नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
नायगाव पोलीस सर्जन
नायगाव पोलीस सर्जन हॉस्पिटलशेजारी डॉ विमल बूब यांचा दवाखाना आहे
गेल्या आठवड्यात एक नवीन
गेल्या आठवड्यात एक नवीन नाव (माझ्यासाठी) ऐकले. विशाख.
अर्थ कार्तिकेय
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव जहांगीर आहे म्हणून लोकांनी त्याला ट्रोल केले. मजेमजेत ट्रोल ही एक गोष्ट झाली, पण इथे लोकांनी चारित्र्यावर विनोद केलेत म्हणे. शिवाय शिवाजी महाराजांची भूमिका करणार्याच्या मुलाचे नाव जहांगीर कसे असे प्रश्न विचारले जात आहेत. एका धर्मातल्या लोकांनी दुसर्या धर्मातली नावे ठेऊ नयेत असे काय शेक्सपियरने पुराणात म्हणून ठेवले आहे की काय! प्रसिद्ध व्यक्तींमध्ये अकबरपुत्र जहांगीर आहे तसेच जहांगीर टाटादेखिल आहेतच की. हे विरोध करणारे लोक कुणी श्लेष्मा नाव ठेवले तर म्हणतील की वा, काय छान आपल्या संस्कृतीला धरून नाव ठेवले आहे!
ता. क. >> चिन्मयने शिवाजी महाराजांची भूमिका यापुढे न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो तसाही मला फार काही आवडत नव्हता त्या भूमिकेत. पण आता ते विरोधी लोक म्हणत आहेत की ह्याला मुद्दाच कळला नाय! मुलाचे नाव बदलायचे सोडून भूमिका करणेच सोडले.
आपल्या मुलाचे / मुलीचे नाव
आपल्या मुलाचे / मुलीचे नाव काय असायला हवे हे ठरविण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य पालकांना आहे. तो चर्चेचा किंवा थट्टेचा विषय नाही.
होमी जहांगीर भाभा हे देशाच्या अणूऊर्जा कार्यक्रमाचे जनक तसेच अग्रगण्य संशोधन संस्था TIFR चे पहिले प्रमूख / संचालक - यांच्या नावात जहांगीर आहे.
अशा मूर्खांची संख्या वाढत
अशा मूर्खांची संख्या वाढत जाईल.. ४०० पार झाले की पुराणातीलच नावे ठेवाची असाही फतवा निघेल!
चि मां चं ट्रोलिंग झालेलं
चि मां चं ट्रोलिंग झालेलं अजिबात आवडलं नाही.जहांगीर टाटांच्या नावावर हे नाव ठेवलं हे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलंय.आणि त्यावरून ठेवलं नसलं तरी त्यांना त्यांच्या अपत्याचं नाव वाटेल ते ठेवण्याचा हक्क आहे.दाभोलकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवलेय.
चि मां चं ट्रोलिंग झालेलं
चि मां चं ट्रोलिंग झालेलं अजिबात आवडलं नाही.जहांगीर टाटांच्या नावावर हे नाव ठेवलं हे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलंय.
+100
त्यांना त्यांच्या अपत्याचं
त्यांना त्यांच्या अपत्याचं नाव वाटेल ते ठेवण्याचा हक्क आहे >> +१
जचिमां ऐकायला (मला) फारसे खास
जचिमां ऐकायला (मला) फारसे खास वाटत नसले तरी तो त्याचा व पत्नीचा निर्णय व हक्क आहे. खरं तर हे नाव का ठेवले हे त्याने एक्स्प्लेनही करायची गरज नव्हती. तरीही एकदा सांगितल्यावर ट्रोल्सची लायकी समजून त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे. फार असभ्य कमेंटस् असतील (आणि यामागे अजून वेळ, पैसा, मनःशांती घालवायची इच्छा असेल तर) सायबर सेलकडे तक्रार करायची.
भविष्यात शिवरायांची भुमिका न करण्याची भुमिका पटली नाही. (मला राजा शिवछत्रपतीमधला अमोल कोल्हे व तान्हाजीतला शरद केळकर त्या भुमिकेत जास्त आवडतो. शंतनु मोघे पाहिला नाही.) उलट ठणकावून शिवरायांची भुमिका करायची. एक टॅलेंटेड कलाकार म्हणून तो त्याचा हक्क आहे. असल्या फालतू ट्रोलिंगमुळे अजिबात माघार घेऊ नये.
