हसरा चेहरा आणि साफसुथरा वेष त्याचा
वाजवित डंका,
संगे झिंदाबाद बोलणारा तांडा सारा
अंगणी माझ्या हात जोडीत आले
याचक खरा पण अतृप्त बिच्चारा
विनम्रतेचे भाव लोचनी, अगतिक मुद्रा
माना उंचावीत मताची याचना करावया
अंगणी माझ्या हात जोडीत आले
गोठ्यातल्या गायीने हंबरडा फोडीला
कुत्र्याने देखील भू भू चा नारा दिला
परी साथ हवी अस्तित्व सावराया म्हणोंनी
अंगणी माझ्या हात जोडीत आले
कितीतरी वेळा ते आले, विजयी झाले
भ्रष्टाचारी म्हणून मस्तीत जगले...
निवडणूक येता आमची आठवण झाली
दर्शवीत अभाग्याच्या वेदना
दु:खितांच्या कळा ज्यांच्या हृदयी
अंगणी माझ्या हात जोडीत आले
माझ्या अमूल्य मतासाठी केविलवाणी
धडपड त्यांची, विनवणी करी मजला
मताच्या दामाचे गुर्हाळ बोलला
फक्त पुन्हा तुमची साथ द्या मजला
लोकशाहीचा पाइक, वाडगा नव्हता हाती
तरीही भीक मागत फिरत फिरत
अंगणी माझ्या हात जोडीत आले
र्हासलेल्या, झुंजनार्या जनतेला झुलवित
उपजत कलेचा अभिनेता नव्हे नेता
अंगणी माझ्या हात जोडीत आले
अशोक भेके
छान.
छान.