संध्याकाळी बाल्कनीत बसलो होतो.सूर्य नुकताच अस्त होत होता ,छान गार वारा सुटला होता. वातावरण अगदी मस्त होतं , का कोणास ठाउक गरम गरम बटाटे वडे खायची इच्छा उफाळून आली .गायत्री (माझी बायको) ला विचारल की गरम गरम बटाटे वडे खाणार का म्हणून ?
नाक्यावर मंगेश वडे वाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटे वडे मिळतात संध्याकाळी या वेळेला. गायत्रीला सुद्धा बटाटे वडा आवडतो, ती हो म्हणाली . मी कपडे चढवले आणि खाली उतरलो .
खरं तर काही कारण नाही पण सहज विचार आला , आई मला बटाटे वडा खणायची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारी ला ही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या आत गरमागरम बटाटे वडे आणि चहा समोर असता ! आईची माया तिची , मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपुर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही . बटाटे वडे घेऊन घरी आलो , गायत्रीने चहा करायलाच टाकला होता. दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यांवर ताव मारला आणि चहा ढोसला . मन अगदी तृप्त झालं.
रात्री झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोधडी काढायला सांगितली .आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यां पासून बनवलेली गोधडी .तलम तरीही आश्चर्यकारक पणे उबदार. आईच्या कुशीत शिरल्याची जाणिव करुन देणारी ती गोधडी.जादुची गोधडी.आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली ती गोधडी.
पूर्वी लहान असताना अशीच आईची उबदार गोधडी घेऊन मी बाबां जवळ झोपायचो .रात्री झोपतांना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचच नाहीं.
आज कितीतरी वर्षांनी झोपतांना आईची गोधडी पांघरून घ्यावीशी वाटली ,तलम आणि उबदार अशी .आईच्या कुशीत शिरल्या सारखे वाटले एकदम .सर्व भिती ,काळजी ,त्रास कुठच्या कुठे पळून गेला. सगळं हलकं हलकं वाटायला लागलं , मनांत आनंद दाटून आला. आई प्रेमाने माझ्या केसांना तेल लावत आहे असे वाटत होते . आईच्या तोंडून तिच्या आवडत्या गाण्याची लकेर आली .......
अंगावरी पांघरूण घेऊनिया काळे ,
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले .
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून ,
पिता तो जगाचा आहे जागत अजुनी
प्रेमाची उब भासत होती .मला गुंगी लागली. झोपेने कधी ग्रासले ते कळलेच नाही .
शुक्रवार ३०/०८/२०२४ ०८:२६ PM
अजय सरदेसाई (मेघ)
छान आठवण.
छान आठवण.
>>>अंगावरी पांघरूण घेऊनिया काळे ,
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले .
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून ,
पिता तो जगाचा आहे जागत अजुनी
वाह! सुरेख चारोळी.
पूर्ण कविता सापडली. ती अशी
पूर्ण कविता सापडली. ती अशी आहे -
नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
काळजी जगाची सार्या आहे भगवंता !
अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून
ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला, तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी, झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
नको जागू, झोप आता, पुरे झाली चिंता
काळजी जगाची सार्या आहे भगवंता"
@सामो ,संपूर्ण कविता शोधून
@सामो ,संपूर्ण कविता शोधून काढल्या बद्दल धन्यवाद " You made my day " , मला थोडीशीच आठवत होती , कवी कोण आहेत या कवितेचे ?
मनापासून धन्यवाद
बोरिवलीचे का तुम्ही ?
नाक्यावर मंगेश वडे वाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटे वडे मिळतात संध्याकाळी या वेळेला.>>>>>>>>>>>>>
बोरिवलीचे का तुम्ही ?
@Ajnabi ,
@Ajnabi ,
हो मी बोरिवलीचाच आणि मंगेश वडेवाला ही तुम्हाला वाटला तोच .
वर्ल्ड इज अ स्मॉल प्लेस आफ्टरऑल .
प्रतिक्रिये बद्दल मना पासुन आभार .
@Ajnabi ,
@Ajnabi ,
हो मी बोरिवलीचाच आणि मंगेश वडेवाला ही तुम्हाला वाटला तोच .
वर्ल्ड इज अ स्मॉल प्लेस आफ्टरऑल .
प्रतिक्रिये बद्दल मना पासुन आभार .
>>>>>>>कवी कोण आहेत या
>>>>>>>कवी कोण आहेत या कवितेचे ?
नाही माहीत मेघ.
>>>आईने माझ्यासाठी प्रेमाने
>>>आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यां पासून बनवलेली गोधडी .तलम तरीही आश्चर्यकारक पणे उबदार.
वाकळ असा एक शब्द आहे त्याला.
मस्त लिहिले आहेत.
अतिशय सुंदर,साधे हृदयाला
अतिशय सुंदर,साधे हृदयाला भिडणारे लिहलय.... असं लिखाण कठीण असते
@बेफिकीर , धन्यवाद
@बेफिकीर , धन्यवाद
@ रेव्यू , मनापासून धन्यवाद
@ रेव्यू ,
मनापासून धन्यवाद
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!