पॉलीअनाची कथा

Submitted by केशवकूल on 16 April, 2024 - 23:44

मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची माबोकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख,
१९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला.
ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर एक वर्षभर दर महिन्याला नवीन प्रतीं छापल्या गेल्या. ब्रॉडवे वर कथेचे नाट्य रुपांतर सादर केले गेले. डिस्नेने एक सिनेमा बनवला. त्या आधी म्हणजे १९३० साली एक मूकपटही येऊन गेला होता.
ही पॉलीअना नावाच्या अनाथ अभागी केवळ तेरा वर्षांच्या मुलीची कर्मकहाणी आहे.
पॉलीअना एका धर्मोपदेशकाची मुलगी. तिचे वडील खेड्यातल्या एका चर्चचे प्रमुख होते. गावातल्या सधन स्त्रियांच्या मदतीवर पॉलीअनाच्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालत होता. छोट्या पॉलीअना कडे मोजकीच खेळणी होती. ते गरीब कुटुंब तिला ह्या शिवाय काय देऊ शकणार? पॉलीअनाला पाहिजे होती एक भावली.
एके दिवशी चर्चला देणगी म्हणून कुणीतरी एक पेटी पाठवली. पॉलीअनाच्या आशा पल्लवित झाल्या. आपली भावली असेल का ह्या पेटीत? तिच्या बाबांनी पेटी जेव्हा उघडली तेव्हा त्यात होत्या तुटक्या कुबड्या!
बिचाऱ्या पॉलीअनाला रडू फुटले. तिचे बाबा तिला म्हणाले, “तू जर रडायची थांबलीस तर मी तुला एक खेळ शिकवीन. भावलीचे काय घेऊन बसलीस. हा खेळ तुला कुठल्याही भावलीपेक्षा जास्त आनंद देईल. हे बघ केव्हाही निराश व्हायचे नाही. तू जर खूप प्रयत्न केलास तर निराशेतही तुला आशेची किनार सापडेल.”
हाच तो “पॉलीअनाचा आनंदी खेळ.” पॉलीअनाचा सुखी “जीवनाचा मूल मंत्र.” ह्या खेळाने संपूर्ण अमेरिकेला भारून टाकले. खेळ असा होता कि कुठल्याही निराश दुःखी प्रसंगात कुठेतरी कणभर का होईना आनंद लपलेला असतो, तो शोधून काढायचा.
“भावलीच्या ऐवजी मोडक्या कुबड्या मिळाल्या? छान! पण केव्हढी आनिन्दाची गोष्ट आहे कि मला कुबड्या वापरण्याची गरज नाहीये. माझे पाय ठीकठाक आहेत...”
ह्यावरून त्या गरीब तरुणाची कथा आठवते. एक गरीब तरुण विंडो शॉपिंग करत टाईम पास करत होता. त्याच्या चपला अगदी झिजल्या होत्या. नवीन घ्यायला झाल्या होत्या. पण खिशात तेव्हढे पैसे नव्हते. आपल्या गरिबीला दोष देत बिचारा दुकानाच्या शोकेस मध्ये मांडलेले बूट चपला बघत चालला होता. आणखी काय करणार?
चालता चालता त्याला एक पाय नसलेला माणूस दिसला.
“देवाचे केव्हढे उपकार आहेत. मला निदान पाय तरी आहेत!”
पॉलीअनाच्या आईचे आधीच निधन झाले होते. पॉलीअना तेरा वर्षांची झाली आणि तिला सुखाचा मूलमंत्र शिकवणाऱ्या तिच्या पित्याचेही निधन झाले. पॉलीअना अनाथ झाली.
पॉलीअनाची रवानगी तिच्या मावशीकडे म्हणजे पॉलीआंटीकडे झाली. ह्या मावशीचा पॉलीअनाच्या आईवर राग होता. पॉलीअनाच्या आईने आपल्या बहिणीच्या इच्छेविरुद्ध पॉलीअनाच्या बाबांशी लग्न केले होते. पॉलीआंटीचा आग्रह होता कि पॉलीअनाच्या आईने गावातील एका साधन तरूणाशी विवाह करावा. पॉलीआंटीचे स्वतःचे एक फसलेलं प्रेम प्रकरण होते. ती श्रीमंत होती पण ह्या दुःखद अनुभवांमुळे तिच्या स्वभावात कडवटपणा आला होता.
तिने पॉलीअनासाठी अडगळीच्या खोलीची साफसफाई करून तिथे तिची रवानगी केली.
पण पॉलीअना आपल्या बाबांची शिकवणूक विसरली नव्हती. तिने गावातल्या लोकांना “आनंदी खेळ” शिकवला. आपल्या खेळाने ती गावकऱ्यांचे जीवनात क्रांती घडवून आणली. तिच्या मावशीच्या स्वभावातही हळूहळू परिवर्तन होत जाते. तिच्या आणि तिच्या प्रियकराची दिलजमाई होते आणि ते लग्न करतात. कथेच्या शेवटी मात्र पॉलीअनाच्या कसोटीचा क्षण येतो. एका मोटार गाडीच्या अपघातामुळे पॉलीअनाच्या पायावर परिणाम होतो. आणि ती अपंग होते. मात्र तिने ज्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला ते गावकरी येऊन तिला धीर देतात, शेवटी तिची मावशी तिच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करते आणि पॉलीअना आपल्या अपंगत्वावर मात करून पुन्हा चालायला शिकते.

