कॉर्पोरेट हैवान

Submitted by Abuva on 6 April, 2024 - 03:32
DALL-E2 generated picture of a devil watching video

(सूचना: विषय गर्हणीय आणि भाषा गलिच्छ आहे याची नोंद घ्यावी)

आज साला कंट्रोल हवा‌ होता. साली झोपायला नाय म्हणाली. पण साली ती डोक्यातच गेली. एवढं खूष ठेवलं तिला. पण साली रंडीच ती! नागवं होताना काय वाटलं नाय तिला इतके दिवस अन सालं आज झोपवायचा मूड होता तं बिथरली. भेंxx आपलं पण टाळकं सटकलं. दीडदमडीची साली, मला नाय म्हणते. सालीला फ्लॅटमधून बाहेरच पडू द्यायला नको होतं, भेंxx

ह्या पोरी साल्या अशाच. ती आधीच्या कंपनीतली पोरगी गुमान झोपली, पण मग सालीनं हरासमेंटची कंप्लेंट केली. आगोदरच पेपर टाकले होते म्हणून वाचलो. मग साली लांब नोकरी धरली, वीस किलोमीटरवर. इथे लागलो तर टेसात टेस्ट लीड म्हणून. साल्या नव्या कोऱ्या पोरी आपल्याखाली - हा हा हा - हाताखाली काम करायला. मुद्दामून गावाकडून आलेल्या पोरी घ्यायच्या. रात्रीच्या शिफ्टला घ्यायच्या. नाय तर रात्री जास्त काम करायला म्हणून बसवून घ्यायच्या. आपली स्टायल तर अशी की, पोरी तं पार खल्लास होणार.

ही तर साली आपल्या रस्त्याला राहणारी. गावची होती पण साला काय माल होता. साल्या एकदोन वर्षं पुण्यात राहिल्या की कसल्या मॉड होतात. रंडी साली वीकेंडला गांड मटकवत आणि बॉल मिरवत हिंडायची मॉलमध्ये. हिकडे साली बायको आपल्याला कंटाळून माहेरी गेली. साले रात्रीचे वांदे झाले. कुणी तरी पटवावी लागणार होती. ही तर आमच्या कॅबमधे असायची. रातीला तिला फोन यायचे पोरांचे. पण ही लय बाराची होती. त्यांना दाद द्यायची नाही. मग म्हटलं हिला वाजवायचं. तं लय मजा व्हील. मग आसंच आंजारलं गोंजारलं. बोलायला झॅक होती. पण घास खात नवती साली. मंग संधी मिळाली. एकदा तिच्या गल्लीच्या रस्त्याचं काम चालू झालं. साली कॅब आत जायची सोय रायली नाय. मग रातीला एक वाजता तिचं आणि ड्रायव्हरचं भांडण झालं. ती म्हणते बिल्डींगच्या खालपर्यंत सोड. तो म्हण्ला मी काय करू, तिथवर रस्ताच नाय गाडीला याला. मग मी म्हटलं मी येतो सोडायला. जाताना खोदलेल्या खड्डयात घसरली नं साली. खरं खरं का खोटं? माहित नाही. पण साला‌ मला‌ चान्स मिळाला. उचलायच्या, हात द्याच्या नावानं हितंतितं हात लावून घेतला सालीला! पयल्यांदा लांब झाली. पण‌ ती‌ काय रायतीय‌ काय दूर?

साला मग टीममधे तिला कडक काम दिलं. एकदा आला मग डेव्ह मॅनेजर तिच्या नावानं बोंबलत. तिला वाटलं गेली नोकरी. आली रडत आपल्याकडे. आपल्याला माहितीच होतं येनार ते! माझ्या मदतीशिवाय तिला त्या इश्यूमधून सुटताच आलं नाय, खेळच होता तो आपला. मग आल्लाद सोडवली तिला इश्यूतंनं. मग आपला मॅनेजर आला. सगळ्या टीमसमोर त्यानं आपल्या कामाचं आणि हिला केलेल्या मदतीचं कौतुक केलं ना भौ. साल्या भोप्या मॅनेजरला काय शाट कळत नाय. आता जातेय कुठे ही? मग तिला सांगितलं. आपली दोस्ती आहे ती चालू ठेवायाची, काय? तिचा कामात फायदा, अन् माझा कामातबी फायदा, हा, हा... मग तिनंच गूळ लावला - आपली जोडी झॅक जमते. आपण खूषच! लोकांना वाटलं बेस्ट कलीग्ज...

