Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मुंबई इंडियनमध्ये जे झाले
मुंबई इंडियनमध्ये जे झाले त्यानंतर रोहीतच्या कॅप्टंसीखाली पांड्या संघात नको असे माझे प्रामाणिक मत आहे!!
तसेही तो सध्याच्या फॉर्मवर भारतीय संघातले स्थान डिझर्व्ह करत नाही....
सिराजच्या जागी आवेश मुख्य संघात हवा होता आणि राखीवमध्ये का होईना संदीप शर्माला चान्स मिळायला हवा होता!!
रोहीत आणि कोहली एकावेळी एका T20 संघात असतील तर जयस्वाल, सुर्या, पंत वगैरे वरची आवश्यक रनरेट राखण्याची जबाबदारी फार वाढणार आहे..... बाकी संघ ठीकठाक आहे!!
संघाला शुभेच्छा!!
मुंबई इंडियनमध्ये जे झाले
मुंबई इंडियनमध्ये जे झाले त्यानंतर रोहीतच्या कॅप्टंसीखाली पांड्या संघात नको असे माझे प्रामाणिक मत आहे!!
>>>>>
+786
माझेही हेच मत आहे. आणि यामागे फक्त संघाहिताचा विचार आहे. असो, आता आशा करूया संघातील वातावरण चांगले राहील.
रिंकू बाबत मला जरा शंकाच होती
रिंकू बाबत मला जरा शंकाच होती.
शिवम दुबे ने अजून अवघड केली त्याची सिच्युएशन.. पण तरी मला वाटते त्याची शैली आणि त्याचा रोल पंत सोबत जुळत होता. आणि पंत पुन्हा आला तर त्यासोबत रिंकू अकरात असेल का याची मला खात्री नव्हती.
स्वरुप
स्वरुप
प्रत्येक वाक्याशी सहमत आहे.
Mumbai Indians Innings 32-4
Mumbai Indians Innings 32-4 (6.2 Ov)
कोण कुणाचा पंगा घेतोय?
खुन्नस!
मुंबई इंडियनमध्ये जे झाले
मुंबई इंडियनमध्ये जे झाले त्यानंतर रोहीतच्या कॅप्टंसीखाली पांड्या संघात नको असे माझे प्रामाणिक मत आहे!!
तसेही तो सध्याच्या फॉर्मवर भारतीय संघातले स्थान डिझर्व्ह करत नाही.... >> स्वरुप प्रामाणिक प्रश्न हा आहे कि जर पांड्याच्या फॉर्म चा प्रश्न नसता तर तुझे पहिले वाक्य तेच राहिले असते का ? निव्वळ दुसरे वाक्य तो संघात नसण्यासाठी पुरेसे होते असे वाटत नाही का ? गम्मत म्हणजे जय शाह- आगरकर-द्रविड-रोहित ह्यांनी पांड्याला निव्वळ संघात घेतले नाहिये तर उपकप्तान म्हणून घेतले आहे. गो फिगर !
असामी
असामी
माझ्या मते त्याचे कारण असे असावे कि पांड्याच्या मागे कोणी जबरी उभा आहे.
आणि
रोहितने विचार केला असणार कि आयला ह्याला घेतला नाही तर ह्याचे सपोर्टर म्हणणार कि पहा रोहितने सूड घेतला.
किती फालतू team select केलीय.
किती फालतू team select केलीय. Selectors सुद्धा वेगवेगळे ठेवायला हवेत प्रत्येक फॉरमॅट la.
अभिषेक नक्कीच हवा होता. एक सीनियर प्लेयर अणि फॉर्म मध्ये असलेले यंग प्लेयर अशी टीम सिलेक्ट केली पाहिजे. सूर्य कुमार तसाही अनुभवी आहे आणि शर्मा. बाकी यंग guns. Pandya कुठून घेतला?? काय basis? कोहली सुद्धा बसवायला पाहिजे होता. खैर जे होईल ते होईल आता.
असामी, फॉर्म असता तर जरा तरी
असामी, फॉर्म असता तर जरा तरी विचार करण्यात अर्थ होता; फॉर्म नसताना त्याला संघात घेणे आणि व्हाईस कॅप्टन (ज्याला तसा फारसा अर्थ नसतो पण खराब फॉर्म असाच चालू राहिला तर त्याला सहजासहजी बसवताही येत नाही ) करणे हे खरेच बुचकळ्यात टाकणारे आहे!!
जे कॉंबो मुंबई इंडियनमध्ये वर्क होत नाहिये हे अगदी उघडपणे दिसतय ते कॉंबो भारतीय संघात वर्क होईल अशी भाबडी आशा तरी कशी ठेवायची?
निर्णय घेणाऱ्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त कळते असे म्हणायचे आणि संघाला शुभेच्छा द्यायच्या
सध्या तरी BCCI मध्ये गुजराती
सध्या तरी BCCI मध्ये गुजराती लॉबी पॉवरफुल आहे. त्याचेच प्रतिबिंब टीम सेलेक्शन मध्ये दिसत आहे.
Hardik Pandya (c) c Rahul b
Hardik Pandya (c) c Rahul b Naveen-ul-Haq
वन बॉल डक!
जे कॉंबो मुंबई इंडियनमध्ये
जे कॉंबो मुंबई इंडियनमध्ये वर्क होत नाहिये हे अगदी उघडपणे दिसतय ते कॉंबो भारतीय संघात वर्क होईल अशी भाबडी आशा तरी कशी ठेवायची? >> काय राव ? हेच काँबो तीन ट्रॉफी जिंकताना होते ना रे ? माझ्या आठवणीप्रमाणे लास्ट वर्ल्ड कप नंतर आगरकर ने (कि जो मेन सिलेक्टर होता त्याने) रोहित नि कोहली पासून मूव्ह व्ह्यायला हवे असे सुचवले होते. त्याच वेळी पांड्ञाला कप्तान केले गेले होते . तो अन फिट होईतो सप्टेंबर मधे होता नि मग सूर्या त्याच्या जागी आला. हे त्याचेच कंटीन्ञुएशन असावे. रोहित नि पांड्या नीड्स टू मूव्ह ऑन असा सिग्नल दिला असावा. यंदा जिंको किंवा नाही, हा कोहली नि रोहित चा शेवटचा टी २० वर्ल्ड कप असावा अशी आशा धरूया.
>>काय राव ? हेच काँबो तीन
>>काय राव ? हेच काँबो तीन ट्रॉफी जिंकताना होते ना रे ?
अरे पण मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय..... सध्या रोहीत आणि पांड्यामध्ये सारे काही आलबेल नाही हे तरी मान्य आहे का नाही तुला? (ते तसे असावे की नसावे हा वेगळा मुद्दा आहे)
सध्या रोहीत आणि पांड्यामध्ये
सध्या रोहीत आणि पांड्यामध्ये सारे काही आलबेल नाही हे तरी मान्य आहे का नाही तुला? >> आहे ना पण दोन प्रोफेशनल खेळाडूंना देशासाठी खेळताना हे पाठी टाकता आले पाहिजे. रोहित कॅप्टन झाल्यापासून ऑल राऊंडर हवा हे म्हणतोय. दुबे चेन्नई कडून खेळत असल्यामूळे त्याला बॉलिंग साठी वापरत नाही. त्यामूळे त्याला घेताना पांड्ञा शिवाय काय पर्याय उरला होता अस विचार केला असेल.
>>पण दोन प्रोफेशनल खेळाडूंना
>>पण दोन प्रोफेशनल खेळाडूंना देशासाठी खेळताना हे पाठी टाकता आले पाहिजे.
आयडीयली येस्स!! पण हार्दिकचा सध्याचा एकंदर वावर बघता त्याचाकडून हे होईल असे वाटत नाही.
त्या दोघांच्यातले शह-काटशह भारताच्या संघाला महागात पडायला नकोत!!
एकवेळ मान्य करु की पांड्याचा फॉर्म नसतानाही (दुसऱ्या सक्षम पर्यायाअभावी) त्याला घेणे हा नाईलाज असेल पण मग व्हाईस कॅप्टन कशाला करायचा??
एकवेळ मान्य करु की पांड्याचा
एकवेळ मान्य करु की पांड्याचा फॉर्म नसतानाही (दुसऱ्या सक्षम पर्यायाअभावी) त्याला घेणे हा नाईलाज असेल पण मग व्हाईस कॅप्टन कशाला करायचा?? >> वर्षभर मागे जा - आधीच्या वर्ल्ड कप नंतर टी २० चा कप्तान बदलून पांड्याला केले होता ना ? त्याचा सब म्हणून सूर्याला आणले ऑक्टोबर मधे. सूर्या इंज्रड झाल्यावर (नि पांड्या चा फीट्नेस यायच्या आधी) परत रोहित कडे सूत्रे परत गेली. हा त्याचा शेवटचा कप असेल असे आधीच सुतोवाच केले गेले असेल म्हणून कंटिन्यूटी (जी ह्या सिलेक्शन समिती ची स्ट्रॅटेजी दिसतेय) हवी म्हणून पांड्याला उपकप्तान केले गेले असेल. असे समज कि मुंबई चा कप्तान पांड्या हे जाहीर व्हायच्या आधी रोहित निव्रुत्तीमूळे / विश्रांती हवी / इंजर्ड असल्यामूळे आयपील खेळणार नाही असे जाहीर् झाले असते तर पांड्या कप्तान म्हणून योग्य का (सूर्या किंवा बुमरा का नाही) ह्याबद्दल बोंबाबोंब झाली असती का ? उत्तर नाही असेल तर तेच लॉजिक एक्स्टेंड कर. त्याला बेनेफीट ऑफ डाऊट दिला गेलाय मुंबई इंडियन्स्च्या कामगिरीबद्दल.