मध्यंतरात पॉलीअनाने शब्दकोशात एन्ट्री मारली.
Pollyanna
noun
Pol•ly•an•na ˌpä-lē-ˈa-nə
: a person characterized by irrepressible optimism and a tendency to find good in everything.
मला वाटते कि ह्या वाक्यात पॉलीअना च्या कथेचे सार सामावले आहे.
२०१३ साली म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांनी मनोवैज्ञानिकांना ह्या पुस्तकाचा शोध लागला. पॉलीअनाच्या खेळाचे नव्याने मुल्यांकन करण्यात आले. सकारात्मक विचारसरणीने मनोरुग्णांना फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर औषधांबरोबर हा खेळही शिकवला जाऊ लागला. शास्त्रज्ञांनी ह्या कथेला एक नवा आयाम दिला. तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. जर आपल्याला कुणी मदत केली असेल तर आपण त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवायला पाहिजे. एव्हढेच नव्हे तर ती व्यक्त करायला पाहिजे.
माझ्या मते अति आशावाद किंवा “ठेविले अनंते तैसेची रहावे” ह्या तत्त्वज्ञानाने जसा फायदा होऊ शकतो तसा तोटाही होऊ शकतो. हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्यापैकी काही लोक आहे त्या परिस्थितीत समाधानी न रहाता त्यावर मात करण्याची धडपड करत असतात. असे लोक नसते तर आपण आजही गुहेत रहात असतो.
शेवटी थोडे मनोरंजन.
एक दरिद्री तरुण देवाची सतत प्रार्थना करत असतो कि देवा मला लॉटरी लागू दे. ते एक गाणे आहे ना,
“कैसे कैसों को दिया है
ऐसे वैसों को दिया है
मुझको भी तो लिफ्ट करा दे
थोड़ी सी तो लिफ्ट करा दे”
पण त्याला एकदाही लॉटरी लागत नाही. एके दिवशी निराशेत तो देवाला अद्वातिद्वा बोलतो.
देव त्याच्या समोर प्रकट होतो आणि त्याला म्हणतो, “मित्रा, तू निदान आधी लॉटरीचे तिकीट तरी विकत घे. मग पुढचे मी बघतो.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, मस्त. कथा आवडली व शेवटचा विनोद सुद्धा. Lol
दोन्ही बाजूंशी सहमत. माझ्या मते दोन्ही बाजू एकत्रित राहू शकतात. म्हणजे प्राप्त परिस्थिती वर मात करण्याची सर्व धडपड करणे; व ती धडपड करत असताना आणि दुर्दैवाने अपयश आल्यास पॉलीअना सारखा विचार करून आनंदी राहणे. म्हणजे बाहुली मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करतच राहणे, व नाही मिळाली तरी आनंदी राहणे. "कर्मण्ये वाधिकारस्ते..." चा अर्थ थोडाफार असाच नाही काय?