मग रोज रातीला जाताना ती अन् मी. रातच्या एक दीडला रस्त्याला कोन कुत्रं नाय. मग घ्या चोळून, है साला! तिला सोडायला‌ गेलो तर साला‌ दीड फुटी डायवर म्हणतो इतका टायम का लागतो? त्याच्या कानाखाली आवाज काढला. विचारलं त्याला, गावात राह्यचंय नं? साला मामा सरपंच आपला. गप झाला एकदम. तेव्हापासून आपलं सालं कॅबमधे पण चालायचं. मस्त हिडीओ दाखवायचे तिला आणि गरम करायचं. मग काय, गल्लीत जाताना...

हे चारसहा वर्षं नोकरी करायची का आपण पण साला इलेक्शन लढणार. ही साली बायको सोडून गेलीय, तिला भेंxx घरी आणाव लागेल. तवर अशाच पोरी दाबून घ्यायच्या साल्या. ही तं इतकी लागीर झाली की सालं मी गेला महिना मी इंग्लंडला कामावर होतो...

साला आपला‌ भोप्या मॅनेजर तर एकदम खूष‌ आपल्यावर. साल्याला असं काम करून देलंय ना. त्याला पैल्याना वाटले साऱ्या पोरीच आपल्या टीममधे, मंग काम कसचं होणार. पण सालं एका एका पोरीकडून असं काम करून घेतलं नं भौ. आपल्याला कळतं नं भौ काय बोललं अन काय केलं की पोरी कामं करतात! आपला‌ श्टायलंच तसला आहे. आणि त्याला वाटतं कसला रिस्पॉन्सिबल लीडर आहे! आपल्याला रायझिंग स्टार ॲवार्ड दिलं. मग मी त्या भोप्याला घोळात घेतला आन हिला पण प्रॉमिसिंग न्यू-कमर ॲवार्ड दिलवला. मग तं काय ही साली फिदाच झाली आपल्यावर...

मग भोप्यानं व्हिसा केला आपला आणि कस्टमर साईटला नव्या प्रोजेक्टच्या केटीला पाठवला. कस्टमरला पण खूष करून सोडला न भौ! आपला साला स्टायलच असाय... कामाला मागं नाय, आन् डोक्यानं आपल्या जवळबी कोणी नाय, आन सगळ्या पोरी आपल्याला जवळ! हा हा.. वाटलं आपली तर साली‌ जिंदगी बन‌ गयी.

पण ते एक आहे सालं. ही‌ नोकरी सोडायच्या आत मॅनेजर तं व्हायचंय आपल्याला. मामा म्हणतो तसं करायचं. मामाचं पहिल्यापासनं ठरलेलंय. आपल्या घराण्यात इंजिनिअर नाय कोणी, गड्या तूच व्हायाचं. पैल्यानं कॉन्वेंट शाळा, मग इंजिअरिंग. तो तर म्हणत होता मास्टर्स ला बाहेर जा. पण आपलं सालं पोरीबरोबर लफडं झालं, गर्भार झाली अन तिच्याशी लग्नच करावं लागलं. साला बायकोमुळं चान्स गेला. म्हणून तर नोकरीला लावलाय मामानं. दहा वर्षं ही अशी नोकरी करायची. मामा मग काढून देल आपल्यासाठी नवी आयटी कंपनी. बस, साली कंपनी, पैसा अन् इलेक्शन. समोरच्या पार्टीची वाजवून ठेवू. पण साला आता आजच्या राड्यानंतर...

तर हिला सालीला यूकेहून रोज रातीला व्हिडिओ कॉल. तिथं सा वाजता रूमवर. मंग काय, ही आली की सुरू आमची रासलीला.. व्हिडिओच डायरेक हा हा.. काय काय करून घेतलं हिच्याकडून! साली आपली तर ट्रीप कारणी लागली. सालीनं हरासमेंट टाकूच दे मग दाखवतो व्हिडिओ भेंxx! काय टापै तिची? सालीचं जिणं काय, आख्खं घराणं बरबाद होईल.

