Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अॅंकी नं 1. अनु, माझे मन धमाल
अॅंकी नं 1. अनु, माझे मन आणि इतर सगळेच
धमाल केली सर्वांनी कास्टिंग आउच.
(आदमखान साहेबांनी एक एक्स्ट्रॉ आयडी दिला असता तर खंबा सुद्धा अॅड केलं असतं)
डीटूर(१९४५)
डीटूर(१९४५)
डीटूर(१९४५) हा अजून एक "गरीब" निर्मात्याने बनवलेला "B-ग्रेड" पिक्चर!
ह्या सिनेमा वर लिहायचे तर एक नवीन लेख लिहावा लागेल. ह्या सिनेमाचे चित्रीकरण केवळ सहा दिवसात करण्यात आले. विकी वर आणि एबर्ट च्या समिक्षणात तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
एक बघणीय फिल्म. Detour(1945)
लिंक https://www.youtube.com/watch?v=QqBPGnSXF8Q
सबटायटल्स आहेत.
हा प्रिंट जास्त क्लीअर आहे.
https://www.youtube.com/watch?v=eHyXWDWLuNo
Detour was selected for the United States National Film Registry by the Library of Congress as being "culturally, historically, or aesthetically significant.
"Film Noir" च्या सुवर्ण युगातील(१९४० १९५०) मधला एक चांगला सिनेमा.
मुंज्या पहिला . पहिला हाफ
मुंज्या पहिला . पहिला हाफ चांगला वाटला . नंतर थोडा बोर झाला . शेवटी तर फारच . तुंबाडची सर नाही . पण शर्वरी खूप आवडली. हिरोही आवडला .
एवढं कास्टिंग करतायत माबोकर,
एवढं कास्टिंग करतायत माबोकर, पण त्या बिचाऱ्या घटोत्कचाची कोणाला पडलेलीच नाहीये.. णिषेध तुम्हा सर्वांचा..
घटोत्कच म्हणून चेन्नई
घटोत्कच म्हणून चेन्नई एक्स्प्रेस चा थंगबली
मुंज्या ओटीटी वर आहे का ?
मुंज्या ओटीटी वर आहे का ? कुठे आहे ?
डिस्ने हॉटस्टार वर
डिस्ने हॉटस्टार वर
The quiet Earth (1985) हा
The quiet Earth (1985) हा न्यूझीलंडच्या दिग्दर्शकाचा मूव्ही पाहिला. कादंबरीवरून काढलेला असल्याने प्रश्नच नाही.
भरपूर प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेला जॅक रात्री झोपतो पण सकाळी आपण जिवंत आहोत हे पाहून आश्चर्य व्यक्त करतो.
पण बाहेर पडल्यावर लक्षात येते कि तो सोडून एकही मनुष्य, प्राणी, पक्षीच काय कीटक सुद्धा नाहीत. तो एकटा आहे. कुण्णीसुद्धा नाही.
कुणाचेही अवशेष दिसत नाहीत. जणू काही सगळे विरघळून गेले आहेत.
शेवट प्रेक्षकांच्या डोक्याला भुंगा लावून देणारा आहे. संपल्यावर पण डोळ्यातून जात नाही.
YouTube वर आहे। OTT वर check नाही केल.
मिळाला. Thanks.
मिळाला. Thanks.
डिस्ने हॉटस्टार वर >>> आला का
डिस्ने हॉटस्टार वर >>> आला का. पिक्चर विकत घ्यायचा आहे की हॉटस्टार पैसे भरुन घेतलं असेल तर दिसेल.
दिठी (आयपीटीव्ही) वर बघितला.
दिठी (आयपीटीव्ही) वर बघितला. कदाचित स्पॉयलर्स असतील.
अनेक दिवसांपासून बघायचा ठरवून त्याला शांतचित्ताने पाहायचे ठरवल्याने राहून जात होते.
किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, ओमकार पटवर्धन
किशोर कदमचाच(रामजी) चित्रपट आहे हा, बाकी सर्वांनी त्याच्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून आपापले काम चोख करूनही ते रूंजी घातल्यासारखे वाटत राहते. आपल्यापैकीच कुणातरी कलाकराचा अभिनय पूर्ण ताकदीने बाहेर पडावा म्हणून इतर कलाकरांनी एक पाऊल कुठेतरी मागे घेणं, तेवढा विश्वास दाखवणं फार सुंदर वाटतं. सुरेखशा जुगलबंदीत ह्याची क्वचित अनुभूती येते. सुरवातीपासून कोसळणारा सततधार पाऊस व मळभ आणि वारीला निघालेले तिघे चौघे. सगळेच विठूभोळे, कर्ताकरविता तोच आहे समजून कष्टात आयुष्य वेचणारे. अशाच प्रलयासारख्या कोसळणाऱ्या पावसाने नदीला आलेल्या पुरात रामजीच्या मुलाचा अघटीत मृत्यू होतो. ह्या पावसात विषण्णतेची छाया आहे. तुंबाड मधल्या पाऊस भयप्रद ताण देणारा होता, इथला विमनस्क करणारा वाटत राहतो. आपली त्याच्याशी नाळ जुळली की आपणही निरभ्र होण्याची वाट बघत रामजीचा तणाव सोसायला लागतो.