ट्रोलिंग हा वेगळा विषय आहे.
ट्रोलिंग हा वेगळा विषय आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध. कुणी कुणाचे काय नाव ठेवावे हे सैफ करीनाच्या मुलाच्या वेळी भरपूर चर्वितचर्वण करून झाले आहे. त्याचा परिणाम काही लोकांवर होत नाही. त्यांची साथ त्या वेळी सोडणे गरजेचे असते.
एखादी भूमिका करणार नाही असे जाहीर करणे हा वेगळा विषय आहे.
लांजेकरांनी आदरणीय भागवतजींचा आशिर्वाद घेऊन शिवअष्टकाची घोषणा केली होती. या चित्रपटांसाठी हीच ट्रोल्स मंडळी राबली होती.
अमक्या खानचा चित्रपट बघण्यापेक्षा हा चित्रपट पहा.
त्यांच्या तावडीतून कुणीही सुटले नाहीत. लांजेकरांनी जी टीम निवडली आहे ती जवळपास कायम आहे. ट्रोलिंग शी आमचा संबंध नाही अशी भूमिका ते घेऊ शकतात. आम्ही फक्त कला म्हणून लांजेकरांसोबत आहोत असेही म्हणू शकतात. तरीही लांजेकरांनी आपल्या ट्रोलिंग टीमशी, त्यांची विचारसरणी असलेल्या संघटनेशी संबंधित कलाकार मंडळी निवडली असेल तर त्यांच्या मनाच्या मोठेपणा बद्दल महाराष्ट्र भूषण दिले पाहिजे.
त्या वेळी चि मां ना ट्रोलिंग खटकले नाही. कारण ते फक्त कलाकार आणि सहनिर्माते होते.
आता स्वतःवर उलटल्यावर ते खटकले याचे नवल नाही वाटत.
असंगाशी संग करू नये असे म्हणतात. हा भस्मासूर स्वतःवर उलटल्यावर तात्विक सात्विक संताप व्यक्त केला तर वरातीमागून घोडं असा प्रकार वाटेल.
ट्रोलिंग बाबत संताप म्हणून अमूक भूमिका करणार नाही असे जाहीर करण्याऐवजी मी ट्रोलिंग चे सहाय्य घेणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या कलाकारांसोबत काम करणार नाही असे जाहीर करणे जास्त योग्य ठरले असते. अर्थात त्याने काय करायचे हा त्याचा प्रश्न आहे.
लांजेकरांनी आदरणीय भागवतजींचा
लांजेकरांनी आदरणीय भागवतजींचा आशिर्वाद घेऊन शिवअष्टकाची घोषणा केली होती. या चित्रपटांसाठी हीच ट्रोल्स मंडळी राबली होती.>>>
याची कल्पना नव्हती. यातला फक्त ‘पावनखिंड’ पाहिला होता आणि एकंदर रोहित शेट्टीस्टाईल मावळ्यांच्या उड्या वगैरे बघून विरसच झाला होता. फक्त ही कहाणी पडद्यावर आली याचेच कौतुक होते.
आता हे वाचून ‘बदनामही सही, नाम तो हुआ’ अशी केस नाहीये ना याची शंका येते आहे.
<< चि मां चं ट्रोलिंग झालेलं
<< चि मां चं ट्रोलिंग झालेलं अजिबात आवडलं नाही.जहांगीर टाटांच्या नावावर हे नाव ठेवलं हे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलंय. >>
------ असे स्पष्टीकरण देण्याची पण गरज नव्हती.... कशासाठी?
अपत्याचं नाव काय ठेवलं यावरून
अपत्याचं नाव काय ठेवलं यावरून ट्रोलिंग करणं अतिशय चुकीचं आहे. +१
अपत्याचं नाव काय ठेवलं यावरून
अपत्याचं नाव काय ठेवलं यावरून ट्रोलिंग करणं अतिशय चुकीचं आहे. +१
पनवेलला डॉ. माला झाला आहेत.
पनवेलला डॉ. माला झाला आहेत.
जहांगीर नावाविषयी स्पष्टीकरण
जहांगीर नावाविषयी स्पष्टीकरण द्यायची काहीही गरज नव्हती, तसेच महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेण्याची तर त्याहूनही गरज नव्हती. उलट वर माझेमन ने म्हटल्या प्रमाणे नाकावर टिच्चून महाराजांची भूमिका करायची.