पण साला आजचा चान्स गेला. साला बायकोपोराचा फोटो तिथून उचलायचा राह्यला. कपडे काढले नं बेडरूममधे आणला तर सालीला दिसला. काय फरक पडतो रंडीला बायको है का नाय? पण‌ केवढं नाटक, केवढं ओरडणं. फसवलं म्हणे! हिला कसलं फसवायचंय. साल्या अशा कैक नादावल्या आन अंगाखाली घेतल्या. पण आज साला केएलपीडी भेंxx. साला माझा टाळका सटकला.‌ हात पडला‌ तर रक्तच निघालं सालीचं . भेंxx बिल्डींगमधे बोंबाबोंब झाली साली. साले बिल्डींगवाले पण... पोलिसाचं खेंगटं आलं सालं. मामाला बोलवावं लागलं. ते बघेल तो. पण साली इज्जत गेली. साली नोकरी पण जाईल आता. भेंxx रंडी.

---

तिचे आई-वडील, भाऊ बाहेर बसले होते. भाऊ तर तोडफोड करायच्या तावात होता.
आत आमची पॉशची कन्सल्टंट थयथयाट करत होती (POSH – Prevention of Sexual Harassment). लेबर कन्सल्टंट पेटला होता. ही एवढी घटना घडते आणि आम्हाला त्याचा गंधही लागला नाही?
आम्ही सांगतोय की, जर कुणी तक्रारच केली नाही तर कळणार काय अन् कसं?
त्यांच्या मॅनेजरची तर बोबडीच वळाली होती. दोघांनाही त्यानं‌ प्रमोशन रेकमेंड केलं होतं! कर्मं त्याचं!

तिच्या सहकर्मचाऱ्यांना विचारलं, नन्ना. आज तरी सगळेच कानावर हात ठेवत होते.

फक्त एकच व्यक्ती याचा साक्षीदार होता - कॅब ड्रायव्हर. तो कॉन्ट्रॅक्टरचा. त्याचा पत्ता लागत नव्हता. मुलीनं पोलिसात तक्रार दिली तर त्याचासुद्धा शोध लागला असता.

त्याच्या अगोदरच्या कंपनीच्या एचआरला शोधून काढला. त्याला विचारलं, तर मागचं हरासमेंटचं कळलं. त्याचं लग्न झालंय, बाकी लफडी कळली.
"मग हे सगळं बॅकग्राऊंड चेकच्या वेळी का नाही कळवलं?"
"तेंव्हा कागदपत्रांत जी होती तीच माहिती कळवली होती. आज तुम्ही प्रत्यक्ष फोन केला, तेंव्हा सांगितलं की! मला माहीती आहे हा हैवान आहे..." धन्य!!

हैवानानं फोन वर सांगितलं - तुम्ही केस कराच, मी व्हिडिओ दाखवतो. एक नाही, दहा दाखवतो. तुम्ही सिद्ध करा की ही जबरदस्ती आहे. तिनंच पुढाकार घेतला होता!
हे असले व्हिडिओ बघायचे म्हटल्यावर आख्ख्या कमिटीची फाटली. ते कायदेशीरही नव्हतं.

आम्ही तिच्या आई-वडीलांना सांगितलं तुम्ही पोलिसात गेलात तर आमचा पूर्ण सपोर्ट असेल.

पुन्हा एक सेक्श्चुअल हरासमेंट या विषयावर सर्वांसाठी वर्कशॉप ठेवायचं असं ठरलं आणि मीटिंग बरखास्त झाली.

---

पोलिसात तक्रार कधीच झाली नाही.

ती सोडून गेली.

त्याला हाकलला.

पुढे त्या मुलीचं काय झालं?
माहिती नाही.

हैवानाचं?
कोणास ठाऊक. आपली थोडीच जबाबदारी आहे ती?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोलीकर वाचक हो,
आवर्त या कथेत मी कॉहै या कथेचा उल्लेख केला, तेंव्हा काही प्रतिक्रिया मिळाल्या.
पण एक लेखक म्हणून मला तुमची मदत पाहिजे आहे.

