(सूचना: विषय गर्हणीय आणि भाषा गलिच्छ आहे याची नोंद घ्यावी)
आज साला कंट्रोल हवा होता. साली झोपायला नाय म्हणाली. पण साली ती डोक्यातच गेली. एवढं खूष ठेवलं तिला. पण साली रंडीच ती! नागवं होताना काय वाटलं नाय तिला इतके दिवस अन सालं आज झोपवायचा मूड होता तं बिथरली. भेंxx आपलं पण टाळकं सटकलं. दीडदमडीची साली, मला नाय म्हणते. सालीला फ्लॅटमधून बाहेरच पडू द्यायला नको होतं, भेंxx
ह्या पोरी साल्या अशाच. ती आधीच्या कंपनीतली पोरगी गुमान झोपली, पण मग सालीनं हरासमेंटची कंप्लेंट केली. आगोदरच पेपर टाकले होते म्हणून वाचलो. मग साली लांब नोकरी धरली, वीस किलोमीटरवर. इथे लागलो तर टेसात टेस्ट लीड म्हणून. साल्या नव्या कोऱ्या पोरी आपल्याखाली - हा हा हा - हाताखाली काम करायला. मुद्दामून गावाकडून आलेल्या पोरी घ्यायच्या. रात्रीच्या शिफ्टला घ्यायच्या. नाय तर रात्री जास्त काम करायला म्हणून बसवून घ्यायच्या. आपली स्टायल तर अशी की, पोरी तं पार खल्लास होणार.
ही तर साली आपल्या रस्त्याला राहणारी. गावची होती पण साला काय माल होता. साल्या एकदोन वर्षं पुण्यात राहिल्या की कसल्या मॉड होतात. रंडी साली वीकेंडला गांड मटकवत आणि बॉल मिरवत हिंडायची मॉलमध्ये. हिकडे साली बायको आपल्याला कंटाळून माहेरी गेली. साले रात्रीचे वांदे झाले. कुणी तरी पटवावी लागणार होती. ही तर आमच्या कॅबमधे असायची. रातीला तिला फोन यायचे पोरांचे. पण ही लय बाराची होती. त्यांना दाद द्यायची नाही. मग म्हटलं हिला वाजवायचं. तं लय मजा व्हील. मग आसंच आंजारलं गोंजारलं. बोलायला झॅक होती. पण घास खात नवती साली. मंग संधी मिळाली. एकदा तिच्या गल्लीच्या रस्त्याचं काम चालू झालं. साली कॅब आत जायची सोय रायली नाय. मग रातीला एक वाजता तिचं आणि ड्रायव्हरचं भांडण झालं. ती म्हणते बिल्डींगच्या खालपर्यंत सोड. तो म्हण्ला मी काय करू, तिथवर रस्ताच नाय गाडीला याला. मग मी म्हटलं मी येतो सोडायला. जाताना खोदलेल्या खड्डयात घसरली नं साली. खरं खरं का खोटं? माहित नाही. पण साला मला चान्स मिळाला. उचलायच्या, हात द्याच्या नावानं हितंतितं हात लावून घेतला सालीला! पयल्यांदा लांब झाली. पण ती काय रायतीय काय दूर?
साला मग टीममधे तिला कडक काम दिलं. एकदा आला मग डेव्ह मॅनेजर तिच्या नावानं बोंबलत. तिला वाटलं गेली नोकरी. आली रडत आपल्याकडे. आपल्याला माहितीच होतं येनार ते! माझ्या मदतीशिवाय तिला त्या इश्यूमधून सुटताच आलं नाय, खेळच होता तो आपला. मग आल्लाद सोडवली तिला इश्यूतंनं. मग आपला मॅनेजर आला. सगळ्या टीमसमोर त्यानं आपल्या कामाचं आणि हिला केलेल्या मदतीचं कौतुक केलं ना भौ. साल्या भोप्या मॅनेजरला काय शाट कळत नाय. आता जातेय कुठे ही? मग तिला सांगितलं. आपली दोस्ती आहे ती चालू ठेवायाची, काय? तिचा कामात फायदा, अन् माझा कामातबी फायदा, हा, हा... मग तिनंच गूळ लावला - आपली जोडी झॅक जमते. आपण खूषच! लोकांना वाटलं बेस्ट कलीग्ज...
