Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मवा??
मवा??
मनोज वाजपेयी
मनोज वाजपेयी
मी इतरत्र Tunnel ahead चे
मी इतरत्र Tunnel ahead चे 'पुढे बोगदा आहे' ऐवजी 'बोगदा पुढे आहे' असे काय भाषांतर करतात म्हणुन टिका केली होती. जणु काही लोक बोगदा कुठे आहे म्हणुन शोधत येणार आणि मग पाटी बघुन म्हणणार "अच्छा पुढे आहे होय!"
आता मी माझी टिका मागे घेतो.
मवा ला साऊथ स्टाईल स्टंट्स
मवा ला साऊथ स्टाईल स्टंट्स करताना पाहून लोळण घेतली.
>>>> असू द्या हो..त्याला पण सिरिअस, डिमांडिंग रोल करून कंटाळा येत असेल ना...कधीतरी त्याला पण फ्रीक आउट व्हावेसे वाटत असेल. नसीर नाही का अधून मधून त्रिदेव मध्ये 'ओये ओये' किंवा डर्टी पिक्चरमध्ये 'ऊह ल्ला ला, ऊ ला ल्ला' करतो? मग याने काय घोडं मारलंय?
बाय द वे, या गाण्यांमुळे नासिर चांगला नाचू पण शकतो हे समजले.
New Delhi Times (1986) हा
धीतरी त्याला पण फ्रीक आउट व्हावेसे वाटत असेल >>
New Delhi Times (1986) हा बहुधा खास दूरदर्शनसाठी बनवलेला पॉलिटिकल थ्रिलर होता. भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच सिनेमा होता. दूरदर्शनसाठीच बनवला असल्याने कॅमेरा वर्क थोडं संथ आहे. बघून खूप वर्षे झाली आहेत.
नेफ्लिवर असल्याचे गुगल दाखवतेय. वीकेण्डला पाहीन.
शूल मध्ये काय क्रश दिसायचा ना
शूल मध्ये काय क्रश दिसायचा ना मवा. पण फारच उदास पिक्चर आहे.
दिलीप कुमारचा अभिनय कसा पडदा
दिलीप कुमारचा अभिनय कसा पडदा भरून टाकतो, आताच्या पिढीत मवा त्या क्षमतेचा आहे. फक्त चेहर्यावर कॅमेरा ठेवता येईल असे थोडके अभिनेते आहेत. डोळ्यातून बोलतो गडी.
शूल पाहिला नाही मी. पण झुबेदा
शूल पाहिला नाही मी. पण झुबेदा मध्ये पहिल्यांदा तो डोळ्यात राजपूत रॉयल (उर्फ डोळ्यात बदाम) दिसला. कुठल्याही ट्रॅडीशनली गुड लुकिंग ऍक्टरपेक्षा मस्त कॅरी केलं होतं त्याने स्वतःला. फॅमिली मॅनमध्ये कॉमिक सेन्समुळे जास्त आवडला.
मवा कधीही क्रश मटेरियल नव्हता
मवा कधीही क्रश मटेरियल नव्हता. तो नेहमी शोषित, चिंतातूर, सुटकेची वाट बघणारा, पीडित, दबावाखाली तडफडत असणारा दिसतो. करिष्मा कपूर सोबत झुबेदा मधे तर कुणीतरी समिक्षक 'ब्युटी ॲन्ड द बीस्ट' म्हटले होते या जोडीला. जास्तच हार्ष झाले हे, तरीही क्रशेबल नाही बुवा मवा रॉयल तर राहूच देऊ.
गाणं बघा.
https://youtu.be/xNFNKQtBtdI?si=6CTL9hRqp4bD-t72
मला आवडतो हं, फक्त क्रशेबल नाही वाटत.
माझ्या क्रशना काम नाही आले तरी चालते, ज्यांना काम येते ते 'क्रशेबल' नसतील तरी चालते. वेगवेगळे ठेवलेले बरे. महेश बाबूला काही अभिनय जमत नाहीत पण ऑब्जेक्टीफाय करायला पर्फेक्ट आहे.
