गणेशोत्सव २०२४ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 12:00

नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव! या 'मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!
पंचवीस वर्षे हा एक खूप महत्त्वाचा मैलाचा दगड. गणरायाच्या कृपेने आणि मायबोलीकरांच्या अलोट प्रेमाने, ओसंडणार्‍या उत्साहाने आजवरची ही वाटचाल आपल्या मायबोली परिवाराला शक्य झाली. मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सग्या-सोयर्‍यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणेश चरणी प्रार्थना. _/\_

सालाबादप्रमाणे या विद्या आणि कलांच्या अधिपतीचा जागर करायला इथे जमलेल्या सगळ्या मायबोलीकरांचे सहर्ष स्वागत.
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!

श्लोक : सुप्रिया जोशी यांच्या आवाजात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
लंबोदर तू विनायक तू चिंतामणी मोरया!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

मोरया!

गणपती बाप्पा मोरया!
मंडळाचे २५ व्या वर्षासाठी हार्दिक अभिनंदन. मंडळाची अशीच वर्षानुवर्षे वाटचाल असुदे रे बाप्पा.

अरेच्च्या! श्लोक मी मिस् केला काल! अगदी सुश्राव्य आणि प्रसन्न गायला आहे! Happy

गणपती तुझे नाम चांगले। आवडे बहू, चित्त रंगले।
प्रार्थना तुझी गौरिनंदना। हे दयानिधे, श्रीगजानना॥

Pages