बदललेली ती..
बुटकी ती.. काळी ती..
कुरूप ती.. नकोशी ती..
परित्यक्ता ती.. विधवा ती..
असायचीच अशी एखादी ती..
भरलेल्या प्रत्येक कुटुंबात..|
वहात रहायची..
घराचं ओझं निमुटपणे....
झुकलेल्या मानेवर..
अंधाऱ्या कोठीघरातून लेकुरवाळ्या माजघरापर्यंत..
गोळाभर अन्नाच्या बदल्यात..
घरातल्या काळोखात लपवायची..
कधी असलेली.. अन् कधी गेलेली अब्रू.. |
काळ बदलला.. बदलली तीही..
ऐकायला शिकली ..
आक्रोश स्वत:चा.. अन् बदलत गेलं काहीतरी..
बाहेर.. अन् तिच्याही आत.. आत....खोलवर..
दिसत गेली तिरीप बारीकश्या फटीतून..
ऐकू आली किलबिल..
उजाडत होतं कुठेतरी..
मावळत होतं कोठीघर..|
अंधार जोजवणारी तीही मग
झेपावत गेली.. बाहेरच्या धुक्यात..
नाकारून गुलामगिरी..
झुगारून काळोखं जीणं ..
टाकत एक एक पाऊल उजेडाकडे..
चाचपडत.. स्वत:चं अवकाश शोधत..
आता विहरते आहे ती..
तिच्या बुटक्या.. काळ्या.. कुरूप रुपासकट..
सधवेच्या अथवा विधवेच्या ..
जिण्याला म्यान करून..
अन् आपल्या ओझ्यालाच पंख बनवून..|
************
छान!
छान!
बदलत्या स्त्री चा आश्वासक चेहरा उत्तमरित्या रेखाटलाय आपण..
छान आहे !
छान आहे !
छान शब्दरचना..!
छान शब्दरचना..!
आक्रोश स्वत:चा.. अन् बदलत
आक्रोश स्वत:चा.. अन् बदलत गेलं काहीतरी..
बाहेर.. अन् तिच्याही आत.. आत....खोलवर..
दिसत गेली तिरीप बारीकश्या फटीतून..
ऐकू आली किलबिल..
उजाडत होतं कुठेतरी..
मावळत होतं कोठीघर..|
अंधार जोजवणारी तीही मग
झेपावत गेली.. बाहेरच्या धुक्यात..>> आवडलं
मस्तच!!! खूप संवेदनशील.
मस्तच!!! खूप संवेदनशील.
छान. मुक्त आकाशात स्वच्छंदपणे
छान. मुक्त आकाशात स्वच्छंदपणे, मनाला आवडेल तसे उडणे पूर्णपणे साध्य झाले नाही, पण सुरुवात तरी झाली आहे. हासुद्धा सकारात्मक बदल आहे.
>>>अन् आपल्या ओझ्यालाच पंख
>>>अन् आपल्या ओझ्यालाच पंख बनवून>>> व्वा मस्तच सकारात्मक..
वाह, छान
वाह, छान