Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
होना वावे. त्याची जिथे तिथे
होना वावे. त्याची जिथे तिथे मी मी करण्याची लत आडवी येते.
मलाही चढ्ढा आवडलेला. रिमेक
मलाही चढ्ढा आवडलेला. रिमेक म्हणून छान केलेला. त्रुटी होत्याच, पण एक सिनेमा म्हणून जी मजा आली पाहिजे ती आलेली.
फॉरेस्ट गंप अर्थात आवडतोच.
आमिर खानचा तो नेहमीचा एक
आमिर खानचा तो नेहमीचा एक startled look असतो. त्यामुळे सगळीकडे एलियन वाटतो. झाले की एकदा, पृथ्वी ओळखीची आहे की तुझ्या
आमिर खानचा तो नेहमीचा एक
आमिर खानचा तो नेहमीचा एक startled look असतो. त्यामुळे सगळीकडे एलियन वाटतो >>> अगदी अगदी!
आमिर खानचा तो नेहमीचा एक
आमिर खानचा तो नेहमीचा एक startled look असतो. त्यामुळे सगळीकडे एलियन वाटतो. झाले की एकदा, पृथ्वी ओळखीची आहे की तुझ्या >>>
अस्मिता
अस्मिता
तिन्ही खानात आमीर जास्त
तिन्ही खानात आमीर जास्त प्रभावी वाटतो. सलमान आणि अभिनयाचा संबंध नाही. शाहरूख खान भयानक कृत्रिम असायचा. अलिकडे खूप सहजता आहे. पीके पासून आमीर खानचा अभिनय वेगळ्याच दिशेने चाललाय.
जो जिता बही सिकंदर मधल्या रूठके हमसे कभी गाण्यात त्याला लहानपणी भावासोबत खेळलेले क्षण आठवत असतात. एका क्षणी त्याची चड्डी निघते, त्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी असताना खुदकन स्मित येतं... ते खूप सुंदर केलंय त्याने. बाकी, त्याच्या मर्यादा पण ठळक आहेत.
The zone of interest डच,
The zone of interest डच, प्राईमवर, सबटायटल्स..
Auschwitz छळजावणीशेजारी एक जर्मन अधिकारी आणि त्याचं कुटुंब राहत असतं...हाकेच्या अंतरावर...छळछावणीत हिंसाचार सुरूच असतो आणि जणू आपण या जगातील नाहीच आहोत या धर्तीवर जर्मन अधिकारी आणि त्याचं कुटुंब राहत असतं...लोकांचे किंचाळण्याचे आवाज,गनशॉटचे आवाज, गैस चेंबरच्या चिमणीतून निघणारा धुर,जर्मन अधिकार्यांच्या मीटींगांमधे त्यांचं चालणारं डिस्कशन सगळं अंगावर काटा आणणारे आहे...आणि दुसऱ्या साईडला अधिकार्याची बायको आपली बाग फुलवण्यात, मुलांना वाढवण्यात मग्न...प्रत्यक्षात काहीही हिंसाचार न दाखवता तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो....म्युझिक भयंकर आणि भयावह आहे...
डिस्टर्बींग सिनेमा..
मवा जबरदस्त आवडतो पण
मवा जबरदस्त आवडतो पण अस्मिता म्हणते तसे तो बरेचदा वाटतो हे ही खरे आहे. मी त्याच्यापुढे जाऊन म्हणेन कि तो पॉलिश्ड हिरो वाटत नाही (लुक्स नाही तर त्याच्या अॅक्सेंट मूळे - झी वरचे तो स्पेशल पोलिस (??) आहे ते दोन्ही सिनेमे पाहा - लक्षात येईल. ) . पण त्याची एकंदर अॅक्टींग नि पडद्यावरचा वावर तौबा तौबा असतो ह्यात कसलाच वाद नसावा.
शाहरूख खान भयानक कृत्रिम असायचा. अलिकडे खूप सहजता आहे. >> सर यायच्या आधी हे उडवा बरे नाहीतर काही खरे नाही राव आता.
पण त्याची एकंदर अॅक्टींग नि
पण त्याची एकंदर अॅक्टींग नि पडद्यावरचा वावर तौबा तौबा असतो ह्यात कसलाच वाद नसावा. >>> +१
(जोराम.. मघाशी मेन्शन केलेल्या चित्रपटाचे नाव आठवले. )
पण त्याची एकंदर अॅक्टींग नि
सलमान आणि अभिनयाचा संबंध नाही. >>> +शेकडो.
