Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त काढलय!
मस्त काढलय!
वाह! खुप सुरेख! गिफ्टेड +१
वाह! खुप सुरेख! गिफ्टेड +१
एक ऊनाड सिंबा
एक ऊनाड सिंबा
सिंबा सिली फेस!
सिंबा सिली फेस!
माउईला ह्यूमन फूड आवडते. माउई ह्यूमन्स सारखा उशी घेऊन झोपतो. माउई हळू हळू ह्यूमन होत चालला आहे असं आम्ही गमतीने म्हणतो
बॉल वगैरे फेकला की पहिले हातच पुढे येतात पकडायला. त्याचे एक रील केले होते.
https://www.instagram.com/p/C3z-1wRuOKS/
डेंजर फोटो आहे सिंबा चा.
डेंजर फोटो आहे सिंबा चा.
माऊई आता बोलायलाच लागेल बहुतेक.'हां, चहा चं कुठवर आलंय?पोळी झाली का?' वगैरे.
क्युटी पाय सिंबा व माउली.
क्युटी पाय सिंबा व माउली.
आमच्या कडे मध्येच आजार पण येउन घरी डुचक्या म्हशी सारखी बसुन राहते. जागेवर अन्न पाणी. आम्ही तिला रिकव्हरी फूड देतो. हे बारक्या डब्ब्यातुन येते. व दोन चमचे पुरते पाणी घालुन. वाटीभर होते. पण काल उत्साह संचारला म्हणून वॉकला आली. आज सकाळी सात वाजताच वॉक ला जागी. मग करुन आलो वॉक. नो अॅक्सिडेंट. ज्येना डॉग. ज्येना ओनर. फिदी फिदी.
हरितात्या,तुमच्या लेकीने
हरितात्या,तुमच्या लेकीने सिंबाचे एकदम सही चित्र काढले.आताच्या फोटोवरून एकदम आधीचे चित्र आठवले. येडाबागडा सिम्बा.
माऊई एकदम गोड आहे.
ज्येना डॉग. ज्येना ओनर. .... अमा, आवडलं.
हरितात्या, गुगलने डुडलकरता
हरितात्या, गुगलने डुडलकरता प्रवेशपत्रिका मागविल्या आहेत. विचार करावा - https://doodles.google.com/d4g/?utm_source=HPP&utm_medium=Owned&utm_camp...
*जणू अल्ट्राच्या अंगात डॉ
*जणू अल्ट्राच्या अंगात डॉ लेलेंचे प्राण आले होते*
*निसर्गालाही आश्चर्य वाटावी अशी थरारक घटना*
लेखक
दीपक प्रभावळकर, सातारा
सातारा ही डॉ. नरेंद्र दाभोळकरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे इथं अंधश्रद्धेला थारा नाही. पण श्रद्धेलाही कोडं पडावं असं सातार्यातच आश्चर्य घडलंय. एक रस्त्यावरचं भटकं कुत्रं अचानक देशभरांत चर्चेचा विषय बनलंय. निसर्गाच्या पुढे जाऊन कांहीं घटना घडतात, त्याच्यात रममाण होऊन जाऊन त्याला मनोभावे नमस्कार करणं आणि डोळय़ादेखत घडलेल्या चमत्कारावर विश्वास ठेवणं यापेक्षा काहीच आपण करू शकत नाही. सातार्याची ओळख ही मॅरेथॉनसिटी किंवा धावणार्यांचं गाव म्हणून झाली आहे. याच सातार्याच्या शिवतीर्थ तथा पोवईनाक्यावरचं एक भटकं, अत्यंत मरतूंगडं कुत्रं या सार्याचा हिरो बनलंय. *‘एकाच गल्लीत पडेल ते खाऊन त्याच गल्ली मरण'ं म्हणजेच त्याला ‘कुत्र्याचं जगणं*' म्हंटलं जातं. पण एका दिवसांत शिवतीर्थावरील या कुत्र्याला केवळ नावचं नाही तर फेम, प्रसिद्धी, प्रेम आणि नाव पण मिळालं. जगभरातल्या मॅरेथॉन धावणार्यांच्या गळय़ात ताईत झालेल्या या कुत्र्याची निसर्गालाही कोडय़ात टाकणारी ही थरारक कथा......