एरवी सर्वांचे सांत्वन करून दुःखभार हलका करणारा रामजी स्वतःच डोंगराएवढ्या शोकापुढे स्वतःला गमावून बसतो. सगळा चित्रपट हा तो ह्या अपत्यशोकाचा स्विकार कसा करतो( किंवा क्लोजर कसे मिळवतो) यावरच आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला वारीनिमित्त तीस वर्षे जाऊनही 'तो' आपल्यासोबत असे कसे करू शकतो, मग ते सगळे निरर्थक होते का, पुत्राला गती मिळाली असेल का, गती म्हणजे नेमके काय, ज्ञानअज्ञान, द्वैतअद्वैतभाव म्हणजे काय. ज्ञानेश्वरी लोक शेकडो वर्षांपासून वाचतात त्यात प्रत्येकाला आपापले उत्तर कसे मिळू शकते? असे अनेक प्रश्न त्याला आणि त्याचे जीवलग असलेले मोहन जोशी, गिरीश कुलकर्णी व दिलीप प्रभावळकर यांना पडतात. रामजी विमनस्क अवस्थेत असताना जे काही हताशपणे बोलतो , त्यावरून त्याला नक्की किती यातना होत असतील याचे निरीक्षणातून अंदाज बांधत असतात. जणू यातून प्रेक्षकांचे प्रश्नच ऐरणीवर घेतले आहेत. मुलगा जाताच सून बाळंतीन होऊन नात झाल्याने रामजीला त्या नातीचा व सुनेचा आत्यंतिक राग येऊन त्यांना घर सोडून निघून जायची धमकी दिलेली असती. नात होऊन मुलगा आधीच गेल्याने झाल्याने असाही कुळाचा निर्वंश झाल्याची चर्चा होते.
गावातील एक पूर्ण वेळ भरलेली गायही सुरवातीपासून प्रसववेदनेने कण्हत हंबरत असते, आपल्यालाही ह्या दोघांची आता सुटका व्हावी असे वाटायला लागते. हा पोथीला शून्यात नजर लावून बसलेला असतो, जीवाचा कोंडमारा शिगेस पोचलेला असताना गाईची सुटका करण्यासाठी आलेले बोलावणे त्याला अव्हेरता येत नाही. कोसळत्या पावसात तो जुजबी सामान घेऊन तातडीने जातो. गाईला आडोसा करून धीर देत पाठीवर मायेने हात फिरवत तिची व पर्यायाने स्वतःची वेणांपासून सुटका करतो. हे दृष्य अतिशय भिडणारे व नितांत सुंदर उतरले आहे. वासरू जन्मताक्षणी जन्ममरण व त्यातील यातना यांचा स्विकार त्याला जमतो. अचानक उजाडते व पाऊस थांबून सगळे मळभ दूर होऊन कोवळे ऊन पडून फुलं डोलायला लागतात, हिरवी तृणे रसरसून वाऱ्यावर डोलतात. घरी परत येऊन तो मोठ्यामनाने सुनेची क्षमा मागून तिला घर सोडण्यापासून परावृत्त करतो, नातीचा मोठ्या मनाने स्विकार करतो.
अर्धवट राहिलेली पोथी पूर्ण करायला जातो व 'आमोद सुनासी जाले' ( द्वैतअद्वैत हा आपपरभाव जाऊन सुगंध आणि नाक हे एकच असण्याची उत्कट अनुभूती आली.) ऐकताच भडभडून रडून घेतो व मोकळा होता.
चित्रपट अतिशय सुंदर आहे, आवर्जून बघावा असा. पावसाने कुंद झालेले वातावरण, पिवळसर प्रकाश, काही कृष्णधवल स्मृती , दिवटीच्या प्रकाशातल्या ओसऱ्या, पडवी, माळवदे सर्वच प्रकाशचित्रण अप्रतिम आहे. अभिनय, गाणी, अभंग सगळंच अतिशय उत्तम झालेले आहे.