कॉर्पोरेट हैवान ही सत्याधारित कथा लिहिणं मला अवघड गेलं. आपल्या आजूबाजूला असे लोक (हैवान आणि पीडित) वावरत असतात हे वास्तव मन स्वीकारू धजत नाही.
ही घटना या कथेच्या शेवटी मांडली आहे त्या स्वरूपात माझ्यासमोर आली. मग माहितीची व्यक्ती आणि कळलेले प्रसंग यांची जुळवाजुळव करून त्याची कथा झाली.
यातला गर्हणीय भाग हा प्रथमपुरुषी एकवचनी लिहिणं मोठं कठीण गेलं. पीडीतेच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न तर सोडूनच दिला.
पण पुरूषाच्या नजरेतून मांडताना मात्र स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांचा फायदा(?) झाला.
कथा लिहिल्यानंतरही मी दोन महिन्यांहून अधिक काळ थांबलो होतो. तरीही टाकताना दहा वेळा विचार केला.
पण इथले नगण्य प्रतिसाद बघता मनात अनेक प्रश्न आले. एका नवीन लेखकाच्या पुढच्या प्रयत्नांना दिशा देण्याचे काम वाचक आणि त्यांचे (मिळणारे) प्रतिसाद करतात.

तुम्ही जर इथपर्यंत पोचला असाल, तर खालील (पैकी काही) प्रश्नांची उत्तरे द्याल?

1. नाव वाचूनच कथा वाचायचे टाळले?
2. कथेच्या पहिल्या परिच्छेदातच वाचन बंद केले?
3. विषयाचा तिटकारा, घृणा, चीड इ. येऊन वाचणे बंद केले?
4. कथा खोटी, ओढून ताणून आणलेली, उगाच TRP वाढवायला लिहिली आहे असं वाटलं?
5. लेखकाला विषयाचा आवाका, गांभीर्य कळलं नाही असं वाटलं?
6. प्रतिसाद काय देणार म्हणून दिला नाही?

आवर्त या कथेच्या प्रतिसादांत या कथेवर प्रतिसाध देणाऱ्या वाचकांचे आभार!

नंबर 3 निवडते.
नंबर 4 या स्वरूपात नाही वाटलं.किंवा कथा ओढून ताणून लिहिली असं नाही वाटलं.फक्त इतक्या घाऊक प्रमाणावर हा गुन्हा आयटी क्षेत्रात इतक्या सोपेपणी करता येत असेल कथेत तर कथा किमान 15 वर्षं जुन्या काळातली आहे असं वाटतं.अजूनही अनेक ठिकाणी हे प्रकार राजरोस चालतात.पण कॉर्पोरेट मध्ये मोठ्या शहरात आज हे कठीण होतं.पुरावे मिळवण्याचे खूप मार्ग असतात.'सेक्शुअल' पेक्षा बायकांची नुसती हरेसमेंट करणे कॉर्पोरेट मध्ये जास्त सोपे आहे.

<< नाव वाचूनच कथा वाचायचे टाळले? >>
नाही, कथा वाचली होती, पण एकंदरीत वापरलेली भाषा रुचली नाही. कथा polished वाटली नाही म्हणून प्रतिसाद दिला न्हवता.
कथा ओढून ताणून लिहिलेली वाटली नाही, पण अतिरंजित नक्कीच वाटली. असले प्रकार, तेसुद्धा वारंवार करणे, वाटतील तितके सोपे नसतात. हे काही होतच नाही असे म्हणणार नाही, पण ते फारच अपवादात्मक असेल मोठ्या आय. टी. कंपनीमध्ये तरी.

तळटीप: आवर्त ही कथा वाचली नाहीये, आता वाचतो.

वाचली.
माणसाच्या आत जनावर असते.
सत्यकथेवर आधारित असे लिहिले त्यामुळे तर अवाक झालो
अर्थात हे posh policy वै सर्व येउन खूप सिरीयसली implement होण्याच्या असेल असे समजतोय मी.
अर्थात त्यातही झोलझाल करणारे लोकं असावेत देखील.
छोट्या कंपनीत काय होते ते माहीत नाही.

कथा इथे आली त्याच दिवशी वाचली होती. तेव्हा सुन्न झाले. पुरुष आपसात बोलताना अशी भाषा वापरतात याचा थोडा अंदाज आहे.... पण तरीही वाचताना एकदम सर्द झाले. बाई असणे म्हणजे एक कमोडिटी, वाट्टेल तशी वापरा...
शब्दांत मांडू शकत नाही इतकी हीन भावना वाटली.

गजेंद्र अहिरे यांचा "त्या रात्री पाऊस होता" (नाव बहुतेक हेच आहे) हा सिनेमा देखील असाच अंगावर आला होता.