मग रोज रातीला जाताना ती अन् मी. रातच्या एक दीडला रस्त्याला कोन कुत्रं नाय. मग घ्या चोळून, है साला! तिला सोडायला गेलो तर साला दीड फुटी डायवर म्हणतो इतका टायम का लागतो? त्याच्या कानाखाली आवाज काढला. विचारलं त्याला, गावात राह्यचंय नं? साला मामा सरपंच आपला. गप झाला एकदम. तेव्हापासून आपलं सालं कॅबमधे पण चालायचं. मस्त हिडीओ दाखवायचे तिला आणि गरम करायचं. मग काय, गल्लीत जाताना...
हे चारसहा वर्षं नोकरी करायची का आपण पण साला इलेक्शन लढणार. ही साली बायको सोडून गेलीय, तिला भेंxx घरी आणाव लागेल. तवर अशाच पोरी दाबून घ्यायच्या साल्या. ही तं इतकी लागीर झाली की सालं मी गेला महिना मी इंग्लंडला कामावर होतो...
साला आपला भोप्या मॅनेजर तर एकदम खूष आपल्यावर. साल्याला असं काम करून देलंय ना. त्याला पैल्याना वाटले साऱ्या पोरीच आपल्या टीममधे, मंग काम कसचं होणार. पण सालं एका एका पोरीकडून असं काम करून घेतलं नं भौ. आपल्याला कळतं नं भौ काय बोललं अन काय केलं की पोरी कामं करतात! आपला श्टायलंच तसला आहे. आणि त्याला वाटतं कसला रिस्पॉन्सिबल लीडर आहे! आपल्याला रायझिंग स्टार ॲवार्ड दिलं. मग मी त्या भोप्याला घोळात घेतला आन हिला पण प्रॉमिसिंग न्यू-कमर ॲवार्ड दिलवला. मग तं काय ही साली फिदाच झाली आपल्यावर...
मग भोप्यानं व्हिसा केला आपला आणि कस्टमर साईटला नव्या प्रोजेक्टच्या केटीला पाठवला. कस्टमरला पण खूष करून सोडला न भौ! आपला साला स्टायलच असाय... कामाला मागं नाय, आन् डोक्यानं आपल्या जवळबी कोणी नाय, आन सगळ्या पोरी आपल्याला जवळ! हा हा.. वाटलं आपली तर साली जिंदगी बन गयी.
पण ते एक आहे सालं. ही नोकरी सोडायच्या आत मॅनेजर तं व्हायचंय आपल्याला. मामा म्हणतो तसं करायचं. मामाचं पहिल्यापासनं ठरलेलंय. आपल्या घराण्यात इंजिनिअर नाय कोणी, गड्या तूच व्हायाचं. पैल्यानं कॉन्वेंट शाळा, मग इंजिअरिंग. तो तर म्हणत होता मास्टर्स ला बाहेर जा. पण आपलं सालं पोरीबरोबर लफडं झालं, गर्भार झाली अन तिच्याशी लग्नच करावं लागलं. साला बायकोमुळं चान्स गेला. म्हणून तर नोकरीला लावलाय मामानं. दहा वर्षं ही अशी नोकरी करायची. मामा मग काढून देल आपल्यासाठी नवी आयटी कंपनी. बस, साली कंपनी, पैसा अन् इलेक्शन. समोरच्या पार्टीची वाजवून ठेवू. पण साला आता आजच्या राड्यानंतर...
तर हिला सालीला यूकेहून रोज रातीला व्हिडिओ कॉल. तिथं सा वाजता रूमवर. मंग काय, ही आली की सुरू आमची रासलीला.. व्हिडिओच डायरेक हा हा.. काय काय करून घेतलं हिच्याकडून! साली आपली तर ट्रीप कारणी लागली. सालीनं हरासमेंट टाकूच दे मग दाखवतो व्हिडिओ भेंxx! काय टापै तिची? सालीचं जिणं काय, आख्खं घराणं बरबाद होईल.
