चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रिबेका ची जवळजवळ सर्व व्हर्जन पाहिली.(सर्वात मॅक्झिम एकदम आय कँडी घेतला आहे, पात्र तसंच आहे कथेत.त्यातल्या त्यात लॉरेन्स ओलिव्हिए आणि चार्लस डान्स जरा दिसायला बोअर वाटले.)
जिथे जिथे हिंदी व्हर्जन झाली आहेत तिथे (किंवा अगदी जुन्या इंग्लिश व्हर्जन मध्ये) मॅक्स ला एकदम धुतल्या तांदळाचा, 'तिने आत्महत्या केली आळ माझ्यावर टाकला' टाईप चा बदलायचा प्रयत्न झालाय.
IMG_20240803_080351.jpgIMG_20240803_080148.jpgIMG_20240803_075951.jpgIMG_20240803_075922.jpgIMG_20240803_075852.jpgIMG_20240803_075818.jpg

अरे हो, दिनो मॉरिया चा अनामिका पण बहुतेक इथेच वाचून पहिला होता.आता पूर्ण आठवत नाही पण सर्व पात्रं एकदम मॉडेल आणि हॉट होती.

यातला मॅक्झिम कोणता? (या प्रश्नात त्याच्या आयकॅण्डीपणाची तौहीन आहे याची कल्पना आहे पण तो कलाकार मला माहीत नाही Happy )

मॅक्झिम उर्फ मक्झिमिलियन द विंटर हे पात्राचं नाव फारएण्ड
इथे ते पात्र वेगवेगळ्या रिबेका मध्ये केलेली मल्टिपल पात्रं.

कोहरा मध्ये बायको लफ्डेबाज दाखवलीय आणि त्या भानगडीत तिचा खुन होतो. आयकँडी माणसाची बायको लफडेबाज म्हणजे जरा जास्तच…. (मला हृतिक रोशन का आठवला देव जाणे Happy )

ते 'श्रीमंत माणसाची बायको लफडेबाज(किंवा श्रीमंत बाईचा नवरा लफडेबाज) असं असेल.म्हणजे आता बकेट लिस्ट मधलं पैश्यांचं ध्येय पूर्ण झालं, आता आयुष्यातल्या बाकी (गोल चेहरा नसलेल्या, एकदम चीझल्ड फीचर्स असलेल्या) गोल्स च्या मागे लागू असं असेल Happy

असेल असेल…. विश्वजीतचा गोड गोड गब्दुला चेहरा सतत बघितला तर डायबेटिस व्हायची शक्यता आहे हा पॉईंट तिला सुचला असावा..

शेवटचा ओमर शरीफ ना? तो डॉ. झिवागोच वाटतोय. हे वर्जन पाहिले पाहिजे.
बाकी रिबेका म्हणजे तत्कालीन पेज ३ सेलेब्रिटी. तिला एकनिष्ठ नवऱ्याचा कंटाळा वगैरे आला असेल.
विश्वजीत मला आयकॅंडी नाही वाटत. फार फार तर संक्रांतीला लुटतात ती छोटी, पिवळ्याधोप गुळाची ढेप जिला ब्राऊन रंगाच्या गुळाचा खमंगपणा नसतो.

विश्वजीत मला आयकॅंडी नाही वाटत. फार फार तर संक्रांतीला लुटतात ती छोटी, पिवळ्याधोप गुळाची ढेप जिला ब्राऊन रंगाच्या गुळाचा खमंगपणा नसतो.>>>>>
हाहा…

विश्वजीत स्वतःला हिरोइनपेक्षा जास्त कमसीन, नाजुक समजायचा बहुतेक… त्याच्या प्रत्येक गाण्यात त्याचा प्रयत्न दिसतो. नादान व भोला दिसणे हिरोला शोभले नसते म्हणुन तो प्रयत्न केला नसावा.

त्यातल्या त्यात बराच लॉजिकल ला प्रिमा मोगली आहे इटालियन.त्यात नायिकेला थोडा कणा दाखवलाय. दुसऱ्या इमेज मधला रिबेका पण चांगला आहे.
जेरेमी ब्रेट च्या रिबेका(शेवटून तिसरी इमेज) मध्ये पूर्ण वेळ जेरेमी ब्रेट अतिशय खडूस सारखा वागतो.घरातला टीपॉय तुटला म्हणून लगेच स्टोअर मध्ये जाऊन नवा आणून ठेवला असावा तसं त्याचं नायिकेबरोबर वागणं पूर्ण वेळ(म्हणजे मॅनडरले मध्ये येण्याच्या आधीपासूनच) मख्ख आणि चिडका बिब्बा आहे.

