अत्यवस्थ

Submitted by abhishruti on 27 May, 2024 - 07:40

प्रत्येक वर्षी गावी गेले की दिसतं मला ते
सुनंसुनं, दुर्लक्षित घर
अगदी मोडकळीस आलेलं
पालापाचोळा आणि धुळीनं भरलेलं
जळमटं आणि गवतानी घेरलेलं

आजूबाजूच्या काही घरांचं नुतनीकरण झालं
काही जुनी घरं पाडून नवीन बांधकाम झालं
हे घर मात्र प्रतिक्षेतच राहिलं
या सगळ्या गर्दीत ते एकटच पडलं
भेदरलं.. ....
शाळेतून न्यायला आई आली नाही की
मूल कसं हिरमुसून पायरीवर बसतं
मला अगदी तसं दिसतं ते घर!!

-- अभिश्रुती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद
माणसं निघून गेली की घर घर रहात नाही.
आधी माणसांनी गजबजलेली घरं नंतर अशी बेवारशी झालेली बघवत नाहीत. नुकतीच गावी जाऊन आले तेव्हा एका वर्गमैत्रिणीचं ओसाड घर पाहिलं... त्या घरी ऑलमोस्ट रोज जायचे मी... खेळायला, अभ्यासाला, सणासुदीचं जेवायला.... आता बघून डोळ्यात पाणी आलं!!