नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शीख समाजात काही ठिकाणी बाळाच्या नामकरणाला गुरू ग्रंथसाहेब उघडून जो शब्द पहिल्यांदा दिसला तो बाळाला नाव म्हणून देतात. त्या नावाला मुलगा असेल तर सिंग आणि मुलगी असेल तर कौर जोडतात. म्हणून नावं सारखीच असू शकतात.

फा Happy

मामी Lol
सनी पाजींनी गोंधळ घातल्याने हेमाजींचा धाकटी पाती हा खिताब अनिताजींकडे जाता जाता राहिला.
हे मां साठी पुत्र पित्यास आडवा गेला.

आता अनिताजी कोण?>>>

किती मोठ्याने प्रश्न विचारला अगदी एको आला त्या प्रश्नाचा!

अनिताजी = अनिता राज!

सोलापूर वरून येताना जेवायला भिगवण येथे थांबलो होतो.
तेव्हा शेजारील टेबलावर बसलेल्या दोघांच बोलणं कानावर पडलं.

"यंदा तरी येदनाच्या लग्नाचं बघताय का?"

"नाही ओ, काही घाई नाही. आता तर २ वर्षे झाली वेदनाला नोकरी लावून, बघू पुढच्या वर्षी "

मी विचारात पडलो, मुलीचं नाव वेदना ???

पण नंतरच्या संभाषणात सुध्दा वेदना नावच ऐकू आल.

रेश्मा भोये नावाचे खासदार लोकसभेवर सलग तीन वेळा निवडून गेले होते. पण त्यांच्या मतदाराना आपला खासदार पुरुष आहे की महिला हेच माहित नव्हतं

Screenshot_2024-05-09-20-19-34-84_e4424258c8b8649f6e67d283a50a2cbc.jpg
पोस्टर वरून चित्रपटात अमिताभचं नाव रेश्मा, सुनील दत्तचं शेरा आणि वहिदाचा अनुल्लेख करून फक्त और म्हटलंय असं वाटतंय ना?

Happy हो अमिताभची एक मीम मधे होती. इंजिनियरिंगचे पहिले वर्ष व्हर्सेस शेवटचे वर्ष. त्यात यातला तो चम्या फोटो होता पहिल्या वर्षाला. आणि डॉन मधला शेवटच्या वर्षाला Happy

सापडली एक Happy
https://twitter.com/RanjanMallya/status/1438177034723790849

फा, अमिताभ, फ्रेंड्स, पु. ल. आणि अश्या अनेक विषयात तुझी तयारी, नाथा कामताला लाजवणारी आहे बाबा. Wink Happy

न्यु यॉर्कात, एक 'निकरबॉकर (Knicker Bocker) मेडिकल सेंटर आहे. मजेशीर नाव वाटले.

The term "Knickerbockers" traces its origin to the Dutch settlers who came to the New World - and especially to what is now New York - in the 1600s. Specifically, it refers to the style of pants the settlers wore...pants that rolled up just below the knee, which became known as "Knickerbockers", or "knickers".

Pages