गुगल माहिती कशाप्रकारे गोळा करते आणि वितरित करते, हे मी गुगलनेच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर टाकलेल्या डॉक्युमेंटरीत पाहत होतो.
(लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.)
अगदी आज 2022 मध्ये, मी जेव्हा गुगलच्या नोट्स(ॲप)वर या लेखाच्या नोट्स काढत आहे, तेव्हा मला एक जाणवले ते म्हणजे 58 मिनिटांची ही फिल्म 34 व्या मिनिटामध्ये आली आणि मला लक्षात आले की, माहितीचा महापूर आपण म्हणतो तो आता आला आहे आणि सोळाव्या सतराव्या शतकात लायब्ररीमध्ये असणारी माहिती आज बाहेर आली आहे खरी, मात्र तिच्या ‘खरे’पणाची शहानिशा आजही गुगलचे लोक करतात, हे प्रथमच समजले. यातच एक फनी इंटरव्यू किस्सा पाहिला. त्याच्यात सर्च हेड प्रमुख असणारा माणूस म्हणाला की, ‘व्हॉट इस ग्रीन?’ याचे गुगल सर्चला उत्तर त्यांनी ‘ब्लू’ असं दाखवलं होतं.
तर अशा प्रकारच्या गोष्टी सोडल्या तर पुढे माहितीच्या इतिहासाचे स्टॅन फोर्ड विद्यापीठामधील माहिती इतिहास अध्यापक बोलताना म्हणाले की, माहिती प्रिंट होऊ लागली, वितरित होऊ लागली, लोकांना कळू लागली आणि गेल्या शतकात झालेली कमाल म्हणजे 1999 नंतर गुगलने ती माहिती सगळ्यांना मोफत देणे व त्याच्या बदल्यात जाहिरात व ग्राहकाचा data विकून पैसे मिळवत ती मोफतच ठेवणे, अशा प्रकारचा उद्योग आरंभला, मात्र ती माहिती खरी आहे की खोटी याची सत्य-सत्यता पडताळणे या काळात अवघड झाले. लायब्ररीच्या काळामध्ये लिहिलेली माहिती योग्यच आहे व सुरक्षित आहे याची हमी प्रकाशक व लेखक घ्यायचा, मात्र जसे इंटरनेटचे जग खुले झाले तसा त्यावर गुगलने माहिती मोफत देण्याचा सपाटा लावला.
मात्र ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने इंटरनेटचा प्रसार जगभर झाला आणि माहिती कोणालाही लिहिण्याची परवानगी मिळाली तेव्हा या माहितीची सत्य-सत्यता तपासणी ही एक मोठी डोकेदुखी गुगलसमोर आहे, असे सध्या गुगलमधील लोक म्हणतात व आता मलाच वाटते की 1999 मध्ये सुरू झालेली गुगल असो किंवा 2005 मध्ये सुरू झालेली फेसबुक व इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म; यांनीही जेव्हा माहिती फुकट उपलब्ध करून देणे सुरू केले, तेव्हा 2014 नंतरचा पोस्ट ट्रूथ हा शब्द आला, कारण आज माहिती भरपूर आहे, मात्र योग्य माहिती असणे अवघड झाले आहे आणि त्याचबरोबर पुढे covid असताना टाळेबंदी काळात वेगवेगळ्या धर्मांबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठणे अथवा व्हाट्सअप वरून कोणतीही माहिती कोणालाही, कधीही, कशीही पाठवणे शक्य झाले आणि तिचा तोटा म्हणजे लोकच माहिती निर्माण करू लागल्याने कोणत्याही प्रकारची माहिती निर्माण करणे आज शक्य झाले आहे आणि तिची सत्या सत्यता पडताळणी आज गुगल टीम किंवा आवाक्याच्या बाहेर जाऊन बसली आहे त्यामुळे ‘माणसा माणसांमधला हा द्वेष वाढला कुठून’ असा मागच्या पिढीतील काही प्रौढ लोकांना हा जर प्रश्न पडला असेल आणि ‘जग एवढे जटील आणि सगळे असे एकमेकांचे जीवावर का उठले आहेत ‘, तर त्याचे कारण म्हणजे या माहितीच्या सत्यतेची पडताळणी आजच्या काळात गुगल, इंटरनेट, फेसबुक व इतर सोशल मीडिया करू शकणे अशक्य कोटीचे आहे त्यामुळे व माहिती निर्माण करण्याची संधी सर्वांना समान रित्या उपलब्ध झाली मात्र काही लोक तिचा दुरुपयोग करत देश जिंकू लागले जग जिंकू लागले आणि त्याची सत्य सत्यता पडताळणी गुगल सारख्या किंवा फेसबुक सारख्या महाकाय कंपन्यांना आपल्या तुटपुंज्या टीमसोबत अशक्य झाले. त्यामुळे एक जाणवते की लायब्ररीच्या काळात जी माहिती सुरक्षित होती व विश्वासार्ह होती, तिला इंटरनेटच्या काळात तडा जाणे सुरू झाले आहे.
