शॉर्ट शॉर्ट फिक्शन.

Submitted by केशवकूल on 1 May, 2024 - 13:39

कमीत कमी किती शब्दात लेखक कथा लिहू शकतो? मानवी भावनांची गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी कमीत कमी किती शब्दांची गरज आहे? आता हे तर सर्वमान्य आहे कि शंभर शब्द पुरेसे आहेत.(कथा शंभरी), कथापन्नाशी वा कथापच्चीसी. असे प्रयोग करायला काय हरकत आहे? दहा शब्द? पुरेसे आहेत? अर्नेस्ट हेमिंग्वे ह्या महान कथा लेखकाने केवळ सहा शब्दात लिहिलेली ही अजरामर कथा. मराठीत भाषांतर करायची माझी हिम्मत नाही.
“For sale: baby shoes, never worn.”
ही कथा वाचून दहा वर्ष झाली. पण अजून ती आकलन झाली आहे असं वाटत नाही.
हे सहा शब्द वाचून तुमच्या मनात काय भाव दाटून येतात? मला काय वाटलं ते आधी मी इथे लिहितो.
हे वाक्य कुणी लिहिले असावे? बहुतेक बेबीच्या बाबांनी. विकायला का काढले? आठवणींपासून सुटका मिळावी म्हणून. नशिबाने जे दान दिले आहे ते बाबांनी मुकाट्याने मान्य केले आहे. No Arguments.
काही वाचकांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.
-चोराने दुकान फोडले असावे आणि आता हे बेबी शूज विकायला काढले.
-बेबी स्टिलबॉर्न. तिच्यासाठी आवडीने घेतले असावे.
-मूल आपल्या नशिबातच नव्हते. दुसरा चान्स घ्यायची हिम्मत नाही. किंवा बस झाले.
-आठवणीचा ठेवा म्हणून जपून ठेवायला पाहिजे होते.
-माझ्या बेबीला मित्रांनी भेट म्हणून हे शूज दिले होते. पण ते पायात बसत नव्हते. मी नवीन पेअर घेतली आणि ही विकायला काढली. काही चुकलं का माझं?
-काय बकवास स्टोरी लिहिली आहे.
-सॅड टेल.
ह्या प्रतिक्रिया मी सँपल म्हणून ठेवल्या आहेत. पण पहा सहा शब्दात केव्हढे सामर्थ्य आहे. लोकांच्या भावनांना उद्दीपित करायचे सामर्थ्य.
मी जर सायको अॅनॅलिस्ट असतो तर मी ही कथा “टेस्ट” म्हणून ठेवली असती. पेशंटची पर्सनॅलीटी समजून घेण्यासाठी.
पण आपला मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. परिणामकारी कथा लिहिण्यासाठी किती शब्दांची गरज आहे?
ह्यातूनच मग लघु लघु कथा (शॉर्ट शॉर्ट फिक्शन) हा वाङ्‌मय प्रकार प्रचलित झाला. रुजला. आणि फोफावला.
आता फ्लॅश फिक्शन आणि सडन(sudden) फिक्शन असे दोन प्रकार झाले. फ्लॅश फिक्शन म्हणजे शब्दसंख्या २५० ते ७५० च्या दरम्यान, त्यानंतर म्हणजे शब्दसंख्या १७५० पर्यंत ह्याला म्हणायचे सडन स्टोरीज.
शब्दसंख्या हजाराने कमी झाली. पण कथेचे वाचकांच्या मनाला स्पर्श करायचे सामर्थ्य हे शब्दसंख्येवर अवलंबून असते काय? नाही. अनेक लेखकांनी हे दाखवून दिले. मी इथेच अर्नेस्ट हेमिग्वेच्या “A Very Short Story” ह्या कथेचा स्वैर अनुवाद केला होता. मानवी जीवनाची निरर्थकता आणि त्यातून “नो एक्झिट”- अगदी भावूक प्रेम देखील अखेर निरर्थक आहे हे वैश्विक सत्य दाखवणारी कथा. अगदी मोजक्या शब्दात. (हेमावैम).
कधी कधी कमी शब्द हेच कथेचे सामर्थ्य होऊ शकते. हजारो शब्द लिहून जे होत नाही ते युवतीच्या एका कटाक्षाने एका क्षणात होऊन जाते.
आर्थर क्लार्क ह्या सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखकाने – “२००१-ए स्पेस ओडेसी” “रान्देव्हू विथ राम” फेम त्याने एक विज्ञान कथा लिहिली नाव होत “siseneG”. मला ही नीटशी कळली नाही. ती अशी आहे.
And God said: DELETE lines One to Aleph. LOAD. RUN.
And the Universe ceased to exist.
Then he pondered for a few aeons, sighed, and added: ERASE.
It never had existed.
ही ३१ शब्दांची कथा. मी एक क्लू देतो. “siseneG”. हे उलट वाचले तर होते “Genesis”.
“Genesis” ही बायबल मधील विश्व निर्मितीची कथा आहे.
ह्या नंतर नेटवर कुणीतरी आवाहन केले कि सहा शब्दांची विज्ञान कथा लिहा. त्याला हजारो वाचकांनी प्रतिसाद दिला.
त्यातील ही काही गाळीव रत्ने. मी मराठीत केलेल्या भाषांतरावर जाऊ नका. ह्या “कथा” खरोखर सहा शब्दांच्याच आहेत.
--काळाचा अंत झाला. काल.
--शेवटी जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा त्याने आपला सप्लाय स्वीच ऑफ केला.
--विश्वाचा अंत झाला. त्याचा नाही.
--आहा! पृथ्वीवरचा शेवटचा माणूस. कित्ती चवदार!
--बाबा, सूर्य असा का भगभगतो आहे?
--टेलेपोर्टरचा प्रयोग यशस्वी झाला. पण मी लिबलिबीत का झालो आहे?
--बाळा छान! तुझ पहिलंवहिलं विश्व! छान जमलय.
अशी बरीच आहेत. पण मी इथे लघुत्तम कथांचे गुणगान करतो आहे. मग इथेच थांबणे इष्ट नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
(लेखाला साजेसा प्रतिसाद दिलाय.)