पण साला आजचा चान्स गेला. साला बायकोपोराचा फोटो तिथून उचलायचा राह्यला. कपडे काढले नं बेडरूममधे आणला तर सालीला दिसला. काय फरक पडतो रंडीला बायको है का नाय? पण केवढं नाटक, केवढं ओरडणं. फसवलं म्हणे! हिला कसलं फसवायचंय. साल्या अशा कैक नादावल्या आन अंगाखाली घेतल्या. पण आज साला केएलपीडी भेंxx. साला माझा टाळका सटकला. हात पडला तर रक्तच निघालं सालीचं . भेंxx बिल्डींगमधे बोंबाबोंब झाली साली. साले बिल्डींगवाले पण... पोलिसाचं खेंगटं आलं सालं. मामाला बोलवावं लागलं. ते बघेल तो. पण साली इज्जत गेली. साली नोकरी पण जाईल आता. भेंxx रंडी.
---
तिचे आई-वडील, भाऊ बाहेर बसले होते. भाऊ तर तोडफोड करायच्या तावात होता.
आत आमची पॉशची कन्सल्टंट थयथयाट करत होती (POSH – Prevention of Sexual Harassment). लेबर कन्सल्टंट पेटला होता. ही एवढी घटना घडते आणि आम्हाला त्याचा गंधही लागला नाही?
आम्ही सांगतोय की, जर कुणी तक्रारच केली नाही तर कळणार काय अन् कसं?
त्यांच्या मॅनेजरची तर बोबडीच वळाली होती. दोघांनाही त्यानं प्रमोशन रेकमेंड केलं होतं! कर्मं त्याचं!
तिच्या सहकर्मचाऱ्यांना विचारलं, नन्ना. आज तरी सगळेच कानावर हात ठेवत होते.
फक्त एकच व्यक्ती याचा साक्षीदार होता - कॅब ड्रायव्हर. तो कॉन्ट्रॅक्टरचा. त्याचा पत्ता लागत नव्हता. मुलीनं पोलिसात तक्रार दिली तर त्याचासुद्धा शोध लागला असता.
त्याच्या अगोदरच्या कंपनीच्या एचआरला शोधून काढला. त्याला विचारलं, तर मागचं हरासमेंटचं कळलं. त्याचं लग्न झालंय, बाकी लफडी कळली.
"मग हे सगळं बॅकग्राऊंड चेकच्या वेळी का नाही कळवलं?"
"तेंव्हा कागदपत्रांत जी होती तीच माहिती कळवली होती. आज तुम्ही प्रत्यक्ष फोन केला, तेंव्हा सांगितलं की! मला माहीती आहे हा हैवान आहे..." धन्य!!
हैवानानं फोन वर सांगितलं - तुम्ही केस कराच, मी व्हिडिओ दाखवतो. एक नाही, दहा दाखवतो. तुम्ही सिद्ध करा की ही जबरदस्ती आहे. तिनंच पुढाकार घेतला होता!
हे असले व्हिडिओ बघायचे म्हटल्यावर आख्ख्या कमिटीची फाटली. ते कायदेशीरही नव्हतं.
आम्ही तिच्या आई-वडीलांना सांगितलं तुम्ही पोलिसात गेलात तर आमचा पूर्ण सपोर्ट असेल.
पुन्हा एक सेक्श्चुअल हरासमेंट या विषयावर सर्वांसाठी वर्कशॉप ठेवायचं असं ठरलं आणि मीटिंग बरखास्त झाली.
---
पोलिसात तक्रार कधीच झाली नाही.
ती सोडून गेली.
त्याला हाकलला.
पुढे त्या मुलीचं काय झालं?
माहिती नाही.
हैवानाचं?
कोणास ठाऊक. आपली थोडीच जबाबदारी आहे ती?