आज खालील व्हिडियो पाहिल्यावर एकंदर सर्च, गुगल, त्यावर पोकळ डोलारा असलेली एकंदर 1999 नंतरची माहिती व्यवस्था समजली आणि या सर्वापासून (जीमेल, सोशल मीडिया, ड्राईव्ह, डॉक, एक्सेल, ppt आणि ai apps न त्याचा वाहक स्मार्टफोन) पासून पळून जाऊ वाटतंय.
गुगल डॉक्युमेंटरी लिंक
https://youtu.be/tFq6Q_muwG0
PS _ मला सर्व ॲक्टिव माबोकरांचे यावरील सर्व बाजूंनी दिलखुलास मत वाचण्याची अपेक्षा आहे. डॉक्युमेंटरी (1 तासाची) पाहून जर बोलता आले, तर आनंदच आहे.
माहिती कोणत्या वेबसाईट किंवा
माहिती कोणत्या वेबसाईट किंवा पुस्तकातून घेतली तिथपर्यंत जाता येणे हाच माहितीचा उपयोग.
जे जालावर नाही ( public domain मध्ये) असेही बरेच असू शकते हे माहिती शोधणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
नंतरची पायरी माहितीचा पडताळा.
माहिती कधी लिहिली आहे हेसुद्धा महत्त्वाचं.
लेखाच्या शेवटी दिलेली लिंक दिसत नाही.
लिंक आत्ता ॲक्टिव झाली
लिंक आत्ता ॲक्टिव झाली
चांगला लेख. लिंक निवांत
चांगला लेख. लिंक निवांत पाहतो.
मात्र या लेखात व्यक्त झालेली जी चिंता आहे त्याबद्दल आधीपासून बोलले जात आहे.
खरे आहे.
खरे आहे.
पण ही भिती लेखन, प्रिंट काळातही होती. इतिहासाचा अभ्यास करताना पहिलं तत्व शिकवलं जातं ते हे की, " नो युवर हिस्टोरियन बिफोर रिडिंग हिज बुक".
लिंक पहाते नंतर लिहिते
फिल्म पाहिली.
फिल्म पाहिली.
प्रथम सोय मिळाली याचं कौतूक झाले. आता त्यातले दोष काढायला सुरुवात झाली.
" Search was great" म्हणणारे थोडे आहेत हे पटलं.
बाकी ठीक.
अजून लिहीन जमेल तसे पण हे
अजून लिहीन जमेल तसे पण हे वाक्य फारच मनोरंजक वाटले.
त्याची सत्य सत्यता पडताळणी गुगल सारख्या किंवा फेसबुक सारख्या महाकाय कंपन्यांना आपल्या तुटपुंज्या टीमसोबत अशक्य झाले >>> या कंपन्यांकडे फक्त थोडा पैसा असता तर...
<< यूट्यूब चॅनेलवर टाकलेल्या
<< यूट्यूब चॅनेलवर टाकलेल्या डॉक्युमेंटरीत पाहत होतो >>
पूर्ण फिल्म पाहिली. डॉक्युमेंटरी(?)ला कमेन्ट देता येत नाहीत, हे लक्षात आले का? गूगल ही फक्त जाहिरातदारांसाठी बनलेली कंपनी आहे, हे लक्षात घेतले तर ही एक प्रॉपगंडा करणारी फिल्म आहे, हे लक्षात येईल. Read between the lines.
टीप: गुगलची खरी काळजी ही आहे की आता AI मुळे सामान्य माणसालापण content सहज बनवता येतील, ज्यामुळे SEO वर परिणाम होऊन जाहिरातींमुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होईल. दुसरी भीती अशी आहे की उत्तरे मिळवण्यासाठी लोक सर्च इंजिनऐवजी Chatgpt सारखी टूल्स वापरू लागतील आणि त्यामुळेपण जाहिरातींचे उत्पन्न कमी होईल.
>>>डॉक्युमेंटरी(?)ला कमेन्ट
>>>डॉक्युमेंटरी(?)ला कमेन्ट देता येत नाहीत, >>
होय, पण त्यांच्या अडचणी, चुका, विरोध हे डॉक्युमेंटरीतच सांगितले आहेत.
