‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्ताने फक्त त्यांचं म्हणणं छापलं आहे. केसरकर आता आवडू लागले आहेत.
पुढे मागे ते सांस्कृतिक खात्याचे मंत्री नक्कीच होतील.

इतकी वर्षे ती कविता आहे पाठयपुस्तकात, कोणाचेही लक्ष कसं नाही गेलं, मला वाटलं यावर्षीचे नवीन उद्योग.

Btw पूर्वी भावे एबीपी माझा नवीन सुरू झालं तेव्हा त्यावर anchor, news reader होती.

ती शेपटीवाले प्राणी कविता फार मस्त आहे.जेव्हा सीडी प्लेयर होता त्यावेळी फाउंटन कंपनी च्या लहान मुलांच्या सीडी मध्ये ती कविता आम्ही मोठे पण सारखी बघायचो.खूप सुंदर नादमाधुर्य आणि कल्पना आहेत.

ती शेपटीवाले प्राणी कविता फार मस्त आहे.जेव्हा सीडी प्लेयर होता त्यावेळी फाउंटन कंपनी च्या लहान मुलांच्या सीडी मध्ये ती कविता आम्ही मोठे पण सारखी बघायचो.खूप सुंदर नादमाधुर्य आणि कल्पना आहेत. >>> +१

त्यांच्या लहान मुलांसाठी अ‍ॅनिमेशन वाल्या गोष्टींच्या कॅसेट्स, सीडी सुद्धा छान होत्या.

ओरिजनल शेपटी वाल्या पण आहे यू ट्यूब वर , सीमा अरुण सरनाईक आणि मुलं.
आमच्या मुलांच्या मुलांना मी शिकवलं होतं ती लहान होती तेव्हा.

पूभा यांची कविता काढून त्या जागी शुद्ध मराठीतली गेयता, प्रास,यमक या अलंकारांनी युक्त अशी कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करावी ही नम्र विनंती.

कुंजात मधुप गुंजारव यमुनातटीं ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥ध्रु०॥

लतागुच्छ सुरतरुही तुच्छ वरी रुजंती करिती मधुकरी ।
विमान वरी दाटल्या उतरल्या गगनीं सुरसुंदरी ।
सुरताल पखवाज खंजिरी मंजरीत बासरी ।
बिन अमृत कुंडली कुणी डफ़ सारंगीला धरी ।
नृत्यकृत्य तत्कार तान करताल झुमकझ्या अंतरीं ।

मोरचंग झांजरी पतीसंपत्यही नानापरी ।
रुपरम्य राधेचे राधा वल्लभ आपण घरी ।
तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभापरी घाबरी ।
फ़ागामधीं बागात मातला वसंत अंत:पुरीं ।
कवण राधिका पति कवण राधा हे न कळे खरी ।
अग सखे ग आनंद मी सांगू किती । अगे सखे
एकमेकावर टाकिती । अगे सखे
कुंकुम अबीर झोकिती । अगे सखे
पिचकार्‍या मुखी मारिती । अगे सखे
केशर मृगमद उडविती ।
या रसाचा कोण जाणता सुरनर हातवटी ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥१॥

श्रीहरीचें वयरुप धरुनि राधा नट नागरधणी ।
पीतवसन बासुरी मुगुट शिरीं तिळभर नाहीं उणीं ।
हावभाव नृत्यात नटाकृति भाव दावितें क्षणीं ।
मदनमूर्ती सावळी तनू सुकुमार फ़ार देखणी ।
तथै तथै तननन नननन वेणुरव किंकणी ।
नृत्यगीत माधुरी हरीची जाणत कालिया फ़णी ।
गर्वरहित गंधर्व सर्व त्या वसंत संतर्पणिं ।
कंठी घालिती मिठी म्हणती राधेला यदुकुलमणी ।
रास जग जनकास मुखामध्यें हास हिर्‍याची खणी ।
बुलाख नथ नासिकीं चमक जशी शुक्राची चांदणी ।
अग सखे रंगरसामधी यदुनायका ॥अगे
नच ओळखिती कितिक बायका ॥अगे
धरुनि मुरलीच्या गायका ॥अगे
सोडिती नयनसायका ॥अगे
कुणी म्हणती हरी आयका ॥अगे
हे मोठे कीं नवल राधिका ॥अगे
घरी नटवर कुचतटीं ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥२॥

वसंतऋतु संतान कुंज ते तरुवर फ़ुलले फ़ुली ।
किती फ़िरती गोपिका किती रंगामधी भिजल्या मुली ।
शुक पीक बक कोकिळा कामपक्षामधीं पडल्या भुली ।
मयुर वर नाचती दिली गती कन्यानें आपली ।
कंद मंद मकरंद धुंद पिचुमंद बकुळवन खुलल्या खुली ।
गुलाब मधु मालती मोगरा बट चंपक मखमली ।
मंदशीत अति सुगंध पवनासहित कुसुम लाखुली ।
किती रासमंडळी गुलाल ही लाल ललित पाऊली ।
स्त्री वेषें हरी होरी खेळतो नवल काय गोकुळीं ।
अनंत कौतुक करी धरी अवतार कृष्ण माउली ।
अग सखे रासांत धूम मातली । अग सखे
श्रीरंगमूर्ती पातली । अगे सखे
रंगात तळी घातली । अगे सखे
गोपिका सकळ रातली । अगे सखे
ठाऊकी न किल्ली आतुली । अगे सखे
सत्य सत्य हे भामा रुसली । अगे सखे
कशी येईल शेवटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥३॥
पुरुषवेध राधा निजवेष कवटाळुनि चुंबिती ।
हरी म्हणून गोपिका शुध्द राधेला आलिंगिती ।
अंगसंग रतिभंग दंग रंगामधी किती लाजती ।
मनीं म्हणती कामिनी नव्हे माधव सुखसंगती ।
अष्ट नायका कृष्ण म्हणुन राधेला कवटाळिती ।
काय सांगु मी तरी विचित्र होरी मज भासती ।
सार साक्षी संसारसार कंसारी धरुं धावती ।
कुणी व्यजन चामरें धरितीं पिचकार्‍या चिपळ्या किती ।
ज्या रासामधी गुलाबकेशरी मृगमदनदी बाहती ।
अशी धूम मातली कळेना कोण गाण (?) गोपि कापती ।
अग सखे धांवत आलें तुजकडे । अगे सखे
सांगाया दु:ख रोकडे । अगे
आधीच तुझे वाकडे । अगे
मोठे मज सांकडे । अगे
कपट रुपिणी राधा येऊनि धरील तुझी हनुवटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥४॥

रासामधी हरी लागी समजले भामा रुसली पिशी ।
निजरुपांते घरी करी खटपट पट पिवळा कशी ।
रंगांतुनि सदनांत एकटा हरि पोहचे तिजपाशीं ।
सचिंत पशुचे रिती तशी मंचकावरी ते मुसमुशीं ।
हळुच पद चुरुनि तिचे मांडीस देतसे उशी ।
उठुनि म्हणे भामिनी सवती मजपुढें सोंग मिरविशी ।
त्या कपट्यांचे रुप धरुनि किती रांडेला कवटाळिशी ।
तसे मजही पाहशी कळेना सये वो मज चौकशी ।
ऐकुनि हरी म्हणे भोग जाहला गोष्ट करावी कशी ।
हात ओढुनि तिला म्हणे मी कृष्ण वृष्णीच्या कुशी ।
अग सखे नको संशय धरुं फ़ारसा । अगे
घे क्षणभरी रती सुख रसा । अगे
करीं कंकण नको आरसा । अगे
अग सखे ग - भामा सुखपडे गारसा ।
कविरायाने यापरी नेली रासामधी गोमटी ।
होरी खेळतो हरी करुन राधा नट आपण नटी ॥५॥

संदभार्सहीत स्पष्टीकरण
https://www.youtube.com/watch?v=6Tnlzyn0fr4

अमीतव Lol

मी खरंतर पूर्वी भावे पूर्वी एबीपी माझा वर anchor, news reader होती, असंच लिहिणार होते, मोह टाळला.

ती यायची तेव्हा मला वाटायचं पूर्वा नावाऐवजी पूर्वी लिहिलं आहे का, नंतर वाटायचं तिची आई गुजराथी असेल, एका गुज्जू मुलीचं पूर्वी हे नाव ऐकलेलं पण नंतर समजलं, आई मराठीच आहे, वर्षा भावे.

आता इतक्या वर्षात विसरून गेलेले तिला, कविता निमित्याने परत झोतात आली.

असाव्यात, त्या लहान मुलांसाठी गायन शिबीर वगैरे घेतात असं ऐकून आहे.

ही सगळी ऐकीव किंवा कुठेना कुठे वाचनात आलेली माहिती आहे. तेही तेव्हा जेव्हा पूर्वी एबीपी वर होती, तिथून सोडल्यावर काही दिवसांनी मी विसरून गेले. आता या चर्चेनिमित्याने एकेक आठवतंय.

याच पहिलीच्या पुस्तकात पहिली कविता अग्गोबाई ढग्गोबाई आहे. पाडगावकरांचीही एक कविता आहे.
पूर्वी भावेंची कविता बालभारतीवाल्यांना कशी मिळाली याबाबत कुतूहल आहे.

काय माहिती. मिळाली तरी निवडली कशी, त्या निवडणाऱ्यांची नावंही समोर यायला हवीत.

कविता कशी पाठवायची बालभारतीकडे असं लोकं विचारतायेत, स्वरचित कविताही टाकतायेत. तुम्ही लिंक दिलीय fb ची तीच वाचत होते रात्री.

भाषिक वाद जाऊदे, काव्य म्हणूनही भिकार आहे. यमक जुळवायचा प्रयत्न सुद्धा यथातथाच आहे. 'मैफल - अक्कल', 'सुंदर - साळींदर' Sad

ही कविता २०१८ पासूनच पहिलीच्या पुस्तकात आहे, मग आताच एवढा गहजब का असा मुद्दा चर्चेत येतो.

म्हणजे काहीतरी चुकीचे आहे ते पूर्वापार चालत आले आहे म्हणून ते योग्य ?

हिन्दी-इंग्रजीयुक्त मराठी पहिलीपासून शिकवणे हा २४०० वर्षांचा वारसा असलेल्या “अभिजात” भाषेचा पाया ? काहीही.

Pages