Submitted by अनन्त्_यात्री on 2 August, 2024 - 03:12
निवडुंग वनांतरी फुलला
पाहील मग कुणी कशाला
धगधगली बघ शेकोटी
धुरकट मग धुनी कशाला
फड तुऱ्यावरी बघ आला
गोफण मग जुनी कशाला
मी याचक नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला
क्षण अगणित संभाव्यांचा
शंका मग मनी कशाला
पट नीटस स्थळकाळाचा
त्यावर मग चुणी कशाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर...
सुंदर...
>>>मी याचक नच तरी देसी
>>>मी याचक नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला
वाह! वाह! फार आवडले हे. फारच.
मनिमोहोर, सामो धन्यवाद!
मनिमोहोर, सामो धन्यवाद!
मस्त!
मस्त!
>>>>>>>.मी याचक नच तरी देसी
>>>>>>>.मी याचक नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला
या ओळीचे २ अर्थ निघतायत
मी याचक नच . तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला
मला न मागताच सर्व मिळतय मग मी कशाला उपकृत राहू. मी थँकलेसच रहाणार.
मी याचक. नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला
मी याचक असूनही तू देत नाहीस मग मी तरी ऋणी कशाला राहू
कविता आणि सामो ह्यांचे निरूपण
कविता आणि सामो ह्यांचे निरूपण - दोन्हीही खूप छान...
छान!
छान!
सुंदर कविता.
सुंदर कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दुसरा अर्थ घेतला सामो.
नंतरची कडवी वाचून इतक्या शक्यता असताना छोट्या शंकांनी दुरावणारं किंवा हिशेब ठेवणारं नातंच नाही हे..! जे होईल ते त्या अजस्र पटावर सुरूकुत्या येऊ देण्याइतकं सुद्धा अस्तित्वात नाही. असाही एक अर्थ लागतो.
आवडली.
आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यावर मग चुणी कशाला!
सामोचा पहिला अर्थ वाचताना लागला न्हवता पण तो ही भावला.
धन्यवाद अस्मिता, अमित.
धन्यवाद अस्मिता, अमित.
मलाही पहीला अर्थ फार आवडला.
rmd, पॅडी, SharmilaR, अस्मिता
rmd, पॅडी, SharmilaR, अस्मिता., अमितव आभार!
सामो विस्तृत प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद