Submitted by चैतन्य रासकर on 10 May, 2024 - 05:15
कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं
पालथं झोपून छताकडे बघावं
भिंतीच्या पापुद्रांनी किती ते पडावं
दार उघडं ठेवून शांत झोपावं
स्वप्नात का होईना कोणीतरी गोळी द्यायला यावं
जुनं काही आठवावं स्वतःशी हसावं
असा का वागलो हे स्वतःला विचारावं
मागच्या गोष्टीचं काही दुःख नसावं
आपल्याला काहीही झालेलं नाही हे नव्याने कळावं
कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं..
-चैतन्य रासकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
एवढ्या दिवसांनी दिसलात, आणि
एवढ्या दिवसांनी दिसलात, आणि म्हणे आजारी पडायचं.. कथा लिहा साहेब जुन्याच किती दिवस वाचायच्या?
छान आहे.
छान आहे.
तुमच्या कथा (स्पेशली विनोदी) मिस्स करत आहोत, लिहते व्हा.
छान आहे, पण नुसतंच वाटू दे.
छान आहे, पण नुसतंच वाटू दे. खरंच आजारी नको पडायला.