माझी कलाकारी - काव्यगायन - पशुपत

Submitted by संयोजक on 17 September, 2024 - 00:44

कविता :

माझ्या उरात दडले, होते सवाल काही…
काटे मनात आणि, ओठी गुलाब काही!

विझले जरी निखारे, राखेत प्राक्तनाच्या…
जाती फुलून ठिणग्या, माझ्या दिलात काही!

पाण्यात वेढलेला, परी राहीलो तृषार्त…
प्राशून आसवांना, सरली तहान काही!

संगीत आणि कंठस्वर : पशुपत
काव्य : सुधीर फाटक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह पशुपत . सुरेख म्हंटलीत गझल. कठीण आहे, गुणगुणायला सुध्दा. तुमच्या आवाजात ला कंप आवडला. तलत मेहमूद च्या जातकुळीतला आवाज वाटतो. खूपच छान.

तुमचा आवाज खूपच सुंदर आहे! चालही आवडली. अवघड असली तरी अगदी चपखल आहे. चाल गझलेच्या शब्दांना न्याय देत आहे.

मस्त..
छान आवाज आहे..
मी धागा यायच्या आधीच मायबोली चॅनेल वर ऐकले होते Happy

अगदी चपखल चाल आहे. 'काही' वरची आंदोलनं फार आवडली.
शब्द, चाल आणि तुमचा आवाज सगळं छान जुळुन आलं आहे. Happy धन्यवाद!

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
कविता वाचणे ऐकणे आणि शक्य झाल्यास त्या स्वरबद्ध करून गाणे हा माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षाचा छंद आहे आणि मेहदी हासन, गुलाम आणि जगजीत सिंग जी यांची गझल अतिशय जास्ती मनापासून ऐकत आल्यामुळे माझ्या चालींचा आणि गाण्याचा बाज हा गझल कडे वळणाराच असतो.
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद !

अगदी चपखल चाल आहे. 'काही' वरची आंदोलनं फार आवडली.
शब्द, चाल आणि तुमचा आवाज सगळं छान जुळुन आलं आहे. Happy धन्यवाद! +१११