वाचली होती . पण काय प्रतिसाद द्यावा कळले नाही . भाषा आवडली नाही . चीड आली माणसातल्या हैवानाची !! ज्यांना हे भोगावे लागले आणि अजूनही भोगावे लागत आहे ( क्षेत्र वेगळे ) त्याविषयी वाईट वाटले.

काय प्रतिसाद द्यावा कळले नाही.
वाक्या वाक्यात साला/ली लिहिलेले खटकले.

प्रथम पुरुष सुरुवात केली मग --- च्या खालच्या भागात "त्यांच्या मॅनेजरची तर बोबडीच वळाली होती. दोघांनाही त्यानं‌ प्रमोशन रेकमेंड केलं होतं! कर्मं त्याचं!" हे कोण म्हणत आहे हा भाग विस्कळीत वाटला..

तुम्ही हे प्रश्न विचारले याचं कौतुक आहे. कथेतील भाषेविषयी सुरूवातीला एक इशारा दिला असता तर बरं झालं असतं असं वाटतं.
माझा पर्याय 6. आपल्या आजूबाजूला समांतर असे हे जग आहे याची आपल्याला जाणीव असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असे वाचले की चीड येते आणि आपण काहीही करू शकत नाही असे जाणवून हताशही वाटते.
अर्थात या हैवानाला expose न करणाऱ्या मुलींची मानसिकता काय असते असाही प्रश्न पडतो.

मला भाषा अजिबात आवडली नाही. जरी विषयाचा भडक पणा दाखवायचा होता..किंवा कहानी कि मांग वगैरे...तरीही हे थोडे संयत भाषेत लिहीता आले असते. थोडा कमी टी आर पी मिळाला असता इतकेच!
वरती एस यांनी म्हटलेय तसे..
शब्दांत मांडू शकत नाही इतकी हीन भावना वाटली.
मी पर्याय ६ निवडते.

सुन्न करणारी कथा आहे.
खरं तर IT, तरुणाई, घरापासून दूर अश्या स्थितीत असे प्रकार घडतात हे ऐकून आहे. परंतु ह्यातील प्रकार जरा अतिरंजित वाटला. आताशा सगळीकडे POSH कमिटी असते त्यामुळे असे प्रकार घडतात याचे नवल वाटते. अर्थात ही सत्यकथा आहे त्यामुळे हा प्रकार भयंकर आहे.
हैवानी पुरुषी नजरेतून कथेचा बाज मांडला गेला आहे.

कथेतील भाषेविषयी सुरूवातीला एक इशारा दिला असता तर बरं झालं असतं असं वाटतं.>>> कार्यवाही केली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद

६. इतके हताश वाटले की प्रतिसाद काय द्यावा तेच कळले नाही.
इथे अमेरीकेत व्यवस्थेमधे एम्प्लॉयीजना सुरक्षित ठेवायला पॉलीसीज वगैरे असतात तरीही आजही जेव्हा अन्यायाला वाचा फुटते तेव्हा 'हे असे इतके काळ चालू होते, आत्ता या क्षणीही कुठेतरी, कुणाच्यातरी बाबतीत घडत असेल' याची जाणीव होवून हताशपण आणि चीड दाटून येते .

>>अर्थात या हैवानाला expose न करणाऱ्या मुलींची मानसिकता काय असते असाही प्रश्न पडतो.>> स्त्रीयांची संख्या जास्त असली तरी हे फक्त स्त्रीयांपुरते मर्यादित नसते. कुणीही व्यक्ती शोषित होवू शकते.
एक छोटीशी न्यूज क्लिप.
https://www.youtube.com/watch?v=hW2zWJ7E7mM
देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रात नोकरी पण कामाच्या ठिकाणी स्वतःला मात्र सुरक्षित करता येत नाही ही परीस्थिती आजही आहे. हैवानाला एक्स्पोझ करायचे प्रयत्न केलेच जात नाहीत असे नाही तर बरेचदा ते खूप तोकडे पडतात. व्यवस्थेतले स्वतःचे स्थान आणि जोडीला लूपहोल्स हैवान व्यवस्थित वापरत असतो.