सातार्याच्या हिल मॅरेथॉनने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहेच. पण सातारकर अन्य मॅरेथॉनला प्रमोट करत असतात. सांगलीत हुतात्मा अशोक कामटेंच्या नावाने मॅरेथॉन होते. यंदा ती रविवारी पार पडणार आहे. देशभरातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने सातार्याचे कन्स्ट्रक्शन व्यावसायिक निरंजन पिसे, हे गेली तीन वर्षे सातारा ते सांगली धावत जातात. यंदा त्यांच्या या श्रद्धांजली दौडला दुःखाची किनार होती कारण निरंजनला धावण्याची आवड लावणारे *डॉ. संदीप लेले* यांचे गेल्याचे वर्षी अपघाती निधन झाले. सातार्याचे पत्रकार पांडुरंग पवार व डॉ. आशा जोशी यांचेही याचवर्षी निधन झाले.
हुतात्म्यांसह डॉ. संदीप लेले व या दोघांना श्रद्धांजली वाहून शिवतिर्थावरून शुक्रवारी पहाटे दौड सुरू होणार होती. निरंजनसोबत कराड-मलकापूरचे कर्मचारी मारुती चाळके हेही संपूर्ण दौडमध्ये त्यांची साथ करणार होते. मग शुक्रवारी पहाटे या दोघांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे व सहकारी दोघांसोबत किमान 10 किलोमिटर धावणार होते.
शुक्रवारची पहाट झाली. शिवतीर्थावर शिवरायांना अभिवादन झाले पण कै. डॉ. संदिप लेले, पांडुरंग पवार, डॉ. जोशींच्या तसबीरीला अभिवादन करताना साऱयांचा कोलाहल झाला. डॉ. संदीप लेले हयात असते तर कदाचित आले असते या दौडला.... अशी कांहींशी भावना होती.
सोपस्कार झाले आणि प्रत्यक्ष धावायला सुरूवात झाली आणि मध्येच भटकं कुत्रं घुसलं. हाकलण्याचा प्रयत्न केला तरी हटेना. मधनंच पळत होतं. बरं, सोबत धावणारे सगळे इंटेलेक्चुअल लोक. डॉक्टर, वकिल असे. मग साऱयांनी धावत-धावत एकमेकांना खुणेनंच असू दे पळु दे कुत्र्याला.
बरं, गाडीमागून धावणारी कुत्री सगळय़ांनी अनुभवली आहेत. त्यांची धाव फार फार तर दोनशे मिटरपर्यंतच असते. पण हे कुत्रं अगदी हायवेपर्यंत धावत आलं. सगळय़ांच्या आश्चर्याचा विषय बनल्यानं त्यांचे फोटो काढणं, त्याचा व्हिडिओ काढणं सुरू झालं. काही केल्या त्याचं धावणं थांबेना म्हंटल्यावर अनेकांच्या अंगावर आता तर काटाच येऊ लागला होता. शेवटी निरंजन पिसे आणि मारूती कांबळेंना निरोप देऊन इतर धावपटू मागे फिरणार होते. सगळे थांबले तसं कुत्रं पण थांबलं. सगळय़ांनी त्याचे लाडकोड केले. कुणी बिस्कीट तर कोणी पाणी दिलं. बाकी मागे फिरले अन् निरंजन-मारूती सांगलीच्या दिशेने.... गंमत म्हणजे ते कुत्रं त्या दोघांच्या मागे धावायला लागलं....
सकाळचे दहा वाजू लागलेले. ऊन्हं तापू लागलेलं. कुत्रं धावतंच आहे. थांबेल तिथं पाणी-बिस्किट की पुढं..... निसर्गाचा चमत्कार डोळय़ादेखत घडतोय.... हे सगळं कसं शक्य आहे, याचा विचार पण धावत धावत करवेना. अखेर 40 किलोमिटरचा टप्पा ओलांडल्यावर निरंजनने फेसबूक लाईव्ह केल्यावर सार्यांना धक्काच बसला..... एक अनोळखी, गावठी-बावठी त्यातही तब्बेतीनं गुबगुबीत आहे असं पण नव्हे तर चक्क मरतूंगडं कुत्र 40 किमी....? नेटीझन्सच्या उडय़ा पडू लागल्या. ‘तरुण भारत'नेही कालच दखल घेतली.
सातार्यातून धावत आतां कराड मागं पडलं होतं म्हणजे 50 किमी होऊन गेलेले. पण कुत्र्याचा तोच सीन सुरू होता. सरतेशेवटी 85 वरील मुक्कामचं इस्लामपूर आलं. हॉटेल बालाजीमध्ये मुक्काम होता. कुत्रं तिथंच घुटमळत होतं म्हणून निरंजन-मारूती यांनी त्याला आपल्याच रूममध्ये झोपायला घेत.
एका रात्रीत जगभरातल्या रनर्स कम्युनिटीचा हिरो झालेला हा डॉग निसर्गाचा चमत्कार दाखवत होता.