अनु हे सगळे तु कुठे बघितलेस ग??

(असला व्यासंग आता मी पण करणारे. काल लगे हाथ संजिव्कुमारचा कत्ल व वरिजिनल अमेरिकन दोन्ही बघितले)

काल मिथुन,मुनमुन सेन व मल्लिका साराभाईचा शिशा युन्ट्तुबवर पळवत पाहिला. हा पण थेटरात जाऊन पाहिलेला होता पण काहीच आठवत नव्हते. मी टु… चळवळीचा आद्य सिनेमा म्हणुन यु ट्युबवर कमेंट आहेत. यातला हिरो फॉर अ चेंज गुन्हेगार आहे जो वकिली मदतीने सुटतो.

काही काही युट्युब वर
बाकीचे प्राईम आणि नेटफ्लिक्स वर.
>>> नोटेड!

असला व्यासंग आता मी पण करणारे >>> Lol
#AVKMIA असा मी हॅशटॅगच करून ठेवलाय, फार कामी येतो! Proud

इथे वाचून मी काल १९४० चा हिचकॉकचा लॉरेन्स ऑलिव्हिएने काम केलेला रिबेका बघितला यूट्यूबवर! मस्त आहे! फक्त ते खूप फास्ट बोलतात. संवाद समजत नव्हते म्हणून कॅप्शन्स ऑन केल्या तर त्या काहीही येत होत्या. Lol पण एकंदरीत दोन्ही मिळून संवाद समजले.
जेव्हा मॅक्सिम तिला रिबेकाच्या मृत्यूचा प्रसंग वर्णन करून सांगतो तेव्हा कॅमेरा ज्या प्रकारे हलतो त्यामुळे अंगावर काटा येतो. अभिनयही सगळ्यांचे मस्त आहेत.

AVKMIA>> हाहाहा! हे भारी आहे.

कल्की 2898 AD पूर्ण नाही पाहिला , बहुधा बघवलाही जाणार नाही ..

पण तो सुरुवातीचा 5 - 6 मिनिटांचा सीन पुन्हा पुन्हा बघितला तरी कंटाळा येत नाहीये .. कुरुक्षेत्रावरचा डायलॉग आणि नंतरचं ऍनिमेशन स्वरूपातलं अमिताभच्या आवाजातलं गाणं .. <3

अमिताभनी मनात आणलं असतं तर साईड बाय साईड गायक म्हणूनही सहज करिअर करू शकले असते आणि संगीतक्षेत्रातही अजरामर कलाकृती दिल्या असत्या ...

कृष्णही आवडला .. चेहरा स्पष्ट न दाखवणं , आवाज - देहबोली , संवादफेकीवर भर देणं हा शहाणपणा दिग्दर्शकाने दाखवला .. तरीही युट्युबवर काहीजण जुन्या कृष्णाच्या ऍक्टर्सशी तुलना करायचे थांबलेले नाहीत ... काहीही नवीन बघितलं की जुनंच कसं चांगलं होतं हे सांगायची मजेशीर प्रवृत्ती आहे आपल्याकडे ... असो .. जर सिक्वेल येणार असेल तर या ऍक्टरला पुन्हा कृष्ण म्हणून पाहायला आवडेल .. पूर्ण चेहरा उजेडात आणि पूर्ण अभिनयासकट ..

आजवर पडद्यावरचा सर्वात भावलेला कृष्ण नीतीश भारद्वाजच आहे.
त्या वेळी ते घडून गेलं. नंतर दुसर्‍या प्रोजेक्ट मधे नीतीश भारद्वाजला सुद्धा ते जमलं नसतं. देखणा पण थोडा बायकी चेहरा, त्याच वेळी त्यावर उमटणारे बेरकी भाव हे मिश्रण अफलातून होतं. प्रभातच्या जुन्या चित्रपटांचा महोत्सव चालू होता तेव्हां गोपाळ काला मधला बाल कृष्ण पण आवडला होता. अर्थात त्या वेळी पडद्यावर कुणीही देव म्हणून आला कि लोक हात जोडायचेच.

