मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची माबोकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख,
१९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला.
ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर एक वर्षभर दर महिन्याला नवीन प्रतीं छापल्या गेल्या. ब्रॉडवे वर कथेचे नाट्य रुपांतर सादर केले गेले. डिस्नेने एक सिनेमा बनवला. त्या आधी म्हणजे १९३० साली एक मूकपटही येऊन गेला होता.
ही पॉलीअना नावाच्या अनाथ अभागी केवळ तेरा वर्षांच्या मुलीची कर्मकहाणी आहे.
पॉलीअना एका धर्मोपदेशकाची मुलगी. तिचे वडील खेड्यातल्या एका चर्चचे प्रमुख होते. गावातल्या सधन स्त्रियांच्या मदतीवर पॉलीअनाच्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालत होता. छोट्या पॉलीअना कडे मोजकीच खेळणी होती. ते गरीब कुटुंब तिला ह्या शिवाय काय देऊ शकणार? पॉलीअनाला पाहिजे होती एक भावली.
एके दिवशी चर्चला देणगी म्हणून कुणीतरी एक पेटी पाठवली. पॉलीअनाच्या आशा पल्लवित झाल्या. आपली भावली असेल का ह्या पेटीत? तिच्या बाबांनी पेटी जेव्हा उघडली तेव्हा त्यात होत्या तुटक्या कुबड्या!
बिचाऱ्या पॉलीअनाला रडू फुटले. तिचे बाबा तिला म्हणाले, “तू जर रडायची थांबलीस तर मी तुला एक खेळ शिकवीन. भावलीचे काय घेऊन बसलीस. हा खेळ तुला कुठल्याही भावलीपेक्षा जास्त आनंद देईल. हे बघ केव्हाही निराश व्हायचे नाही. तू जर खूप प्रयत्न केलास तर निराशेतही तुला आशेची किनार सापडेल.”
हाच तो “पॉलीअनाचा आनंदी खेळ.” पॉलीअनाचा सुखी “जीवनाचा मूल मंत्र.” ह्या खेळाने संपूर्ण अमेरिकेला भारून टाकले. खेळ असा होता कि कुठल्याही निराश दुःखी प्रसंगात कुठेतरी कणभर का होईना आनंद लपलेला असतो, तो शोधून काढायचा.
“भावलीच्या ऐवजी मोडक्या कुबड्या मिळाल्या? छान! पण केव्हढी आनिन्दाची गोष्ट आहे कि मला कुबड्या वापरण्याची गरज नाहीये. माझे पाय ठीकठाक आहेत...”
ह्यावरून त्या गरीब तरुणाची कथा आठवते. एक गरीब तरुण विंडो शॉपिंग करत टाईम पास करत होता. त्याच्या चपला अगदी झिजल्या होत्या. नवीन घ्यायला झाल्या होत्या. पण खिशात तेव्हढे पैसे नव्हते. आपल्या गरिबीला दोष देत बिचारा दुकानाच्या शोकेस मध्ये मांडलेले बूट चपला बघत चालला होता. आणखी काय करणार?
चालता चालता त्याला एक पाय नसलेला माणूस दिसला.
“देवाचे केव्हढे उपकार आहेत. मला निदान पाय तरी आहेत!”
पॉलीअनाच्या आईचे आधीच निधन झाले होते. पॉलीअना तेरा वर्षांची झाली आणि तिला सुखाचा मूलमंत्र शिकवणाऱ्या तिच्या पित्याचेही निधन झाले. पॉलीअना अनाथ झाली.
पॉलीअनाची रवानगी तिच्या मावशीकडे म्हणजे पॉलीआंटीकडे झाली. ह्या मावशीचा पॉलीअनाच्या आईवर राग होता. पॉलीअनाच्या आईने आपल्या बहिणीच्या इच्छेविरुद्ध पॉलीअनाच्या बाबांशी लग्न केले होते. पॉलीआंटीचा आग्रह होता कि पॉलीअनाच्या आईने गावातील एका साधन तरूणाशी विवाह करावा. पॉलीआंटीचे स्वतःचे एक फसलेलं प्रेम प्रकरण होते. ती श्रीमंत होती पण ह्या दुःखद अनुभवांमुळे तिच्या स्वभावात कडवटपणा आला होता.
