सु. शि. : एक अनुभव

Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53

सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधानिशा तुमचे " दोन - तीन टेम्प्लेट मॉडेल निर्माण केली आहेत -" हे म्हणणे एकदम पटले. एकदा चटकदार शैली नि वेगळे कथानक ह्यापलीकडे गेलो हे प्रकर्षाने जाणवते.

प्रतिकार मधली नायिका एकदम तडफदार वगैरे असताना पण अगदीच बुळबुळीत वागते असे दाखवलय जे अजिबात मन्य करवत नाही.

सुशिंच्या कथा चित्रपटासाठी किंवा चित्रपटावरून बेतलेल्या असाव्यात असे वाटायचे. त्या वेळी बड्या साहित्यिक मंडळींच्या लिखाणात जे नसायचे ते पुरवायचे काम सुशिंनी केले. तरूणाईची भाषा आणली. बर्‍याच निषिद्ध गोष्टी मुद्रित साहित्यात आणल्या.

त्या वेळच्या त्यांच्या कथांना आजच्या मापात कसे तोलावे समजत नाही.
आजच्या कित्येक संज्ञा, वाद यापासून ते दूर असावेत. सोशल मीडीया आल्यापासून अनेक सुशिक्षित / उच्चशिक्षित पुरूषांचे सोशल एज्युकेशन सुरू झाले आहे. Proud
त्यांच्या लिखाणात उजवी विचारसरणी डोकवायची. मिठाचा खडा बाजूला सारावा तशी सारून इfunction at() { [native code] }हेचा आनंद घ्यावा हा विचार करायचो. त्यांची विचारसरणी तशी असताना त्यांनी बळेच पुरोगामी बनून लिखाण केलं असतं तर ते प्रामाणिक नसतं वाटलं.
मतं चुकीची / बरोबर असतील पण प्रामाणिक होती.

त्या वेळी पुरूषांकडून स्त्री पात्रांचे वैविध्य अचूकतेने रंगवणे हे कमी लोकांना जमत असेल. मुला मुलींच्या वेगळ्या शाळांचा काळ तो. मोकळ्या स्त्री पुरूष संवादाचा अभावच अभाव. थोडक्याच लोकांना स्त्री समजून घेता येत असेल. तसेही त्या काळात सामान्य माणसाला स्त्रीचे वैविध्य फारसे आढळतच नसेल. एक म्हणजे आपल्या आजूबाजूची चूल, मूल,सोशिक घरगुती स्त्री किंवा मग प्रोतिमा बेदी.

सोशल मीडीयावर अनेक लोक लिहिते झाले खरे पण जेव्हां त्यांच्या कथेत महिला पात्राच्या तोंडी संवाद द्यायची वेळ येई तेव्हां ते गडबडत असत. काँग्रेस आणि भाजप अशा दोन तंबूत वावरावे तसे स्त्री पुरूष वावरत असत. Proud (स्त्रियांचे आयडी चालवणारे पुरूष यामुळेच ओळखू येतात Lol )

सुशिंची बिनधास्त स्त्री पात्रं ही दीवार मधल्या परवीन बाबीला डोळ्यासमोर ठेवून आली असतील.

आचार्य, पुण्यात आहात ना? अक्षरधारा मधे आहेत की सुशिंची बरीच पुस्तकं! तिथे मिळतंय का पहा कणाकणाने.

वंडर ट्वेलव म्हणजे सोन्याची चित्रं वालं ना?ओके टाईप्स आहे ते.
निमित्तमात्र पण चांगलं आहे.अजून एक वाचलं होतं. मजेशीर होतं.एक ट्रेनी भूत असतं त्याला गायबच होता येत नाही असं.
'अखेर' पण आवडायचं.

ते रिटर्न करतोय. आता विचारल्यावर वाचून मग रिटर्न करावं असा (बेकायदेशीर) विचार डोक्यात आला. Lol

. मजेशीर होतं.एक ट्रेनी भूत असतं त्याला गायबच होता येत नाही असं. >> लटकंती म्हणायचे असावे बहुधा ! ते भूत नसते तर "मधे" अडकलेला आत्मा असतो. महान प्रकरण आहे हे पुस्तक. दुर्दैवाने फार्च कमी जणांना माहित आहे.

सु शिं चा एक अनुभव मस्त होता.
एकदा मित्राच्या वडलांना बघायला हॉस्पिटलला गेलो होतो. आई म्हणाली कि असं टी शर्ट जीन्स मधे जाणं बरं वाटत नाही हॉस्पिटलला. मी म्हणालो कि ज्याला भेटायला चाललोय तो काही शहाणा नाही.
गेलो तर हा थ्री पीस मधे स्वागताला. आईने विचारलं "तू कुठे बाहेर चालला आहेस का ?" तर म्हणाला "नाही, इथेच ड्युटी आहे आज"
मग समजलं कि आयसीयू मधे त्याच्या वडलांना ठेवलं होतं त्याच्या शेजारीच एका मुलीच्या आईला ठेवलं होतं. दोघांची मैत्री झाली. त्यामुळं हा बाहेर जाऊन अर्जंट थ्री पीस शिवून आला.

