X/0 = ∞

Submitted by अनन्त्_यात्री on 24 July, 2024 - 08:59

अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व

अनंत जोखण्या
-हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो

धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो

Group content visibility: 
Use group defaults

फारच अगाध...!
Infinity चे मलाही फारच आकर्षण वाटते.

अस्मिता. धन्यवाद

शीर्षकातील समीकरण शास्त्रसंमत नाही याची कल्पना आहे Happy

Happy मुक्तीला कशी असतील शास्त्रांची बंधनं, कारण मग ती अनंत कशी राहील...!
तुम्ही लिहीत रहा, (बहुतेक) माझ्यापर्यंत पोचतात तुमच्या कविता.

ओव्हरकॉन्फिडन्समध्ये शून्य जर अगाधाला गुणायला आले असते तर हाती काहीच लागले नसते.
तेव्हा त्याने अगाधाला भागण्याचा, विभाजन करुन (डिव्हाईड & मेक सेन्स) समजण्याचा प्रयत्न केला हे उत्तम झाले. त्यामुळे त्याला अनंत कवेत घेता आले Happy

कविता आवडली.

सुरेख कल्पना आणि रचना!

चरणांमधला भंग टाळण्यासाठी आणि तिन्ही चरणातल्या मात्रा समान (१०), आणि चौथ्या चरणातल्या समान (६) होण्यासाठी काही सुचवू का? बघा कसं वाटतंय

अगाधा भागण्या
शून्यास घेतले
मग भेटी आले
अनंतत्व

अनंता जोखण्या
नसे मोजपट्टी
तरीही हिंपुटी
झालो ना

धून अनंताची
झंकारली गात्री
अनंतात यात्री
झालो रे