अतिशय गल्लीच्छ भाषा, अनावश्यक
अतिशय गल्लीच्छ भाषा, अनावश्यक स्त्रियांचा अपमान करणाऱ्या शिव्या
९९% मुलां मधले एकही तिच्या
९९% मुलां मधले एकही तिच्या मदतीला आले नाही ही आपल्या समाजाची शोकान्तिका आहे.
मदतीला धावून जाणं कधीकधी
मदतीला धावून जाणं भावनिकदृष्ट्या कितीही योग्य वाटलं तरी कधीकधी व्हिक्टईम ला आणि मदत करणाऱ्याला जास्त अडचणीत पाडू शकतं.(वाक्याचे स्पष्टीकरण हवेच असल्यास थोडा लिहायला वेळ मिळाल्यावर देईन)
(पॉश कमिटी कडे वेळेत जाणे, योग्य पुरावे, आपली खरी बाजू नीट मांडणे हे योग्य उपाय.)
सहकर्मचाऱ्यांना थोडी फार
सहकर्मचाऱ्यांना थोडी फार कल्पना असली तरी नक्की कुठवर रिलेशन आहे या गोष्टी माहित असतीलच असे नाही. शिवाय यातली एक व्यक्ती जर बॉस असेल, तर व्हिक्टीम स्वतःहून इतरांशी रिलेशन डिस्कस करेल ही शक्यता कमी होत जाते. जरी हैवान मॅरीड असला आणि जाणूनबुजून फसवले असले तरी, हैवानाच्या बायकोमुलांविषयी माहिती पडेपर्यंत व्हिक्टीमने स्पष्ट नकार आणि विरोध दर्शवला नाही. अशा वेळी सहकर्मचारी फारशी मदत नाही करू शकत.
९९% मुलां मधले एकही तिच्या
९९% मुलां मधले एकही तिच्या मदतीला आले नाही ही आपल्या समाजाची शोकान्तिका आहे>>>
समाजानं, तिर्हाईतांनी कसं मधे पडायचं?
१. आजचीच गोष्ट. चांगले मध्यमवयीन, मध्यमवर्गीय मराठी जोडपं होतं. ॲक्टिव्हावरून चाललं होतं. पण मागे बसलेली बाई 'मला उतरव, उतरव' म्हणून ओरडत होती. आणि तो पुरूष लक्ष न देता स्कूटर चालवत होता. सिग्नलला थांबलो, तर हे शेजारी थांबले. पण बाई काही उतरली नाही! तिची ओरडाआरडी चालूच होती. या वेळी आजुबाजूच्या इतर कुणी या प्रकरणाची दखल घ्यायची की नाही? मला कळत नाही.
२. मी मागे कुठल्याशा धाग्यावर प्रतिसाद देताना म्हटलं होतं, की जिथे मी रहातो त्याभागात बरेचदा तरूण, प्रौढ आणि अगदी बाल म्हणावी अशीसुद्धा, जोडपी संध्याकाळी, रात्री एकमेकांच्या अंगचटीला जाताना दिसतात. प्रश्न हा आहे की हे मियां-बिबी राजी प्रकरण आहे का जोर-जबरदस्ती? काय समजायचं आणि काय करायचं?
३. बहुतांश वेळा मुली तोंड झाकून असतात. म्हणजे अब्रूची काळजी कोणाला? कधी रडारड ऐकू येते, कधी भांडण जाणवतं. काय करायचं अशा वेळी? तिर्हाईतानं मधे पडावं की नाही?
४. अहो, जिथे एका मराठी माध्यमाच्या, सर्वसाधारणपणे कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून येणाऱ्या विद्यार्थ्याचा भरणा असलेल्या शाळेतून शाळा सुटल्यावर गणवेषात बाहेर पडणारी मुलगी लिपस्टिक लावून बाहेर पडते तेंव्हा काय म्हणायचं? अशा मुली तिथे डोंगरावर दिसतात त्यांच्या जोडीदाराबरोबर. कुणी कुणाच्या बाजूनं मधे पडायचं?
५. कधी तर एक मुलगी तोंड फिरवून उभी असते आणि दुसरीबरोबर पुरुष चिकटून असतो. ही तर चक्क सोय असणार?
आता तुम्ही मला पर्व्हर्ट म्हणा, घाणेरड्या नजरेचा हिरवट म्हातारा म्हणा, वा काहीही. पण वरील बहुतेक उदाहरणात मला भिती आहे ती या घटनांमधील स्त्री पात्रावर जबरदस्ती होण्याची. तिथे समाजानं हस्तक्षेप केलाच पाहिजे. पण हे घडणार कसं?
त्या स्त्रीला आपल्या मदतीची गरज आहे वा नाही, हे तिनं सांगितलं तरच कळणार.
मग ऑफिसमध्ये रोज आत येताना नजरेस पडेल असं भलं मोठं पोस्टर लावा - POSH विषयी. म्हणजे असं घडलं तर काय करायचं याची माहिती तर मिळेल. पण मग प्रत्येक इंटरॅक्शनला वेगळ्या अर्थानं बघितलं जाईल का? मला आठवतंय, तो पेन्स नामक अमेरिकन उपराष्ट्रपती होता. त्यानं जाहीर सांगितलं होतं की मी कुठल्याही स्त्रीला एकटं भेटत नाही! घ्या, हा झाला अतिरेक.
एक गंमत:
माझ्या कारकिर्दीत एकदा(च) एक मुलगा - पुरूष म्हणू या - तो तक्रार घेऊन आला होता की माझी टीममेट टीशर्ट-पॅंट घालून येते. मग ती वाकली की मला (च्यायला, लिहायचं तरी कसं?!) तिची चड्डी दिसते. अहो, आख्ख्या कंपनीनं ती चड्डी कधी ना कधी पाहिली होती! (सॉरी, अतिशयोक्ती) पण त्यात एक सहजभाव होता. ती मुलगी नियमांनुसार अंगभर कपडे घालून यायची, खोट काढायला जागा नव्हती. मुद्दामहून ती मुलगी असं करत असेल असं त्या टीमच्या मॅनेजरलाही कधी वाटलं नाही, ना एचआरला, ना इतर टीममेटना. आता त्या मुलाची हे दृष्य सारखंच पाहून नजर मरणं (संदर्भ: नाटक - तुझे आहे तुजपाशी!) अपेक्षित आहे ना? पण त्याला त्रास होत होता. काय करणार? मग तिला समज दिली. तर तिनं कंपनीच सोडली! आता ती जर म्हणाली असती, की या मुलाचीच माझ्यावर वाईट नजर आहे म्हणून तर? करा हरासमेंट! (खुलासा: २००४ किंवा २००५ चा हा किस्सा आहे!)
दुसरी गंमत:
समोरच्या इमारतीत रहाणारी आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मुलगी. अंधारून आल्यावर तिचा मित्र येतो (एक वा अनेक?) मग त्यांची भर रस्त्यावर, पण झाडांआड, वा पार्क केलेल्या वहानांआड चुम्माचाटी चालते. तिच्या घरासमोर! यात जबरदस्ती नसणार हे मान्य. पण अशा PDA वर्तनाला आक्षेप घ्यावा अथवा नाही?
बॉटम लाईन:
तरीही, आय विल गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू द फिमेल पार्टी, ऑलवेज.
>>तो पेन्स नामक अमेरिकन
>>तो पेन्स नामक अमेरिकन उपराष्ट्रपती होता. त्यानं जाहीर सांगितलं होतं की मी कुठल्याही स्त्रीला एकटं भेटत नाही! घ्या, हा झाला अतिरेक.>>
असेच मी David McCullough ने लिहिलेल्या Truman यांच्या चरित्रातही वाचले होते. त्यांना १-२ दा मुद्दाम स्त्री वापरुन अडकवायचा प्रयत्नही झाला होता पण ट्रुमन सावध असल्याने डाव उलटला. मला वाटते तेच प्लेबुक पेन्स वापरत असावेत. मला नाही वाटत त्यात काही अतिरेक आहे. तुम्ही काय प्रकारचे काम करता, काय गमावू शकता, रिस्क किती आणि कशी या वर असे निर्णय ठरतात.
