दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.
रिओने अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आयोजन केलं, नंतर टोक्योने कोव्हिडच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. त्यामुळे आता पॅरिसकडूनही नेत्रदिपक उद्घाटन सोहळा तसेच चोख व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की उत्साहं असेल त्याप्रमाणे अॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.
ह्याही वर्षी भारताला चांगली पदके मिळतील अशी अपेक्षा करूया आणि त्याकरता खेळाडूंना शुभेच्छा. ह्यावर्षी बहुदा नीरज चोप्रा ध्वजधारक असेल.
ही वेबसाईटः https://olympics.com/en/paris-2024
अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.
स्कोअर लेव्हल.
स्कोअर लेव्हल.
हॉकी जिंकावी.. एक पे कॉर्नर
हॉकी जिंकावी.. एक पे कॉर्नर वाया घालवला.
श्या हरली मॅच आणि ते पण
श्या हरली मॅच आणि ते पण जर्मनी विरुद्ध. आता किमान ब्राँझ तरी मिळावे. चांगली टीम आहे.
भारत 2-३ पराभूत ! वेल प्लेड,
भारत 2-३ पराभूत ! वेल प्लेड, बॅड लक .
हो ना पूर्ण टूर्नामेंट छान
हो ना पूर्ण टूर्नामेंट छान आणि सातत्य राखून खेळले. एकदमच वाईट.
विनेश फोगट: गोल्ड साठी
विनेश फोगट: गोल्ड साठी शुभेच्छा !
भारतीय पुरुष हॉकी टीम: कालचा विजय थोडक्यात हुकला, छान खेळले. PC कन्व्हर्ट करता यायला हवे होते, PS ने खेळ बदलावला. आता ब्रॉंझ मेडल साठी शुभेच्छा.
मीराबाई चानू: आजच्या मॅचच्या शुभेच्छा
विनेशचं वजन दुसऱ्या दिवशी ५०
विनेशचं वजन दुसऱ्या दिवशी ५० किलो पेक्षा दीडशे ग्राम जास्त भरल्याने ती स्पर्धेतून बाद झाल्याची बातमी आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे खोटं असू दे किंवा काही मार्ग निघू दे.
हो, इंडियन एक्स्प्रेसमध्ये
हो, इंडियन एक्स्प्रेसमध्ये बातमी आली आहे.
Vinesh Phogat disqualified after weigh in, will miss Paris Olympic medal.
खरी बातमी आहे वाटतय
खरी बातमी आहे वाटतय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
(No subject)
सपोर्ट स्टाफ काय करतो?
सपोर्ट स्टाफ काय करतो? Official weighing च्या आधी या लोकांना करता येत नाही?
तिला स्वतः:ला माहीत न्हवते की
तिला स्वतः:ला माहीत न्हवते की स्वत:चे वजन किती भरले पाहिजे? अतिशय दुर्दैवी![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
फार वाईट बातमी
फार वाईट बातमी
आता यावर बेकार राजकारण सुरू होणार...
257-member Indian delegation
257-member Indian delegation comprising 117 athletes and 140 supporting staff was sent to Paris
पनवती लागलीच अखेर
पनवती लागलीच अखेर![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विनेश चे सगळ्यात हार्ट
विनेश चे सगळ्यात हार्ट ब्रेकिंग, याहून जास्त निराशाजनक काही असू शकत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विनेशचे मनापासून वाईट वाटले.
विनेशचे मनापासून वाईट वाटले. नंतर तिला शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. आता प्रकृती ठीक आहे
https://timesofindia.indiatimes.com/sports/paris-olympics-2024/indiapari...
..
https://www.loksatta.com/krida/vinesh-phogat-disqualified-in-olympic-for...
खेळाडूंना सवय असते की वजन कमी करून खालच्या वजनात लढायचं. पण वजन राखता आलं पाहिजे. वजन कमी करताय तर वजन राखलं पाहिजे. तोंडावर कंट्रोल केला पाहिजे. काहीतरी खाललं असेल, कारण पोटात काहीतरी गेल्याशिवाय वजन कधीच वाढत नाही”, अशी खंत हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केली.
