जुन्या गाद्या कशा डीस्पोज करायच्या?

Submitted by केशवकूल on 27 August, 2024 - 08:02

जुन्या गाद्या कशा डीस्पोज करायच्या? कुणी घेऊन जाणारा असेल तर मी वर पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला हा प्रश्न कधी पडला होता का? कसा सोडवला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल + १, जवळपास गाद्यांची दुकाने असतील तर त्यांना विचारा. फुकट म्हटल्यावर नेतातच ते. तुम्हाला वर पैसे द्यायची गरज नाही.

कापसाच्या जुन्या गाद्या डिस्पोज करणे खुप कठीण आहे. गादी कारखाना वाले घेत नाहीत. अश्याच कोणाला देऊ म्हटलं तरी कोणाला ही नको असतात.

आम्ही शेवटी घंटा गाडी वाल्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी नेल्या. नेण्याचे पैसे ही दिले अर्थातच. त्या गाद्या ते कळवा खाडीत टाकून देणार अस त्या वेळी त्यांनी मला सांगितलं होतं. मला ते आवडलं नव्हत, पटल नव्हत अर्थातच, पण माझ्या कडे दुसरा पर्याय नव्हता.

गाद्या सुस्थितीत असतील आणि इतर काही कारणांमुळे डिस्पोज करत असाल तर मदतनीस वगैरेंना विचारून बघा. माझ्या मदतनीस मुलीने नेली होती.

आम्ही गादी कारखान्यात गेलेलो गाद्या घेता का विचारायला.. २०२१ ची गोष्ट.. फुकट सुद्धा नको म्हणाले.. पण तेव्हा करोना संपला नव्हता.. कदाचित त्यामुळे ते नाही म्हणाले असावेत असा अंदाज .. वर तो म्हणाला अजून ४ ठिकाणी विचारले तरी नाही घेणार .. खरोखर पुढे २-३ ठिकाणी विचारले त्यांनी नाही घेतल्या.. आम्ही त्या अशाच कोणालाहव्यात कोणाला हव्यात ? असे करत करत विकल्या /फुकट दिल्या गाद्या व उशा ..

फिर भी लक अजमावके देखो

फुकट गाद्या म्हटलं की घेणाऱ्यांना शंका येते की त्यावर मयत झाल्याने देत आहेत. घेत नाहीत.
ते धूड एवढे मोठे असते की आपल्यालाही कुठे नेऊन टाकतात येत नाही. जागा सोडून जायचे असेल तर त्या गादीचे दोन दोन लोड तकिया बनवून घ्या. चोविस इंची.

माझेही अनुभव असेच आहेत. आमच्या पुण्याला दुर्दैवाने खाडी नाहीये. नदी पण अशी आहेकी. निर्माल्य टाकतानाही अपराधी पणाची भावना येते.
शेवटी रेडीट वर वाचलेला उपाय करावा लागेल. गादी फाडायची आणि रोज थोडी थोडी कचऱ्यात टाकायची.
रआ कुणा लॉजवाल्यांशी मैत्रीचे संबंध नाहीयेत.

हॉस्पिटलला विचारुन बघा. Light 1 तिथे या बेडवर कोणी मयत झाला असेल तर मी झोपणार नाही असे कुणी म्हणत नाही.

मोठी कचराकुंडी नसते का हल्ली कुठे? बांधकामाच्या साईटवर डम्पस्टर? डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याची काही सुविधा नसते का?

गादी वापरण्यायोग्य स्थितीत

गादी वापरण्यायोग्य स्थितीत असल्यास- फेसबुकवर शहर +free giveaway अशा नावाने ग्रुप्स आहेत. त्यात सामील व्हा. गादीचा फोटो , तुमचे लोकेशन टाकून कोणाला हवी आहे का विचारा.
मुंबई साठीच्या अशा ग्रुपवर गादी मागणारी आणि देणारी अशा दोन्ही पोस्ट्स पाहिल्या आहेत.
पुण्याशी संबंधित एका ग्रुपवर अशी गादी देऊ केलेली दिसली.

डॉग शेल्टर् , अ‍ॅनिमल रेस्क्यु वाल्यांना हवी आहे का विचारा.

त्यातही कापसाच्या की अजून कशाच्या गाद्या आहेत त्यावर अवलंबून असते. कापसाच्या गाद्या घेतात एक वेळ गादी कारखाना वाले. पण नॉन-कापसाचे (स्पॉंज किंवा सिंथेटिक मटेरियल) गाद्या किंवा काही असेल तर पैसे देऊन कचऱ्यात टाकावे लागते. ते कापसासारखे रिसायकल करता येत नाहीत.

काही ट्राय केले आहे. उरलेले काही करून बघेन.
डॉग शेल्टर् , अ‍ॅनिमल रेस्क्यु वाल्यांना हवी आहे का विचारा.>> हे ट्राय करणार निश्चित! कुणीतरी हे मला सजेस्ट केले आहे.
सगळ्यांचेच पुन्हा एकदा आभार.

सगळ्यांनी साठी.
मी अनिमल रेस्क्यू ट्रस्ट पुणे ला मेल केली होती. ते घ्यायला तयार आहेत पण मला ट्रान्सपोर्ट चा खर्च करावा लागेल. They are located at
मांजरी. हडपसर पासून पुढे चार किलोमीटर. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे कि त्यांनी जर ट्रान्सपोर्ट अरेंज केला तर मी पैसे देईन. बघुया काय होतंय.

बाप रे ! हे वाचून आता भीती वाटू लागली आहे मला .
माझ्याकडे पॉकेटेड स्प्रिंग्ज ची गादी आहे ९ इंचाची . आणि ती लवकरच डिस्पोज करावी लागणार आहे . ती दुरुस्त होत नाही .
सुचवा काय करू . .

पुण्यात एका (साठे) गादी कारखान्याने सांगितले (तुम्ही पैसे देणारअसाल तर) गादी नवी बनवून निवारा किंवा तत्सम संस्थांना देता येते. जुनी साधारणत घेत नाहीत. किंवा ते कापूसही घेतात (कदाचित कोणा दुसऱ्या देणगीदाराकडून नवी बनवायचा खर्च घेत असतील)

दुकानात जाउन नवीन घेताना त्याला जुनी गादी घेउन जाण्याबाबत सांगता येणार नाही का?
त्याचा टेम्पो आलेलाच नवीन गादी घेउन. असतो, आणि कुठे कशी डिसपोज करायची हे त्याला बरोबर माहीत असणार. त्यातले थोडे जरी मटेरियल त्याच्या फायद्याचे/ विकता येण्यासारखे असेल तर तो नक्कीच घेउन जाईल.

गाद्यांच्या काऱखान्या/दुकानात जुन्या गाद्या घेत नाहित. माझ्याकडे काथ्याचि होति. कातरि ने तुकडे केले आणि ब्लु पिशवी मध्ये भरले. कचरे वाल्याला पैसे दिले. (त्याने अगोदरच घंटा गाडी वाल्याला सांगुन ठेवले होते.)

आमची जुनी गादी वेकफिट वाले नवी घेऊन येताना जुनी घेऊन जातील म्हणाले होते, पण गादी आल्यावर या गादीला एक्स्चेंज ऑफर नाही असा शोध लागला.घरात पेंटर योगायोगाने होते, त्यांना विचारलं नेणार का, ते गुंडाळून कशीबशी दुचाकीवरून घेऊन गेले.
एरवी गादीच्या ओळखीच्या दुकानात विचारतो.फारसा जुन्या बदलून नव्या करायचा प्रसंग आला नाही.

जुन्या गाड्या कापसाच्या असतील तर नवीन कुशन, लोड बनवा. मी वृद्धाश्रम, वगैरेला विचारलेले पण ते लोक वापरलेल्या गाद्या घेत नाहीत . मी आमच्याकडे काम करणाऱ्या बायकांना फुकट देऊन टाकल्या. त्यातही त्यांना पण गुंडाळल्या जाणाऱ्या कापसाच्या गाद्याच हव्या होत्या , स्प्रिंगवाल्या नकोत म्हणतात. तरी २ खपवल्या . आता कचरा नेणाऱ्यांना पैसे देऊन बाकीच्या देऊन टाकणार .

एकूण गाद्यांचा प्रश्न फारच ज्वलंत होत आहे.
जपान कोरियाच्या मालिकेत ते लोक चटयांवरच झोपताना दाखवतात. जागेची बचत.

ओह, माझी आधीची "गाद्यांची दुकाने नेतात" पोस्ट कापसाच्या गाद्यांच्या बाबतीत होती. इतर प्रकारच्या गाद्या कशा डिस्पोझ करतात ते नाही माहीत.

आपण नवीन गादी बनवली तरी त्यात वापरलेला कापूस १००% नवा नसतो. त्यात थोडा जुन्या गाद्यांचा कापूस वापरतातच दुकानदार. कापूस पिंजल्यावर नवीन कोणता आणि जुना कोणता ते आपल्यासारख्या माणसांना सांगता येणे अवघड असते - अशी माहिती माझ्या गादीवाल्याने दिली होती. गादीत वापरलेल्या नव्या:जुन्या कापसाचे गुणोत्तर हे प्रत्येक दुकानदारानुसार बदलते.

नविन गादी घेताना buyback करू शकला असतात. अर्थात त्याला buyback म्हणता येणार नाही कारण नविन गादीची delivery करताना जुनी गादी घेऊन जातात पण पैसे देत नाहीत. उलट आपणच dispose off करण्यासाठी हजार / दीड हजार द्यावे लागतात. फक्त घरातुन बोजड पसारा जातो हा एक फायदा.

Back to top