खूप सकारात्मक....
प्रत्येकजण दु:खातून बाहेर येण्याचा सतत प्रयत्न करत असतो. कधी जमतं , कधी नाही जमतं. जेव्हा जमत नाही तेव्हा आपण काय हरवलं यापेक्षा आपल्याकडं काय आहे आणि त्यानं आयुष्य सुंदर होऊ शकतं असा आत्मविश्वास येणे गरजेचे असते. काही लोकात तो येतो काही लोकांना कोण तरी सद्गुरू भेटावा लागतो.
मला वाटतं शाश्वत काही नाही... प्रत्येक गोष्ट अनित्य आहे हा बोध फक्त शाश्वत आहे.

दत्तात्रय साळुंके
टोकाचे आशावादी असणेही काही चांगला गुण नाही.
वर माबो वाचक ह्यांनी लिहिलंय तस संतूलीत दृष्टीकोन असावा. सगळ्यांनाच सहज साध्य असेल अस नाही.

दसा
वाचला आणि समजला. पॉलीअनाची आठवण केव्हा येते जेव्हा सगळ टॉप्सी टर्वी होते तेव्हा. पण काही जण असे असतात की त्यांच्या कडे सर्व काही असते तरी ते अस्वस्थ असतात म्हणून तर W3 कडून W11 कडे प्रवास होतो. एक काळ असा होता की शेजारच्या पेठेत टेलेफोन लागत नव्हता. पण आता तुम्ही त्रिखंडात बोलू/बघू शकता. इंटरनेटवाले आता चंद्र मंगल आदी ग्रहांवर नेट वाढवायचा विचार करत आहेत.
देवा शप्पत, त्यांनी पॉलीअनाची गोष्ट वाचली नसणार.

बन्या
नाही लिहील का . सॉरी. बर मग आता सांगतो. खेळ असा आहे कि कितीही संकटे कोसळली तरी त्याला कुठेना कुठे सिल्वर लायनिंग असते. ती शोधून काढायची. आता अस नका म्हणू कि हा कसला खेळ आहे. पण अमेरिका मात्र ह्यावर भाळली.
सोनाली ०४
हो. पण आपल्या इकडे thank you आणि sorry म्हणायचा पण जिभेला सराव नाही.

छानच लिहिलंय !! आवडलं
ही पॉसिटीव्हिटी येण्यासाठी (पॉसिटीव्हिटीची दलदल ..? हाहा !!) दररोज न चुकता आम्ही gratitude जर्नल लिहितो.
म्हणजे कारणासह एखाद्या घटनेला , व्यक्तीला , अगदी निर्जीव वस्तूला thank you म्हणायचे. आभार मानायचे. रोज दिवसभरातील किंवा भूतकाळातील (अगदी भविष्यात काही घडायला हवे असेल तेही तसे घडले आहे असे कल्पून त्याचे आधीच आभार मानायचे )अशा किमान १० गोष्टींसाठी आभार मानायचे.
याने आपण पूर्ण बदलून जातो. आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो व कठीण प्रसंग आला तरी अजिबात डगमग होत नाही. आपण लवकर परिस्थिती accept करून त्यातून मार्ग पटकन काढू शकतो, घडलेल्या वाईट किंवा नकोशा गोष्टी उगाळल्या न जाता त्यातले चांगले दिसते फक्त Happy अजून खूप काही ..
सॉरी विषयांतर होईल म्हणून थांबते.

दररोज न चुकता आम्ही gratitude जर्नल लिहितो.>> साष्टांग नमस्कार करणारी बाहुली.

याने आपण पूर्ण बदलून जातो. आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो व कठीण प्रसंग आला तरी अजिबात डगमग होत नाही. आपण लवकर परिस्थिती accept करून त्यातून मार्ग पटकन काढू शकतो, घडलेल्या वाईट किंवा नकोशा गोष्टी उगाळल्या न जाता त्यातले चांगले दिसते फक्त Happy अजून खूप काही ..
सॉरी विषयांतर होईल म्हणून थांबते..>> थांबू नका. हे विषयांतर नाहीये. हाच कथेचा गाभा आहे.