हा किस्सा आम्ही (रूबी हॉलच्या) व्हरांड्यात स्टीलच्या खुर्च्यात बसून एकमेकांना टाळ्या देत सांगत होतो. माझा भाऊ म्हणाला कि हे सुशिंना सांगायला पाहिजे, त्यांच्या पुढच्या भयकथेत ताण कमी करायला नक्की टाकतील.

त्यावर शेजारी बसलेला माणूस म्हणाला "अरे तुम्ही फडतूस सुहास शिरवळकर वाचता का ?"
आम्ही आधी आगंतुक माणसाकडे तु क टाकला. पण त्याचा चेहरा इतका मिस्कील होता कि आम्ही त्याला लेक्चर देऊ लागलो.
खूप वेळ त्याने आम्हाला उकसवल्यावर मग ओळख करून दिली.
" मीच तो सुहास शिरवळकर "
असला जबराट धक्का बसला होता.

असाच धक्का एकदा पु लं च्या टिव्हीवरच्या कार्यक्रमाच्या निर्मात्याने (प्रदीप भिडे) यांनी दिला होता.

ट्रेनी भूत >>> हे पुस्तक मलाही नाही आठवत आहे.

मला 'मूड्स' आवडलं होतं सुशिंचं.

आचार्य, किस्सा मस्त आहे.

कधीतरी वेबवर शोधून हे जॉट करून ठेवलं होतं. दर्दींनी उत्तरं द्यावीत. टिक उमटला तर ती उत्तरं मला माहित आहेत. ही खरी टेस्ट आहे. Happy

१] मोटेल दिलखुलास चे प्रस्तावीत मुळ नाव काय?
२]'बोगम' हे पात्र कोणत्या कादंबरीत आहे?

३]'फ्रिस्टी' हा उल्लेख कोणत्या कादंबरीत आहे?

४]दुनियादारी कादंबरीत प्रितम व श्रेयस रुपाली होटेल मध्ये कोणती दोन गीते ऐकतात?
व त्यांचे गायक कोण? √ ( खूपच बाळबोध)
५]'पद्या' नावाचे निखालस रिकामटेकडे पात्र कोणत्या पुस्तकात आहे?

६] न्यायाधीश खुनी असलेली कादंबरी कोणती?
७]दारा व अस्लम एक अतिशय जहाल मादक पेय पितात्,त्याचे नाव काय?
 - ह्याकरता मी दाराची सगळी पुस्तकं पालथी घातली, हे वाचलेलं आठवतंय, पण आता माहित नाही. खजिना वगैरे ...
८]अमर विश्वास ची सचिव मोहिनि हीचे मुळ नाव काय?

९] सु.शिं.च्या पुस्तकांमध्ये दोन सुप्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्श़कांच्या नावावर बेतलेली
पात्रे येतात्.ती कोणती?(एक दिगदर्शकाचे टोपण नाव)
 - Too vague! But of course it is Goldie (Vijay Anand) Happy
१०]पीटर गायकवाड हा कोणत्या कादंबरीत नायक आहे?

5. हा बहुतेक निमित्तमात्र मध्ये(यात अविनाश आणि अलका पळून जाऊन लग्न करतात.) पण या उत्तराबद्दल श्यूअर नाही.तुक्का.

आधीचे आले नाहीत.पण अजून प्रश्न देते नवे
11. श्रीरुप साधले हे नाव कोणत्या कथेत आहे?
12. नक्षब, किलवर आणि राणू हे गुंड कोणत्या कथेत आहेत?
13. नॅन्सी शोराब्दो ही बार डान्सर कोणत्या कादंबरीत आहे?(हॉटेल आणि कादंबरीचे नाव एक)
14. सन्मित्र ओक व जोगदंड कोणत्या कादंबरीत आहेत?
15. नितीन सदाशिव घोडके कोणत्या कादंबरीत आहे?
16. बिप्लवा बॅनर्जी कोणत्या कादंबरीत आहे?

(सर्व हिट आणि सोप्या कादंबऱ्या आहेत)

Nice.

११. निमित्तमात्र
१३. शॅली शॅली. बाय द वे ती नॅन्सी शोबारादो आहे.
१४. झूम
१५. दुनियादारी

१२ आणि १६ शोधायला लागेल.

5. हा बहुतेक निमित्तमात्र मध्ये(यात अविनाश आणि अलका पळून जाऊन लग्न करतात.) पण या उत्तराबद्दल श्यूअर नाही.तुक्का. ———- नाही. पद्या ’जाई’मध्ये आहे.

5. हो, आता आठवलं.जाई ही कादंबरी इतकी दुःखी आहे की मी सोयीस्करपणे विसरते.
मेख: ओके बरोबर. आता आठवलं.

तुम्हा सर्वांना इतकं कसं आठवतं, अर्थात मी सु शि प्रेमी नव्हते, त्या त्या टप्प्यावर काही वाचल्यात, ते इथेच सुरुवातीला लिहीलं असणार. कॉलेज मैत्रीणी जीव ओतायच्या तेवढं काही वाटायचं नाही.

Pages

Back to top