..
वजन एक किलोने वाढल्याचे लक्षात येतात तिने सायकल चालवली, स्वतःचे केस कापले आणि शरीरातील थोडे रक्तही काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात 900 ग्रॅमचे यश मिळाले परंतु शंभर ग्रॅम राहिलेच.
https://sports.ndtv.com/olympics-2024/haircut-no-water-or-food-for-days-...
यंदाच्या ऑलिंपिक मध्ये
यंदाच्या ऑलिंपिक मध्ये आपल्याला २ डिजिट मध्ये मेडल मिळतील अशी आशा होती. आता पर्यंत ३ मेडल मिळाले. आज अगदी कन्फर्म असलेले मेडल गेले. विनेश विजेती आहे, संघर्ष करणारी आहे, तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न केले पण ते कमी अगदी थोडेसे कमी पडले. आपल्या हातात आलेले मेडल गेले. तिच्या आणि आपल्या सगळ्यांच्या पदरी निराशा आली. आता मोजके इव्हेंट शिल्लक आहेत. बघूया आपल्याला अजून किती मेडल मिळतात.
भारतीय संघाला शुभेच्छा !
अरेरे! फार वाईट. पाणी कमी
अरेरे! फार वाईट. पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात डीहायड्रेट होऊन पार चक्कर येऊन पडली ! रक्त काढायचा प्रयत्न फार भयंकर वाटले ऐकून.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे अवॉइड करता आले असते का?
अगदी काल ती पात्र होती आणि एका रात्रीत वजन वाढून अपात्र झाली हे वाचून अवाक व्हायला होतंय . इथे अक्षरशः पूरी कायनात तिला मेडल मिळू न देण्यासाठी एकत्र आल्यासारखे वाटले!!
https://x.com/sportstarweb
https://x.com/sportstarweb/status/1821110865036505258
विनेशचं वजन कालच्या दिवसभरात दोन किलोहेनही जास्त वाढलं. . काल सकाळी ते ५० किलोच्या खाली होतं. काल ती तीन सामने खेळली. त्यादरम्यान खाणंपिणं झालं.
रात्रभर वजन कमी करायचे प्रयत्न केले. ते १०० ग्राम ने कमी पडले.
ही तिची natural weight category नव्हती हेही एक कारण सांगितलं जातंय.
सपोर्ट टीमने काल दिवसभर तिचं खाणं कसं मॅनेज केलं? त्यात चुका झाल्या का?
https://x.com/alliseeisgold
https://x.com/alliseeisgold/status/1821160225958740454
हा अमेरिकन मल्ल ऑलिंपिक आणि जागतिक कुस्ती स्पर्धांचा विजेता आहे. तो म्हणतोय, विनेशला सिल्व्हर मेडल मिळायला हवं.
Team manager ला गेल्या
Team manager ला गेल्या आठवड्यातले वजन चार्ट सादर करायला सांगा. म्हणजे कळेल काय कुणाची चूक होती. विनेश खरोखरच पन्नास किलो गटात जाऊ शकत होती का?
तिने त्याचं वजनी गटात qualify
तिने त्याचं वजनी गटात qualify केलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून Olympic quota मिळवला.
स्पर्धेच्या आदल्या दिवसापर्यंत वजन कमी करणं हे सर्रास होतं.
इथे सविस्तर स्पष्ट केलं आहे
https://indianexpress.com/article/sports/sport-others/explained-why-vine...
तिचा मूळ वजनी गट वेगळा - वरचा होता , हे खरं. पण या वजनी गटात येऊन तिने कामगिरी करून दाखवली. आधीसारखी फायनलही कालच झाली असती, तर हा प्रश्न आलाच नसता.