चुकून दोनवेळा पडला.

उबो
पहा शेवटी जे मंजुरे खुदा होता है तेच झालं.

छान. reddit वर two sentence horror story नावाचा धागा आहे, त्यात नावाप्रमाणे २ वाक्यात धक्कादायक कथा सांगितली जाते.

माबो वाचक
आहा. दोन वाक्यात्त horror स्टोरी! जाऊन वाचणार. टिप दिल्याबद्दल आभार.

मला वाटतं पूर्वी कथा अथवा गोष्टी कमी शब्दात नसाव्यात हे नंतरचे आविष्कार आहेत. कमी शब्दातली कथा सर्वांना समजेल असे नाही. कवितेप्रमाणे ज्याची जशी प्रतिभा तितके वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
मी जेव्हा कथा लिहितो तेव्हा कथेतल्या पात्रांबरोबर भवताल ही जिवंत होईल हे पाहतो. आता कितपत जमतं हे समजायला मायबोलीकर सुज्ञ आहेत. ते नेहमी सांभाळून घेतात. मला ही सवय दिग्गज मराठी, हिंदी कथाकारांनी लावली आहे.
लघू कथेप्रमाणे मी दिवाकरांच्या नाट्यछटा शालेय जीवनात अभ्यासल्या आहेत. त्यावर एक अत्यंत अल्पजीवी धागा काढला तो जन्मला अन् मेला...https://www.maayboli.com/node/67130

लिखाणात लघू कथा हा प्रकार आला. दंतकथा तशा वेल्हाळ लावणा-या वाटल्या तरी ऐकणा-याला खिळवून ठेवतात. माझे लहाणपणी मी गोंधळाचे कार्यक्रम पहायचो. या गोंधळाच्या सगळ्या कथा लिहणं, वाचणं माहित नसताना एका पिढीकडून दुस-या पिढीकडं पोटापाण्यासाठी संक्रमण करत. ती कथनशैली ऐकणाराचे लक्ष खिळवून ठेवायची.
जो ऐकणारा खिळवून ठेवतो तो गोष्टीवेल्हाळ.
एखाद्या कथेत वाचकांना चकीत करणारं काही नसलं तरी भवताल आणि पात्रांचे भाव जीवंत झाले की कथा सुंदर होते.
मला स‌आदत हसन मंटोची ही कथा काही मोजके शब्द किती ताकदवर असतात हे दर्शवतं. कथेचं शिर्षकच "खोल दो" आहे आणि शेवट असा आहे...
शाम के क़रीब कैंप में जहां सिराजुद्दीन बैठा था। उसके पास ही कुछ गड़बड़ सी हुई। चार आदमी कुछ उठा कर ला रहे थे। उसने दरयाफ़्त किया तो मालूम हुआ कि एक लड़की रेलवे लाइन के पास बेहोश पड़ी थी। लोग उसे उठा कर लाए हैं। सिराजुद्दीन उनके पीछे पीछे हो लिया। लोगों ने लड़की को हस्पताल वालों के सुपुर्द किया और चले गए। कुछ देर वो ऐसे ही हस्पताल के बाहर गढ़े हुए लकड़ी के खंबे के साथ लग कर खड़ा रहा। फिर आहिस्ता आहिस्ता अन्दर चला गया। कमरे में कोई भी नहीं था। एक स्ट्रेचर था जिस पर एक लाश पड़ी थी। सिराजुद्दीन छोटे छोटे क़दम उठाता उसकी तरफ़ बढ़ा। कमरे में दफ़अतन रोशनी हुई। सिराजुद्दीन ने लाश के ज़र्द चेहरे पर चमकता हुआ तिल देखा और चिल्लाया, “सकीना!”

डाक्टर ने जिसने कमरे में रोशनी की थी सिराजुद्दीन से पूछा, “क्या है?”

सिराजुद्दीन के हलक़ से सिर्फ़ इस क़दर निकल सका, “जी मैं... जी मैं... इसका बाप हूँ!”

डाक्टर ने स्ट्रेचर पर पड़ी हुई लाश की तरफ़ देखा। उसकी नब्ज़ टटोली और सिराजुद्दीन से कहा, “खिड़की खोल दो।”

सकीना के मुर्दा जिस्म में जुंबिश पैदा हुई। बेजान हाथों से उसने इज़ारबंद खोला और शलवार नीचे सरका दी। बूढ़ा सिराजुद्दीन ख़ुशी से चिल्लाया, “ज़िंदा है... मेरी बेटी ज़िंदा है...” डाक्टर सर से पैर तक पसीने में ग़र्क़ हो गया।

ही संपूर्ण कथा इथे आहे....
https://www.rekhta.org/stories/khol-do-saadat-hasan-manto-stories?lang=hi

ओ माय गॉड.
पूर्ण कथा वाचायची काय गरज आहे?
माझ्यासाठी ही एव्हढीच पुरेशी आहे.