धावताना रनर्स ‘हायड्रेशन' करत असतात. म्हणजे अंगावर पाणी ओतून वॉर्म झालेलं अंग थंड करण्याचा प्रयत्न असतो तो. गंमत म्हणजे हे कुत्रंसुद्धा धावताना मध्येच कुठल्या शेतात पाटाचं पाणी वाहत असेल तीथं जाऊन डुबक्या मारून पुन्हा धावायला लागायचा. बरं, हा काही एक-देन मिनिटांचा किंवा एक-दोन तासांचा नव्हे तर आख्ख्या दिवसभराचा व 85 किलोमिटरचा प्रकार होता. कुत्र्याला हायवेने पळताना ट्राफिक, प्रचंड वेगाने पळणार्या गाडय़ा, अजस्त्र ट्रक हे आडथळे होतेच पण रस्त्यावरची, गावामधली इतर कुत्री याच्यावर भूंकण्याचा वेगळाच अडथळा होता.
वाचतानाही आश्चर्य वाटेल पण, ‘हाती चले अपनी चाल, कुत्ते भोकें हजार' या म्हणी प्रमाणे त्याचं सुरू होतं. कोणी भुंकलं तर त्याच्यावर भुंकण्याचा कुत्र्याचा मुळचा निसर्गदत्त स्वभाव आहे. पण पूर्ण रस्त्यात हे कोणावर भुंकलं नाही की कोणाच्या भुंकण्याने विचलीतही झालं नाही. आज हे कुत्रं म्हणीतल्या त्या हत्तीच्या भुमिकेत होतं.
इस्लामपुरच्या मुक्कामाची पहाट झाली. निरंजनला जाग आली की खट्टकन् हे कुत्रं उठून बसलं. आवराआवरी झाली निरंजनसोबत आलेल्या कारमध्ये सगळं भरलं आणि दौड सुरू केली तसं कुत्र्याचंही धावणं सुरू.....
शनिवारी पहाटे मात्र सर्वांच्याच डोक्याच्या शिट्टय़ा वाजल्या... काय घडतंय, कसं घडतंय? अहो, पण हे शक्य आहे का? मुळात हे खरंय ना? अहो, जनावरांच्या वेलनोन डॉक्टरला विचारलंय, तेही म्हणताहेत की, शक्यच नाही. गावठी कुत्रं असं उठून शंभर किमी धावूच शकत नाही. सगळीकडून शंका व नकारघंटा वाजत होत्या त्याच वेळी या तिघांची दौड सांगलीच्या नजिक पोहोचत होती.
रनर्स कम्युनिटीबरोबर हा विषय चांगलाच व्हायरल झाला होता. सांगली मॅरेथॉनचा शनिवारी एक्स्पो असल्याने गडबडी गुंतलेले संयोजकही यांच्या स्वागताला आतूर होते. सोशल मिडियासह इलेक्ट्रॉनिक मिडियाचे कॅमेरामन, प्रिंटमिडियाच फोटोग्राफर आता निरंजन पिसे व मारूती चाळकेंच्या पेक्षा या कुत्र्याच्या मागेच धावत होते.
आपण सारे उत्सवप्रिय लोक असल्याने कुत्र्याच्या सांगली स्वागताचाही एक चांगला उत्सव झाला. कोणाच्या जवळ गेलं तरी ‘हाड, हाड' याशिवाय मनुष्यकडून कोणताच अनूभव न घेतलेलं हे कुत्रं साऱया गर्दीचं कौतुक झाला होता. फोटो, सेल्फी इतकंच काय अनेकांच्या किशी, हगज् त्याला मिळत होते....
सारा उत्सव पार पडला. सगळी मिडिया निरंजन व मारूती चाळकेंकडून निसर्गाचा हा चमत्कार कसा घडला हे जाणून घेत होते पण साऱया घटनेचा हिरो मात्र शेपटीसुद्धा न हलवता जणू सावधानमध्ये शांत उभा होता.
याला असं ‘कुत्रं' म्हणणं आता सगळय़ांच्या जीवावर येत होतं. वास्तविक मॅरेथॉनच्या दुनियेत जे लांब-लांब अंतर धावतात त्यांना ‘अल्ट्रा रनर्स' म्हणतात त्यामुळे कोणत्या पाळण्यात न घातला आपोआपच या कुत्र्याचं ‘अल्ट्रा' हे नाव एका दिवसांतच निश्चित झालं.
मुळात निरंजन पिसे हे मॅरेथॉनमध्ये पेसर (मार्गदर्शक रनर) म्हणून धावतात. आज तब्बल 130 किलोमिटर धावून झालं असलं तरी ते रविवारी सांगलीत काही ना काही किमी धावणार आहेत आणि अल्ट्राच्या बॉडी लॅग्वेजवरून तोही धावणार आहे, हे निश्चित वाटत आहे.
