Sometimes

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2024 - 02:43

अमेरिकन कवी थॉमस एस. जोन्स यांची "Sometimes" ही एक अल्पाक्षरी कविता.

लहानपणी ध्यानी, मनी, स्वप्नी उराशी बाळगलेल्या व पुढे जगण्याच्या धडपडीत नामशेष होऊन स्मरणमात्र उरलेल्या आपल्या महत्वाकांक्षांबद्दलचं हृदयस्पर्शी भाष्य म्हणजे ही कविता.

ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा माझा प्रयत्नः

ACROSS the fields of yesterday
He sometimes comes to me,
A little lad just back from play—
The lad I used to be.

And yet he smiles so wistfully
Once he has crept within,
I wonder if he hopes to see
The man I might have been.
========================

कधितरी...
----------
भेदून पटल काळाचे
तो कधितरी भेटिस येतो
येताना अवघे माझे
तो शैशव लेऊनी येतो

का त्याच्या चेहेर्‍यावरचे
हसणे अवचित काजळते?
माझ्या हत आकांक्षांचे
का पिशाच्च त्याला दिसते?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मूळ कविता आणि भावानुवाद दोन्ही ही सुंदर...
बालपणीची सावली मज आज भेटली होती
किती शिळा मी, ती तशीच ताजी होती

खूपच छान
द सा यांच्या दोन ओळीही किती हृद्य!