लोकसभा निवडणुकाआधी महायुतीला हवेहवेसे वाटणारे अजीतदादा निवडणूक निकाला नंतर नकोनकोसे झालेत तशी धुसफुस आधीच सुरु होती कारण बहुमत असतांनाही अजीत पवारांना पक्ष चिन्ह व आमदारांसहीत आयात करणे शींदे गटाला रुचणारे नव्हते कारण त्यांची मंत्रीपदे कमी होणार होती व ती झालीही फडणवीस कितीही म्हणत असले की मी आलो पण दोन पक्ष फोडुन आलो तरीही ते सत्य कधीच नव्हते हे महान कार्य करणारे होते ते मोदी आणि शहा कारण संघासह या दोघांनाही पराभवाची जाणीव निवडणुकीपुर्वीच झाली होती आणि शींदेच्या ताकदीचीही शींदेच्या भरोश्यावर 45 पार तर सोडाच पण दहा जागाही जींकणे अशक्य आहे हे लक्षात येताच भाजपने अजीत पवारांना आयात करण्याचे ठरवले एकदा का अजीतदादा आमदारांसह भाजपसोबत आले तर शरद पवारही एकटे पडतील व तेही सोबत येतील वा नाहीच आले तर लढणारच नाही आणि लढले तरी हरणार याची भाजपला खात्री होती म्हणून शींदेच्यां विरोधाला न जुमानता धाकदपटशा दाखवून गप्प करीत अजीतदादांना वाजतगाजत आयात केले युतीची ताकद वाढली आता आपण सहजच निवडणूक जींकु शकतो असा गैरसमज युतीने करुन घेतला पण यात शरद पवारांना कमी लेखण्याची चुक मोदी व शहांसह युतीने केली आणि येथेच भाजपचे गणित चुकले शरद पवार ना घाबरले ना एकटे पडले अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने ते ईर्षेने पेटुन उठले फक्त बारामतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्यानी पींजून काढला आणि अजीत पवारांना त्यांची खरी जागा दाखवत भाजपलाही मोदी शहांनी महाराष्ट्रात येरझारा घालूनही तोंडघशी पाडले आणि भाजपला महाराष्ट्रात सतरा जागाही मिळवतांना धावाधाव करत लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
अपयशाला बाप नसतो म्हणतात पण पराभवाच खापर कूणावरतरी फोडण भागच होत खरतर या पराभवाला अबकी बार चारसो पार ही मोदींची घोषणाच कारणीभुत होती आणि मोदींच्या हवेवर असलेला भाजपचा अती अंधविश्वास ही.आज भाजप कितीही नेरेटिव्ह म्हणून बोंबलत कसली तरी भाजपला चारसोपार कशासाठी हव होत याचा खुलासा भाजप आजही करत नाही दोन पक्षातील आमदार फोडत फक्ष व चिन्हही पळवण महाराष्ट्रातील जनतेला कधीच पटणारे नव्हतेत्यामुळे ठाकरे व पवारांकडे जनतेची सहानुभूती वळली त्यातच युतीतील जागा वाटपाचा घोळ उमेदवारीसाठी चाललेली मारामारी यामधे युतीचा बराच वेळ गेला पण आघाडीने तोपावेतो प्रचारातही आघाडी घेतली होती आघाडी कंबर कसुन एकदिलाने तनमनधनाने लढाईत उतरली होती कारण त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता मात्र युतीतील दोन आयात केलेले पक्ष मात्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्यापेक्षा दुसरा शिरजोर होणार नाही हेच पहात होते एकदिलाने युती लढलीच नाही आणि शेवटी पराभवाला सामोर जाव लागल पण या पराभवाच खापर मोदी शहा यांच्यावर फोडता येणे शक्य नसल्याने आत्मपरीक्षण करतांनाच भाजप आमदारांनी धुसफुसत अजीत दादांचि मते आम्हाला मिळालीच नाही त हे आकडेवारीसह सिद्ध करत दोष अजीत दादांच्या माथी मारला शुंदे गटानेही तेच कारण दिले पण जाहीर वाच्यता संघाच मुखप्रुषठ असलेल्या आँर्गनायझरमधील लेखान झाली आणि आता शिवसेनेच्या एकानेत्यान अजीत दादा थोडे उशीरा आले असते तर काही बिघडले नसते अस म्हणत दादिंवर शरसंधान साधले मात्र भाजप नेते किहीही म्हणत असले तरी मनात नसतिंनाही अजीतपवारांची भलावण करीत असले तरु त्यालाही कारण आहे कारण भाजप हा मीत्रपक्षांना सोबत घेऊन संपवत असतो या भाजपच्या किर्तीत भरच पडणार असल्याने भाजप उघड काही बोलू शकत नाही तरीही भाजपला आजीत पवार सोडून गेले तर भरच होईल असच वाटत आताही विधानसभेत भाजपला यशाची खात्री दिसतच नसल्यिने पाहुण्याच्या हातुन साप मारण्याची खेळी भाजप खेळत आहे .
