दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.
रिओने अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आयोजन केलं, नंतर टोक्योने कोव्हिडच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. त्यामुळे आता पॅरिसकडूनही नेत्रदिपक उद्घाटन सोहळा तसेच चोख व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की उत्साहं असेल त्याप्रमाणे अॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.
ह्याही वर्षी भारताला चांगली पदके मिळतील अशी अपेक्षा करूया आणि त्याकरता खेळाडूंना शुभेच्छा. ह्यावर्षी बहुदा नीरज चोप्रा ध्वजधारक असेल.
ही वेबसाईटः https://olympics.com/en/paris-2024
अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.
कुठलातरी सेन फायनलला जाणार हे
कुठलातरी सेन फायनलला जाणार हे नक्की. दोघेही भारतीयच आहेत.
लक्ष्य सेनचा पराभव दुःखद होता
लक्ष्य सेनचा पराभव दुःखद होता कारण 1) तो फॉर्ममध्ये असून आतापर्यंत अप्रतिम खेळत होता २) पहिल्या गेममध्ये खूप मोठी आघाडी घेवूनही तो 22- 20 हरला. मला वाटतं, डेन्मार्कच्या खेळाडूच्या उंचीचा फायदा घेत खूप मागूनही कुठेही, नेटच्या जवळ सुद्धा, स्मॅश मारण्याचं कसब सेनला सतत पेंचात टाकत होतं. दुसऱ्या गेममध्ये तर तो यामुळे हताशच झाला असावा. बॅड लक. कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी व उज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा !!
लक्ष्य सेन उत्तम खेळला,
लक्ष्य सेन उत्तम खेळला, अनुभवाचा अभाव नडला, त्याचा प्रतिस्पर्धी लांडगा होता अन मौक्यावर मात करत होता, सामन्यानंतर त्याचे अविर्भाव त्याच्या आक्रमकतेचे आणि काही अंशी सामन्याच्या सुरुवातीस त्याला काही माघार घ्यावी लागली त्याच्या वचप्याचे द्योतक होते
पण आपला सेन गडी नक्कीच येती काही वर्षे चमकणार हे नक्की, सिंधु मात्र फ्लॅटर्ड टु डिसिव्ह झाली
>>> कुठलातरी सेन फायनलला
>>> कुठलातरी सेन फायनलला जाणार हे नक्की. दोघेही भारतीयच आहेत.>>> याला विनोद म्हणायचं का!!
ऑलिंपिक चं यंदाचा भारतातले
ऑलिंपिक चं यंदाचा भारतातले प्रक्षेपण सगळ्यात भयाण. अर्धा वेळचकाट्याच असतात. भारतीय लोक कमेंट्रीला असले तर टीव्ही म्यूट करावासा वाटतो.
स्टुडियोतला ॱ anchor( हा प्रिमियर कबड्डी लीगमध्ये असतो)
ट्रंपसारखी काहीही विशेषणं वापरतो
आता म्हणताहेत lakshya sen one win away from bronze medal.
स्वप्नील कुसळेचं नाव यांनी चुकीचं घेतलं.
कुठे नरोत्तम पुरींसारखे लोक आणि कुठे हे.
भरत +१
भरत +१
आज जिओवर हॉकीचे समालोचन ऐकत होते हिंदीतले . कसले बेकार होते ते . क्षणभर वाटलं की नवज्योत सिद्ध्युलाच आयपीएल मधून आणून इथे बसवलं की काय .!
किती तो उन्माद , कुठलेही शब्द आणि उपमा .
जोकोविच आणि अल्कराझ मेन्स
जोकोविच आणि अल्कराझ मेन्स फायनल फार उत्कंठावर्धक झाली.
ब्राँझ साठी म्युसेट्टी आणि ओजे अलियासीनचे दोन सेट मस्त झाले, तिसरा सेट ओजे फारच खराब खेळाला.
बॅडमिंटन डबल्स फायनल बघितली. चायनीज-तायपेयी जिंकले. मी ज्या वेळी बघतो तेव्हा इथे भारतीय प्लेअर्स दिसतच नाहीत.
