Submitted by Abuva on 11 September, 2024 - 05:32
लग्नाच्या नवलाईत होरपळणारी वर्षा आतुरतेनं मान्सूनची वाट पहात होती. वाटायचं, ऋतू बदलला की माणसं बदलतील! पावसानं मात्र वर्दी दिली ती सरत्या आषाढात! आठवड्यातभरात हिरवाई लेऊन सृष्टी सुखावली.
मोठ्या मिनतवारीनं तिनं समीरला रविवारी घराबाहेर काढलं. घाटरस्त्याला गाडी वळली, तोच घनघोर बरसात सुरू झाली. डोंगरकपारींतून खळाळते झरे, अन् कड्यांवरून झेपावणारे धबधबे दिसू लागले. समोरच उफाळता धबधबा बघताच वर्षाच्या उत्साहाला उधाण आलं. तिनं गाडी थांबवायला लावली. तारुण्यसुलभ ऊर्मीनं पावसात मनसोक्त भिजू, नाचू लागली. भिजतच तिनं समीरचा हात धरून त्याला गाडीबाहेर ओढला. त्यानं तिचा हात झिडकारला आणि कर्कशला, "चवचाल साली!"
माथी वीज कोसळावी तशी स्तंभित झाली वर्षा.
ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान जमलीय!!
छान जमलीय!!
त्या समीरला एक अक्कल नाही
त्या समीरला एक अक्कल नाही
पण तुम्ही तरी एका रंगात आलेल्या तरुण स्त्रीवर इतका अन्याय होऊ द्यायला नको होता मालक !!
त्याच कड्यावरून ढकलून द्यायला
त्याच कड्यावरून ढकलून द्यायला हवं होतं.
जमलीय कथा….
आवडली!
आवडली!
मस्त जमलीये!
मस्त जमलीये!
जमलीये कथा..
जमलीये कथा..
पण लगेच त्या पुरुषाला दोष नको.. ते फक्त एकमेकांसाठी बनले नव्हते इतकाच पहिला निष्कर्ष हवा.
आईग्गं. कथा जमलीये मात्र.
आईग्गं. कथा जमलीये मात्र.
मस्त जमलीये!
मस्त जमलीये!
मला चक्क कळलेली शशक.. मस्त..
मला चक्क कळलेली शशक..
मस्त..
ओह्ह... ओह्ह!
ओह्ह... ओह्ह!
कोरडे? तो कोरडा ती मेलेली
भारी लिहीलीयेत.
भारी लिहीलीयेत.
ती कधी मेली? म्हणजे मला नाहीच
ती कधी मेली? म्हणजे मला नाहीच कळली का
मृ, अशी वीज कोसळल्यावर ती
मृ, अशी वीज कोसळल्यावर ती (मनाची अवस्था) जिवंत असून नसल्यासारखीच की.