नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल्स
ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल्स असंच म्हणतात. >> हो खरंच की!
आणि अश्या ट्रोल्सना अलगद
आणि अश्या ट्रोल्सना अलगद आपल्या जाळ्यात पकडणाऱ्यांना ट्रॉलर म्हणतात
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च)
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च) आहे >> ???
निळू (फुले) कि मां ?
साऊथ मध्ये अगदी मुलीची
साऊथ मध्ये अगदी मुलीची वाटणारी नावं (सतिशा, कीर्ती, राधा) मुलांची असतात.त्यामुळे नीलिमा नावाचा मुलगा सापडला तर आश्चर्य वाटणार नाही.संदीप और पिंकी फरार मध्ये संदीप परिणीती चे आणि पिंकी अर्जुन कपूर चे नाव आहे.
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च)
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च) आहे ? त्याचा अर्थ काय ?
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च)
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च) आहे ? त्याचा अर्थ काय ? >>> लालीमा सारखा नीलिमा असावा
चंद्रमा कसा पुल्लिंगी आहे,
चंद्रमा कसा पुल्लिंगी आहे, तसाच नीलिमा
अनया, खरं आहे. पण मुलीच्या
अनया, खरं आहे. पण मुलीच्या जन्माच्या वेळची चाकोरी ती १८ वर्षे होईपर्यंत सारखीच नसेल ना. हे उर्दू, मुस्लिम साऊंडिंग नावाला ट्रोल करणे आपण लहान असताना न्हवतं.
उद्या अनिता, करीना, नीना, नताशा, इरा, सोनिया अशा रशिअन साऊंडिंग नावांना ट्रोल करायची फॅशन आली की १८ वर्षे आधी ठेवलेल्या नावांचं काय करायचं? मूर्खपणाला काही अंत नसतो. तू व्हिक्टिम ब्लेमिंग करत नाहीयेस कल्पना आहे, पण हे वरचे धागाकर्ते गाडी त्या रुळावर कधी नेतील पता लागायचा नाही.
खर आहे. म्हणून लिहावं की नाही
खर आहे. म्हणून लिहावं की नाही, अशा द्विधा मनस्थितीत होते. ज्याला त्याला आपल्या मुलांची नावं ठरवायचा अधिकार आहे. त्याबद्द्ल दुमत नाही.
आईवडिलांनी स्वत:चं नाव बदललं
आईवडिलांनी स्वत:चं नाव बदललं तर त्यावरून मुलांना ट्रोल केलं जाणार नाही?
लहानग्या सई परांजपेंला पुण्यातल्या काकवा तिच्या फॉरेनर बापावरून आणि एकल पालक आईवरून प्रश्न विचारीत.
नाव ठेवताना आडनावा सोबत कसे
नाव ठेवताना आडनावा सोबत कसे वाटेल ह्याचा ही विचार व्हावा मिलॉर्ड..
केया वाणी
कियारा पाटील
रायन वाघमारे
माया स्टाईल...टू मिडलक्लास म्हणुन सुनेचेच बारसे मनिशा वरून मॉनिशा करते
सविता हे नाव पुल्लींगी >> हो,
सविता हे नाव पुल्लींगी >> हो, मूळ सवितृ शब्द आहे (सूर्य हा अर्थ). पितृ चे पिता, भ्रातृ चे भ्राता त्याप्रमाणे. सविता भाभी ऐवजी सविता भावजी किंवा सविता जीजू पाहिजे होते.
नीलिमा पुल्लिंगी आहे हे माहीत
नीलिमा पुल्लिंगी आहे हे माहीत नव्हतं..मग काळीमा पण पुल्लिंगी आहे काय?
सविता, नीलिमा ही नाव
सविता, नीलिमा ही नाव पुल्लींगी >> ही माहिती नवीनच आहे.
शर्मिला पुल्लिंगी पाहिजे.
शर्मिला पुल्लिंगी पाहिजे. शर्मिली स्त्री लिंगी
इथे समान विषय चालू आहे म्हणून
इथे समान विषय चालू आहे म्हणून:
मास्टरशेफ स्पर्धक स्त्री चे नाव सुमित सहगल आहे(तो बुगी वुगी चा तिसरा जज नव्हे.)
इथल्या चर्चेनंतर सुंदरा
इथल्या चर्चेनंतर सुंदरा नाजुके नावाचा कुणी आडदांड मनुष समोर आला तरी धक्का बसणार नाही.
श्री गुलाब पोळ माजी पोलीस
श्री गुलाब पोळ माजी पोलीस आयुक्त होते.