हे रस ग्रहण भारी आहे. वाचून
हे रस ग्रहण भारी आहे. वाचून चित्रपटा बद्दल काही कल्पना झाल्या. त्याला तडा जाऊ नये म्हणून पिक्चर बघणे नाही,
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! असे नको व्हायला.
अस्मिता अतिशय सुरेख रसग्रहण
अस्मिता अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस . फार आवडलं . मी केशवकुल बरोबर सहमत . .. मी पण नाही बघणार . ती गाय , तो थांबलेला पाऊस , जन्म आणि मृत्यू चा केलेला स्वीकार . ... सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.
अस्मिता, सुंदर लिहिलं आहे.
अस्मिता, सुंदर लिहिलं आहे.
मी हल्लीच ही कथा वाचली होती आणि तीवर मी वाचलेले पुस्तक इथे शंका विचारली होती. स्वाती आणि चिनूक्स यांनी फार सुंदर उलगडा केला .
चिनूक्स यांचा या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग आहे आणि त्यावर त्यांचा एक सुंदर लेख मायबोलीवर आहे.
त्यावर त्यांचा एक सुंदर लेख
त्यावर त्यांचा एक सुंदर लेख मायबोलीवर आहे.>>> कृपया लिंक द्याल का?
अस्मिता , खूपच छान पोस्ट आहे
अस्मिता , खूपच छान पोस्ट आहे ही.
चिनूक्स यांचा लेख वाचला होता
चिनूक्स यांचा लेख वाचला होता बहुतेक. हो, त्यांचे नाव श्रेयनामावलीत दिसले आणि कौतुक वाटले.
ती चर्चा मात्र आठवत नाही.
केकू , दक्षिणा, भरत, खंबा धन्यवाद.
रसग्रहण function at() {
रसग्रहण function at() { [native code] }इशय सुंदर असल्याने, पावसावरचे सगळे पॅराज भिडलेले असल्याने स्वतंत्र पोस्टची विनंती करत आहे. भर घालावी.
असेच रसग्रहण किल्ला या चित्रपटाचेही करावे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/78907
चिनूक्स यांचा लेख
अस्मिता, सुंदर लिहिलं आहे. मी
अस्मिता, सुंदर लिहिलं आहे. मी बहुतेक चिनुक्स यांचा लेख वाचला आहे.
The quiet Earth (1985)
The quiet Earth (1985)
पाहिलेला होता जहाजावर. अशाच पद्धतीचे सहा सात सिनेमे लायब्ररीत होते. दोन तीन पाहिल्याने आता डोक्यात भेसळ आहे.
पुन्हा पहायला हरकत नाही (बरेचसे पहायचे राहून गेले असताना कितपत शक्य आहे अवघडच आहे).
छान लिहीले आहेस अस्मिता!
छान लिहीले आहेस अस्मिता!
विवाह, मुका घ्या मग एकदम
विवाह, मुका घ्या मग एकदम दिठी!!! करमणुकीची सुई गरा गरा फिरत आहे. परीक्षण छान लिहिले आहे. रामजीला सर्व जन्म मरण सायकल चे ज्ञान एकदम एका क्षणात होते ते क्रिस्चन धर्मात एपिफनी नावाचा प्रकार आहे त्या लेव्हल चे आहे. गायीला वासरु होते तसेच सुनेला पण बाळ होते
नात झाली म्हणजे वंश संपला हे अगदी रिग्रेसिव्ह विचार आहे. मुलगा वारला तर सुनेचा काय दोष तिला का बरे हाकलले. रामजी एक फ्लॉड कॅरेक्टर आहे पण फार दु:खाच्या भरात असे होउ शकते. त्यात ती ओली बाळंतीण इथे वारकर्याची दया माया पंढरी वगैरे काही जागे होत नाही. ती पण कोणाची तरी मुलगी आहे. लगे च दोन मिनिटात तिला माफी व घरी राहायची परवानगी. सुनेने सासर्याचे विचार ओळखुन घ्यावे.
ज्ञान प्राप्ती झाल्यावर उन्हे पडतात हिरवळ दिसते अश्या टाइपचे मॅट्रिक्स च्या तिस र्या सिनेमात पण आहे. मशीन व माण्से युद्ध एकदाचे संपल्यावर लगेच निळे आकाश त्यात इंद्र धनु श्य, बारकी होप फुल मुलगी. अशी छान दृश्ये आहेत. एरवी सिनेमात डिप्रेसेंग हिरवा कलर आहे.
