कोहळ्याचे खमंग वडे

Submitted by किल्ली on 4 August, 2024 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी चणाडाळ, पाव वाटी मुगडाळ, पाव वाटी उडीदडाळ, दोन टी स्पून तांदूळ, कोहळा पाव किलो किसून, हिरव्या मिरच्या 4, मीठ, जिरे व ओवा ह्यांची भाजून केलेली पूड, हळद, अद्रकाचा तुकडा

क्रमवार पाककृती: 

कृती :
१.डाळी आणि तांदूळ धुवून घ्या. कोहळ्याच्या किसामध्ये 3तास भिजत घाला. पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कोहळ्याच्या पाण्यात डाळी भिजतात.
२.भिजत घातलेले मिश्रण मिक्सर जार मध्ये घाला.त्यात मिरच्या, अद्रक, जिरेओवा पूड हे सगळं घालून जाडसर भरडून घ्या.
३.हे मिश्रण एका बोल मध्ये घेऊन त्यात चविप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या.
४.आता चमच्याने किंवा हाताने गरम तेलात सोडून कुरकुरीत वडे तळून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४, खाणारे नग असल्यास प्रमाण बघू नये
अधिक टिपा: 

पीठ पातळ झाले आहे असे वाटले किंवा बाइंडिंग हवी असल्यास 2 चमचे/ टी स्पून बेसन मिसळा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी दिसत आहेत.
टेस्टी असणारच, अशा पावसात खायला अजून छान
Happy

मस्त दिसतायत करून बघणार ... कोहळा मऊ असतो पण वडे कुरकुरीत होतात का ? कोहळ्या ची टेस्ट मस्त लागत असेल.

डाळींचा कोरडा भरडा काढून मग भिजत घालीन अस म्हणतेय म्हंजे कोहल्याच किसलेल texture टिकून राहिल. असो.

केले की लिहिते इथे ही रिझल्ट काय ते ..

धन्यवाद सर्वांना Happy
कोहळ्याच्या किसाचे थालीपीठ, धिरडे, पराठे, कटलेट वगैरे असंख्य प्रकार करता येतील.

धन्यवाद,
Ash guard म्हणतात, तुम्ही आशु गार्ड म्हटलं तरी चालेल Proud

सुरेख !
ये आयडिया की कल्पना काम मे लायी जायेगी! आळशीपणा करायची आयती संधी आहे मला. किसातच जिन्नस भिजत घालणे हे कधी सुचलं नसतं....