1. नाव वाचूनच कथा वाचायचे टाळले? - नाही 
2. कथेच्या पहिल्या परिच्छेदातच वाचन बंद केले? - नाही 
3. विषयाचा तिटकारा, घृणा, चीड इ. येऊन वाचणे बंद केले? - नाही 
4. कथा खोटी, ओढून ताणून आणलेली, उगाच TRP वाढवायला लिहिली आहे असं वाटलं? - IT मधला प्रोसेस थोडा खटकला, काही ठिकाणी नोटीस पिरियड मध्ये असताना देखील इमिजिएट टर्मिनेशन होते under POSH... कथेतली सिच्युएशन्स इम्पॉसिबल नसली तरी नॉट सो सिम्पल.. भाषा चपखल वाटली जे लोक अशा मानसिकतेचे असतात त्यांचे स्वगत या पेक्षा वेगळे असू शकत नाही.   
5. लेखकाला विषयाचा आवाका, गांभीर्य कळलं नाही असं वाटलं? - त्या दृष्टीने विचार केला नाही किंबहुना शेवटच्या ओळीखेरीज लेखकाचं स्वतःच असं  काहीं नाहीये कथेत( कदाचित शेवटची ओळही लेखकाची नाही तर एकूण समाजाची झापडबंद मानसिकता दाखवते. )
6. प्रतिसाद काय देणार म्हणून दिला नाही? - हे असायला हरकत नाही, कारण आयुष्याचा बराचसा भाग याच समाजाचा हिस्सा म्हणून या झापडबंद सामाजिक मानसिकतेत मी ही घालवलाय.

#३
अंगावर आली.
डोक्याला शॉट नको म्हणुन पुढे झरझर चाळली पण वाचवली नाही.

तुमच्या इतर कथांपैक्षा ही वेगळी आहे
निःशब्द आणि हताश करायला लावते ही कथा कारण ही नुस्ती कथा नाही तर हे सत्य आहे जे अजूनही बऱ्याच ठिकाणी वेग वेगळ्या स्वरुपात अस्तित्वात आहे.
असे हैवान तळागाळातून अगदी प्रतिष्ठित पदा पर्यंत पोहचले आहेत, घरकाम करणाऱ्या बाई कडे वाईट नजरेने पाहणाऱ्या पासून अमेरिकन अध्यक्ष पदा पर्यंत सांगळे सांगतात I did it because I could.
अलीकडच्या me too movement मुळे बरीच प्रकरण बाहेर आली आणि काही हैवान गजाआड झाले.
नोकरी टिकवण्या साठी बऱ्याच स्त्रिया बरच काही दुर्लक्षित करतात, सहन करतात पण त्यामुळे हे हैवान अजून बळावतात तर क्वचित काही जणी त्यांच्या महत्वाकांक्षे साठी त्या हैवनाच्या वाटेल जातात.

अशा गोष्टी मायबोली वर कमी येतात आणि प्रतिसाद मोजके असतात पण तुम्ही लिहीत रहा

मी सुद्धा वाचली होती कथा.
अर्थात तुम्ही छान लिहिता म्हणून वाचणे होतेच
पण मला ही कथा फार आवडली नाही.
शिव्यांचा आणि अश्या भाषेचा प्रॉब्लेम नाही. पण मला कुठे रीलेट झाली नाही. म्हणजे मला असे अनुभव आले नाही कधी ज्या तीन चार कंपनी मध्ये मी आजवर काम केले तिथे..
कदाचित अश्या मानसिकतेच्या लोकांमध्ये माझी उठबस नसेल त्यामुळे अनुभव नसेल.
तसेच मला कथा लिहिण्याचा उद्देश सुद्धा समजला नाही. म्हणजे तो असू शकतो. पण मला समजला नाही.

तुम्ही विचारलंय म्हणून प्रांजळ प्रतिक्रिया देत आहे; समजून घ्या. कथा पूर्ण वाचली. विषय किंवा त्याअनुषंगाने भाषा ह्याचा त्रास नाही झाला. सुरुवातीला फार रिपीटिशन वाटते; कॅरॅक्टर एस्टॅब्लिश करण्याचा भाग धरून सुद्धा. इथे TRP वाढवण्याची शंका आली. एका टेस्ट लीड ला एवढी सत्ता असणे, ह्याविषयी कंपनीत काही चर्चा न होणे, हे सर्व निर्वेध चालू राहणे हे थोडं अतिरेकी वाटतं. विषय चांगला आणि महत्वाचा होता एवढं खरं.

