झटपट होणा-या हळदीच्या पानातील सुगंधी पातोळ्या.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 August, 2021 - 10:09

हळदीच्या पानातील पातोळ्या हा कोकणातील आवडता नैवेद्याचा पारंपारिक पदार्थ. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी जिन्पनसात होणारा हा मधुर एक चवदार पदार्थ आहे. नैवेद्यासाठी, नाश्त्यासाठीही हा पातोळ्यांचा प्रकार कमी वेळ असताना करायला असदी सोयीस्कर पडतो. पीठ व मीठ घालून दाटसर पेस्ट करायची. आपल्या मोदकांच्या सारणाला करतो तसेच ओला नारळ, गुळ वेलची व आवडत असल्यास सारणाची श्रीमंती वाढवायला थोडे आवडते ड्रायफ्रुट घालून मस्त चवदार सारण बनवायचे. हळदीची हिरवीगार पाने घेवून त्यावर तांदळाची हळुवार भिजवलेली पिठी पसरवून त्यात ओल्या नारळाचे सोनेरी सारण भरायचे मग वाफवून तयार होतात हळदीच्या अनोख्या सुगंधाच्या, गुळखोब-याच्या स्वर्गिय गोड चवीच्या गरमागरम मऊ लुसलुशीत पातोळ्या. याला काही हळदीचा रंग येत नाही पण अप्रतिम सुगंध येतो व वाफवत असतानाही तो दरवळत असतो. खालील लिंक उघडून पातोळ्या करण्याची पद्धत पहा.
https://youtu.be/zYWAWixb3xU

IMG_20210813_065737_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच प्रकार आहे हा...! एकदम तोंपासु...!!

जागूकाके, तुझो ह्यो व्हिडीओ बघलंय तर माका माईन तिचो वाड्यार आलेल्या पाटणकरणीक ह्यां पातोळ्या शिकवल्यानी तां भाग आठवल्यान.

मस्तच ग जागू.
मी खास यासाठी कुंडीत हळद लावली होती. हळदीचा काय सुंदर वास येतो हे उकडताना . .

हवीच होती ही रेसिपी. ऐकून होते फक्त.
कुंडीत हिरवीगार पाने फुटलेली आहेत, डिटेल रेसिपी ,नारळ, गूळ, पिठी आहे बस करायचीच खोटी आहे.
नक्की करणार.

आज केल्यात जागुतै.
पण आम्ही पानाच्या शिरेवर दुमडून करतो.
हा झब्बू
20210814_173042.jpg

खूप छान.
हल्ली तुमचे धागे येत नाहीत जागू ताई

पातोळ्या म्हटले की पाहिले सुगंधच डोक्यात येतो. गंध स्पर्श चव.. सगळी इंद्रिये सुखावणारा पदार्थ आहे हा Happy