भूत पंढरीचे मोठे

Submitted by अश्विनीमामी on 1 July, 2024 - 03:06

दरबार हे युट्युब वरील शास्त्रीय संगीताच्या जाणकार चाहत्यांसाठी एक महत्वाचे चॅनेल आहे. ह्यांचे अ‍ॅप पण आहे. काल परवात एक लिंक अचानक समोर आली व तिने झपाटून टाकले. दोन तीन दा व्हिडिओ बघितला मग हेड फोन लावुन पंधरा वेळा तरी ऐकले पण मन तृप्त होईना. वन ऑफ माय फेवरिट्स झाले आहे.

सध्या वारीचा माहौल आहे म्हणून दर्दी माबोकरांसाठी लिंक देत आहे.

तुकारामांचा अभंग आहे व रजनी, गायत्री ह्या दोघी गायिकांनी फारच सुरेख गायिले आहे. बरोबर घटम आणि मृदंगाची/ पखवाजाची साथ परफेक्ट जमली आहे. गायत्री ह्या सिनीअर वाटत आहेत. दोघींचे आवाज मधुर आहेत व शास्त्रीय कर्नाटकी संगीताचे ज्ञान व अनुभव तो तर दिसतच आहे. चंद्र कंस रागात आहे.

https://www.youtube.com/watch?v=kZTC4eB-DKU

अभंग खालील प्रमाणे:

भूत मोठे पंढरीचे

पंढरीचे भूत मोठे
आल्या गेल्या झडपी वाटे

बहु खेचरीचे रान हे
बघ हे वेडे होय मन

जाउ नका कोणी तिथे
जे गेले नाही आले..... नाही आले परतोनी.

तुका पंढरीसी गेला
पुन्हा जन्मा नाही आला!!

विठ्ठला पांडुरंगा: सर्वांना वारीच्या व एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या धाक ट्या लेकीला हा अभन्ग फार आवडतो. ती आता ५ झाली आहे, मागच्या वर्षी सारखी पन्ढरपूर ला जाऊ म्हणून मागे लागलेली हा अभंग ऐकल्यापासून.. (मम्मा, खरच तो इतका छान आ हे का? मम्मा मला पहायचय त्याला). ह्या वर्षी तरी जायचा योग यावा!

हे वर्जन नक्की ऐकणार. आम्ही देव्बाभळी आणि सन्जीव जहागीरदारा ह्यान्चं वर्जन ऐकलय आतापर्यंत.

नानबा, प्रतिसादा बद्दल धन्यवाद. गाणे मुलींना घेउन बसवता आले तर बघा. त्यांना नक्की आव डेल. गायत्री रजनी दोघी एकदम बरोबर गातात तेव्हा तर फार मॅजिकल वाटते.

नानबा, तुझ्या लेकीला इतक्या लहान वयात विठूरायाची ओढ लागलेय हे किती गोड आहे आणि भाग्याचेही! त्याच्या भेटीचा योग लवकरच येवो.
मलाही हा अभंग फार आवडतो, कारण लहानपणी माझे आबा म्हणायचे आणि वारीच्या आठवणी , पंढरपुरचे वर्णन करायचे. पंढरपूरला जायचा योग्य आजवर काही जुळून आला नाही पण १४ वर्षांपूर्वी बाबांचे माहेरचे घर बंद झाले तेव्हा माझ्या चुलत भावंडांनी देवघरातली विठोबा रखुमाई मला देण्यासाठी माझ्या आईकडे सोपवली.

मी सांगलीला कार ने जाताना एकदाच पंढर पूर, चंद्रभागा व मंदीर दुरून बघितले आहे. परवा मराठी बाणा पाहिला त्यामध्ये वारीचे सीन आहेत व विठोबा रखुमाई मागे उभे आहेत असा सीन आहे. तो बघुन एकदम रडूच आले. आता अमॅझॉन वर मुर्ती बघुन ठेवली आहे. शिफ्ट झाल्यावर छान देवघ र बनवायचा विचार आहे तिथे ठेवायला घेणार.

रजनी नाही - रंजनी.

षण्मुखानंदला प्रत्यक्षात हा अभंग दोघींनी गायलेला ऐकलाय. अप्रतिम गातात.