पण हार्दिकचा सध्याचा एकंदर वावर बघता त्याचाकडून हे होईल असे वाटत नाही.
त्या दोघांच्यातले शह-काटशह भारताच्या संघाला महागात पडायला नकोत!! >> सॉरी मला असे होईल असे वाटत नाही. हार्दिक समोर त्याची पूर्ण कारकीर्द उभी आहे अजून. असे करणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे हे त्याला समजत नसेल हे अगदीच बाळबोधपणाचे वाटते.
>>वर्षभर मागे जा -
>>वर्षभर मागे जा -
परत एकदा; मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय.... मागच्या दोन आयपीएल नंतर हा पांड्या आवडतोय; मॅच्युअर वाटतोय हेच माझे मत होते पण मधल्या काळात त्याच्या ॲटीट्यूडने माती खाल्लीय!!
रोहीत आणि तो हे नजिकच्या काळात वर्क होणारे कॉंबो असेल असे मला वाटत नाही यावर मी ठाम आहे
उद्या रोहीत संघातून बाहेर गेल्यावर GT वाला पांड्या बघायला मिळूही शकतो पण आत्ता रोहीत बरोबर जुळवून घेणे त्याच्यासाठी सोप्पे नाही वाटत!!
रोहित, सूर्या आणि पांड्या
रोहित, सूर्या आणि पांड्या तिघे एका संघात म्हणजे संघ फक्त 8 खेळाडूंनी खेळणार. तसेही आपला संघ फक्त फिरायाच्या विचाराने जाणार आहे, जेवढा लवकर बाहेर पडेल तेवढा फिरायला जास्त वेळ मिळेल.
पांड्याला उपकर्णधार करणार की
पांड्याला उपकर्णधार करणार की नाही हाच आमच्याइथे कालपासून चर्चेचा विषय होता.
मी खालील दोन मते मांडून पोल सुद्धा काढला होता जो पांड्या हरला होता.
एक मत असे होते - रोहित कर्णधार आहे. दोघातील वाद उघड आहे. जर ते जुळवून घेतील का ही भीती असेल तर उपकर्णधार बुमराह, पंत किंवा सूर्या करा.
दुसरे मत असे होते - संघातील तणाव वाढू नये म्हणून त्याला उपकर्णधार करा. अन्यथा नाराज होऊन तो अजून कोणाचे तरी कान भरत बसणार. त्यामुळे एक तर त्याला घेऊच नका किंवा घेतले तर उपकर्णधार म्हणून राहू द्या.
Submitted by मनमोहन on 30
Submitted by मनमोहन on 30 April, 2024 - 20:51
>>>>>
अभिषेक शर्मा, हो त्याला चान्स देता आला असता.
पण यशस्वी टेस्टेड आहे. आणि नुकतेच शतक झळकावत त्याने फॉर्मवरचा प्रश्नचिन्ह काढला.
मला भीती होती की गिल मागच्या सीजन सारखा धावा टाकू लागला तर त्याला नेतील की काय..
पण नशीब तो आणि राहुल यांचा विचार केला गेला नाही.
कोहलीला घेण्यामागे आणि न बसवण्यामागे स्वतंत्र चर्चा होईल इतकी कारणे आहेत. वर चर्चा झाली आहेच. पण शर्मा आहे आणि कोहली नाही असे केल्यास वातावरण अजून पेटले असते.
पांड्या नसता तर खरेच बरे वाटले असते. रिंकू सिंग नसल्याने आता तो ऑलराऊंडरच नाही तर फिनीशर रोल म्हणून सुद्धा सारे सामने खेळणार हे नक्की..
फक्त प्रश्न आहे की त्याने बरेच काळ हे दोन्ही रोल जस्टीफाय करणारे काही स्पेशल केले नाही.
