Submitted by किल्ली on 4 August, 2024 - 04:46
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2024/08/04/Screenshot_20240804_141118_Gallery.jpg)
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धी वाटी चणाडाळ, पाव वाटी मुगडाळ, पाव वाटी उडीदडाळ, दोन टी स्पून तांदूळ, कोहळा पाव किलो किसून, हिरव्या मिरच्या 4, मीठ, जिरे व ओवा ह्यांची भाजून केलेली पूड, हळद, अद्रकाचा तुकडा
क्रमवार पाककृती:
कृती :
१.डाळी आणि तांदूळ धुवून घ्या. कोहळ्याच्या किसामध्ये 3तास भिजत घाला. पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कोहळ्याच्या पाण्यात डाळी भिजतात.
२.भिजत घातलेले मिश्रण मिक्सर जार मध्ये घाला.त्यात मिरच्या, अद्रक, जिरेओवा पूड हे सगळं घालून जाडसर भरडून घ्या.
३.हे मिश्रण एका बोल मध्ये घेऊन त्यात चविप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या.
४.आता चमच्याने किंवा हाताने गरम तेलात सोडून कुरकुरीत वडे तळून घ्या.
वाढणी/प्रमाण:
४, खाणारे नग असल्यास प्रमाण बघू नये
अधिक टिपा:
पीठ पातळ झाले आहे असे वाटले किंवा बाइंडिंग हवी असल्यास 2 चमचे/ टी स्पून बेसन मिसळा.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किल्ली, मस्त दिसतायेत वडे.
किल्ली, मस्त दिसतायेत वडे.
तों पा सु
ऋतु +१२३ : लाळ गाळणारी बाहुली
ऋतु +१२३ : लाळ गाळणारी बाहुली :
चमचमीत दिसतेय
चमचमीत दिसतेय
भारी दिसत आहेत.
भारी दिसत आहेत.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टेस्टी असणारच, अशा पावसात खायला अजून छान
धन्यवाद. दिसतेय एकदम तोंपासू
धन्यवाद. दिसतेय एकदम तोंपासू
करुन बघण्यात येईल
मस्त दिसतायत वडे!
मस्त दिसतायत वडे!
मस्त दिसाताहेत वडे
मस्त दिसाताहेत वडे
मस्त दिसतायत करून बघणार ...
मस्त दिसतायत करून बघणार ... कोहळा मऊ असतो पण वडे कुरकुरीत होतात का ? कोहळ्या ची टेस्ट मस्त लागत असेल.
डाळींचा कोरडा भरडा काढून मग भिजत घालीन अस म्हणतेय म्हंजे कोहल्याच किसलेल texture टिकून राहिल. असो.
केले की लिहिते इथे ही रिझल्ट काय ते ..
मस्त दिसतायत वडे. तुझा फोटोही
मस्त दिसतायत वडे. तुझा फोटोही छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसताहेत वडे. खरंच, फोटो
मस्त दिसताहेत वडे. खरंच, फोटो गोड आलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान पाकृ आहे.
छान पाकृ आहे.
वाह मस्तच.
वाह मस्तच.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोहळ्याच्या किसाचे थालीपीठ, धिरडे, पराठे, कटलेट वगैरे असंख्य प्रकार करता येतील.
मस्तं आहे रेसिपी !
मस्तं आहे रेसिपी !
छान. डीप फ्राईड नसलेला आयटम
छान. डीप फ्राईड नसलेला आयटम बनवून बघणेत येईल.
कोहळ्याला इंग्लीश मधे काय म्हणतात?
धन्यवाद,
धन्यवाद,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Ash guard म्हणतात, तुम्ही आशु गार्ड म्हटलं तरी चालेल
अगदीच जवळचं नाव
वा वा! फारच मस्त दिसतायत!!
वा वा! फारच मस्त दिसतायत!!
सुरेख !
सुरेख !
ये आयडिया की कल्पना काम मे लायी जायेगी! आळशीपणा करायची आयती संधी आहे मला. किसातच जिन्नस भिजत घालणे हे कधी सुचलं नसतं....
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)