सर्व प्रतिक्रियाबद्दल वाचकांचे आभार. आवाहनाला मान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
कठीण गेलेल्या पेपराविषयी परिक्षकांनी बोलावून घेऊन चुका समजावून द्याव्यात (कान उपटावेत Lol ), यापरते भाग्य ते कोणते!
काही प्रतिसादांत आज ही गोष्ट घडू शकणार नाही असा मुद्दा आला. मोठ्या आयटी कंपन्यांत तरी नाही, असा सूर होता. हे आश्वासक आहे.
काहींनी आक्षेप घेतले भाषेवर, गोंधळात पाडणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्तीरेखांनी केलेल्या प्रथमपुरुषी निवेदनावर तर काहींनी कथेतले कच्चे दुवे दाखवले.
एकंदरच, जी घृणा उत्पन्न होणे हा कथेच्या मांडणीमागचा विचार होता तो साध्य झाला असे दिसते आहे.
या प्रतिसादांचा उपयोग यापुढील कथा मांडण्याच्या दृष्टीने होणार आहे, विषयांच्या निवडीसाठी होईल.
धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद,..

गंमत बघा. कॉर्पोरेट पद्मिनी आठवते आहे?
हा हैवान टेस्टर, तीसुद्धा टेस्टर.
हा बुद्धीमान, ती पण हुशार.
दोघेही कामाला वाघ.
पण ती सेवाभावी, आणि हा सत्तापिपासू. एक ग्राहकांची सेवा या वातावरणात वाढलेली, तर दुसरा सत्तेच्या मदात, सत्तेच्या छत्रछायेखाली.
मूलभूत फरक या जडणघडणीत आहे असे मा.वै.म.आ.!

काळ्याचे पांढरे होताना (आणि आता नाहीसे होताना) आलेले माणसांचे अनुभव कथास्वरूपात मांडता येतात, ही माबोची कृपा.

पॉश आणि बाकी गोष्टी कंपनीज ला iso आणि लेबर लॉ मुळे अस्तित्वात आहेत आणि काम करतात अश्या दाखवाव्या लागतात.

असे गुन्हे ऑन पेपर आले तर खूप गंभीर दखल घ्यावी लागते.केस वर कथेत असलेल्या हैवानासारखी खूपदा हे करणारी नसेल, एकच तक्रार आली तर पॉश चे गुन्हे ऑन पेपर येऊ नये, संबंधित माणसाला कडक समज देऊन, सन्माननीय पद्धतीने रिझाईन करून तो जाईल असे प्रयत्न पॉश कमिटी आणि मॅनेजमेंट करते. कारण पॉश च्या केसेस हे दुहेरी हत्यार आहे.ज्याच्यावर जाहीर केस, कारवाई झाली, मीडियात काही आलं तर माणूस पूर्ण पुढचं करियर बाद होऊ शकतो.

कधीकधी माणूस कामात, कस्टमर रिलेशन मध्ये इतका उपयोगी असतो(म्हणजे हा गेला तर अमुक हजार डॉलर्स चा बिझनेस गेला किंवा डळमळला, याच्या टेक्निकल स्किल्स ची माणसं मिळणं कठीण) की त्याच्यावर पुढे बारीक नजर ठेवून पहिला गुन्हा संशयाचा फायदा देऊन माफ केला जातो.

बायकांचं कंपनीत स्वतःचं कँटीन वॉशरूम इनफॉर्मल नेटवर्क इतकं पक्कं असतं की 'हा अमका माणूस असा आहे, काही वर्षांपूर्वी ती अमकी केस झाली होती' हे जवळजवळ सर्वांना माहीत असतं.त्यामुळे पुढे आपोआप 100 नजरा लक्ष ठेवतात.

(हे फक्त कॉर्पोरेट आयटी कंपनीजचं बोलतेय.अनेक जागी जिथे करता येतात, पॉश अस्तित्वात नाही किंवा नावापुरती आहे(पॅनल मध्ये ज्यांची नावं त्यातले 80% लोक कंपनी सोडून गेले/परदेशात आणि प्रचंड व्यस्त आहेत, किंवा पॉश कमिटी नाहीच) तिथे हे प्रकार सर्रास चालू असतात याची जाणीव आहे.शेतकरी, फॅक्टरी कामगार वर्ग, हाऊसकिपिंग अश्या अनेक जागी सत्तेचा धाक दाखवून केसेस होतात.)