परत एकदा; मधल्या काळात
परत एकदा; मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय.... मागच्या दोन आयपीएल नंतर हा पांड्या आवडतोय; मॅच्युअर वाटतोय हेच माझे मत होते पण मधल्या काळात त्याच्या ॲटीट्यूडने माती खाल्लीय!! >> तू मतावर ठाम राहण्यबाबत काहीच हरकत नाही फक्त मधला काळ म्हणजे नक्की कुठला नि नक्की काय केले आहे हे सांगू शकतोस का ? मला तो ऑगस्ट नंतर आय पील मधे खेळताना दिसलाय थेट . फक्त आय पील चा रेफरन्स असेल तर सोडून देऊया.
गावस्कर काय म्हणतो आहे ते पाहा : https://www.rediff.com/cricket/report/forget-ipl-flop-hardik-to-shine-in...
मला नाही वाटत कि आयपीएलच्या
मला नाही वाटत कि आयपीएलच्या फॉर्मचा नॅशनल टीमच्या - आणि ते सुद्धा वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंटच्या - सिलेक्शनशी मोठा संबंध आहे. पंड्या वि. रोहित वगैरे सुद्धा मिडियाने जितकं मोठं केलंय तितकं आयपीएलच्या वर्तुळाबाहेर नसावं. चहल वगळता ही सगळी टीम गेलं वर्षभर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचेस खेळली आहे.
पंड्या वि. रोहित वगैरे सुद्धा
पंड्या वि. रोहित वगैरे सुद्धा मिडियाने जितकं मोठं केलंय
>>>>>
संजय मांजरेकर याना बिहेव बोलायची वेळ येते.
कोहली लोकांना विनंती करतो.
रोहीत आणि पांड्या एकत्र येऊन काही स्टेटमेंट देत नाहीयेत..
रोहितचे पोस्टर मैदानावर न्यायाला मनाई केली जात आहे.
उलट बरेच गोष्टी बाहेर येत नाहीयेत असे वाटते.
“ संजय मांजरेकर याना बिहेव
“ संजय मांजरेकर याना बिहेव बोलायची वेळ येते.
कोहली लोकांना विनंती करतो.
रोहितचे पोस्टर मैदानावर न्यायाला मनाई केली जात आहे.” - हा लोकांच्या वागण्याचा / ओव्हर-रिअॅक्शनचा भाग झाला.
“ रोहीत आणि पांड्या एकत्र येऊन काही स्टेटमेंट देत नाहीयेत..” - कशासाठी द्यायचं? लोकांची गॉसिपची हौस फिटावी म्हणून असलं काही करायची आवश्यकता नाहीये.
गावसकर आणि कपिलच्या बाबतीत कॅप्टन्सीचा हुतूतू बरेचदा खेळला गेला होता पण दोघांपैकी कुणी मैदानावर त्याचा परिणाम होऊ दिला नव्हता. हे तर तसंही फ्रँचाईझी लीग क्रिकेट आहे.
मयांकचा सणसणीत अपवाद वगळता
मयांकचा सणसणीत अपवाद वगळता यंदा अजून एकही प्रॉमिसिंग नवा भारतीय बॉलर दिसला नाहिये राव. स्पिनरची पारच वानवा आहे.
मस्त झाली आजची मॅच !
मस्त झाली आजची मॅच !
मुंबै चेन्नई फायनल सामना आठवला...
हो आजची मॅच मस्तच झाली. Bhuvi
हो आजची मॅच मस्तच झाली. Bhuvi ne छान केली. Nattu, Bhuvi, Cummins सगळेच चांगले खेळले आज. दोघे Bhuvi आणि Nattu नाहियेत squad मध्ये
हो. नटराजन हाय स्कोरिंग
हो. नटराजन हाय स्कोरिंग सामन्यात सुद्धा कन्सिस्टंटली चांगली टाकत आहे. बुमराहच्या जोडीला वेगवान गोलंदाज आयपीएल फॉर्मवर निवडायला हवे होते. कारण तसेही कोणी इंटरनॅशनल मध्ये स्वतःला सिद्ध केले अशातला भाग नव्हता. नटराजन आणि संदीप शर्मा आत आले असते.
आज मुंबई वि कोलकाता. मुंबई
आज मुंबई वि कोलकाता. मुंबई शारुकच्या संघाला दोन गुण मिळवून देऊ शकते. हे मुंबई लिहले की भिंग का येतयं? माबो शोधचे का?
मुंबई
मुंबई
Pages