'तो ' गुलाब म्हणजे गुलाब
'तो ' गुलाब म्हणजे गुलाब पुल्लिंगी शब्द. पुरुषाचेच नाव असायला पाहिजे खरंतर. पण असते बायकांचे.
ती गुलाब केसात घाल
आमचा एक पोळ आडनावाचा मित्र
आमचा एक पोळ आडनावाचा मित्र होता.
त्याला काही मित्र फुर्र करून बोलावत आणि काही ये रे जाळपोळ म्हणत.
पुरुष - गुलाब आणि स्त्री-
पुरुष - गुलाब आणि स्त्री- गुलाबो
मी तरी गुलाब, गुलाबराव अशी
मी तरी गुलाब, गुलाबराव अशी पुरुषांचीच नावे ऐकली आहेत, स्त्रीचे नाही. माझ्या बालमित्राच्या वडिलांचे नाव गुलाबराव होते.
आमच्या इथे आहे की एक आडदांड
आमच्या इथे आहे की एक आडदांड सुंदरा माणिकम एकदा एका मिटिंग मध्ये बोलल्यावर कळले.फोटोही लावत नाहीत कधीकधी लोक्स.आपला चेहरा राणी पद्मिनी प्रमाणे पडद्यातच राहावा अशी इच्छा असेल.
मराठी चित्रपट अभिनेत्री गुलाब
मराठी चित्रपट अभिनेत्री गुलाब कोरगावकर
स्त्रीचे नाही. >>> मी
स्त्रीचे नाही. >>> मी आजपर्यंत ३ गुलाब स्त्रिया पहिल्या आहेत. एक खूप आडदांड, एक छोटीशी लाजाळू व एक नेहमी डोक्यात शेवंतीची वेणी घालून असे.
आडदांड सुंदरा माणिकम >>
आडदांड सुंदरा माणिकम >> हा पुरुष आहे हे लक्षात येत आहे. तिथली नावं आपल्यासाठी विचित्र वाटतात. सुंदरमाणिकम असा एक सामासिक शब्द लिहिण्याऐवजी ते लोक शब्दांची फोड करतात नावांत. ते माणिकम त्याचं आडनाव नक्कीच नसणार, त्याच्याच नावाचा भाग असणार. पण पासपोर्ट किंवा इतर अधिकृत ठिकाणी लास्ट नेम लिहायला लागतं म्हणून असे काही लोक त्या नावाचाच एक भाग लास्ट नेम म्हणून वापरतात. शिवाय हाक मारायला सोपे म्हणून सुंदर आणि दाक्षिणात्य प्रथेप्रमाणे अकारान्त शब्द हे आकारान्त होत असल्याने सुंदरा असणार.
आमच्या हपिसात एक आडदांड उमा महेश्वर होता. सगळे त्याला उमा सर म्हणायचे - कसलं विचित्र वाटलं होतं पहिल्यांदा ऐकताना. तसंच कॉलेजात गणित शिकवायला एक 'महेश कुमारी' नावाची उत्तर भारतीय बाई होती. हपिसात एक दुर्गेश नावाची उ.भा. मुलगी होती.
अरे हो. हे विसरलोच.
गुलाब कोरगावकर> अरे हो. हे विसरलोच.
तुंबाडचे खोत कादंबरीत एक
तुंबाडचे खोत कादंबरीत एक गुलाब नावाची स्त्री आहे.
आमच्या गावात एक गुलाब होती.
(एखादं नाव किंवा एखादा शब्द परत परत लिहिला/वाचला की काही वेळाने तो नीरस, निरर्थक वाटायला लागतो मला. एकदा 'गुलाब' वाचलं किंवा लिहिलं की तो सुंदर, सुगंधीदेखील वाटतो. पण परत परत लिहिला की त्यातला अर्थ निघून जातो. सगळ्यांचंच असं होतं का?)
चर्चा गुलाबावर आलीच का!
चर्चा गुलाबावर आलीच का! "नावात काय आहे ... गुलाब या फुलाचं नाव दुसरं काहीही असतं तरी सुगंध तेवढाच दरवळला असता..." असं शेक्स्पियर म्हणून गेला. एवढी नाम नामेति नामेति झाल्यावर चर्चा पुन्हा गुलाबावर आली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.
(इथे 'गुलाबाचं नाव जुलाब असतं तर दरवळला असता का सुगंध?' - हे शिरीश कणेकरांचं वाक्य वरच्या वर्तुळाला टँजंट मारून जातं.)
मराठी चित्रपटात गुलाब मोकाशी
मराठी चित्रपटात गुलाब मोकाशी होते
माझ्या मावस बहिणीचे आणि एका आत्याचेही नाव गुलाब आहे
Pages