हल्ली कोणाला न कोणाला कुठल्या तरी फालतू कारणावरून ट्रोल करण्याची फॅशनच निघालीय.
त्या मुलाची काळजी वाटते.
त्या मुलाची काळजी वाटते. यांचं ट्रोलिंग सोशल मीडियावर झालं आणि त्यापुरतंच राहिलं. मुलाला प्रत्यक्ष आयुष्यात काय काय ऐकावं लागेल. तो काय तैमूर सारखा उंच जगात राहणार नाही.
तो मोठा होईपर्यंत विसरतील लोक
तो मोठा होईपर्यंत विसरतील लोक.
तो लहान असतानाच त्याला
तो लहान असतानाच त्याला वाईट अनुभव येऊ शकतात. धर्मद्वेषाचे विष शाळकरी मुलांतही उतरलंय. याला नुसत्या नावामुळेही त्याची झळ बसू शकते.
तो मोठा होईपर्यंत विसरतील लोक
तो मोठा होईपर्यंत विसरतील लोक.
नवीन Submitted by वावे on 24 April, 2024 - 15:37
मुलगा आता अकरा (११) वर्षांचा आहे
मुलगा आता अकरा (११) वर्षांचा
मुलगा आता अकरा (११) वर्षांचा आहे >> ओह! मग आत्ता का जाग आली ट्रोलर्सना? चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांची भूमिका करायला लागला म्हणून का? त्यालाही आता बरेच दिवस झाले की.
मशाल पेटायला अंमळ उशीरच झाला
मशाल पेटायला अंमळ उशीरच झाला म्हणायचा म्हणजे
ट्रोलर्स असा काही शब्द नाही.
ट्रोलर्स असा काही शब्द नाही. ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल्स असंच म्हणतात.
(कुकातकुका)
मला नेहमी असं वाटतं की आपल्या
मला नेहमी असं वाटतं की आपल्या आवडी किंवा तत्त्वं ह्याचा वापर आपल्या मुलांची नावं ठेवताना करु नये. त्या लहान जिवाला कशाला त्रास? फारच वाटत असेल, तर स्वतःचं नाव बदलावं.
मला नेहमी असं वाटतं की आपल्या
मला नेहमी असं वाटतं की आपल्या आवडी किंवा तत्त्वं ह्याचा वापर आपल्या मुलांची नावं ठेवताना करु नये. त्या लहान जिवाला कशाला त्रास? फारच वाटत असेल, तर स्वतःचं नाव बदलावं. >>>>>> हे बेश आवडलं अनया.
हं. म्हणजे बारसे वगैरे करू
हं. म्हणजे बारसे वगैरे करू नये. मुलांना समज आली की स्वतःचे स्वतःचे नाव, आडनाव ठेवून घेतील. तो पर्यंत त्यांना अमुक अमकेकरांचे अक्र१...अक्र२.. असे संबोधावे.
मानव, तसं नव्हतं म्हणायचं मला
मानव, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण चाकोरी पारच सोडून , मुलाला / मुलीला पदोपदी व्याप होणार असेल, तर अशी नावं ठेवावी का? किंवा का ठेवावी ? असं वाटतं.
उदा. सविता हे नाव पुल्लींगी आहे. पण सगळीकडे हे नाव मुलीचं असतं. मग ते कसे चुकतात, हे सिद्ध करण्यासाठी अट्टाहासाने मुलाचं ठेवायचं. नंतर तो मुलगा जन्मभर हे स्पष्टीकरण देत राहणार.
असं काहीतरी.
सविता हे नाव पुल्लींगी(सुद्धा
सविता हे नाव पुल्लींगी(सुद्धा) आहे, ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. अर्थात तसे ठेवले तरी मी कुणाला काही विचारायला गेलो नसतो म्हणा.
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च)
निलिमा सुद्धा पुल्लिंगी (च) आहे
पुल्लिंगी (च) आहे.
पुल्लिंगी (
च) आहे. >>माझ्या मेव्हण्याच्या बायकोचे (या नात्याला काय म्हणतात?मेव्हणीच्या नवऱ्याला साडू म्हणतात, ते माहीत आहे.) नाव लग्नाआधी नीलिमा होते.
Pages