महायुतीला अजीत पवार नकोसे झालेत काय?
Submitted by ashokkabade67@g... on 20 June, 2024 - 13:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अख्ख्या लेखात दोन फुलस्टॉप.
अख्ख्या लेखात दोन फुलस्टॉप. अहो धाप लागली ना!
किती अशुद्ध लेखन! दादा
किती अशुद्ध लेखन! दादा रागवतील ना अशाने.
पवार घराण्याचे राजकारण अवघड
पवार घराण्याचे राजकारण अवघड काहीच नाही. मीडीयाला हाताशी धरून वेगवेगळ्या कंड्या पिकवत रहायचे. आता त्या जोडीला अजितदादांच्या बंडाचे नाटक ही भर छभुंचे उपमामुपद हिसकावून घेण्यापासून झाली आहे. हे सर्व पवार मिळून एकमताने करत असतात. स्क्रीप्ट मिळून मिसळून लिहीलेली असते.
आता दादांना गहीवर येईल. मग ताईच्या भावना उचंबळून येईल. एखादा प्रसंग पाहून मनोमीलन होईल. तोपर्यंत विधानसभा पार पाडून दादा पुन्हा आघाडीत परतून उपमामू होतील. सरकार कुणाचेही असो उपमामुपदी दादाच !
र आ हाहाहा, सहीच.
र आ हाहाहा, सहीच.
अजितदादा म्हणजे लेट
अजितदादा म्हणजे लेट नाईण्टीजची ऐश्वर्या राय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सलमान खान तर देवेंद्र फडणवीस हे विवेक ओबेरॉय आहेत. आता उद्धव ठाकरे जर अभिषेक बच्चन झाले तर किमान मविआरूपी बच्चन कुटुंबात ही ल्येक लाडकी बारा घरची सुखाने नांदेल, अन्यथा उद्धव ठाकरे स्वतःच रूप बदलून ऐश्वर्या राय झाले तर देवेंद्र ओबेरॉयचे जुने प्रेम पुन्हा उफाळून येईल.
<< अपयशाला बाप नसतो म्हणतात
<< अपयशाला बाप नसतो म्हणतात पण पराभवाच खापर कूणावरतरी फोडण भागच होत खरतर या पराभवाला अबकी बार चारसो पार ही मोदींची घोषणाच कारणीभुत होती आणि मोदींच्या हवेवर असलेला भाजपचा अती अंधविश्वास ही. >>
-------- चारसो पार धोषणा दिली नसती तरी त्याने निकालांची परिस्थिती फारशी बदलाली नसती. पराभवाची अनेक कारणे आहेत पण त्याची चिकीत्सा होतांना दिसत नाही.
विरोधी विचारांची गळचेपी, CBI/ED/EC चा गैरवापर, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, कोव्हिड काळांत केलेला अक्षम्य हलगर्जीपणा... टोकाचा धार्मिक द्वेष अगदी संसदेतही ? एका विरोधी खासदाराला "उग्रवादी, कटवे... " हे काय चालविले आहे?
ज्या रामाच्या नावाचा बाजार चालविला होता त्या अयोध्येमधे आणि परिसरांत भाजपाचे किती खासदार आलेत ? सत्तेची नशा डोक्यात गेली होती आणि संधी मिळाल्यावर जनतेनी मस्त पैकी उतरवली. भारताच्या कोट्यावधी जनतेचे अभिनंदन करावे असे हे आशादायी निकाल आहेत.
