भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंडस सॅमी. मांजरी असतातच एन्टायटल्ड पण आमचं भुभू सुद्धा कमी नाही. ही कोकोनटची दिनचर्या -- एकदम नवाब आहे.
IMG-20240522-WA0001.jpg
नदीकाठी फिरायला....
IMG-20240501-WA0003.jpg
नेबरहूड वॉच- वजन वाढल्यामुळे हा फोटो कांगारू सारखा वाटतोय Lol
IMG-20240522-WA0004.jpg
अठरा तास डुलक्या - आम्हीच पकडून पांघरूण घालून मिठ्या मारतो.
IMG-20240522-WA0002.jpg

कोकोनट मोठा झालाय आता Happy पांघरुणातला फोटो फार क्यूट. असे निरागस झोपलेले दिसले की आपल्याला आवळ चिवळ करायचा अटॅक येतो हा माझाही अनुभव आहे. तेही करून घेतात बिचारे. Happy

हो मैत्रेयी. कुस्तीच खेळतो आम्हीही. घुसळून लोणी काढल्यासारखं करायचं मग मुके घ्यायचे, तो एकदम प्रगल्भ भाव आणून सहन करतो. 'घ्या बाबा घ्या पप्प्या' टाईप... Lol

मीटबॉल. हावरट आहे एकदम. आजच ती म्हणत होती की आपणच घराचे मालक असल्याच्या थाटात वावरत असतो आणि असं लिहील.
>> meatball would write some article saying he grew up homeless and now he has his own house and private bathroom with two live in chefs, and that his financial advice is important to listen to>>

मीटबॉल Lol दॅट लुक्स ! Wink

पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा मिळावा (अमेरिकेतल्या)
माझी आई इथे आली होती तेव्हा ती सँमी मंकीचे लाड बघायची . त्यांचे वॅक्सिन्स, त्यांच्या वेट कडे नेण्याच्या कॅरियर्स, ट्रीट काय, टॉईज काय त्यामुळे ती हे वरचं वाक्य म्हणायची Lol

बर झालं धागा वरती आला
अनेक गमती जमती लिहायचा आहेत

ओडिन चा बडी रिओ आता मोठा झालाय
आणि आता उलट झालं आहे तो अतीच हायपर असल्याने तोच आता ओड्यावर हम्प करायला बघतो
त्यामुळे सॉलिड कुस्ती सुरू असते
बघण्यासारखे डावपेच असतात, तुडतुडीत रेसलर आणि मातीतला पैलवान यांच्यात भिडत व्हावी तसा
ओडिन वजनाचा फायदा घेत त्याला दाबून ठेवायला बघतो
तर तो उड्या मारत चकवत राहतो
कधी पोटाखालून घुसतो कधी अंगावरून उडी मारतो
फुल फोकस मध्ये एकमेकांना दमवत राहतात त्यामुले आम्हला बाजूला उभं राहून फक्त लक्ष ठेवावे लागत अर्धा पाऊण तास मारामारी झाली की दोघेही ह्या ह्या करत मातीत पसरतात
की चला म्हणलं की घरी
मस्त व्यायाम होतोय सध्या

मीटबॉल मस्त आहे.
कोकोनट बऱ्याच दिवसांनी दिसला. गब्रू जवान झालाय.

मस्त आहेत सगळे माऊ आणि भुभु.कोकोनट,मंकी,वाढलेला ओडिन(याचा फोटो दाखवा आताचा)
मीटबॉल चे फोटो कसले मस्त आलेत.एकदम पोस्टर फोटो आहेत.एखादी पावडर ची तीट लावा.

https://www.instagram.com/p/C7TVN7NJ_Fo/?igsh=MWp3Nm0wbDFncWkwdw==

ओड्याचा लेटेस्ट फोटो

एसी ची मज्जा, रात्री बेडरूममध्ये एसी लावलेला असतो
पण दिवसभर नसतो ते त्याला काही कळत नाही
सारखा बेडरूममध्ये जाऊन बघतो की गार झालंय का Happy
नसेल झालं तर कन्फ्यूज होतो आणि मग त्याला कळत नाही हे असं काय होतंय
बिचारा जागा बदलून बदलून झोपून बघतो कुठं तरी गार वारा येईल अशा आशेने

<<हावरेपणाचं प्रूफ>> हेच फोटो मीटबाॅल त्याच्या म्यावबोलीवर पण टाकू शकतो - बघा, मी समोर असून पण मला न देता खाल्ले, घे घ्या प्रूफ.......

वा! इलॉन आणि लाना मस्त दिसतायत! सध्या तिकडे उन्हाळा जबरदस्त ना. पेट्स ना त्रास होत असणार. त्यात लांब केसांच्या ब्रीड्स ना तर फारच.

इलॉन आणि लानाचा फोटो फार छान आला आहे.
मीटबॉल मान तिरकी करतेय ते अतिच गोंडस आहे.
ओडीनचा दुबई शेख हबिबी लूक बघून आले. Lol

धनवन्ती,
म्यावबोलीवरील मीटबॉलचा कोतबो Lol

Pages