अं हं मवा क्रशेबल नाही. सहमत.
अं हं मवा क्रशेबल नाही. सहमत.
मवा कधीही क्रश मटेरियल नव्हता
मवा कधीही क्रश मटेरियल नव्हता. तो नेहमी शोषित, चिंतातूर, सुटकेची वाट बघणारा, पीडित, दबावाखाली तडफडत असणारा दिसतो.>>> रियली?? सत्या,गॅन्ग्स ऑफ ववासेपुर्,,स्पेशल २६,राजनिती,झुबेदा,पिन्जर, फॅमिलि मॅन हे त्याचे
सगळेच धडाकेबाज, भरपुर कौतुक झालेले, मोस्तली अॅक्शन असलेले मुव्हिज यातल्या मवाला तो शोषित -वन्चित कस म्हणता येइल?
हा!! तो लौकिक अर्थाने हिरो टाइप फेस असलेला नाही त्यामुळे क्रश मटेरियल नाही पण लाइकबेल स्टार...तो थेट मला नासिरउद्दिन शाहची आठवण करुन देतो..सट्ल्, प्रामाणीक,परीणामकारक हिरो..
मी नेमकं यातलं बरंच बघितलेलं
मी नेमकं यातलं बरंच बघितलेलं नाही म्हणून 'हिंसक' राहून गेले लिहायचे....
हाय अस्मिता! मतलब तुने रियल
हाय अस्मिता! मतलब तुने रियल मवा को देखा ही नही फिर!! सगळेच बघ यातले एकेक करुन.
बघते, प्राजक्ता.
बघते, प्राजक्ता.
हो मवा क्रशेबल नसेल हे समजू
हो मवा क्रशेबल नसेल हे समजू शकतो. पण अगदीच शोषित वंचित नाही. म्हणजे श्याम बेनेगलच्या पिक्चरमधे जमीनदाराच्या दारात उकिडवा बसलेला आदिवासी नायक वगैरे इमेज त्याची येत नाही डोळ्यासमोर. चांगली डेप्थ असलेला रोल मवा भन्नाट करतो. त्याला राजनीती आणि आरक्षण दोन्हीमधे फारच सरधोपट वन डायमेन्शल रोल्स दिले होते. मराठी सिरीयलमधल्या अकारण खुनशी बायकांच्या कॅरेक्टर्ससारखे.
मवा कोण ?
मवा कोण ?
हल्ली मवा दिसत नाही इथे
हल्ली मवा दिसत नाही इथे
मवा कोण ? >>> मटकंद वानरपुरे
मवा कोण ? >>> मटकंद वानरपुरे
मनोज वाजपेयी, मृ
मनोज वाजपेयी, मृ
मवा क्रशेबल नसेल...>>>मी,
मवा क्रशेबल नसेल...>>>मी, मावा क्रशेबल नसेल असं वाचलं. तेच म्हंटल, मावा क्रशेबलच.
म वा मलाही नव्हतं समजलं.
म वा मलाही नव्हतं समजलं.
क्रश नाहीये पण आवडतो मला तो. सुरुवातीच्या काळात सत्या मध्ये त्या हिरोपेक्षा हाच जबरदस्त वाटलेला.
करिष्मा कपूर सोबत झुबेदा मधे
करिष्मा कपूर सोबत झुबेदा मधे तर कुणीतरी समिक्षक 'ब्युटी ॲन्ड द बीस्ट' म्हटले होते या जोडीला >>>>
नहीं$$$$$ ये मैं क्या सुन रही हूँ...
शोषित, पीडित >>> म्हणजे दिसू शकतो तो पीडित वगैरे. उदा. पिंजरमधला रशीद. पण त्याने मनात आणले तर तो क्रश मटेरियल पण दिसू शकतो. आता जरा त्याने वजन घटवले असावे. चिझल्ड फेस कट दिसतो फॅमिली मॅन मध्ये.
