आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शाहरूख - गंभीर आज बहुतेक जिंकत आहेत..

पण विरोधकांनी आशा सोडू नका .. क्रिकेट आहे.. काहीही होऊ शकते Happy

कॉपी पेस्ट
--------------
आयपीएल २०२४ फायनल केकेआर आणि हैदराबाद यांच्यात होत आहे. केकेआरच्या या धमाकेदार कामगिरीचे श्रेय गंभीरला दिले जात आहे. त्यांनी १५ पैकी फक्त ३ लढती गमावल्या आहेत. गंभीर मेंटर झाल्यापासून संघात फार बदल झाल्याची चर्चा आहे. गेली दोन वर्ष गंभीर लखनौ संघासोबत होता तेव्हा दोन्ही हंगामात तो संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता

जिंकला माझा शाहरूख... बदाम बदाम बदाम Happy

मांझे सगळे शाहरूख प्रेम एका बाजूला राहू दे..

पण

क्रिकेट आणि क्रिकेटरचा सन्मान करणारा संघमालक जिंकला याचा खूप खूप आनंद आहे Happy

प्रयत्न करूनही लखनौ जिंकली नाही. शेवटी गंभीरने टीम बदलली, तुलनेने चांगली टीम चांगला मालक आणि महत्चांच म्हणजे चांगला कॅप्टन मिळाला आणि जिंकली. आज नक्कीच संपूर्ण KKR टीम आणि फॅन्स खुश असतील.

हा खेळ नुसता मैदानावर खेळला जात नाही. ड्रेसिंग रूम वातावरण कसे आहे हे खूप मॅटर करते.
आणि फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये मालक कसा आहे यावर ते ठरते.

“ CSK चा मालक तर टीम मीटिंग मध्ये जी चर्च होत होती ती बाहेर फोडायचा.” - Rofl

केकेआर यंदा अगदी डिझर्व्हिंगली जिंकले. चंद्रकांत पंडितच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा. गंभीर आणि केकेआरचं यशस्वी युनियन कंटीन्यू झालं.

क्रिकेट आणि क्रिकेटरचा सन्मान करणारा संघमालक जिंकला याचा खूप खूप आनंद आहे~~~नालायक बिनडोक वानखेडे वाले बीच्यार्याला उगीच बैन केला होता

तस इथं पण काही बैन करायची सोय आहे का

इथल्या माझ्या पोस्ट जिओ सिनेमा वाले वाचत आहेत बहुधा...
आज सामना संपल्यावर त्यांचे कॉमेन्ट्री पॅनल सुद्धा सारखे शाहरूख कौतुकात हेच बोलत होते Happy जे मी वर लिहिले आहे.. की संघ मालक असावा तर असा...

शाहरूखने मैदानावर मारलेली फेरी सुद्धा मस्त वाटली. आजारी असून आलेला. नेहमीची फिजिकाल स्त्रेंथ नव्हती. पण उत्साहाला कधीच कमतरता नसते.

तसेच त्याने आपल्याच खेळाडूंच्या गळाभेट नाही घेतल्या तर हैदराबाद मधील युवा खेळाडूंना सुद्धा जाऊन भेटला..
त्याचे guesture नेहमीच अनुकरणीय असे असते. आणि हे तो दिखावा म्हणून नाही तर नेहमीच सहजतेने करतो असे बरेच जणांकडून ऐकले आहे. म्हणून क्रिकेट मध्ये जसा सचिन बद्दल आदर वाटतो तसा च बॉलीवूडमध्ये शाहरूख बद्दल वाटतो.. यावर एक वेगळा धागा निघेल.

खूप स्ट्राँग पर्सनॅलिटी आहे रे त्याची. इंडियाच्या स्टार कल्चरमधे फिट होणं अवघड आहे. >> +१. परत केके आर ने दोन वर्षे टीम बिल्ड केली आहे चंद्रकांत पंडीत खाली. पण पंडीत ची स्टाईल पण भारतीय संघाला झेपणारी नाहि. एक वेळ भारतीय खेळाडूंना प्रॉब्लेम नाही होणार पण इगोईस्टीक फॅन्स ना नक्की होईल त्याच्या मिलीटरी स्टाईलचा हे नक्की आहे. नरेन नि अर्नोल्ड वगळता त्याअ संघामधे स्टार नाहीत ह्याचा फायदा नक्की झालाय. त्यांचे हर्शित राणा, फिल सॉल्ट , रमणदीप ला इंपॅक्ट प्लेयर म्हणून वापरणे नि जवळजवळ सगळे सामने सेम टीम खेळणे ह्या सगळ्या स्ट्रेटेजी जबरदस्त चालल्या.

एव्हढी रन फेस्ट असलेली आयपील बाद फेर्‍या अशा बॉलिंङ ला सूटेबल पिचेस्वर खेळवणे अनुचित वाटले Wink

नितिश रेड्डी चा ऑल राऊंडर म्हणून उदय होणे , अभिशेक शर्मा चा कामचलाऊ स्पिनिंग ऑलराऊडर म्हणून वापर केला जाणे, रियान पराग, हर्शित राणा चा मिडल नि डेथ ओव्हर्स स्पेशालीस्ट म्हणून कस लागणे (विशेषतः हिट ड डेक हार्ड स्टाईल मधे प्रसिद्ध बाहेर पडल्यावर) ह्या जमेच्या बाजू आहेत. एकही नवा स्पिनर पुढे येऊ नये ह्या दुर्दैवाच्या बाजू आहेत.

परत केके आर ने दोन वर्षे टीम बिल्ड केली आहे चंद्रकांत पंडीत खाली. पण पंडीत ची स्टाईल पण भारतीय संघाला झेपणारी नाहि. >>>

पंडित तसाही भारतीय नॅशनल टीम च्या जॉब साठी अपात्र आहे, वय साठीपार असल्याने.

तो नियम का आणला कळले नाही. >>>

IPL मॅच फिक्सिंग स्कँडल नंतर सुप्रीम कोर्टाने बसवलेल्या लोढा आणि मुदगल कमिशन ने जे बदल आणले त्यातला हा एक नियम होता.

कारण गावस्कर, गांगुली, कुंबळे आणि इतर यांनाच माहिती ज्यांनी नंतर बसवलेल्या क्रिकेट ऍडमिनस्ट्रेशन कमिटी ला नियम बनवण्यात मदत केली होती.

Pages