कँटीन वॉशरूम इनफॉर्मल नेटवर्क इतकं पक्कं असतं की>>>>
खरं आहे. पण इथेही कोणत्याही ग्रुपमधे नसणारीला/नव्या आलेल्या मुलीला पटकन ही माहिती मिळत नाही. सगळ्यात जास्त व्हल्नरेबल ग्रुप हाच असतो.

भाषा हवी तशी पकड बिलकुल घेत नाही. जुनीच दारू नवीन बाटलीत टाईप ओढून ताणून वाला प्रकार वाटला. विचार प्रवर्तक / समाज जागृती वगैरे गोष्ट लिहिण्याचा उद्देश असावा कदाचित पण कथेची थोडी सरमिसळ झालीय असे वाटते आणि त्यामुळे न धड पुणेरी मिसळ ना धड कोल्हापुरी मिसळ बनली.
उदा. -
गल्लीच्या रस्त्याचं काम चालू झालं. साली कॅब आत जायची सोय --- कुठल्या ग्रामीण भागात कॅब आहेत ?

विचारलं त्याला, गावात राह्यचंय नं? साला मामा सरपंच आपला --- इथे ग्रामीण भागातील कॉर्पोरेट असेल तर नक्कीच आज सुद्धा असे हैवान कार्यरत असणार

वीकेंडला xxxxxxxxx मिरवत हिंडायची मॉलमध्ये ---- ग्रामीण भागात पण शहराजवळ नोकरी असे मांडले आहे का एकंदर ? मग त्या तूटपुंज्या पगारवाल्याना कॅब सर्विससुद्धा असते की बस सर्व्हिस असते ?

कथा आज वाचली, मायबोलीवर आलो नव्हतो इतक्यात फारसा. कथेतील हैवान, त्याच्या एकंदर विचारप्रणालीवरून माजलेल्या खानदानातील असावा, आणि त्यांची भाषा जशी लेखकाने मांडली आहे तशी असू शकतेच. एका खूप जवळची, मराठवाड्यातल्या विकसनशील शहरात BE mech शिकलेली हुशार मुलगी, मुंबईत नोकरीला लागली. mech असल्याने कम्पनीत मुलांची संख्या खूप, 99%.. फ्लोअर तसा लहान, मदत करण्याच्या बहाण्याने खुर्चीच्या मागून मानेपाशी तोंड आणून बोलणारी 2 पोरं.. कावरीबावरी झालेली ती मुलगी, फ्रेशर असल्याने घाबरून आणि शहरात असं असू शकतं, आपण जास्त विचार करतोय असंही वाटून ती गप्प बसली, पण त्यामुळे 2 दिवसात पोरांची भीड अजून चेपली. तिसऱ्या दिवशी सरळ हॅट धरला, वाट अडवली, मुलगी चिडली, म्हटली मी मॅनेजरला तक्रार करते, ती पोरं म्हणाली, मॅनेजर आमचा बाप, काका आहे, जा सांग.

दुसऱ्या दिवसापासून तिने जॉब सोडला, आता जॉबची धास्ती कायमची तिच्या मनात बसलीय.

कथा वाचली. साला हा शब्दप्रयोग बरेच वेळा उगाच आलाय असे वाटले. बाकी आताशा असले काही मॅटर आले तर अंग काढून घेतो, नकोच वाटते.. २०१३ ला कायदा आला तेंव्हा बरीच कायदे विषयक ट्रेनिंग सेशन घेतली होती, आधी एच आर साठी मग आय टी क्राउड, फॅक्टरी ई ठिकाणी, अगदी व्हाइट कॉलर आणि शॉप फ्लोअर दोन्ही साठी. त्याआधी पण विशाखा जजमेंट होतेच. मग हळू हळू केसेस येऊ लागल्या/ रिपोर्ट होऊ लागल्या. कधी खऱ्या, कधी खोट्या. स्वरूप पण कधी कधी काहीही असते, म्हणजे काहीही.. आताच एवढ्यात बजाज अलियांजची गाजली होती. ह्या कायद्या खालच्या केसेसचा लेखाजोखा डायरेक्टर रिपोर्टला द्यावा लागतो स्वतंत्र हेडिंग खाली. त्यामुळे काय आणि किती रिपोर्ट होत असेल ते सुज्ञास कळलेच असेल.

Pages