विनाकारण हरभऱ्याच्या झाडावर
विनाकारण हरभऱ्याच्या झाडावर चढवलाय सगळ्यांना. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत यांचा सराव आणि मेहनत सुमार असते. चुकून नशिबाने दोन चार शॉट इकडे तिकडे लागतात आणि हे मेडल जिंकतात. आपण विनाकारण अपेक्षा ठेऊन असतो.
बंद केलंय मी टिव्ही बघणं !
टिव्हीवर आपली पोरं कधी 10 जण असूनही जिंकलो म्हणून नाचतात , तर कधी
कोण तो लक्ष्या एकटा होता आणि हरला म्हणून रडतात !!
यूएस gymnast Simone Biles
यूएस gymnast Simone Biles चे व्हिडीओ पहिले स्पर्धेतले . काय भारी प्रकार असतात तिचे . लवचिक शरीर आणि डौलदार हालचाली . नो वंडर , सगळी सुवर्णपदके तिच घेऊन गेली .
निशाची मॅच बघितली काय? दिल
निशाची मॅच बघितली काय? दिल तूट गया. इथून पुढे कुठली रेसलिंग मॅच पाहवणार नाही.
*दिल तूट गया* +१. मला वाटतं
*दिल तूट गया* +१. मला वाटतं तिथल्या व टिव्हीवर ती मॅच बघणाऱ्या प्रत्येकाला वाईटच वाटलं असेल !!!
आज लक्ष्य सेनचा पराभव व पदक हुकणं हेंही खूप दुःखदायक होतं; किती सुंदर दर्जेदार खेळला ह्या संपूर्ण स्पर्धेत ! बॅड लक.
या ऑलिंपिकमध्ये भारताची
या ऑलिंपिकमध्ये भारताची आतापर्यंत पाच सहा ब्रॉंझ मेडल्स. हुकली असतील.
नेमका निशाची मॅच संपल्यावर टीव्ही लावला. ती रडताना दिसली. मग ते इंज्युरीवाले शॉट्स परत परत दाखवत होते.
याआधीच्या ऑलिंपिकमध्ये विनेश फोगट अशीच जखमी झाली होती ते आठवलं.
भारताच्या ऑलिंपिक प्रगतीबाबत
भारताच्या ऑलिंपिक प्रगतीबाबत टीका टिपण्णी करण्यापूर्वी सुनंदन लेले सरांचा खालची विडिओ नक्की बघा.
https://www.youtube.com/watch?v=2E5VLDQC0_4
सुनंदन लेले यांचा व्हिडिओ
सुनंदन लेले यांचा व्हिडिओ सुंदर आहे, त्यांच्याशी सहमत. एक शतांश सेकंदाच्या अंतराने किंवा एक दशांश गुणाने पण फरक पडू शकतो.
एक शतांश सेकंदाच्या अंतराने
एक शतांश सेकंदाच्या अंतराने किंवा एक दशांश गुणाने पण फरक पडू शकतो.>> कालची १०० मी. फायनल अफलातून झाली. पहिल्या आणि दुसर्यात ५/१००० सेकंदाचा फरक. आणि सगळ्या आठांमधे ९.७९ ते ९.८८.
१०० मी. चा थरार और असतो.
लोकहो. आपली मंडळी यावेळेलाही चांगली खेळली आणि खेळतील. काही पदके अगदी ठोडक्यात हुकली. हॉकी टीमची जिद्द तर लाजबाब. ऑलिंपिक नंतर रीटायर होणार्या श्रीजेशची तर कमालच. मजा आली मॅच पहायला.
इतरांच्या पेक्षा मेहेनत कमी पडते याला मी सहमत नाही. आपली मंडळी खूप उशीरा खेळ चालू करतात हे एक कारण असावे. शिवाय देशांतर्गत
आंतरराष्ट्रीय पातळी वरचे कमी खेळाडू. या दोन्ही गोष्टी हळू हळू नक्की सुधारतील.