विमान प्रवासासारखं झालं आहे. सोयीचं प्रथम कौतूक झाले होते पण आता त्रास, गैरसोय, याबद्दल लोक बोलतात. स्पर्धा आली की पर्याय मिळतात तुलना होते.
छान विषय आहे .
छान विषय आहे .
<< पण ही भिती लेखन, प्रिंट काळातही होती. इतिहासाचा अभ्यास करताना पहिलं तत्व शिकवलं जातं ते हे की, " नो युवर हिस्टोरियन बिफोर रिडिंग हिज बुक". >>
------ सहमत, आधीच्या काळांतही लोक खोटी माहिती तोंडी/ लेखी/ प्रिंट मार्गाने पसरवायचे. तेव्हा माहिती पसरण्याचा वेग कमी होता, आता नव्या साधनांमुळे तो वेग कमालीचा वाढला आहे एव्हढेच.
समोर आलेली माहिती " खरी/ खोटी " आहे हे तपासण्याचे साधन सोबतच मिळाले आहे. काही तासातच बातमीची शहानिशा करता येते. या मधल्या काळांत ( गैरसमजातून) कुठला मोठा अनर्थ व्हायला नको एव्हढीच अपेक्षा ठेवायची.
त्याची सत्य सत्यता पडताळणी
त्याची सत्य सत्यता पडताळणी गुगल सारख्या किंवा फेसबुक सारख्या महाकाय कंपन्यांना आपल्या तुटपुंज्या टीमसोबत अशक्य झाले >>>
जसे काही यांना खूप पडलेली आहे सत्यासत्यता पडताळण्याची. इंस्टाग्राम / फेसबुक यांच्यावर आत्तापर्यंत १००० हून अधिक पोस्ट्स / व्हिडिओ / आक्षेपार्ह लिंक्स / कंटेंट रिपोर्ट करून झाला आहे. पण प्रत्येक वेळी त्यांच्या टीम कडून स्टँडर्ड रिप्लाय येतो की आम्हाला या लिंक मध्ये काही आक्षेपार्ह वाटले नाही त्यामुळे आम्ही ही लिंक काढणार नाही. त्यांचे सो कॉल्ड् कम्युनिटी स्टँडर्ड हा एक मोठ्ठा विनोद आहे.
: गुगलची खरी काळजी ही आहे की
: गुगलची खरी काळजी ही आहे की आता AI मुळे सामान्य माणसालापण content सहज बनवता येतील, ज्यामुळे SEO वर परिणाम होऊन जाहिरातींमुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होईल. दुसरी भीती अशी आहे की उत्तरे मिळवण्यासाठी लोक सर्च इंजिनऐवजी Chatgpt सारखी टूल्स वापरू लागतील आणि त्यामुळेपण जाहिरातींचे उत्पन्न कमी होईल.>>>>>
गुगल ए आय वापरुन लोकांच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधुन त्यांना दाखवते, त्यामुळे मुळ वेब साईट जिथुन ही माहिती गुगलने उचलली तिथवर लोक पोहचत नाहीत. त्यामुळे कित्येक वेब्साईट्सचे उत्पन्न गेल्या सहा महिन्यात शुन्यावर आले आहे हा आरोप अशाच एका वेबसाईटने गुगलवर करत आपली वेबसाईट बंद केल्याचे त्यांच्या फे बु पेजवर जाहिर केलेय.
गुगल इतरांची सर्च इन्जिने दाखवत नाही, चॅटजिपिटी कसे चालते मला माहित नाही पण गुगल मला तेही न दाखवायची शक्यता आहे.
छान लेख.
छान लेख.
अगदी महत्वाच्या विषयावरचा.
व्हिडिओ बघेन लवकरच.
एखाद वर्षांपूर्वी misinformation कशी/ कधी तयार होते.... त्याची एका जवळून झलक बघायला मिळाली होती. त्यातून बरेच प्रश्न पडले, निर्णय/ विचार बदलले/ बदलावयाला लागले.
सर्वांचे प्रतिसाद मला
सर्वांचे प्रतिसाद मला वेगवेगळ्या विचारास प्रवृत्त करत आहेत. डॉक्युमेंट्री पाहताना माझा विचार हा ' माणसाचे माहिती मिळवणे आणि त्यात डिजिटल माध्यमातून त्याचे झालेले अतिसुलभीकरण आणि त्यातून होणारा खरेपणाचा गोंधळ ' याच्या आसपास फिरत होता.
एखाद वर्षांपूर्वी
एखाद वर्षांपूर्वी misinformation कशी/ कधी तयार होते.... त्याची एका जवळून झलक बघायला मिळाली होती. याबद्दल नक्की लिहा वेळ मिळाला की