Submitted by अनन्त्_यात्री on 4 June, 2024 - 07:57
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन
निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन
जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन
राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी
सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने
कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -त्यात विरुन जाईन
मनोरथाच्या वाटेवरती वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान, शेवटचे कडवे तर फारच
छान, शेवटचे कडवे तर फारच आवडले. जे न देखे रवी ते देखे कवी....
खूप सुंदर!
खूप सुंदर!
वेगळ्या विषयावरची छान कविता.
>छान, शेवटचे कडवे तर फारच
>छान, शेवटचे कडवे तर फारच आवडले. जे न देखे रवी ते देखे कवी>>>+101
मला वाटलं माथेरानच्या
मला वाटलं माथेरानच्या वाटेवरती.
बोकलत हे नाव मी इतके दिवस
बोकलत हे नाव मी इतके दिवस बोंबलत असे वाचत होतो.
मला बोंबिल आवडतात म्हणून मी
मला बोंबिल आवडतात म्हणून मी बोंबलत नाव ठेवणार होतो. मस्त १०० रुपयात वाटा येतो. आम्ही गरीब आहोत म्हणुन सुरमई पापलेट कोलंब्या हलवा आणत नाही. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
अस्मिता, छल्ला, द.सा.
अस्मिता, छल्ला, द.सा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कवितेतली शब्दरचना अप्रतिम..!
कवितेतली शब्दरचना अप्रतिम..!
>>>>कृष्णविवर सैराट , भटकते
>>>>कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -त्यात विरुन जाईन
कृष्णविवर फार आकर्षक व भीतीदायक वाटतं. नेहमी.
रूपाली, सामो प्रतिसादाबद्दल
रूपाली, सामो प्रतिसादाबद्दल धन्यवाद