प्रकाशचित्रांचा झब्बू ४ - माझे शेत/ माझी बाग

Submitted by संयोजक on 13 September, 2024 - 09:49

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

माणसाच्या आयुष्याची मुलभूत गरज.... प्राणवायू व अन्न. हे दोन्ही आपल्याला मुबलक प्रमाणात देणारी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षवल्ली.
आपण शहरात, देशात, परदेशात, गावात, खेड्यात कुठेही रहात असलो तरी या ना त्या प्रकारे या वृक्षवल्लींशी नाते जोडून ठेवतो. कोणाची स्वतःची एकराने शेती असेल तर कोणाची परसातली बाग तर कोणाची छोटीशी गच्चीवरची किंवा टेरेसवरची बाग..

यावेळेसचा झब्बूचा विषय हाच आहे. माझे शेत/ माझी बाग. तुमची एकरो शेती असो किंवा दोन चार कुंड्यांमधे हौसेने केलेली लागवड, आमच्यासोबत त्याची छायाचित्रे नक्की शेअर करा.....

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मध्यलोक, हे ते भिजणं आणि एंजॉय करणं..
आधीच्या फोटोत उंची कमी वाटली तरी सव्वा पुरुष उंची आहे भिंतीची..


आमच्या बागेतील पावसाळी प्रवाहावर बांध घालून बनवलेला मिनी धबधबा..>>> अप्रतिम!!!

नागपूर, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात आहेत शेतजमिनी>>>>

बरेचसे फोटो श्रीमंती धाग्यावरही उठून दिसतील.

Pages