बालवाडीपासून सहन करतेय त्याला, आयुष्यभरच म्हणता येईल.
पण त्याची एकंदर अॅक्टींग नि पडद्यावरचा वावर तौबा तौबा असतो ह्यात कसलाच वाद नसावा. >>> +१
हो. हे तर 'क्रकवा' होतं. क्रश कसा वाटला
हे तर 'क्रकवा' होतं. क्रश कसा
हे तर 'क्रकवा' होतं. क्रश कसा वाटला >>> फॅशन शो सारखे प्रत्येकाचे क्रशेस रॅम्प वॉक करत येत जात आहेत. या बाफवरचे माबोकर जजेस सारखे बसले आहेत त्यांना मार्क्स द्यायला. आणि फॅशनचा गंध नसलेले (माझ्यासारखे) लोक हे सगळे काय चालले आहे असा विचार करतात तसे बाकी माबोकर विचार करत बघत आहेत.
फॅशनचा गंध नसलेले
फॅशनचा गंध नसलेले (माझ्यासारखे) लोक हे सगळे काय चालले आहे असा विचार करतात तसे बाकी माबोकर विचार करत बघत आहेत.
>>>> खरं की काय. मलाही 'शाळा घ्यायला' फार आवडते. बरंच झालं हे
एकदा ८३ च्या वर्ल्ड कपचं
एकदा ८३ च्या वर्ल्ड कपचं षटकार मधे वर्णन होतं. त्यात विंडीजच्या मार्शल, गार्नर, होल्डिंग आणि रॉबर्ट्सचं वर्णन होतं. हे चारही जण जर रस्त्यावरून जाताना दिसले असते तर निरूपद्रवी वाटले असते. पण यांच्या हातात बॉल दिला कि ते कसे आग ओकणारे दानव बनतात हे ज्याने पाहिलं त्यालाच कळलं...
मवाचं अगदी तसंच आहे. पडद्याबाहेर तो साधारण मनुष्य आहे. एकदा का पडद्यावर आला कि बाप रे बाप बाप !
अस्मिता पण शाळा फॅशनची की
अस्मिता पण शाळा फॅशनची की क्रश आवडवून देण्याची?
पडद्याबाहेर तो साधारण मनुष्य आहे >>> क्या याद दिलायी खंबा! "साधारण मनुष्य" शब्दाला माझ्या डोक्यात एक वलय आहे. कारण या सीन मधल्या त्या संवादांत फक्त "साधारण मनुष्य" हेच दोन शब्द समजले होते पहिल्यांदा सीन पाहिला तेव्हा.
"साधारण मनुष्य" शब्दाला
"साधारण मनुष्य" शब्दाला माझ्या डोक्यात एक वलय आहे. >>>
साधारण नाही असाधारण
विजयकांतचे जेव्हढे सीन्स पाहिलेत ते रजनीच्या वरताण आहेत.
आला का विजयकांत
आला का विजयकांत
विजयकांत आहे का हॅलेचा धूमकेतू, दर काही काळानंतर येतोच भेटीला.
ती मागच्या पानावरची पीटर
ती मागच्या पानावरची पीटर-चीटरची पोस्ट मजेदार आहे
बॉलीवूडच्या वेगवेगळ्या दशकातील लोकांची आवड हा एक ग्रंथाचा विषय आहे
शाळा फॅशनची की क्रश आवडवून
शाळा फॅशनची की क्रश आवडवून देण्याची?
>>>>>>
ह्या प्रश्नाने अवांतरासाठी 'मजबूर-बिजबूर' केले. अगदी कशाचीही शाळा -
१. क्रशला अनक्रशून-
इथे आपण तपशीलवार नावे ठेवली की कुणी 'वोक पीप्स' प्रगट व्हायची शक्यता असते. तेव्हा See, this is how Woke culture killed comedy म्हणून त्यांनाच 'पळता भुई' करू.
२. अनक्रशला क्रशून-
पूर्णपणे ऑब्जेक्टीफाय करून देऊ. स्त्री पुरुष कुणीही असो, 'चीप समानता' आणू. अगदी शारीरिक मापांसहित.
३. फॅशन सेन्स नसणाऱ्यांना 'साधी रहाणी उच्च विचारसरणी' म्हणून आवडून देऊ. आम्हाला नको असेल तर त्याला/तिला 'बावळट ध्यान' म्हणून उपहास करू.
