Submitted by अभय आर्वीकर on 12 August, 2024 - 11:31
साक्षीला दिवस आहे
दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो
एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो
दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू
त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो
आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
तारतम्य लागले जर हेलकावे खायला
भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो
योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता
अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो
- गंगाधर मुटे 'अभय'
======
बारा/आठ/चोवीस
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा परत आलात...स्वागत
अरे व्वा परत आलात...स्वागत
सुंदर गझल...
@दत्तात्रय साळुंके, आभार सर
@दत्तात्रय साळुंके, आभार सर जी.
अभयजी
अभयजी
तुमचे शेतीला वाहिलेले लिखाण आवडीने वाचले आहे. मस्त आंतरीक ओल झिरपते तिथे मुळांशी...
आशा करतो आता सातत्याने वाचायला मिळेल.
लिहिते राहा. पुलेशु. (शीर्षक
लिहिते राहा. पुलेशु. (शीर्षक पटले नाही )
-दिलीप बिरुटे