सुनंदन लेलेचं काय ऐकताय तो
सुनंदन लेलेचं काय ऐकताय तो स्वतःच मायबोलीवरचे प्रतिसाद वाचून तिकडे बोंबलत असतो. क्रिकेट वर्ल्ड कप झाला तेव्हा बोलभिडू युट्यूब चॅनलवर आला होता. सगळे मुद्दे आपल्या मायबोलीवरच्या क्रिकेट धाग्यावर आहेत तेच होते.
सुनंदन लेलेंचा व्हिडीओ छान
सुनंदन लेलेंचा व्हिडीओ छान आहे. आवडला.
जोकोविच-अल्काराझ सामना मस्त झाला. एकदम टफ. जोकोविचला एवढं भावनाविवश होऊन रडताना पहिल्यांदाच बघितलं!
भारतीय पुरुष हॉकी संघाला
भारतीय पुरुष हॉकी संघाला आजच्या उपांत्य फेरीतील लढतीच्या शुभेच्छा !
ग्रेट फोगट एकच नंबर.
ग्रेट फोगट एकच नंबर. Defeated gold medal contender and Tokyo gold medallist.
आता नीता अंबानी बाईंचा
आता नीता अंबानी बाईंचा कार्यक्रम दाखवताहेत
Gold medallist on her Olympic
Gold medallist on her Olympic debut at Tokyo 2020 (50kg), without conceding a point and despite being unseeded.
Four-time world championships gold medallist (2017, 2018, 2022, 2023), winning her first title at age 18.
Became the first wrestler to win all age-group world titles (U17, U20, U23, senior) and an Olympic title.
Won gold on her international debut at the 2014 Cadet World Championships.
SUSAKI Yui - यापूर्वी ती एकही सामना हरली नव्हती .
ग्रेट फोगट व भारतासाठी विशेष
ग्रेट फोगट व भारतासाठी विशेष अभिमानास्पद विजय ! अभिनंदन !!
हॉकी - जर्मनीचं हॉकी म्हणजे अतिशय शिस्तबद्ध, अचूक लाँग पसिंग व गतिमान खेळ. कितीही वैयक्तिक कसब असलं तरीही ठरवलेल्या डावपेंचाबाहेर कुणीही जाणार नाही. त्यामुळे, आजचा आपला सामना हा आपल्या खेळाडूंची कसोटी घेणाराच होणार. पण आपल्या संघाचं मनोबल सध्या खूपच उंचावलेलं असल्याने, जर्मनी देखील दबावाखाली असेल, हेही आहेच. आजच्या सामन्यात शैलीदार, प्रेक्षणीय खेळाची अपेक्षा न
ठेवलेलीच बरी. भरपूर गतिमान, टेन्शनभरा खेळ पहायची तयारी ठेवून व भारतीय संघ (व श्रीजेश ) विजयश्री खेचून आणतीलच अशा आशेने हा सामना पाहूया !!
भाऊ फोगट जिंकेल असे वाटत आहे
भाऊ फोगट जिंकेल असे वाटत आहे आज. हॉकी पण जिंकू आज.
भाऊ भरत बोकलत फोगट जिंकली..
भाऊ भरत बोकलत फोगट जिंकली.. फायनल ला पोचली ग्रेट
हुर्रे!
हुर्रे!
भरत हॉकी बघा. भारत एक शून्य
भरत हॉकी बघा. भारत एक शून्य ने आघाडी वर आहे पहिल्या क्वार्टर नंतर.
हो पाहतोय.झाली बरोबरी.
हो पाहतोय.झाली बरोबरी.
काल निषाची नच पाहून जेवढं
काल निषाची नच पाहून जेवढं दुःख झालं ती सगळी कसर फोगटने आज भरून काढली. फोगट जिंकली तेव्हा तिचा कोच पण इमोशनल होऊन रडला. आता फक्त हॉकीत जिंकू दे.
भाऊ भरत बोकलत फोगट जिंकली..
भाऊ भरत बोकलत फोगट जिंकली.. फायनल ला पोचली ग्रेट>>> हो बघितली मॅच. लाईव्ह बघायची हिम्मत नाही होत. जिओ सिनेमा दोन मिनिटे मागे असतो आणि दुसऱ्या टॅबमध्ये लाईव्ह स्कोर सुरू असतो. हॉकी पण तशीच बघतोय.
Pages