४. फॅशन सेन्स असणाऱ्यांना 'हॉट बॉड' सिद्ध करू. आम्हाला नको असेल तर 'सवंग आणि उथळ' अशी वल्गना करत उच्च अभिरुची दाखवून देऊ.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्वरा करा. आज आमचा मूड आहे.
हे मुद्देवंचित धाग्यावर जाईल का , फा ? की पुरेशी वंचना नाही यात.
हे धमाल आहे. एकदम कस्टमाइज्ड
हे धमाल आहे. एकदम कस्टमाइज्ड करिक्यूलम हे टोटल नवीन धाग्याचे मटेरियल आहे
अस्मिता असे नुसते उतारे नको,
अस्मिता असे नुसते उतारे नको, या शाळेतली पाठ्यपुस्तके पण येऊदेत इथे वेगळी. अवांतर वाचनाची पुस्तकं पण!
हो वेगळा धागाच हवा. इथे सगळी
हो वेगळा धागाच हवा. इथे सगळी प्लेबुक तयार करून मिळतील.
दोघांनाही
दोघांनाही
एवढुशासाठी वेगळा धागा कसा काढू...
(No subject)
एवढुशासाठी वेगळा धागा कसा काढू..>> पुरेशा गांभीर्याने लिहीलं कि आपोआप विनोदी धागा निर्माण होतो. लोक विनोदी विभागात हलवा असे प्रेमाने सांगतात. विनोदी विभागात लिहीलं कि आपोआप गांभीर्य प्राप्त होतं. लिहीणं महत्वाचं.
विनोदी विभागात लिहीलं कि
विनोदी विभागात लिहीलं कि आपोआप गांभीर्य प्राप्त होतं.>>>
न्यू दिल्ली टाईम्स अपेक्षा
न्यू दिल्ली टाईम्स अपेक्षा नसताना आतापर्यंत तरी उत्तम चालू आहे. तगडी स्टारकास्ट आहे.
एखाद्या लेखकाच्या कादंबरीहुकूम गुन्हे घडत असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय असणे या थीमवर वेगवेगळी ट्रीटमेंट असलेल्या अनेक कादंबर्या वाचल्यात. इथे लेखका ऐवजी पेनचा संबंध असणारेच पण वेगळे पात्र आहे..
या सिनेमाच्या आधी भारतात छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर अशा जॉनर मधली पोलिटिकल क्राईम स्टोरी आलेली नाही. संथ आहे पण ओक्के आहे.
पुरेशा गांभीर्याने लिहीलं कि
पुरेशा गांभीर्याने लिहीलं कि आपोआप विनोदी धागा निर्माण होतो. >> एकदम सिक्सर!
एवढुशासाठी वेगळा धागा कसा
एवढुशासाठी वेगळा धागा कसा काढू..>> पुरेशा गांभीर्याने लिहीलं कि आपोआप विनोदी धागा निर्माण होतो >>>>
सध्या हॉरर आणि मिस्टरी
सध्या हॉरर आणि मिस्टरी सिनेमा बघायचा सपाटा लावला आहे. काल "ऐतबार" बघितला. दिग्दर्शक मुकुल आनंद ह्याच्या ह्या सिनेमात डिंपल, राज बब्बर, सुरेश ओबेरॉय आणि डॅनी प्रमुख भूमिकेत आहेत. हिचकॉक च्या "डायल एम फॉर मर्डर" वर बेतलेला आहे. यू ट्यूब वर आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
दुसरा आहे "त्रिकाल. फॅमिली ड्रामा" ज्यांना सिनेआटोग्राफी मध्ये रुची आहे त्यांनी मुद्दामहून बघावा. जुन्या जमान्यातल्या अभिनेत्यांचे दर्शन मिळेल. दिग्दर्शक श्याम बेनेगल. भूतकाळात घेऊन जाणार सिनेमा. हाही आपल्याला यू ट्यूब वर मिळेल.
>>>>>पुरेशा गांभीर्याने
>>>>>पुरेशा गांभीर्याने लिहीलं कि आपोआप विनोदी धागा निर्माण होतो. लोक विनोदी विभागात हलवा असे प्रेमाने सांगतात. विनोदी विभागात लिहीलं कि आपोआप गांभीर्य प्राप्त होतं. लिहीणं महत्वाचं.
हाहाहा अल्टिमेट प्रतिसाद आहे.
Pages