तुप, खसखस, तीळ , तांदूळ ,ओले खोबरे , खारीक, बदाम , काजू, पिस्ता, (आवडतील ते ड्राय फ्रुट्स ), शेवया, गूळ, वेलची , जायफळ , सुंठ, मीठ इत्यदि
खसखस १/२ वाटी
तीळ १ वाटी
तांदूळ ३/४ वाटी
नारळ २ मोठे
खारीक १/४ किलो
गूळ १ किलो
शेवया १००-१५० ग्राम ( याचे प्रमाण वाढले तर घट्ट पणा वाढतो , लोक वाढले तर पाणी वाढवता येते Wink )
ड्रायफ्रूट्स ( याचे प्रमाण चांगले झाले तर जास्त फरक पडत नाही, उलट चावून खाताना मस्त वाटते )
बदाम १ वाटी
काजू १ वाटी
पिस्ता १/२ वाटी
जायफळ १/४ युनिट्स (जास्त झाले तर झोप जास्त येते Happy )
सुंठ १.५ मोठा चमचा
वेलची १० युनिट्स
यात आमच्या चवीनुसार ६ लिटर पेक्षा थोडी जास्त होते.
या प्रमाणे आपल्या टार्गेट quantity नुसार रेशो मध्ये बदल करून करा आणि एन्जॉय करा Happy
तूप हे भाजणीची आणि सुरवातीला पातेल्यात खाली चिकटू नये यासाठी आहे. प्युअर वेगन हवं असेल तर तेलाने पण काम चालून जाईल.
आदल्या दिवशी खसखस, तीळ, तांदूळ, बदाम, काजू, पिस्ता भिजवत ठेवावेत.
१) दुसऱ्या दिवशी खसखस, तीळ, तांदूळ, पाण्यात घालुन ब्लेंडर मध्ये बारीक करावेत. हे गाळून याचे दूध वेगळे करून घ्यावे. ३ वेळा हि स्टेप रिपीट करावी. राहिलेला चोथा फेकून द्यावा.
२) ओले खोबरे पाणी घालून ब्लेंडर ला फिरवून घावे. ( याचे दूध काढायचे नाही )
३) बदामाची साले काढून घ्यावीत . बदाम , काजू, पिस्ता तुपात भाजून घ्यावीत.
४) खारीक मधील बी काढून ब्लेंडर मध्ये बारीक करून घ्यावा . ( पाणी न घालता )
५) बारीक झालेली खारीक, तुपात भाजून घ्यावेत.
६) बारीक शेवया तुपात भाजून घ्याव्यात.
६) गूळ विळीवर किसून घ्यावा. ( विरघळायला सोपा जातो )
कृती : हा या पाक कृतीचा सगळ्यात सोपा भाग आहे.
गॅस वर मोठे पातेले ठेऊन त्यात थोडे तूप घालून बदाम , काजू, पिस्ता, खारीक परतून घ्यावे. त्यात स्टेप क्र १ मधील खसखस तीळ आणि तांदूळ यांचे दूध हळूहळू घालावे. यात हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. याला उकळी आली कि स्टेप क्र २ मधील ओल्या नारळाचे द्रावण हळूहळू घालत राहायचे. येथे सुद्धा हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. नंतर किसून ठेवलेला गूळ घालायचा आणि सगळा गूळ पूर्णपणे विरघळू द्यायचा. हे सगळे मिश्रण शिजवत ठेवायचे. नंतर त्यात तुपात भाजलेल्या शेवया टाकायच्या.
या शेवया पूर्णपणे शिजू पर्यंत गॅस सुरु ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचे. या नंतर यात हळू हळू पाणी घालायचे. हे काम चव घेत सुरु ठेवायचे. (इथे दिलेल्या फोटो quantity नुसार ६ लिटर झाले होते.)
अगदी शेवटी त्यात वेलची , जायफळ , सुंठ घालायचे. ( यासाठी थोडा थंड होऊ द्यायचा ). थंड झाल्यावर चवीपुरते मीठ घालायचे.
यात दूध घातले नसल्यामुळे हे २-३ दिवस खराब होत नाही ( शिल्लक हि रहात नाही हा भाग वेगळा). खाताना हवे असेल तर दूध केशर घालून थोडे dilute करून खाऊ / पिऊ शकता. हाताशी २-४ तास निवांत झोपायला वेळ असेल तर पोटभर ओरपावे आणि गुडूप व्हावे.
वाचताना यात खूप सारे तूप तूप आलेय पण शेवटी ते खूप साऱ्या पाण्यात dilute होतं, तुपकट अजिबात लागत नाही.
