चित्रपट दीवार
शशी कपूर पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर आला आहे. त्याला फोन कॉल आला आहे. निरोप देणारा पोलीस "लडकी का फोन" म्हणताना चांगलाच जळलाय. हा इकडे पोरीबरोबर बोलतो आणि समोरून नीतू सिंग धावत येते.
दोघे पोलीस म्हणतात " कम सून !"
आता दोघे जीपगाडी मधे.
शशी कपूर हनुवटी ला खालच्या दिशेने झटका देत चेहर्यावर खळी पाडत एक बोट वर नेत म्हणतो
"कह दूं तुम्हें ?"
ती "हां"
"या चुप रहूं ?"
"ना "
"दिल मे मेरे आज क्या है"
आता इथे गिटार पीस वाजायला पाहीजे..
टुंग टुंग टुडुंग, टुंग टुंग टुडुंग, टुंग टुंग टुडुंग, टुंग
पण कोरस ऐकू येतो
आ आ आ आ आ आ
आ आ आ आ आ आ
अब जुदा हो ना हम
कभी खुशी कभी गम
शशीकपूर वैतागतो.
अरे यार हे काय ? काल पर्यंत गिटार वर मूव्हमेण्ट्स करत होतो. हे काय लावलंय आ आ आ आ आ?
तिकडून सलीम जावेद पळत येतात.
"आता यश अंकल नाही तर करन जोहर नावाचा दिग्दर्शक सगळं करणार आहे पुढचं काम "
करन जोहर गालाला खळी पाडत येतो. (हिंदीत ण बाणाचा नाही नळाचा).
"शशीजी, वो आप कह दू तुम्हें पर जो कर रहे थे ना , वो मत करना"
"मग काय करू ?"
करन जोहर मग काही पावलं मागे जातो.
तो दोन्ही पायात अंतर ठेवतो. चेहरा, छाती आणि खांदे एका रेषेत आणून कॅमेर्याशी साठ अंशाचा कोन करून उभा राहतो. आता कमरेपासूनचा भाग मागच्या प्रतलात असा झुकवतो कि वाय प्रतल आणि वायझेड प्रतल यांच्यात २५ अंशाचा कोन होईल. तर जमिनीच्या आडव्या प्रतलाला हा कोन ११५ अंशाचा होईल.
त्याच बरोबर दोन्ही पायांपैकी कॅमेर्या जवळ असणारा उपाय (उजवा पाय) गुडघ्यात पाच अंश झुकवून हात दोन्ही गुडघ्यांच्या जवळ घेतो. आता हाताचे लहान मुलांना आपण खाऊ म्हणून बंद मूठ दाखवून नंतर उघडे करून "काही नाही" अशा अर्थाने हलवून दाखवतो, तसेच दोन्ही पंजे पूर्ण उघडे करून वर वर आणतो.
यात शरीराचा तोल मागच्या बाजूला २५ अंश, उजव्या गुडघ्यात ५ अंश असा साधला असल्याने आणि कॅमेर्याशी साठ अंशाचा कोन असल्याने हा इक्विलिब्रियमचा क्लास घेतोय का या कल्पनेने शशीच्या पोटात धस्स होते. बिचार्याने दहावी सुद्धा पाहिलेली नसते.
" हे काय आहे भावा ?"
" ही पोज करायची आहे "
" अरे पण इथे जास्त एनर्जेटिक पोझ करतोय की"
" छे छे, हा करन जोहरचा सिनेमा आहे म्हटल्यावर ही पोझ असायलाच पाहीजे "
" अरे पण सिच्युएशन ?"
" सिच्युएशन कुठलीही असो, आनंद,दु:ख, विरह, शोक, देवाशी संभाषण, मरतानाचे संवाद.... पोझ हीच असायला पाहीजे "
शशी वैतागतो.
पण काय करणार ?
कह दू तुम्हे नंतर ती पोझ करायच्या आधी "भई कपूर खानदान से हूं, थोडी समझ तो होगी ना मुझ मे ?'
इतक्यात बच्चन येतो आणि म्हणतो "कर भई कर, ये नही सुनेगा"
मजबुरीका नाव महात्मा गांधी म्हणत शशी तो सीन करतो.
*****************************************
अमिताभ बच्चन ओबेरॉय शेरेटनच्या बार मधे बसला आहे.
शेजारी परवीन बाबी येऊन बसते. पाठीमागे कुणीतरी किंवा एल पी रेकॉर्डवर उर्सुला वाझ गातेय.
मंद संगीत वाजतेय.
" I am falling in love with a stranger
I am falling in love with a stranger
The night tonight has a flavour of love
I am falling in love with a stranger
"
बच्चनची थंड नजर त्याच्या लार्ज पेग कडे.
डॉन मधल्या खईके पान बनारस वाला गाण्यातल्या शर्टाच्या कापडाचा बो त्याला खुलून दिसतोय.
(त्याच्या चेहर्यावरचे भाव कठोर होते (गुरूनाथ नाईकांची क्षमा मागून) तरी आत मधे खळबळ माजलेली होती).
तो घाईघाईत सिगार काढून स्टाईल मधे ओठात सरकवतो.
लाईटर शोधत असतानाच शेजारी बसलेली बाबी लायटर शिलगावत सिगारच्या तोंडाशी धरते.
बच्चन अदबीने "थँक यू" म्हणतो.
ती त्याच्या अदांवर फिदा..
"ये सब कहने की कोई जरूरत नही, मै तो बहाना ढूंढ रही थी....
तुमसे बात करनेका "
बच्चन तिच्याकडे वळून पाहतो. तीच थंड नजर , काळजाचा ठाव घेणारी.
" मै सोच रही थी इस वक्त इस बार मे ना तुमसे ज्यादा कोई खूबसूरत आदमी है, ना तुमसे ज्यादा कोई अकेला "
बच्चन च्या निर्विकार चेहर्यावर काहीही परिणाम होत नाही. तो खाली पेग कडे बघत खर्जातल्या आवाजात म्हणतो
"किस को मरना है, जो इस वक्त मेरे साथ होगा "
यावर परवीन बाबी किणकिणत्या आवाजात हसण्याचा प्रयत्न करते.
"शायद ये बात तुमने इस लिए कही,क्युं की मै तुम्हें अकेला छोड दूं "
आणि मादक स्वरात वाक्य पूर्ण करते..
" वर्ना अपने आपसे मायूस नजर नही आते तुम "
पुन्हा बॅकग्राऊंड स्कोअर स्पष्ट होतो
Laa laa laa laa laa laa
Laa laa laa laa laa laa laa laa
Your touch is so tender
There is something to remember
Your touch is so tender
There is something to remember
Of you
Of you
आणि ती त्याच्याशी वेगवेगळे विषय काढून गप्पा मारायचा प्रयत्न करते. पण त्याच्या करारी चेहर्यावरची एक रेषाही हलत नाही.
ती त्याला बार मधे लोक आज का दारू पीत असतील याचे अंदाज सांगतेय.
हा थंडपणे विचारतो. या वेळी एका सूक्ष्म मिस्कील छटा डोळ्यात उमटलेली आहे.
"और मै किसलिये पी रहा हूं ?"
" क्युं की शायद तुम्हें किसी का इंतजार है"
त्याबरोबर त्याला करंट बसतो.
मागे गाणं वाजतंच आहे.
I am falling in love with a stranger
I am falling in love with a stranger
The night tonight has a flavour of love
Oh i am falling in love with a stranger.
बॅकग्राऊंडला हजारो व्हायोलिन्स दोन सेकंद समेवर आल्याचं म्युझिक वाजतं.
हा झटकन मनगटाला झटका देऊन रिस्ट वॉच बघतो.
"और मुझे जिनका इंतजार है, वो बाहर मेरा इंतजार कर रहे है "
"वेटर बिल"
तो लॉबीतून ताड ताड पावले टाकत चालला आहे. तो पोर्चमधून बाहेर पडतो आणि पार्किंग कडे चालायला लागतो. समोरच्या इमारतीतून गोळी सुटते. इतक्यात धावत आलेल्या परवीन बाबीच्या हातातला बिल्ला पडल्याने दोघे खाली वाकतात. गोळी काचेवर आपटून काचेचा भुगा होतो.
" ये वही लोग थे जिनका तुम्हे इंतजार था ? "
उत्तरा दाखल मान किंचित हलते आणि सर्दी झाल्यावर आवाज फुटत नाही, बोलणे जिवावर येते तसं तो "हा" म्हणतो.
तिच्या चेहर्यावर एक वेगळंच कौतुक आहे
" तुम्हारे जैसे अजीब आदमी का नाम क्या हो सकता है ?"
"विजय"
"ऊं हुं"
"एक सिगरेट जलाओगी मेरे लिये ?"
"शुअर........ तुमने मेरा नाम नही पूछा ?"
" फायदा क्या ? तुम्हारी जैसी लडकियां अपना नाम कपडों कि तरह बदलती है "
सलीम जावेद हा प्रसंग करन जोहरला नरेट करत आहेत आणि तो जोरजोरात मान हलवत आहे.
सर्वात पहिल्यांदा ते बॅकग्राउंडचं गाणं हटवून तिथे कोरस टाकूयात.
आ आ आ आ आ आ आ
कभी खुशी कभी गम
मग संवाद खालील प्रमाणे
विजय संत्र्याचा ज्यूस पीत बसला आहे.
परवीन बाबी येते
"मुझे पहचाना ?"
तो तिच्याकडे पाहतो..
त्याच्या हृदयात गाणे झंकारते
"तुम पास आये, यू मुस्कराये"
" टीना ?"
" तो पहचान ही लिया ?"
" जी हां बचपन की दोस्ती कोई कैसे भुला सकता है ?"
"मेरी याद आयी ?"
"कभी कभी "
" मै तो हर वक्त तुम्हे याद करती थी "
" दोस्ती मे इतना याद नही किया जाता "
" तो ये क्या है विजय ? दोस्ती या कुछ और ?"
विजय गपगार..
करन जोहरच्या प्रत्येक सिनेमात अल्लड वयातल्या नायक नायिकांना पडलेला हा प्रश्न त्यांनाही पडला आहे.
कधी कधी तीन तास याच प्रश्नाच्या उत्तरात जातात. एव्हाना त्यांना मूल होऊन आई ढगात जाऊन शेवटचं पत्रही आठ वर्षाच्या मुलीच्या हातात पडलेलं असतं. तरीही त्यांना प्रेम आणि दोस्ती मधला फरक समजलेला नसतो .
विजयला काही सुचत नाही.
तो ज्यूसचा ढेकर द्यायला बाहेर निघतो.
इथे करन जोहर त्याला ११५ अंशाची पोझ करायला सांगतो.
यहा गाना बनता है बॉस
इथे जावेद त्यांच्या उर्दूमिश्रित हिंदी मधे ओठ दुमडून सांगण्याचा प्रयत्न करतात
" ये तो आ बैल मुझे मार वाली सिच्युएशन हो गयी, सामने दो लोग गन लेकर बैठे है, उन्हें बेस्ट पोझिशन देखकर गोली चलानी है, और आप है कि उन्हें कह रहे हो.. मार मुझे मार, ये ले मेरा सीना"
" गोली रूक सकती है, लेकीन गाने की सिच्युएशन नही, उसके दिल मे घंटी बज रही है, ये ज्यादा इम्पॉर्टन्ट है "
" ये क्या है डायरेक्टर साहब ? पहले तो आपने वो अंग्रेजी ट्यून हटा दी और आ आ आ आ आ डाल दिया " जावेदचा करवादलेला स्वर.
" ये हमारी खानदानी ट्यून है .. हर एक फिल्म मे बजनी चाहिए "
" और वो पोझ ?"
" वो पोझ भी .... सिच्युएशन कुठलीही असो, आनंद,दु:ख, विरह, शोक, देवाशी संभाषण, मरतानाचे संवाद.... पोझ हीच असायला पाहीजे "
अमिताभ गोंधळून बघत असतो.
इतक्यात शशी येतो " कर ले बेटा अब, मुझे ग्यान दे रहा था ना ?"
आणि अचानक जाग आली.
स्वप्नात करन जोहर ने शोले, दीवारचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमांचे केजो वर्जन्स आले होते.
देवाचे उपकारच की हे स्वप्न होतं...
सकाळी सकाळी रितेश देशमुखच्या चित्रपटातलं गाणं कानात वाजू लागलं..
माऊली माऊली माऊली माऊली
तुम्हालाही असे गाजलेल्या प्रसंगांचे, सिनेम्यांचे केजो किंवा असेच मिसफिट वर्जन्स सुचत असतील तर इथे लिहा. दंगा घालूयात.
बाकी कमेण्ट बॉक्स मधे.
ही असली काही पोझ म्हणताय का?
ही असली काही पोझ म्हणताय का?
माम >> सहीच
माम >>
सहीच
अरे देवा कश्याला कराव्या
अरे देवा कश्याला कराव्या अश्या भयप्रद कल्पना
बाकी कल्पनाशक्ती सॉलिड आहे.
मँड्रेकचे मायाजाल.....
मँड्रेकचे मायाजाल.....
मजा आली वाचायला
मजा आली वाचायला
माझेमन, बरं झालं फोटो टाकला, मला काय ती पोझ कळली नव्हती वाचून...
मस्त. मजा आली वाचायला.
मस्त. मजा आली वाचायला.
मला लगेच कळलेली बरं का पोझ
मला लगेच कळलेली बरं का पोझ यश राज म्हटल्यावर.
माम (माझे मन) , एस, मृणाल,
माम (माझे मन) , एस, मृणाल, अनुजी धन्यवाद सर्वांचे.
मस्त!
मस्त!
छान कल्पक आहे.
छान कल्पक आहे.
रोमॅन्सचे सर्वेसर्वा यशराज फिल्म्स आहे. करन जोहरला कधी जमतं कधी नाही. स्वप्नील जोशी पण करतो ती पोझ. शाहरूखची सिग्नेचर पोझ आहे ती, आवडते मला. त्यालाच शोभते. उलट नाही केली तर चुकल्याचुकल्या सारखे वाटेल.
क्षणभर मला वाटलं ऋ ची post
क्षणभर मला वाटलं ऋ ची post आहे, पण अस्मिता नाव दिसलं. अरेच्चा असं काय?
.
मस्त लिहिलंय रघू जी
मला पण ऋन्मेषची आठवण आली
मला पण ऋन्मेषची आठवण आली लिहिताना किल्ली
किल्ली, धन्यवाद.
किल्ली, धन्यवाद.
शाहरूखची सिग्नेचर पोझ आहे ती, आवडते मला. >> सरोज खानने इन्व्हेन्ट केली होती.
पूर्वी प्रत्येक नटाची एखादी सिग्नेचर स्टेप,पोझ असायची पण ती कोरिओग्राफ्ड नसायची. उदा. राजेश खन्नाचं पत्रवाटप, धर्मेन्द्राचा तुडतुडा डान्स, शशीकपूरचं नवीन शॉकअॅब्सॉर्पर बसवल्यासारखे झटके मारत चालणे आणि अमिताभची गणपतीत सर्वांनी उचललेली नाचाची स्टाईल.
पण ते उठसूठ सगळीकडे वापरायचे नाहीत. असो.
एका वेगळ्याच विरोधाभासी सीन वर लिहावं कि नाही म्हणून विचार चाललाय.
जरा भीती पण आहे पण ...
भारी कल्पनाविस्तार आहे!
भारी कल्पनाविस्तार आहे!
शाहरूखची सिग्नेचर पोझ आहे ती, आवडते मला. त्यालाच शोभते. उलट नाही केली तर चुकल्याचुकल्या सारखे वाटेल. >>> +१
धन्यवाद र्मड
धन्यवाद र्मड
विचार करा, आमिर ने पिके
विचार करा, आमिर ने पिके स्टाइल अभिनय महाराजा च्या हिंदी आवृत्तीत केला तर?किंवा शाहरुख ला घेऊन त्याने आधी बायकोबरोबर एखादे स्विस स्वप्नदृश्य दिले गाण्याचे, हात उंचाव पोझ देऊन तर?आत्मपीडन के लिये खयाल अच्छा है.
Rmd च्या मराठी उच्चारावरून आठवले, हल्ली चरपस/चर्पस दिसत नाहीत.त्यांच्या सिनेमा वर टिप्पणी चांगल्या असायच्या.
हाय लेव्हल आहे हे
हाय लेव्हल आहे हे