रामानंद सागरच्या रामायण मधला राम म्हणजे अरूण गोविल कधीही राम वाटला नाही.
राम, कृष्ण, बुद्ध यांचे चेहरे थोडे बायकी असतात. हे बहुतेक राजा रविवर्म्याच्या किंवा ज्याने कुणी पहिल्यांदा ही चित्रे चितारली त्याच्या चित्रांचं भारतियांच्या मनावर असलेलं गारूड असावं. त्याला छेद देणारी प्रतिमा आवडून घेतली जात नाही.

गावाकडे न्हाव्याच्या दुकानात गेलं कि नरकात दिल्या जाणार्‍या यातनांचं एक चित्र असायचं, त्याच्या शेजारी मल्हारी मार्तंड घोड्यावर बसला आहे आणि त्याने एका दैत्याचा वध केलेला आहे, काली मातेचं धडकी भरवणारं एक चित्रं, शेजारी राम, कृष्ण आणि शंकराची मात्र भरपूर चित्रं असत. एक उभे पेंटिंगसारखे महादेवाचे चित्र अजून लक्षात आहे. कमनीय बांधा, उडणारे केस, निमुळता चेहरा आणि एक पैलवान सारखा दिसणारा उग्रट चेहर्‍याचा महादेव. हे दोन चित्रकार वेगळे असतील.

मला नितीश भारद्वाज आणि आता सौरभ राज जैनचा कृष्ण आवडला. दोघेही नटखट कॅटेगरीतले वाटायचे. बायकी नाही पण आपल्याकडे जुन्या चित्रात गोल चेहरा वापरायचे देवादिकांच्या चित्रात. अरुण गोविलचं स्मितहास्य फार सुदिंग होतं. म्हणून तो वाटायचा राम. पण सिरीअल संपल्यावर रामाचा चेहरा म्हणून तो आठवायचा नाही जसा नितीश आठवायचा कृष्ण म्हणून. शंकर मात्र देवों के देव महादेवमधला मोहित रैनाच!

दुसर्‍या प्रोजेक्ट मधे नीतीश भारद्वाजला सुद्धा ते जमलं नसतं. >>

नाहीच जमलं .. विष्णू पुराण मालिकेतील अभिनय पहा , सुमारच्या जवळपास आहे . ज्याने इतका कमाल कृष्ण साकारला तो इतका सुमार विष्णू कसा साकारू शकतो असा प्रश्न पडतो . तेव्हा - त्यावेळी ते घडून गेलं हे खरं आहे .

अरुण गोविल बहुसंख्य जनतेला राम म्हणून पसंत आहे ... including me .. कारण उपलब्ध ऑप्शन्स पैकी तो वरचढ आहे . इतक्या वर्षात 10 - 15 रामायण मालिका झाल्या त्यातला कुणी जवळपासही जाणारा नाही . अगदी अलीकडचा सौरभ राज जैन - इतका देखणा अभिनेताही पुरेसा राम वाटणार नाही .

राम मनमोहन , भुवनसुंदर वगैरे होता अशी वर्णनं वाचली आहेत आणि अरुण गोविल तर तसे नव्हते , जरा जास्तच वय असेल , रूपही नाजूक नाही .. पण काहीतरी बात होती निश्चित जी आजपर्यंत कुठल्या रामाच्या ऍक्टर मध्ये दिसली नाही . ( धीरगंभीर , मर्यादापुरुषोत्तम , संयतशील वगैरे कदाचित ... ) निदान प्रचलित स्क्रीनवर आलेल्या तरी .. कुठे खेड्यातल्या रामायण नाटकातला राम न जाणो अरुण गोविल पेक्षा कितीतरी सरसही असायचा , जणू प्रति विष्णूच वाटेल असा . पण तसा कुणी जोवर समोर येत नाही तोवर अरुण गोविल राम वाटत राहतील .

बाकी , प्रतिमा आता झपाट्याने बदलत आहेत .. आता स्क्रीनवरचे शंकर सिक्स पॅकचे झाले आहेत आणि गणपती सडसडीत होऊ लागले आहेत , 25 वर्षात गणपती साठीही सिक्स पॅक ही कंडिशन होईल .

नवीन रामायण , महाभारतावर आधारीत सिरिअल बघण्यापेक्षा डोळे मिटून घेतलेले बरे असं भडक , हास्यास्पद आणि वाईट चित्रण आहे .