प्रमाण ठरवताना शिजवणे सुरु असताना टेस्टिंग ला किती लोक आहेत आणि प्रत्येकाला टेस्ट करण्यासाठी किती लागते हे अगोदर हिशोबात धरावे.
अजून अधिक टिपा :
शुद्धलेखनाच्या चुका काढणाऱ्या आणि मराठी इंग्लिश एकत्र झालंय म्हणणाऱ्या लोकांना गरुडपुराणात लिहलंय तसं हा पदार्थ लवकर खायचा योग येत नाही आणि आल्यास फक्त छोटी वाटी वाटणीला येते.
मस्त
मस्त
तीळ तांदळाचे दूध व गुळ
तीळ तांदळाचे दूध व गुळ घातलेली रेसिपी पहिल्यांदाच वाचते आहे. याच्याबद्दल जास्त माहिती वाचायला आवडेल म्हणजे कुठल्या गावात करतात वगैरे. कारण आत्तापर्यंत शीरखुर्म्याच्या रेसिपीमध्ये दूध, साखरच वाचले होते.
वाह वाह निपाजी, किती छान
वाह वाह निपाजी, किती छान स्टेप बाय स्टेप फोटोसह रेसिपी आणि खुसखुशीत लिहिलंय. किती मेहनत आहे यात, कौतुक तुमचं.
रेसिपी वाचूनच चव एकदम भारी
रेसिपी वाचूनच चव एकदम भारी असेल असं वाटतंय. खसखस दूध, नारळ दूध, तीळ, काजू, बदाम, खारीक... तुम्ही कधी करताय तेव्हा बोलवा
आत्तापर्यंत शीरखुर्म्याच्या
आत्तापर्यंत शीरखुर्म्याच्या रेसिपीमध्ये दूध, साखरच वाचले होते. +१. यात शेवयांचं प्रमाणही कमी आहे का?
पण हा प्रकार भलताच रिच आणि कदाचित हेवी आणि उष्ण असेल असं वाटतंय. रंग सुरेख आलाय.
एप्रिलमध्ये रमजानच्या ईदेला एक लिटर दुधाचा शेवया ड्रायफ्रूट्सचा शीर खुर्मा केला होता. शेवया दूध शोषून घट्ट्पणा आणतात हा साक्षात्कार नंतर झाल्याने आणखी दूध घालावं लागलं. त्यात आमंत्रि तांपैकी काहींनी टांग दिल्याने फ्रीजमध्ये ठेवून संपवायला तीनचार दिवस तरी लागले होते.
ईदचा खराखुरा शीरखुर्मा असाच
ईदचा खराखुरा शीरखुर्मा असाच करतात. दूध , शेवया वैगेरे शॉर्ट कट मेथोड्स आहेत. तो प्रकार म्हणजे शेवयाची ड्रायफ्रूट घालून केलेली खीर असं होतो.
याची तयारी करणं वेळखाऊ आहे आणि याची चव पूर्णपणे वेगळी आहे.
यात शेवयांचं प्रमाणही कमी आहे का?>>>
होय भरतजी, शेवया खूप कमी लागतात यात. वर दिलेला फोटो पहा, तेवढ्या शेवया ६ लिटर मध्ये डिस्ट्रीबुट होतात.
या मध्ये शिजलेली खारीक, खोबरे आणि बाकीच्या घटकांचा काढलेला अर्क, त्यामुळे याची चव वेगळी होते. हेवी किंवा उष्ण असं काही वाटत तर नाही. शास्त्राप्रमाणे घागर भर करून मित्र मंडळी सोबत खाणे आणि जवळ नसलेल्याना नेऊन देणे, असा प्रकार आहे हा
भारी रेसिपी
भारी रेसिपी
फायनली माबोवर आली
आयतं खायला येतो next टाइम
प्रमाण फोटोत बघून कळत नाहीये त्यामुळे ग्राम , वाटी अशा स्वरूपात देता येईल का?
रेसिपी भारी वाटते आहे.
रेसिपी भारी वाटते आहे.
घागरभर करणे अशक्य पण एक कप नारळाच्या दूधाकरता बाकीच्या जिनसांचे प्रमाण दिले तर होतकरूंना उपयोगी पडेल.
एक लिटर दूधाकरता >>>> दूध
एक लिटर दूधाकरता >>>> दूध नाहीच्च आहे यात ....
दूध नाहीच्च आहे यात. >>>
दूध नाहीच्च आहे यात. >>> प्रश्न बदलून विचारला आहे :).
Mast recipe. Mala waight gain
Mast recipe. Mala waight gain la upyog hoil ka. Authentic aahe. Mi pahile ekda khalli aahe. Punyat ek Mitra nissan hut ghare hoti tyat rahaicha tyachya ammi jaan ne banavilli hoti.