देवाची ३० वर्शे भक्ती करणे व तो मुलाचा मृत्यु कसा घडवून आणेल हा डिसबिलीफ असणे म्हणजे शास्त्रीय दृश्टि कोणाचा अभाव आहे. शरीर काही काळाने नश्ट होणारच. गायीच्या डिलिव्हरी करणार्याला कधीतरी स्टिल बर्थ चा अनुभव असेलच की.
अस्मिता, सुंदर लिहिलं आहेस.
अस्मिता, सुंदर लिहिलं आहेस.
त्या सिनेमातलं पावसाळी कुंद वातावरणच सर्वात जास्त घेरून टाकतं, लक्षात राहतं.
अस्मिता, दिठी पोस्ट एकदम
अस्मिता, दिठी पोस्ट एकदम हृदयस्पर्शी.
बारदोवी बघितला, आवडला. पण
बारदोवी बघितला, आवडला. पण शेवट कळला नाही
ओके, खूप घाबरवणारा आहे का
ओके, खूप घाबरवणारा आहे का?थिएटरमध्ये पाहता येईल की ओटीटी वर आल्यावर हळूहळू फॉरवर्ड करत बघावा?(मी माझ्या वाढदिवसादिवशी थिएटरमध्ये मुंज्या पाहिला आणि बरीच घाबरले.पण मग दुसऱ्या वेळी पाहताना भीती नाही वाटली.)
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
चित्रपट आवर्जून बघा.
खंबा, हो. संततधार पाऊस हा मुख्य कलाकारांपैकी आहे. किल्लाची नोंद घेतली आहे. माझे विचार प्रभावित होऊ नयेत म्हणून वर आलेले धागे वाचणार नाही.
अमा
करमणुकीची सुई गरा गरा फिरत आहे.>>> वादळात हरवलेल्या नौकेच्या होकायंत्रासारखी
रामजीला सर्व जन्म मरण सायकल चे ज्ञान एकदम एका क्षणात होते ते क्रिस्चन धर्मात एपिफनी नावाचा प्रकार आहे त्या लेव्हल चे आहे.
>>> एपिफनीवर माझा विश्वास नाही. बघताना त्या एका क्षणात वठवलेला साक्षात्कार हा जन्मभराच्या चिंतनमननातून आलेला असू शकतो. एखाद्या माणसाला माहिती असते पण अनुभव आल्याखेरीज ती माहिती ज्ञान होत नाही. आत्मज्ञान तर मुळीच नाही. माहितगार भरपूर सापडतात, त्याने प्रभावित होऊ नये... ज्ञानी विरळा असतो. Information and knowledge यांत फरक आहे. विठ्ठलाचा ध्यास घेतल्याप्रमाणे हाही आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचायचाच पण अर्थ मात्र अपत्यशोकानंतर उमजला.
नात झाली म्हणजे वंश संपला हे अगदी रिग्रेसिव्ह विचार आहे. >>>> हो, आहेतच. आवर्जून लिहिले आहे ते त्यामुळेच. सगळा समाजच त्यावर पोसला आहे आपला. पण इथे पितृसत्ताक पद्धती विरोधात तलवार काढाविशी वाटली नाही कारण ही वाक्यं इतरांच्या तोंडून आलेली आहेत. प्रत्येकाचे या घटनेबद्दलचे पर्सेप्शेन वेगवेगळे दाखवले आहे. त्याच्या मनात काय होते हे कळत नाही, शिवाय मुलाच्या निधनाआधी सुनेशी नाते कसे होते हेही स्पष्टपणे दाखिवलेले नाही. आता या आयुष्यातील सर्वात निराश क्षणांमधे त्याला 'जज' करणे किंवा त्यावरून त्याची जडणघडण ठरवणे अयोग्य वाटते. म्हणून त्याबाबत काही लिहिले नाही.
किती छान लिहिलं आहेस अस्मिता
किती छान लिहिलं आहेस अस्मिता. वाचताना चित्रपटातली दृश्य परत आठवली. मराठी चित्रपट मला बहूतांशी वेळा टिव्हीवरच बघायला मिळतात. हा चित्रपट मात्र इंडिया हॅबिटॅट सेंटर, दिल्ली इथे झालेल्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये बघायला मिळाला, थँक्स टू चिनूक्स. खूपच सुरेख अनुभव होता तो.
खूप छान लिहीलं आहेस, अस्मिता.
खूप छान लिहीलं आहेस, अस्मिता. नेहमीप्रमाणेच शब्दांची उत्तम निवड.
२०१५ च्या बीएमेम मधे 'आमोद सुनासी' कथा जितू जोशीने वाचली होती त्याचं एका मिनीटाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. गंमत म्हणून इथे लिंक डकवते आहे - https://www.youtube.com/watch?v=bm5GQrPP0HE
Pages