ओट्स १ कप (मी सफोला ओट्स घेतले)
कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरून)
गाजर - १ (किसून)
कोथिंबीर (बारीक चिरून)
लसूण ४-५ पाकळ्या (बारीक किसून)
इतर कोणत्याही भाज्या (बारीक चिरून घेतलेल्या)
बेसन - १ चमचा
तांदूळ पीठ -१/२ चमचा
लाल तिखट किंवा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, धणेपूड (प्रत्येकी १ लहान चमचा)
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
ओट्स जेमतेम भिजतील इतक्याच पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवावे व नंतर चाळणीत काढून निथळून घ्यावे.
त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य नीट कालवून घ्यावे. वडे करताना असते तशी कन्सिस्टन्सी ठेवावी.
गरजेनुसार बेसन आणि तांदूळ पिठीचे प्रमाण कमी-जास्त करता येते.
तेल कडकडीत तापले कि त्यातील चमचाभर तेल भिजवलेल्या पिठात मोहन म्हणून घालावे.
नीट मिसळून चमच्याने थोडे थोडे पीठ तेलात सोडून खरपूस तळून घ्यावे.
ओट्स पकोडे तयार आहेत.
झटपट होणार प्रकार आहे.
छान कुरकुरीत दिसतायेत पकोडे.
छान कुरकुरीत दिसतायेत पकोडे.
मस्त दिसताहेत ओट्स पकोडे..
मस्त दिसताहेत ओट्स पकोडे.. बनवेन एकदा..
नक्कीच करून बघेन-
नक्कीच करून बघेन- आप्पेपात्रात
ओट्स पकोडे !
ओट्स पकोडे !
Too much of a good thing
करुन खाणार लवकरच.
पकोडे एकदम मस्त, कुरकुरीत,
पकोडे एकदम मस्त, कुरकुरीत, चटपटीत दिसत आहेत.
पकोडे मस्त, चमचमीत, कुरकुरीत
पकोडे मस्त, चमचमीत, कुरकुरीत दिसत आहेत. पाऊस सुरूअसताना खायला कित्ती मजा येईल.
धन्यवाद सगळ्यांना.. नक्की
धन्यवाद सगळ्यांना.. नक्की करून बघा
ओट्सचे पीठ का अखंड ओट्स?
ओट्सचे पीठ का अखंड ओट्स?
>>बेसन - १ चमचा
तांदूळ पीठ -१/२ चमचा>> हे बांधायला का?
ओट्स अखंड..
ओट्स अखंड..
बेसन - १ चमचा
तांदूळ पीठ -१/२ चमचा>> हे बांधायला का...>>
हो. बांधणी होते आणि कुरकुरीत देखील होतात