खसखस , तीळ, तांदूळ यांच्या
खसखस , तीळ, तांदूळ यांच्या राहिलेल्या चोथ्याचे काय केलेत ?
फारच सॉलिड रेसिपी आहे.इतकी
फारच सॉलिड रेसिपी आहे.इतकी मेहनत बहुधा करणार नाही, पण एकदा अश्या कृतीने बनवलेली कुठे विकत मिळाली तर खाऊन बघेन.
यात स्टेप 1 मधल्या 'चोथा फेकून द्यावा' ऐवजी या चोथ्याचे अंघोळीच्या वेळी वापरायला उत्तम इको फ्रेंडली सुरक्षित बॉडी स्क्रब बनेल(आपले रामकृष्ण मिल्स वाले त्यांची तेले काढताना बनलेला चोथा वाळवून स्क्रब म्हणून विकतात.ते त्वचेला लावता येते किंवा एखाद्या ग्रेव्ही भाजीत अधिक पोषण मूल्य म्हणून वापरता येते.)
पण एक कप नारळाच्या दूधाकरता >
पण एक कप नारळाच्या दूधाकरता >> नारळाचे दूध पण नाही आहे .
पण स्केल डाऊन करून घटक टाकतो इथे.
प्रमाण फोटोत बघून कळत नाहीये त्यामुळे ग्राम , वाटी अशा स्वरूपात देता येईल का?>>> नक्कि
Mast recipe. Mala waight gain la upyog hoil ka. Authentic aahe. >>>> होय अमा, ऑथेंटिक आहे. पचायला हलकी आणि एनर्जेटिक आहे, पोटभर प्याल्यावर गरगरीत झोप पण होते.
खसखस , तीळ, तांदूळ यांच्या राहिलेल्या चोथ्याचे काय केलेत ?>>> मिम्स टाकायचा लैच मोह होतोय
चोथा झाडाला खत म्हणून वापरला . सगळ एक्सट्रॅक्ट झाल्यामुळे त्याला अजिबात चव नसते. मी_अनु यांनी लिहिल्याप्रमाणे स्क्रब म्हणून वापरता येईल.
ग्रेव्ही भाजीत अधिक पोषण मूल्य म्हणून वापरता येते.>>> चव आणि पोषण मूल्य काही नाहीत , इन्सोल्युबल फायबर्स म्हणून खाता येईल
छान रेसिपी निपा! सुटीच्या
छान रेसिपी निपा! सुटीच्या दिवशी करायचा व खायचा प्रकार वाटतोय.. करायला १.५ झोपेचा वेळ?
भारी आहे रेसीपी! जरा खटाटोप
भारी आहे रेसीपी! जरा खटाटोप आहे पण सणासुदीची खास पाकृ म्हटल्यावर ते ओघाने आले. फोटोंमुळे पाकृ कळायला मदत झाली पण घटकांच्या प्रमाणाचा अंदाज येत नाहीये. घटक कप, चमचा प्रमाणात दिले तर बरे होईल.
निपा , ते प्रमाणाचं बघा जरा
निपा , ते प्रमाणाचं बघा जरा
उत्तम पाककृती!
उत्तम पाककृती!
'अधिक टिपा' हा विभाग बराच विस्तृत व्हायला हवा होता. त्यात एकदोनच वाक्ये असल्याने घोर निराशा झालेली आहे.
हा तर एकदम व्हिगन शिरखुर्मा
हा तर एकदम व्हिगन शिरखुर्मा झाला की. (तूप आहे पण डालडा वापरले तर व्हिगन होईल )
मस्त आहे रेसिपी. अशी कधीच खाल्लेली नाही. सध्या तरी इतके जड काही करून बघणे होणार नाही. हे खायचे तर खरंच महिनाभर रोजे करावे लागतील.
हे खायचे तर खरंच महिनाभर रोजे
हे खायचे तर खरंच महिनाभर रोजे करावे लागतील. >>> अगदी अगदी. मेहनतही फार आहे. आयती मिळाली तर ठीक.
कागलला जायचं निपाजींकडे, आयतं
कागलला जायचं निपाजींकडे, आयतं खायला.
So much khus khus will make
So much khus khus will make me sleep for 5 hours .I can drink possibly one small cup at a time. I have decided to use suga r and dabur ready coconut milk. Massive aarogya wardhak pey aahe pan . Waiting for proportions.
Excellent ! पारंपरिक आणि
Excellent ! पारंपरिक आणि ऑथेंटिक. शेवटच्या कणभर मिठाच्या टिपसह. जियो.
(Almost) Vegan आहे, lactose intolerance वाल्यांनाही काही अडचण नाही.
