अंत: अस्ति प्रारंभ: - १ - मोहीम फत्ते - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 16 September, 2024 - 08:24

लाल महालात नुसता हलकल्लोळ माजला होता. सगळेजण सैरावैरा धावत होते. झोपेत अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळेच बेसावध होते. राजांनी आपल्या मावळ्यांबरोबर पक्का डाव आखला होता. शाहिस्तेखान पक्का तावडीत सापडला होता पण त्याच्या सुदैवाने त्याच्या बोटांवरच निभावले. इतक्यात महालाबाहेर खानाचे सैनिक सावध झाल्याचा इशारा ऐकू आला. इतर सगळे सावध व्हायच्या आत महाराज सिहंगडाकडे जायला निघाले. मोहीम फत्ते झाली होती.
आता शाहिस्तेखानाचे सैन्य देखील त्यांचा पाठलाग करू लागले. महालाच्या बाहेर काही अंतरावर आधीपासूनच काही मावळे थांबले होते. महाराजांनी इशारा करताच त्यांनी बैलांच्या शिंगाला मशाली बांधल्या आणि दिले त्यांना कात्रजच्या घाटाच्या दिशेने सोडून.... शाहिस्तेखानाच्या सैन्याने उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्या रस्त्याकडे धाव घेतली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults