झटपट ओट्स पकोडे / ओट बाइट्स

Submitted by मनिम्याऊ on 3 July, 2024 - 10:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्स १ कप (मी सफोला ओट्स घेतले)

कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरून)
गाजर - १ (किसून)
कोथिंबीर (बारीक चिरून)
लसूण ४-५ पाकळ्या (बारीक किसून)
इतर कोणत्याही भाज्या (बारीक चिरून घेतलेल्या)

बेसन - १ चमचा
तांदूळ पीठ -१/२ चमचा

लाल तिखट किंवा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, धणेपूड (प्रत्येकी १ लहान चमचा)
मीठ - चवीनुसार

तेल - तळण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

ओट्स जेमतेम भिजतील इतक्याच पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवावे व नंतर चाळणीत काढून निथळून घ्यावे.

त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य नीट कालवून घ्यावे. वडे करताना असते तशी कन्सिस्टन्सी ठेवावी.
गरजेनुसार बेसन आणि तांदूळ पिठीचे प्रमाण कमी-जास्त करता येते.

तेल कडकडीत तापले कि त्यातील चमचाभर तेल भिजवलेल्या पिठात मोहन म्हणून घालावे.
नीट मिसळून चमच्याने थोडे थोडे पीठ तेलात सोडून खरपूस तळून घ्यावे.

ओट्स पकोडे तयार आहेत.

झटपट होणार प्रकार आहे.

वाढणी/प्रमाण: 
कराल तितके. १ वाटी ओट्स चे १५-२० बाईट साईझ पकोडे होतात.
माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओट्स पकोडे !
Too much of a good thing Happy

करुन खाणार लवकरच.

ओट्स अखंड..
बेसन - १ चमचा
तांदूळ पीठ -१/२ चमचा>> हे बांधायला का...>>
हो. बांधणी होते आणि कुरकुरीत देखील होतात