स्टार प्लस वरची महाभारत ठीक होती पण त्यांनंतर बेसुमार पौराणिक मालिकांचं पीक आलं आहे , जय गणेश , जय हनुमान , कर्ण , राधाकृष्ण , शनी , गरुड ... युट्यूब वर एखादा मिनिट भराचा व्हिडीओ कुतूहलाने पाहिला तरी मालिकेचं स्टॅंडर्ड लक्षात येतं .

अगदी माझेमन. अरुण गोविल (गवळी देऊ लागले ऑटोकरेक्ट Lol ) किती किरकोळ होता. मी सुद्धा मारू शकले असते रावणच काय.

मोहित रैनाच्या चेहऱ्यावर जम्मुचा थंड, स्मशानवासी निरासक्तपणा दिसायचा. किती देखणा आहे तो..! प्रेमळ पण अव्यक्त, इंट्रोव्हर्टांचे आराध्य. आणि सौरभ राज जैन बरोबर कृष्ण वाटायचा वरून सर्वाचा आनंद घेणारा, कलासंगीतात रमणारा, प्रचंड खट्याळ तरीही गूढ. कृष्ण तसाच आहे, एक्स्ट्रोवर्टांचे आराध्य.

रामानंद सागरचे रामायण आणि बी आर चोप्राचे महाभारत दोन्ही आठवत नाही. फक्त नावाजलेले आहे म्हणून रामायण बघायचे प्रयत्न केले होते पण रवींद्र जैनची गाणी आणि रडारड, शिवाय ठराविक डबिंग आर्टिस्टचे आवाज सगळ्याच्या सगळ्या कास्टला दिल्याने पेशंस संपला.

नंतर दुसऱ्या एका रामायणात रावण अधूनमधून उर्दू बोलायचा. (फरहान सोडून हे काय Lol ) त्याच मालिकेत समोरच्या महत्त्वाच्या वानरांना हुप्पचे प्रॉप दिले होते.
सशासारखे मल्टिप्लाय होणाऱ्या मागच्या वानरसेनेला बजेट संपल्याने की काय 'मॅन्युअली' हुप्प Lol करायला सांगितले होते. रावण पिशाच्चांशी लढताना खाली सबटायटल्समधे 'पिस्ताशिओ- पिस्ताशिओ' येत होते. खिरीत पिशाच्चे घातली का ?
आता पौराणिक मालिका सहनही होत नाहीत.

खिरीत पिशाच्चे घातली का ? >>> Lol हॅलोवीनच्या भोपळ्याची खीर Happy

अरुण गोविल (गवळी देऊ लागले ऑटोकरेक्ट Lol ) >>> Lol

रावण अधूनमधून उर्दू बोलायचा >>> सिरीयसली? "सागर" शब्द समुद्र याच अर्थाने घ्यायचा ना तो नक्की? Happy

नितिश भारद्वाज कृष्ण म्हणून छान होता. एक मिष्किल भाव असे त्याच्या चेहर्‍यावर. All-knowing expression, but in a good way. त्या व्यक्तिरेखेला फिट्ट बसे ते. पुण्याच्या गणपतींच्या मिरवणुकीत एका वर्षी बहुधा दगडूशेठच्या रथावर तो कृष्णाच्या पूर्ण मेकअपसहित होता. पब्लिकने तुफान स्वागत केले होते.

पुण्याच्या गणपतींच्या मिरवणुकीत एका वर्षी बहुधा दगडूशेठच्या रथावर तो कृष्णाच्या पूर्ण मेकअपसहित होता >> जन्माष्टमी ना ? २१ लाख रूपयाची हंडी ?

रामायण मालिकेत सुनील लाहिरी (लक्ष्मण) , अरविंद त्रिवेदी (रावण) , दारासिंग Happy आणि हिडिंबा ही पात्रं अगदी अचूक कास्टिंग होती. बाकीचे धरून आणलेले होते. अरूण गोविल राजश्री प्रॉडक्शन मधे जे एकच एक्सप्रेशन शिकला त्यावर त्याने आख्खी मालिका चालवली. तेच हसू सलमान खान, संस्कारी बाबूजी, मोहनीश बहल आणि सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसतं.

सोनाली बेंद्रेचा तिच्या तोंडावळ्याचा एखादा भाऊ असेल तर तो रामाच्या भूमिकेत मी तरी घेईन. Happy
सीता शोभना समर्थच. दीपिका कधीही सीता वाटली नाही, त्यातून तिचे उच्चार आणि आवाज. संवादफेकही अजबच.