साष्टांग नमस्कार करणारी बाहुली.>> इतके काही नाही अहो !! तुम्ही try करून बघा. रोज २१ days सलग लिहिले की अपॉप सवय लागेल. शक्यतो (असे म्हणे की ) पेनाने वहीवर लिहावी म्हणजे ती ३ दा रिपीट केली जाते आपल्याकडून. लिहिल्यावर एकदा डोळ्यांना दिसते व आपसूक वाचले जाते, हाताने लिहिताना वाचले जाते व लिहिण्या आधी मनात येते तेव्हा..!!! आणि एक(किंवा २) महिन्यानंतर जेव्हा आपण पहिला दिवस पुन्हा वाचू, तेव्हा खूप छान feeling येतं. लोकांच्या कैक वह्या भरल्यात अशा. पण मी बाबा mobile वर लिहिते आणि gmail च्या draft मध्ये save करते. वही पेन कोण नाचवणार सतत सोबत? Wink

पॉलिआना हे पात्र मी पहील्यांदा लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मध्ये वाचले. अ सॅजिटेरिअन गर्ल इज अ रेग्युलर पॉलिआना - अशा अर्थाचे काहीसे वाक्य होते.
पण ही कथा माहीत नव्हती. ओळख आवडली.
कृतज्ञतेबद्दल अगदी पटते. तुम्ही कृतज्ञ नसाल तर नशीबाने तुम्हाला काहीही का द्यावे? कृतज्ञतेमुळे एक रोझी पर्स्पेक्टिव्ह एक वास्तववादी दृष्टीकोन येतो खरा. कारण माणूस हा स्वभावतः छिद्रान्वेषी असतो. पण सतत चांगुलपणा, उत्तम ते पहाण्याचा सराव केल्याने त्या छिद्रान्वेषी वृत्तीला जरा आळा बसतो.

केशवकूल - खूप उद्भोदक माहिती आणि ह्या लेखावरच्या सगळ्या सार्थ प्रतिक्रिया निश्चितच दिशादर्शनाचे काम करतात...!
gratitude जर्नल, कृतज्ञता, अनित्य बोध, सिल्वर लायनिंग, equanimity.... ह्या साऱ्या पाऊलवाटा माझ्या मते शाश्वत आनंदाकडेच घेऊन जाणाऱ्या आहेत...

>>>साऱ्या पाऊलवाटा माझ्या मते शाश्वत आनंदाकडेच घेऊन जाणाऱ्या आहेत...>>>
मला अनित्यबोधातून माणूस सम्यक संबुध्द होतो. जो सुखात हुरळून जात नाही आणि दु:खात कढ काढत बसत नाही. ज्याला कुठली इच्छा, मान, अपमान, आशा, आकांशा वगैरे असे काहीच नसते ती उन्मनी अवस्था. मानवी भावभावना सुखदुःखांना जन्म देतात. जीवनाकडं तटस्थपणे पाहता आले पाहिजे.

दसा
तुमचा प्रतिसाद वाचून मला श्री रामकृष्ण परमहंस यांची आठवण झाली. माझ्या मते संत तुकाराम महाराज (सदेह स्वर्गावरोहण) , माउली, रामदासस्वामी, मीराबाई, गणिती रामानुजम, व्हॅन गो आणि तत्सम हे सर्वजण चवथ्या मितीतून चुकून इकडे आले आणि चवथ्या मितीत विलीन झाले.

सामो , दसा >> १००% सहमत
ह्या साऱ्या पाऊलवाटा माझ्या मते शाश्वत आनंदाकडेच घेऊन जाणाऱ्या आहेत>> सत्यवचन!!!
map of consciousness जर पाहिला तर त्यात आनंद, प्रेम, शांती, oneness हे सगळे वरच्या लेवल ला आहेत. याउलट राग द्वेष चिडचिड दोष देणे सूड घेण्याची भावना, मत्सर हे सगळे खाली आहेत व त्याचा इमोशनल लेव्हलला, जीवनमूल्ये, जगण्याची गुणवत्ता इत्यादी वर खूप फरक जाणवतो.
एक आठवडा असे वागून बघितले की खूप छान वाटते. like असे ठरवायचे की पुढच्या २४ / ४८ तास मी कोणत्याही complaint , क्रिटिसिसम , भूतकाळाबद्दल रडरड याशिवाय घालवणार! कठीण आहे पण अशक्य नाही. चिडचिड झाली तरी लगेच भानावर आणायचे स्वतःला व शांत करायचे. समोरची व्यक्ती व आपण वेगळे नाही हा oneness feel करायचा!! हे म्हणेज too much आहे असे वाटते नंतर त्याची सवय होते. आपले अनाहत चक्र खूप open होत जाते/ व्हायला मदत होते.
अंजलीदेवी की जय हो !!!