तिने पॉलीअनासाठी अडगळीच्या खोलीची साफसफाई करून तिथे तिची रवानगी केली.
पण पॉलीअना आपल्या बाबांची शिकवणूक विसरली नव्हती. तिने गावातल्या लोकांना “आनंदी खेळ” शिकवला. आपल्या खेळाने ती गावकऱ्यांचे जीवनात क्रांती घडवून आणली. तिच्या मावशीच्या स्वभावातही हळूहळू परिवर्तन होत जाते. तिच्या आणि तिच्या प्रियकराची दिलजमाई होते आणि ते लग्न करतात. कथेच्या शेवटी मात्र पॉलीअनाच्या कसोटीचा क्षण येतो. एका मोटार गाडीच्या अपघातामुळे पॉलीअनाच्या पायावर परिणाम होतो. आणि ती अपंग होते. मात्र तिने ज्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला ते गावकरी येऊन तिला धीर देतात, शेवटी तिची मावशी तिच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करते आणि पॉलीअना आपल्या अपंगत्वावर मात करून पुन्हा चालायला शिकते.
मध्यंतरात पॉलीअनाने शब्दकोशात एन्ट्री मारली.
Pollyanna
noun
Pol•ly•an•na ˌpä-lē-ˈa-nə
: a person characterized by irrepressible optimism and a tendency to find good in everything.
मला वाटते कि ह्या वाक्यात पॉलीअना च्या कथेचे सार सामावले आहे.
२०१३ साली म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांनी मनोवैज्ञानिकांना ह्या पुस्तकाचा शोध लागला. पॉलीअनाच्या खेळाचे नव्याने मुल्यांकन करण्यात आले. सकारात्मक विचारसरणीने मनोरुग्णांना फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर औषधांबरोबर हा खेळही शिकवला जाऊ लागला. शास्त्रज्ञांनी ह्या कथेला एक नवा आयाम दिला. तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. जर आपल्याला कुणी मदत केली असेल तर आपण त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवायला पाहिजे. एव्हढेच नव्हे तर ती व्यक्त करायला पाहिजे.
माझ्या मते अति आशावाद किंवा “ठेविले अनंते तैसेची रहावे” ह्या तत्त्वज्ञानाने जसा फायदा होऊ शकतो तसा तोटाही होऊ शकतो. हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्यापैकी काही लोक आहे त्या परिस्थितीत समाधानी न रहाता त्यावर मात करण्याची धडपड करत असतात. असे लोक नसते तर आपण आजही गुहेत रहात असतो.
शेवटी थोडे मनोरंजन.
एक दरिद्री तरुण देवाची सतत प्रार्थना करत असतो कि देवा मला लॉटरी लागू दे. ते एक गाणे आहे ना,
“कैसे कैसों को दिया है
ऐसे वैसों को दिया है
मुझको भी तो लिफ्ट करा दे
थोड़ी सी तो लिफ्ट करा दे”
पण त्याला एकदाही लॉटरी लागत नाही. एके दिवशी निराशेत तो देवाला अद्वातिद्वा बोलतो.
देव त्याच्या समोर प्रकट होतो आणि त्याला म्हणतो, “मित्रा, तू निदान आधी लॉटरीचे तिकीट तरी विकत घे. मग पुढचे मी बघतो.”
He वाचून मी उगाचच लॉटरी ची
He वाचून मी उगाचच लॉटरी ची तिकीटे काढली :D.
( खूप कंटाळा आलेला, तेच तेच चाललं आहे, त्यामुळे cheap thrill :D)
बक्षीस लागले, तिकीट काढायला केलेला खर्च निघाला .. बक्षीस घ्यायला रिक्षाने गेले तर तोट्यात जाणार मात्र .. लोल..
क्षणाचा विरंगुळा मात्र झाला.
अमा उत्तम गुण आहे. इट विल सी
अमा उत्तम गुण आहे. इट विल सी यु थ्रु ऑल कलॅमिटीज. बिग हग!!!
Pages