अगदी पटलं अबुवा.स्पेशली
अगदी पटलं अबुवा.स्पेशली दुचाकीवर भांडणाऱ्या स्त्री पुरुषात तर अजिबात मध्यस्ती करू नये.
(अर्थात हा च चा किस्सा जरा जास्त झाला.लो वेस्ट जीन्स चा ट्रेंड होता तेव्हा सगळीकडे अक्षरशः ती फॅशन लादलेली असायची. साधी हाय वेस्ट जीन्स मागितली तर सेल्स पर्सन मख्खपणे 'ती फॅशन गेली, मेल जीन्स घ्या पाहिजे तर' सांगायचे.किंवा ब्रँड सोडून कोणत्यातरी साध्या दुकानात शिवलेल्या चांगल्या हाय वेस्ट जीन्स बघून घ्याव्या लागायच्या.ईश्वर कृपेने जेगिंग आणि हाय वेस्ट जीन्स ची फॅशन येऊन टिकली.)
महाराष्ट्रातले सध्याच्या
महाराष्ट्रातले सध्याच्या लॉटमधले एक राजकारणीही या बाबतीत फार पर्टिक्युलर आहेत व स्त्रियांना एकट्यात भेटत नाहीत असे ऐकले आहे.
ईश्वर कृपेने जेगिंग आणि हाय वेस्ट जीन्स ची फॅशन येऊन टिकली. >>> १०० %. लो वेस्ट जीन्स कॅरी करण्यासाठी मॉडेलची फिगर आणि टोन्ड बॉडी अत्यावश्यक होती. अदरवाईज डोळ्यांवर अत्याचार व्हायचा.
mi_anu खुलासा केला आहे की तो
mi_anu खुलासा केला आहे की तो किस्सा २००४ वा २००५ चा आहे. मुलगा गावाकडचा होता. उलट्या तक्रारीचा हा एकच प्रसंग. हे ही खरंच की हैवानही इतक्या वर्षांत एकच.
स्त्रियांना एकटं न भेटणे
स्त्रियांना एकटं न भेटणे बरोबर स्ट्रॅटेजी वाटते.
कातडीबचाऊ स्पष्टीकरणं आवडली
कातडीबचाऊ स्पष्टीकरणं आवडली
साधी हाय वेस्ट जीन्स मागितली
साधी हाय वेस्ट जीन्स मागितली तर सेल्स पर्सन मख्खपणे 'ती फॅशन गेली, >>> अगदी अगदी. पुरुषांन्ना तर जर्रही शोभत नाही लोवेस्ट जिन्स..किती अ त्याचार सहन करावे लागायचे, प्लम्बर बोलवला तरी
रिकामभोट माणूस असला की हे
रिकामभोट माणूस असला की हे असले उद्योग सुचतात. कोण कुठे फिरते, कोणासोबत फिरते, कोण कोणाला भेटते. प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते, लोकं नागडे फिरतील नाहीतर नागडे नवस फेडायला जातील आपल्याला काय. त्यांना बरं वाटतंय असू दे. ते काय लहान असाह्य पोरं आहेत. दुनिया एकापेक्षा एक एडझव्या माणसांनी भरले कोणाकोणाला शहाणं करणार तुम्ही? आपण मस्त सकाळी उठावं व्यायाम करावा, ऑफिसमध्ये जावं, फॅमिली सोबत लाईफ स्पेंड करावी,दोन चार चांगले छंद जोपासणे जे फावल्या वेळात आपल्याला आनंद देतील एव्हढा साधा सोपा आयुष्य असतो. पण नाय, दुसऱ्यांच्या दुंगणात नाक खुपसून वर्षानुवर्षे वास घ्यायची सवय लागली ती थोडीच इतक्या लवकर सुटणार?
Pages