Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 July, 2024 - 08:22
पुन्हा जीवा तीच आस
पुन्हा मनी तोची ध्यास
ओढ पंढरीची खास
या आषाढी पावलास
झिरपलं पाणी रानी
ओल तव पाझरोणी
तृण बहरासी आलं
रोमरोम झकांरलं
वर सावळी सावली
संगती तुका, माऊली
अंतरी विठू कल्लोळ
वाटेलागी संतमेळ
तुझा दूत हा पवन
त्यानं धरियले बोट
वाट सरे फुलावाणी
नाही पावलाशी कष्ट
सुर्यदेवाच्या रथाला
अश्व भावाचा जोडला
पर्वत अडी नडीचा
पार लिलया म्या केला
विठू अनंता व्यापून
परी विरक्ती अंतरी
सजे तनमन भरजरी
आगळे रितेपण ऊरी
ठायी ठायी हो पंढरी
एका विठूच़ीच वैखरी
सर्व सुखाचे आगर
चाले नामाचा जागर
आता आलं माझं गाव
झालं जलमाचं सोनं
नाही परतोनी जाणं
याची पायी स्थिरावणं
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! आवडली
वा ! आवडली
वाह, सुंदर साजिरी
वाह, सुंदर साजिरी
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे
हपा कुमार सर अवल खूप धन्यवाद
हपा
कुमार सर
अवल
खूप धन्यवाद
सुंदर भक्तीमय रचना..!
सुंदर भक्तीमय रचना..!
द सा - पुंडलिक वरदा..! खूप
द सा - पुंडलिक वरदा..!
खूप छान..!!
भावपूर्ण रचना दसा. आवडली.
भावपूर्ण रचना दसा. आवडली.
प्राचीन अनेकानेक धन्यवाद...
प्राचीन अनेकानेक धन्यवाद...
पॅडी खूप धन्यवाद.... हल्ली कविता लेखन थांबलय...
रूपाली ताई अनेकानेक आभार...
द सा- जरा काळा-वेळाचे गणित
द सा- जरा काळा-वेळाचे गणित बिनसलेय आमचे...! म्हणून हजेरी कमी झालीय... विचारपूस केल्याबद्दल आभार...
पॅडी...
पॅडी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अडचण समजली....मनाची वेळ काळानं साधायला हवी...
(No subject)