शायनिंग इंडिया -भाग दोन हा आधीच्या भाग एक पेक्षाही बोचरा, जिव्हारी लागणारा आहे. मानहानीकारक पराभव सर्वांनाच माहित असतो, काहींनी अनुभवला असतो पण मानहानीकारक विजय काय/ कसा असतो यासाठी २०२४ निवडणूक निकालाचा अभ्यास केल्यावर कळते.
शायनिंग इंडिया -भाग दोन हा
शायनिंग इंडिया -भाग दोन हा आधीच्या भाग एक पेक्षाही बोचरा, जिव्हारी लागणारा आहे. मानहानीकारक पराभव सर्वांनाच माहित असतो, काहींनी अनुभवला असतो पण मानहानीकारक विजय काय/ कसा असतो यासाठी २०२४ निवडणूक निकालाचा अभ्यास केल्यावर कळते.>> १०० टक्के सहमत, अजूनही मार बसलेल्या जागा (पराभूत नेते) हुळहुळत आहेत आणि कसे विरोधी पक्षाचेच चुकलेले आहे हे सांगायचा प्रयत्न सुरु आहे. त्यात भर म्हणजे मातृसंस्थेने आरसा समोर केला, त्यामुळेच मणिपूरकडे लक्ष दिले जात आहे, अजूनही महिला कुस्तीगीरांचा प्रश्न सुटला नाही. पॅरिस ऑलिम्पिकच्या यश-अपयशावर निर्णय घेणार आहेत का?
<< त्यात भर म्हणजे
<< त्यात भर म्हणजे मातृसंस्थेने आरसा समोर केला, >>
---- मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर असा प्रकार वाटतो.
वर्षभर मणिपूर जळत असतांना बघ्याची भूमिका.
दिल्ली कुस्ती महिलांचे वर्षभर आंदोलन सुरु आहे... तिथेही बघ्याची भूमिका.
देशातल्या बहुतेक सर्व विरोधकांना धाक/ धमक्या दाखवत तुरुंगवास होत असतांना हे बसले शांत. अवाक्षरही कधी निघाला नाही.
आणि आज निवडणूक निकालांमुळे पायाखालची वाळू सरकल्यावरच कंठ फुटतो ? too late.
दिल्ली सुनियोजीत घडविलेली दंगल ( ते ही कोरोना दारांत आलेला असतांना) - लाठ्या/ काठ्या हातामधे घेऊन निरपराधी नागरिकांना रस्त्यावर मारत सुरणारे राक्षस यांना प्रशिक्षण कोण देतो / कुठे मिळते ? जे पेरत आहात तेच उगवणार.... मग आता मारल्यासारखे नाटक कशासाठी ?
अशा वक्तव्यांवर माझा विश्वास नाही आहे.... एका तोंडाने मुद्दाम संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करायचे , नंतर सारवा सारव ( नाटक )... आधीच्या वक्तव्याचे दहा अर्थ लावत बसा.... लोक व्यस्त रहातात, लाठ्या/ काठ्याचे प्रशिक्षण देणे सुरु रहाते आणि " छुपा " अजेंडा पुढे सरकतो.
मानहानीकारक विजय काय/ कसा
मानहानीकारक विजय काय/ कसा असतो यासाठी २०२४ निवडणूक निकालाचा अभ्यास केल्यावर कळते.
सहमत. विश्वगुरूना जमिनीवर आणले निकालाने. नाहीतर २०२९ पर्यंत कायकाय दिवे लावले असते काय माहित. २०१४ ते २४ चा निकाल पाहिल्यावर महान आठवली. कावळ्याच्या हातात दिला कारभार….
त्ये कायका असना पर खरत मोदीनी
त्ये कायका असना पर खरत मोदीनी भाजप परीस जनतेले च लोकशाहीच महत
नी लोखशाहीत इरोधी पक्षाच महत्त्व भी म्हनूनच जनतेन भाजपले बहुमतापास्न दूरच ठेवल आता मोदी संसदेमंधन इरोधी खासदारायले बाहेर नाय काढु शकत ना चर्चेविना बिळ पास करु शकत तवा जनताच जनार्दन हाय ह्येच खर.
<खासदारायले बाहेर नाय काढु
<खासदारायले बाहेर नाय काढु शकत ना चर्चेविना बिळ पास करु शकत> उगाच आशा लावून ठेवू नका.