महेशबाबू चांगला आहे. बॉयीश चार्म आहे त्याचा. मवा जरा वेगळी कॅटेगरी, आण्ट रोझ म्हणते तश्शी
आत्ता एक सिनेमा आहे ना ओटीटी
आत्ता एक सिनेमा आहे ना ओटीटी वर. त्यात मवा हराकडे आलेला आदिवासी कामगार. त्याच्या बायकोचा खून होतो आणि आळ त्याच्या वर येतो. १५ मिनिटे पाहिला त्यामुळे नाव आठवत नाही.
हाताळणी खूपच कंटाळवाणी आणि प्रचारकी वाटली. पण मवा च्या अभिनयासाठी पाहू शकतो..
बेबी फेस वाले हिरो आमीर खान
बेबी फेस / फेमेनाईन फेस वाले हिरो आमीर खान पासून सुरू झाले, त्यांनी मॅनली, एक्शन हिरोंना हद्दपार केलं.
हे म्हणजे जंगलात धडकी भरवणारी डरकाळी फोडणाऱ्या सिंहाऐवजी रील्स मधे दिसणारे माणसाळलेले, घरात फिरणारे, बस म्हटलं कि बसणारे, उठ म्हटलं कि उठणारे, अगदी पाळीव कुत्र्या सारखे बनलेले सिंह जास्त पॉप्युलर झालेत तसं आहे.. याला जबाबदार महिला प्रेक्षक!
कुठे तो "पीटर तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा था" म्हणणारा Angry Young Man
आणि कुठे " राहुल इज्जे चीटर चीटर, चीटर चीटर" वर लाडात येत बॅ बॅ बॅ करणारा नायक..
पीटर पे चीटर भारी पड गया.
कुणीतरी जांबुवंत येऊन म्हणेल.
ऊठ पीटर, तेरी पीटने कि शक्ती तू भूल गया है. तेरे साथ चीटिंग हो रही है. जा अपनी शक्ती को याद कर, और पीट दे सब को"
तेव्हा पीटर पुन्हा फॉर्म मधे येईल.
आता अमीर खान हाऊस ने महाराजा
आता अमीर खान हाऊस ने महाराजा चं हिंदी प्रोडक्शन विचारात घेतलंय आणि आमिर खान ला महाराजा ची भूमिका करण्यात स्वारस्य आहे हे पेपरात वाचून धडकी भरली.
त्याला सेतुपती रूपी जांबुवंत
त्याला सेतुपती रूपी जांबुवंत भेटला.
( रीमेक चा एव्हढा मोठा फटका खाऊन पण धडा घेतलेला दिसत नाही.)
कुणीतरी जांबुवंत येऊन म्हणेल.
कुणीतरी जांबुवंत येऊन म्हणेल.
ऊठ पीटर, तेरी पीटने कि शक्ती तू भूल गया है. >>>>
मलाही दिसायला बदाम वगैरे नाही
मलाही दिसायला बदाम वगैरे नाही वाटत, पण त्याचा अभिनय, डोळ्यांतून भाव पोचवणे वगैरे जबरदस्त वाटतात. फॅ, मॅन पासून त्याच्या फॅन क्लबात.कौन मधे धडकी भरायला लावतो & इरीटेट करतो अक्षरशः
चिझल्ड फेस कट दिसतो फॅमिली मॅन मध्ये.>>> करेक्ट.
लालसिंग चढ्ढाचं काम आमिर
लालसिंग चढ्ढाचं काम आमिर खानने स्वतः न करता दुसऱ्या कुणाला तरी द्यायला हवं होतं ( रणवीर सिंग/आयुष्मान खुराना/राजकुमार राव वगैरे). बाकी तो रिमेक म्हणून खरंच आवडला मला. (फॉरेस्ट गम्प खूप आवडतो.)
आमिर खान दंगल मधला & घझीनी
आमिर खान दंगल मधला & घझीनी मधला आठवा. तो रोल अनुसार स्वत:ला एवोल्व्ह करतो. पण त्याचा पीके, चड्ढा नाही बघवले मला, डोळे ताणुन अॅक्टींग
Pages