
तुप, खसखस, तीळ , तांदूळ ,ओले खोबरे , खारीक, बदाम , काजू, पिस्ता, (आवडतील ते ड्राय फ्रुट्स ), शेवया, गूळ, वेलची , जायफळ , सुंठ, मीठ इत्यदि
खसखस १/२ वाटी
तीळ १ वाटी
तांदूळ ३/४ वाटी
नारळ २ मोठे
खारीक १/४ किलो
गूळ १ किलो
शेवया १००-१५० ग्राम ( याचे प्रमाण वाढले तर घट्ट पणा वाढतो , लोक वाढले तर पाणी वाढवता येते Wink )
ड्रायफ्रूट्स ( याचे प्रमाण चांगले झाले तर जास्त फरक पडत नाही, उलट चावून खाताना मस्त वाटते )
बदाम १ वाटी
काजू १ वाटी
पिस्ता १/२ वाटी
जायफळ १/४ युनिट्स (जास्त झाले तर झोप जास्त येते Happy )
सुंठ १.५ मोठा चमचा
वेलची १० युनिट्स
यात आमच्या चवीनुसार ६ लिटर पेक्षा थोडी जास्त होते.
या प्रमाणे आपल्या टार्गेट quantity नुसार रेशो मध्ये बदल करून करा आणि एन्जॉय करा Happy
तूप हे भाजणीची आणि सुरवातीला पातेल्यात खाली चिकटू नये यासाठी आहे. प्युअर वेगन हवं असेल तर तेलाने पण काम चालून जाईल.
आदल्या दिवशी खसखस, तीळ, तांदूळ, बदाम, काजू, पिस्ता भिजवत ठेवावेत.
१) दुसऱ्या दिवशी खसखस, तीळ, तांदूळ, पाण्यात घालुन ब्लेंडर मध्ये बारीक करावेत. हे गाळून याचे दूध वेगळे करून घ्यावे. ३ वेळा हि स्टेप रिपीट करावी. राहिलेला चोथा फेकून द्यावा.
२) ओले खोबरे पाणी घालून ब्लेंडर ला फिरवून घावे. ( याचे दूध काढायचे नाही )
३) बदामाची साले काढून घ्यावीत . बदाम , काजू, पिस्ता तुपात भाजून घ्यावीत.
४) खारीक मधील बी काढून ब्लेंडर मध्ये बारीक करून घ्यावा . ( पाणी न घालता )
५) बारीक झालेली खारीक, तुपात भाजून घ्यावेत.
६) बारीक शेवया तुपात भाजून घ्याव्यात.
६) गूळ विळीवर किसून घ्यावा. ( विरघळायला सोपा जातो )
कृती : हा या पाक कृतीचा सगळ्यात सोपा भाग आहे.
गॅस वर मोठे पातेले ठेऊन त्यात थोडे तूप घालून बदाम , काजू, पिस्ता, खारीक परतून घ्यावे. त्यात स्टेप क्र १ मधील खसखस तीळ आणि तांदूळ यांचे दूध हळूहळू घालावे. यात हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. याला उकळी आली कि स्टेप क्र २ मधील ओल्या नारळाचे द्रावण हळूहळू घालत राहायचे. येथे सुद्धा हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. नंतर किसून ठेवलेला गूळ घालायचा आणि सगळा गूळ पूर्णपणे विरघळू द्यायचा. हे सगळे मिश्रण शिजवत ठेवायचे. नंतर त्यात तुपात भाजलेल्या शेवया टाकायच्या.
या शेवया पूर्णपणे शिजू पर्यंत गॅस सुरु ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचे. या नंतर यात हळू हळू पाणी घालायचे. हे काम चव घेत सुरु ठेवायचे. (इथे दिलेल्या फोटो quantity नुसार ६ लिटर झाले होते.)
अगदी शेवटी त्यात वेलची , जायफळ , सुंठ घालायचे. ( यासाठी थोडा थंड होऊ द्यायचा ). थंड झाल्यावर चवीपुरते मीठ घालायचे.
यात दूध घातले नसल्यामुळे हे २-३ दिवस खराब होत नाही ( शिल्लक हि रहात नाही हा भाग वेगळा). खाताना हवे असेल तर दूध केशर घालून थोडे dilute करून खाऊ / पिऊ शकता. हाताशी २-४ तास निवांत झोपायला वेळ असेल तर पोटभर ओरपावे आणि गुडूप व्हावे.
वाचताना यात खूप सारे तूप तूप आलेय पण शेवटी ते खूप साऱ्या पाण्यात dilute होतं, तुपकट अजिबात लागत नाही.
प्रमाण ठरवताना शिजवणे सुरु असताना टेस्टिंग ला किती लोक आहेत आणि प्रत्येकाला टेस्ट करण्यासाठी किती लागते हे अगोदर हिशोबात धरावे.
अजून अधिक टिपा :
शुद्धलेखनाच्या चुका काढणाऱ्या आणि मराठी इंग्लिश एकत्र झालंय म्हणणाऱ्या लोकांना गरुडपुराणात लिहलंय तसं हा पदार्थ लवकर खायचा योग येत नाही आणि आल्यास फक्त छोटी वाटी वाटणीला येते.
या इथल्या रेसिपी वाला खुर्मा
या इथल्या रेसिपी वाला खुर्मा स्वीगी वर पुण्यात कुठे मिळेल? >>> चांगली बिझिनेस आयडिया
दमदार रेसिपी
दमदार रेसिपी
----×ו××----
ता. क
दिवाळीच्या उटण्यात तो चोथा वापरून एनरीच अमुक तमुक व्हिटामिन प्रोटीन लेबल लावून मार्केटिंग करायला हरकत नाही.
प्रमाणासाठी धन्यवाद निपा!
प्रमाणासाठी धन्यवाद निपा!
प्रमाण आले
प्रमाण आले
प्रमाणाबद्दल धन्यवाद.
प्रमाणाबद्दल धन्यवाद.
दूध, खीर आवडत नाही त्यामुळे हा करूनबघायचा मानस आहे.
6 लि नाही एखादे लिटर करून बघेन
या इथल्या रेसिपी वाला खुर्मा
या इथल्या रेसिपी वाला खुर्मा स्वीगी वर पुण्यात कुठे मिळेल? >>> चांगली बिझिनेस आयडिया >>> सेम मनात आलं. निपाजी सुरू करा branches, मुंबई पुण्यात.
Hi nipa good morning. If you
Hi nipa good morning. If you make premix in proportion ir will be very helpful. . Use coconut powder and gul powder. Call or power mix or something. And one sachet to boil for one cup a day.
पण काळजी घ्यायला लागेल, एकदम
पण काळजी घ्यायला लागेल, एकदम कोरडं, एकदम व्हॅक्युम पॅक ची.खोबरं लगेच खवट होतं.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
लॅक्टोज intolerance वाल्या भाचीसाठी आईने असेच ओल्या खोबऱ्याच्या वाटणातील शेवयांची खीर केली होती. दुधाऐवजी ओल्या खोबऱ्याची खीर जास्त चांगली लागली होती.
एक सुंदर सिरीज़ होऊ शकेल.
एक सुंदर सिरीज़ होऊ शकेल. इंशागोविंदा ! >> मजा ही आ जायेगा.
बाकी रेसिपी तुफान टेस्टी असेल पण इतके पेशन्स नाहीयेत. त्यापेक्षा मुस्लिम मित्रांपैकी कोणी शिया असेल तर शोधणं बर किंवा swiggy जिंदाबाद ..
प्रमाणाकरता धन्यावाद.
प्रमाणाकरता धन्यावाद.
Pages