हल्ली हॅण्ड हेल्ड स्टीम वाल्या इस्त्रीची सारखी जाहिरात दिसते आहे. (मी गुगल वर सर्च केल्यानेही असेल). मल घ्यावी वाटते आहे. पण कोणाकडेच बघितली नाही. फक्त ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात बघितली आहे. हँगर ला कपडे लावून तिथल्या तिथे इस्त्री करता येते. पट्कन होते वगैरे खूप ऐकले आहे.
तर इथल्या कोणी वापरली आहे का? कोणत्या ब्रँड ची?
इंस्टा वर टेकी मराठी म्हणून एक पेज आहे ते शाओमी ची रेकमेंड करत आहेत. पण साधारण सेम किमतीत (३ हजार) फिलिप्स ची पण दिसते आहे ऑनलाईन.
आम्ही सध्या इस्त्री वाल्याकडे कपडे इस्त्रीला टाकतो पण आमची इस्त्रीची पिशवी भरेपर्यंत कधी कधी खूप वेळ जातो. आणि ती पूर्ण भरेपर्यंत आम्ही कपडे टाकत नाही इस्त्रिला. त्यामूळे तिला ही इस्त्री तिला रीप्लेस करू शकेल का?
दुसरे म्हणजे मी आणि नवरा बैठे काम नी विशेष धुळीचे एकस्पोजर नसल्याने एक कपडा किमान दोन वेळा वापरून मगच धुवायला टाकतो. अश्या वेळी नॉर्मल इस्त्री केल्याने जर यदाकदाचित कपड्यावर एखादा डाग किंवा धूळ असेल तर ती पक्की होते असे ऐकले आहे. त्यामुळे त्या ऐवजी स्टीमरवाली इस्त्री घरात असेल तर ती वापरता येईल असे डोक्यात आहे.
खूप सामान्यपणे (common)
अशी इस्त्री वापरलेली नाही. काही अनियमित आणि कमी खपाची महागडी वस्तू वापरण्यात थोडा धोका असतो. नाटकं आणि ताप होतो अशा वस्तूंचा. काही कंपन्या अशा काही परदेशी वापरातल्या वस्तू बाजारात आणतात आणि मग खप झाला नाही की अचानक त्याची विक्री बंद करतात.
..............................
खूप सामान्यपणे (common) वापरली जाणारी आणि बाजारात सहज मिळणारी वस्तू वापरून काम करणे फार सोयीचं जातं. आमची साधी इस्त्री वापरत होतो पंचवीस वर्षे. चार पाच वेळा आतलं हीटींग एलिमेंट बदललं. ( दहा पंधरा रुपयांत मिळे आणि मीच बदलायचो. ) एका स्प्रे बॉटलमधून पाणी फवारून सुती कपड्यांना छान इस्त्री होत असे. इतर नायलान पॉलिस्टरला असे करावे लागत नाही परंतू फार तापू नये हे पहावे लागते. ऑन ऑफ करून वापरायचो. पण हा खटाटोप वाचवणे तर ऑटो कंट्रोल असलेली इस्त्री घेतली. ( सातशे रुपये, POLYCAB कंपनीची. फिलिप्सचा ब्रॅंडचा धसका घेतला आहे. त्यांच्या वस्तू चांगल्या असतात पण काही मोडले की बदलणे अवघड कारण ते पार्ट सील फिक्स असतात.)
तर ही इस्त्री बिनबोभाटपणे दीड वर्षं चालते आहे. नायलान, किंवा सुती असे सेटिंग ठेवायचे. दीड मिनिटांत गरम होते आणि वापरता येते. सुती कपड्यांना पाणी मारायचेच. गरम इस्त्री फिरली की वाफेने सुरकुत्या मोडतात. (कपडे धुऊन वाशिंग मशिनचा स्पिन ड्राय फार वेळ फिरवला तर कपड्यांना फार सुरकुत्या पडतात त्या मग इस्त्रीनेही निघत नाहीत. कपडे टांगल्यावर पाणी गळणार नाही इतकेच फिरवतो.)
मी बाष्पेस्त्री आठ दहा
मी बाष्पेस्त्री आठ दहा वर्षांपूर्वी १५०० की १८०० ला घेतली, फिलिप्सची. अनुभव चांगला नाही, पडून आहे तशीच माळ्यावर. वीस वर्षे जुनी फिलिप्सची साधी इस्त्री वापरतोय अजून, तपमान स्वनियंत्रित करणारी.
अरे बापरे !!
अरे बापरे !!
मला काही कारणांनी साधी इस्त्री घेण्याची भीती वाटते. १. मला ती वापरता येत नाही २. घरात लहान मूल आहे. ३. ती खूप वीज खाते असे ऐकून आहे. ४. सिल्क च्या किंवा वर्क वाल्या कपड्यांवर ती वापरता येत नाही. पण ही बाष्प इस्त्री वापरता येते.
मानव पृथ्वीवर तुम्ही कुठे राहता? तुमची इस्त्री अजून वर्किंग कंडीशन मध्ये असेल तर वापरून बघते. पैसे सुद्धा देईन.
हैद्राबाद.
हैद्राबाद.
अन्यथा ब्लिंकिट करता आली असती.
पण तुम्ही इस्त्री कधी वापरलीच नाही तर तुम्हाला वेगळा अनुभव येऊ शकतो स्टीमरचा, साधी इस्त्री नेहमीच वापरत असल्याने एक ब्लॉक आला असेल माझ्यात. अमेझॉनवर 7 days return ऑप्शन असलेली ऑर्डर करून वापरून बघु शकता. नाही पटली तर परत करायची.
सिल्कचे सेटिंग असते साध्या इस्त्रीत पण काही सांगता येत नाही, चुकूनही चूक झाली आणि जास्त गरम असताना कपड्यावर ठेवली की गेला कपडा असे होऊ शकते. तेव्हा असल्या व वर्क असलेल्या कपड्यांवर आम्ही दुसरा सुती कपडा ठेवून इस्त्री करतो.
विजेबाबत: दोन्ही १००० वॅट्सच्या आहेत. थोडाफार फरक असला तरीही प्रत्यक्ष वापराचा वेळ फार कमी असल्याने विशेष फरक पडणार नाही.
तेव्हा असल्या व वर्क असलेल्या
तेव्हा असल्या व वर्क असलेल्या कपड्यांवर आम्ही दुसरा सुती कपडा ठेवून इस्त्री करतो. >>> हेच करावे . कपडे सेफ राहतात.
अशी काही वापरली नाही. आपली
अशी काही वापरली नाही. आपली रेग्युल वापरतो. पारंपरिक पाणी शिंपडून
वीजेवरील वायर लोंबणारी सारखी मधे मधे येणारी.
नवं काही उत्तम असल्यास आणि आवडल्यास प्रयोग करुन पाहण्यात येतील.
-दिलीप बिरुटे
(पारंपरिक पद्धतीने घरी इस्तरी करणारा)
पारंपरिक पाणी शिंपडून
पारंपरिक पाणी शिंपडून वीजेवरील वायर लोंबणारी सारखी मधे मधे येणारी.
>>वर लिहिलेल्या कारणांमुळे मला नकोय ती.
पियू , संपर्क केलाय . वाचा.
पियू ,
संपर्क केलाय . वाचा.