नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नानावटी Lol

लंपन, अच्छा. मग शर्विल= ?.
मृच्छकटिकम् बद्दल सविस्तर लिहा नक्की. वाचायला आवडेल. जमल्यास वेगळा धागा.

नांदेड - सिडको भागात भाजी मंडईचे नाव - महात्मा फुले फळे व भाजी मार्केट असे वाचलेले आठवते.

आका नंतर आता हा धागा स्ट्रेस बस्टर झालाय Lol
लेखिका विचार करत असेल काय म्हणुन धागा काढला. लोकांनी कुठे नेला>>> हो ना Wink

आमच्या बिल्डींग मधे २ काका लोक भाऊ-भाऊ आहेत, नावे आबा & बाबा. माझे पप्पा कायम म्हणतात, ह्यांच्या तिर्थरुपांनी जरा ही डोक्या ला जोर न लावता पोरांची नावे ठेऊन दिली आहेत, तोंडाला येतील ती.
माझ्या १ इन्शुरन्स एजंट चे नाव "पार्श्व" गुजराती आहे..मला १ च अर्थ माहितेय ह्या नावाचा. Sad मी त्याला मि. शहा म्हणते.

सध्या वरच्या तेलूगू कुटुंबातल्या १ मुलाचे नाव- आश्रित. माझ्या माहिती प्रमाणे अर्थ आहे शरण/आश्रयास आलेला. म्हणजे काहितरी दीनवाणा टाईप अर्थ होतो ना? असे नाव का ठवले असावे.. अजून एखादा अर्थ असावा.

वर पार्थिव शब्द आला आहेच. मला प्रेत हाच अर्थ माहित आहे, दुसरा अर्थ काय आहे?

पार्श्व >> हे बहुतेक पार्श्वनाथचे (जैन समाजाचे तीर्थंकर) संक्षिप्त रूप असावे. पण याही नावाचा काय अर्थ असेल?

पार्थिव >>> मातीपासून बनलेला...पृथ्वी तत्वाचा अंश असलेला. प्रेत हा अर्थ नंतर आला असावा ('माती असशी मातीस मिळशी' सारखा)

पार्श्व

मुंबईत “पार्श्वभक्ती” एका बिल्डिंगचे नाव वाचले आहे. हसू आवरणे अशक्य झाले होते Lol

पार्श्वभक्ती Lol
तर अशी पार्श्वभूमी आहे नावाची.

पार्श्वनाथ मूळव्याध, भगंदर, बवासीर क्लिनिक. रोगी मथुरा रेल्वे फाटक के पास मिले.
ही पाटी झेलम एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस ने गेलेल्या मराठी माणसाने पाहिलीच असेल.

'सु-पार्श्व' !

नावाची प्रेरणा काय, कोण, कुठून सुचली असेल याची उत्सुकता आहे.

पार्श्वभक्ती साठी मात्र पूजाविधी, स्तोत्रे, शंखारती आणि प्रसाद सर्वच बाबतीत विचारसुद्धा करवत नाही Lol

सुपार्श्वनाथ है जैनाचे ७ वे तीर्थंकर तर पार्श्वनाथ हे जैनांचे २३वे तीर्थंकर आहेत. त्यामुळे जैन मंडळी ही नावे त्यांच्या दुकानाला, ऑफिसला देत असावी.

हर्पा, नाही सापडला हा शर्विल कुठे. पण एवढा जुना संदर्भ आहे तेंव्हा काहीतरी व्युत्पत्ती किंवा अर्थ असावा. विकांताला बघेन परत.

माझ्या माहितीत एक डॉक्टर "झाला" म्हणून होते. आणि लहान पणी "एन् आर सी" मध्ये आमचे फॅमिली डॉक्टर होते के एम् पटेल. सगळे जण त्यांना केम(छो )पटेल असं म्हणायचे . Lol

झाला हे राजस्थान आणि गुजरात भागातले कॉमन
आडनाव आहे. “झालावाड”, “झालारापाटण” असे नाव असलेला जिल्हा / तालुका आहे.

सुपार्श्वनाथ है जैनाचे ७ वे तीर्थंकर तर पार्श्वनाथ हे जैनांचे २३वे तीर्थंकर आहेत. त्यामुळे जैन मंडळी ही नावे त्यांच्या दुकानाला, ऑफिसला देत असावी.>> हो कोल्हापूर ला पण एक दुकान आहे सु पार्श्व नावाचे. दुकान लहान आहे पण अप्रतिम चादर, अभ्रे, शो पायपुसणी, मच्छरदाणी वगैरे मिळतात.. खूप days साबा सतत हे नाव घेत व मला काही केल्या कळायचे नाही, उच्चारही कळायचा नाही व असे का नाव हेही नाही कळायचे शेवटी एकदा दुकानात गेल्यावर नाव नीट कळले आणि ते जैनांचे ते तीर्थकर आहेत वगैरे.

सध्या कुठेतरी बुद्ध्ही बळ स्पर्धा चालू आहेत. त्यात एक प्लेयर चे नाव डी. गुकेश आहे. काय हे नाव?! टमरेल घेउन चाळीच्या संडासासमोर उभे राहिल्याचे फिलिन्ग येते. सकाळी पेपर उघडला की तोच वर कोपर्‍यात फोटो व नाव असते.

name Gukesh means "Virtue, God Murugan or Kanthan" हे वाचुन रेवती ताई नावावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे

या न्यायाने 'कुंडीत झाड लावले' हे तमीळ लोकांनी इमॅजिन केले तर द लास्ट किंगडम मध्ये ब्रिडा स्टॉरी (Storri) चे जे हाल करते तो सीन त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील.

Pages