फार वाईट वाटले. पण हे पुन्हा
फार वाईट वाटले. पण हे पुन्हा पुन्हा चेक करायचे कारण कळत नाही. एखाद्याने चिटिंग करायला त्या चेक करण्याच्या दिवसापुरते वजन कमी केले असेल व मूळची ती खेळाडू वेगळ्या गटातली असेल तर ते पकडण्याकरता हे असावे. पण त्याला ही काहीतरी टॉलरन्स असायला हवा. १०० ग्रॅम ने इतका मोठा फरक पडतो? म्हणजे खेळाडूला इतका प्रचंड फायदा मिळणार आहे की तिला डिसक्वालिफाय करायची गरज पडावी?
त्यातही सिल्वर मेडल बद्दल पटते. कारण तोपर्यंतची कामगिरी अधिकृत धरली जायला हवी. त्यामुळे फायनल नाही खेळली तरी सिल्वर मिळायला हवे. एकदा स्पर्धेकरता सगळे चेक्स झाल्यावर इतक्या नंतर डिस्क्वालिफाय म्हणजे खूपच हार्श आहे.
टॉलरन्स असतो काहीतरी, नक्की
टॉलरन्स असतो काहीतरी, नक्की किती ते माहित नाही, पण त्या टॉलरन्स च्या लिमिट पेक्षा १०० ग्रॅ जास्त भरले वजन. बाकीच्या स्पोर्ट्स मधे नसेल फरक पडत पण कुस्तीसारख्या खेळात फरक पडत असावा ना वजनाचा. इतर स्पर्धांमधेही प्रत्येक मॅच ला बघतात वजन . वेइंग इन हा रुटीन मधला मह्त्त्वाचा भाग असतो. त्यामुळे तसेच वेळापत्रक असते स्पर्धकांचे. आधी वजन मग ते झाले की खाणे - पिणे. मग मॅचेस आणि रात्री पुन्हा भरपूर व्यायाम, सौना वगैरे करून वजन जागेवर आणणे.
हे आता इकडे तिकडे वाचून मिळालेली माहिती.
आज सुवर्णपदकाच्या मॅचसाठी
आज सुवर्णपदकाच्या मॅचसाठी विनेशच्या जागी क्यूबाची युस्नेईलिस लोपेझ हिला फायनलमध्ये बढती दिली आहे.
<<< म्हणजे खेळाडूला इतका
<<< म्हणजे खेळाडूला इतका प्रचंड फायदा मिळणार आहे की तिला डिसक्वालिफाय करायची गरज पडावी? ...
इतक्या नंतर डिस्क्वालिफाय म्हणजे खूपच हार्श आहे. >>
१. समजा विरोधी खेळाडू (अमेरिकन) डिसक्वालिफाय झाली असती तर इतके हळहळले असते का लोकं की सुवर्णपदक मिळाले म्हणून आनंद साजरा करत बसले असते?
२. हे नियम सगळ्यांना सारखेच आहेत की ठराविक लोकांना वेगळे? म्हणजे एकाला १०० ग्रॅम वजन जास्त नको आणि दुसऱ्याला ५०० ग्रॅमपण चालेल?
३. हे नियम आधी माहीत न्हवते की आयत्यावेळी बदलले?
झालं गेलं विसरा आता आणि पुढच्या वेळी ही चूक करू नका, हा धडा मिळाला.
पण त्या टॉलरन्स च्या लिमिट
पण त्या टॉलरन्स च्या लिमिट पेक्षा १०० ग्रॅ जास्त भरले वजन >>> ओह! मला वाटले मूळ कट ऑफ पेक्षा जास्त भरले.
पण तरी हा प्रश्न राहतोच की तिचे वजन त्या दिवसांपर्यंत बरोबर होते. तर फक्त त्या मॅच मधून डिस्क्वालिफाय करून सिल्वर का नाही द्यायचे?
मस्तच मीराबाई..ग्रेट
मस्तच मीराबाई..ग्रेट
विनेशच्या ग्रुपमधल्या
विनेशच्या ग्रुपमधल्या मेडलच्या कुस्त्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत.
Pages