राम, कृष्ण, संत ज्ञानेश्वर आणि गौतम बुद्ध यांच्या बद्दल फेसबुकवरच्या चर्चेत वाचले होते कि यांच्याबद्दल प्रसन्न वाटावं किंवा आईकडे जसे मूल पाहते तसे या देव / विभूतींकडे पहावं असं काहीसं आहे. महादेवाची भीतीही वाटली पाहीजे आणि संकटात आधारही वाटला पाहीजे म्हणजे वडलांबद्दल जे भाव असतात ते ...चित्रात उमटावेत असं काही आहे. खखोचिजा.

जन्माष्टमीलाही असेल. मी मिरवणुकीत पाहिला होता.

अरूण गोविल राजश्री प्रॉडक्शन मधे जे एकच एक्सप्रेशन शिकला त्यावर त्याने आख्खी मालिका चालवली. तेच हसू सलमान खान, संस्कारी बाबूजी, मोहनीश बहल आणि सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसतं. >>> Happy हो खरे आहे. रामायण मधल्या त्याचा रोलचा संबंध राजीव गांधींच्या व्यक्तिमत्त्वाशीही लावला गेला होता तेव्हा.

सीता व रावण दोघांचेही रोल करणारे नंतर भाजपमधे आले ना? पुढच्या घटनांची नांदीच होती ती Happy

विषयांतर झालंच आहे जरा तर .. राम कृष्णांचे रोल केलेल्यांनी अगदीच निराशा केली .. गोविल , भारद्वाज उघड भाजप समर्थक आहेत ... स्वप्नील जोशी जुगाराची जाहिरात करून झाली आहे ..नितीश यांनी वैयक्तिक आयुष्याची लक्तरं वेशीवर टांगून गीता आपल्याला शतांशाने कळली नसल्याचं सिद्ध केलं आहे . .

माझे एक आवडते ऍक्टर सर्वदमन बॅनर्जी , त्यांच्या कृष्णाच्या पूर्ण रोलपेक्षा मला त्यांचा गीता सांगतानाचा अभिनय आवडतो .. त्या रोल बद्दल ते भरभरून बोलतात पण संपूर्ण रोल आवाज दुसऱ्या डबिंग आर्टिस्टने दिला होता याबद्दल एका शब्दाने बोलले नाहीत , ज्यावेळी त्यावर स्वतंत्र डॉक्युमेंटरी झाली त्या आर्टिस्टचा इंटरव्ह्यू वगैरे तेव्हा समजलं .... तोपर्यंत हे सगळ्या क्रेडीट बाबत मूग गिळून शांत होते ... खरं तर त्या रोलला जी काही थोडीफार लोकप्रियता मिळाली त्यात 60 % क्रेडीट तर व्हॉइस आर्टिस्टचं होतं , 10 % बॅकग्राऊंड गाण्यांचं आणि उरलेलं यांचं .. तरीही .. असो .

घटाघटाचे रूप आगळे म्हणून गप्प बसावं झालं . बाह्य रूपच नाही , अंतरंगही वेगळं घडवलं आहे . त्याने असं घडवलं आहे म्हणून तसे वागतात म्हणायचं झालं .

किल बघितला. चिक्कार मारामारी खूनच खून बघायचे असतील तर बेस्ट आहे. बॉलिवूड चा जॉन विक जणू. हिरो पण किआनू सारखा दिसायला चांगला आहे.

उचकवणे वगैरे काही नाही .. हे चारी माझे खूप आवडते ऍक्टर्स आहेत , लहानपणापासूनचे .. यांना देवाच्या रोलमध्ये बघतच मोठी झाल्यामुळे अभिनय हा मापदंड वगैरे नाही , त्याहीपलीकडे ते कुठेतरी जवळचे आहेत मनाच्या .. त्यांच्या वागण्यामुळे झालेला मनस्ताप बराच काळ आत होता तो आज लिहिला गेला एवढंच . आता ते कसेही वागले तरी प्रिय राहिले नाहीत असंही होणार नाही आणि त्यांचं वागणं योग्य म्हणून ऍक्सेप्टही होणार नाही मग मधला मार्ग वर म्हटला तो .. माझ्या स्वतःपुरता .

“ पुण्याच्या गणपतींच्या मिरवणुकीत एका वर्षी बहुधा दगडूशेठच्या रथावर तो कृष्णाच्या पूर्ण मेकअपसहित होता” - येस्स!! गर्दीत धावत जाऊन त्याला शेक-हँड केला होता. Happy

Pages