शिया मुस्लिम बांधवांकडे हमखास असाच शीर खुरमा घरोघरी करतात. आपल्याकडे दूधयुक्त सेंवई खीर हीच शीर खुरमा म्हणून ओळखली जाते.
रच्याकने
रच्याकने
शीर खुरमा
सेंवई खीर
आब-ए-शाही
मुजाफ़र
शीरविरंज
मोतिया खीर
हैदराबादी शाखोरा फीरनी
मुतन्जन
फीरनी
शाहनुमा
ज़र्दी / जर्द-ए-शाही
ठंडाई
शोला / शोलेह
इराणी + उझबेकी + हिन्दुस्तानी फ़्यूज़नचे हे गोड पदार्थ वरकरणी सारखेच दिसले तरी लागणारे जिन्नस आणि तयार पदार्थांचा बेस, पोत, चव आणि सुगंधामधे खूप फरक आहेत. Volunteers मदतीला आले तर यावर एक सुंदर सिरीज़ होऊ शकेल. इंशागोविंदा !
@अनिंद्य >>>> बरोबर. इराणी
@अनिंद्य >>>> बरोबर. इराणी पदार्थांचा फ्लेवर आणि पोत फार नाजूक असतो. त्यामुळे यातला एक सोडून इतर पदार्थ ट्राय करेन हळूहळू.
Are koni tari kunafa recipe
Are koni tari kunafa recipe taka .
खसखस १/२ वाटी
खसखस १/२ वाटी
तीळ १ वाटी
तांदूळ ३/४ वाटी
नारळ २ मोठे
खारीक १/४ किलो
गूळ १ किलो
शेवया १००-१५० ग्राम ( याचे प्रमाण वाढले तर घट्ट पणा वाढतो , लोक वाढले तर पाणी वाढवता येते )
ड्रायफ्रूट्स ( याचे प्रमाण चांगले झाले तर जास्त फरक पडत नाही, उलट चावून खाताना मस्त वाटते )
बदाम १ वाटी
काजू १ वाटी
पिस्ता १/२ वाटी
जायफळ १/४ युनिट्स (जास्त झाले तर झोप जास्त येते )
सुंठ १.५ मोठा चमचा
वेलची १० युनिट्स
यात आमच्या चवीनुसार ६ लिटर पेक्षा थोडी जास्त होते.
या प्रमाणे आपल्या टार्गेट quantity नुसार रेशो मध्ये बदल करून करा आणि एन्जॉय करा
तूप हे भाजणीची आणि सुरवातीला पातेल्यात खाली चिकटू नये यासाठी आहे. प्युअर वेगन हवं असेल तर तेलाने पण काम चालून जाईल.
शिया मुस्लिम बांधवांकडे हमखास
शिया मुस्लिम बांधवांकडे हमखास असाच शीर खुरमा घरोघरी करतात. आपल्याकडे दूधयुक्त सेंवई खीर हीच शीर खुरमा म्हणून ओळखली जाते.>>>> करायला लागणार वेळ आणि कोस्ट ऑफ प्रोडक्शन या दोन गोष्टी कारणीभूत आहेत ऑथेंटिक कडून दुधाच्या खिरी कडे वळण्यात. अगोदर खसखस चे दूध काढणे हाच एक मोठा कामाचा भाग होता, सध्या हाताशी असलेल्या ब्लेंडर मुळे काम खूप सोप्पं झालं आहे. यात नजाकतीचा भाग म्हणजे शिजलेली खारीक खोबरे आणि चावून खाताना लागणारे ड्रायफ्रुटस , याचे जे टेक्श्चर फील होते , ते आहे. शेवटी सुंठ , जायफळ आणि खसखस दूध याची चव रेंगाळते.
कागलला जायचं निपाजींकडे, आयतं
कागलला जायचं निपाजींकडे, आयतं खायला.>>> निदान त्यासाठी तर या , घागर भर करून ठेवतो.
So much khus khus will make me sleep for 5 hours >>> अमा , कुठे आपल्याला खाऊन झाल्यावर खड्डे काढायला जायचे आहे ? खाणे का पिणे का मस्त आराम करनेका
रेसिपी छान आहेच.
रेसिपी छान आहेच.
मला हे नव्याने कळलं. मीपण आतापर्यंत जास्त खजूर,काजू,बदाम आणि केशर घातलेल्या घट्ट खिरीलाच शीरखुर्मा म्हणायचे.ऑफिस मध्ये लोक तेच आणतात(अर्थात सोयीचा भाग.)
या इथल्या रेसिपी वाला खुर्मा स्वीगी वर पुण्यात कुठे मिळेल?
Pages