बै बै ..! कुठे नेऊन ठेवली माझी पोलिअन ???

रेव्यु
लिंक बद्दल धन्यवाद. आता बघेन.
तसेच सामो ,पॅडी ,SharmilaR तुमचे प्रतिसाद "पोचले."
anjali_kool.
ही किरीस्ताव लोकांची प्रेयर
O Lord, my Heavenly Father, give me this my daily bread...
आम्ही म्हणतो. अन्नदाता सुखी भव.
हे एव्हढे म्हटले तरी खूप आहे.

>>>>>>>>समोरची व्यक्ती व आपण वेगळे नाही हा oneness feel करायचा!!
बरेचदा मला वाटतं की समांतर विश्व ही कल्पना वेगळ्या रीतीने उलगडते. समोरची व्यक्ती हा आपलाही एक पर्याय होता व असतो. पण आपण 'आत्ताचे आपण' पर्याय निवडतो. तेव्हा भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपण होउ शकलो असतो.

समोरची व्यक्ती हा आपलाही एक पर्याय होता व असतो. पण आपण 'आत्ताचे आपण' पर्याय निवडतो. तेव्हा भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपण होउ शकलो असतो.>> होच .. !!!!! हेच तर आहे मॅट्रिक्स .. !आपल्याला व्यवस्थित फसवून (हाहा Wink )आधीचे सगळे पुसून फक्त नवीन अंगरखा देतात .. बघ बॉ तू असे असे कर्म केलेस छान केले तरी व घाण केले तरी असे असे केलेस आता त्याची परतफेड अमुक ढमुक करण्यासाठी तुला हा हा जन्म घ्यायला हवा ..कि पुन्हा ४डी मधून आपण ३डी मधे .. चालूच पुन्हा पालथे पडा, रांगा, चाला, शाळेत जा, अभ्यास करा, कोणीतरी व्हा, लग्न करा (वा नका करू ) म्हातारे व्हा नि मरा हा हा Lol

ए ss आता खरंच बास केकु मारतील ...

मी ज्या विषयापासून पळायचा प्रयत्न करत आहे तिकडे खेचला जात आहे.
आता एकाच वाक्य लिहितो.
Cogito, ergo sum. "I think, therefore I am", ---- René Descartes
I think, therefore you (people) are----Keku.
हसू नका प्लीज. हे जग आपल्या मनाचे खेळ आहेत.

हसू का येईल ?

तुम्ही/आम्ही/आपण कशापासूनही पळालो व कितीही विषय टाळला तरी हेच अंतिम सत्य आहे
जे तुम्ही वर लिहिलंय .. अहं ब्रम्हास्मि !!
we are the creator

Hi I am a saggitarian and overly optimistic. To the extent it irritates others. Totally relatable with polyanna. Mostly people who don't get any emotional support in their childhood build such happy optimistic environment around them just to survive.

अम
वर सामोने लिहिले आहेच कि
अ सॅजिटेरिअन गर्ल इज अ रेग्युलर पॉलिआना
पण हा काही सद्गुण नाहीये.

खूप छान आणि सकारात्मक लेख आहे केशवकूल
फार आवडला.

वाचला तेव्हा प्रतिसाद काय द्यावा पटकन सुचले नव्हते. सविस्तर लिहावे म्हणून थांबलो होतो.. पण आताही सुचत नाहीये म्हणा.. पण इथले प्रतिसाद सुद्धा छान येत आहेत..

वाईटात नेहमी चांगले शोधा..
वाईट लोकांशी देखील नेहमी चांगले वागा
संकटात विनोदबुद्धी सोडू नका
..
हे काही फंडे मी सुद्धा आयुष्यात जमेल तितके पाळायचा प्रयत्न करतो..
जमेल तितके यासाठी कारण हे प्रत्येकासाठी सोपे नसते.
पण सवयीने जमू लागते.. एकदा याचे फायदे कळू लागले की आयुष्य जगायला मजा येते Happy

अमा
Hi read my full post>> नाही कळले.

Pages