आश्चर्य वाटण्याचा सातारकरांचा कडेलोट झाला होता. या सार्याची एका वाक्यात भावना व्यक्त करायची झाली तर सार्यांची मुखी एकच वाक्यं होतं, जणू, अल्ट्राच्या अंगात डॉ. संदीप लेलेंचे प्राण आले असावेत.....!
-दीपक प्रभावळकर
9325403232 फोन
9527403232 व्हाटसऍप
https://www.facebook.com
https://www.facebook.com/BhuinjActivityClub/videos/934000057058171/
youtube वर पाहिली हि न्युज व
youtube वर पाहिली हि न्युज व ते भटके श्वान 'अल्ट्रा' ला पण पाहिले .
आई गं! आश्चर्य आहे खरंच. काय
आई गं! आश्चर्य आहे खरंच. काय विचाराने तो इतके लांबवर धावला असेल कुणास ठाऊक!
इतके सगळे होऊन निदान त्या बिचार्याला कुणीतरी अडॉप्ट केलं तर छान होईल.
ओह किती आश्चर्यजनक आहे हे
ओह किती आश्चर्यजनक आहे हे
आश्चर्य आहे ... इतका लांबवर
आश्चर्य आहे ... इतका लांबवर कसा धावला असेल
(No subject)
खरंच आश्चर्यजनक आहे!
खरंच आश्चर्यजनक आहे!
ही न्यूज युट्युबवर शोधताना अजून एक अशीच बातमी दिसली ८ वर्षापूर्वी अलाबामा मधे एका कुत्र्याने चुकून हाफ मॅरेथॉन केली आणि ७ वा नंबर आला.
आश्चर्य आहे ... इतका लांबवर
आश्चर्य आहे ... इतका लांबवर कसा धावला असेल
नवीन Submitted by मृणाल १ on 29 February, 2024 - 06:01>>>>>>>>>> चार पायांवर
खरंच खूप आश्चर्य आहे.
खरंच खूप आश्चर्य आहे.
आज सिंबा २ वर्षाचा झाला
आज सिंबा २ वर्षाचा झाला
अरे कुठे गेले सगळे ? एकही
अरे कुठे गेले सगळे ? एकही पोस्ट नाही
Happy birthday to Simba.
Happy birthday to Simba.
मी कोकोनटला गाई दाखवायला नेलं होतं. घराजवळ फार्म आहे. अधुनमधून बघायला जातो.
हे रोजचे वॉक.
Belated happy birthday Simba!
Belated happy birthday Simba!
कोकोनटला गाई दाखवायला नेलं होतं. ....... लहान मुलांना ट्रेन/विमान दाखवल्यानंतर त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते तशी याची असते की आपले शांत न्याहाळत बसतो?
हा मॅक्स .. माहेरच्या घरचा
हा मॅक्स .. माहेरच्या घरचा मेंबर .. स्वतःच लीश स्वतःच घेऊन पळतो.
गोड दिसतोय कोकोनट. मलापण
गोड दिसतोय कोकोनट. मलापण लहान मुलांना "हम्मा बघायला जायचं का..." हेच आठवलं
मॅक्स हॅण्डसम दिसतोय.
अरे सिंबाचे फोटो मिस केले
अरे सिंबाचे फोटो मिस केले होते! इन्स्टा वर विश केले होते पण पुन्हा एकदा (बिलेटेड) हॅपी बड्डे टु गुब्बॉय सिंबा!!
स्वतःच लीश स्वतःच घेऊन पळतो. >>>>> मॅक्स कोकोनट पण क्यूट.
मॅक्स हॅन्डसम. कोकोनट
मॅक्स हॅन्डसम. कोकोनट गोजिरवाणा!
हो, 'हम्मा दै' बघायलाच
स्वतःच लीश स्वतःच घेऊन पळतो. >>>>> मॅक्स क्यूट.
हो, 'हम्मा दै' बघायलाच प्रज्ञा
देवकी तै, थोडा घाबरला आणि थोडी मजा आली. कारण गाई नंतर आमच्याकडे रोखून बघत हळूहळू फेन्सपाशी आल्या. मी तर त्याला झू बघायला नेणार होते पण तिथे कुत्रे चालत नाहीत. त्याला शिकवले आहेत काही शब्द आणि असोसिएशन -- मनिमाऊ, डॉग, गाय, दादा, ताई, पाणी वगैरे शब्द कळायला लागले आहेत.
'ये गं मना माझी' म्हटलं की कुठूनही येतो आणि माया करतो. मी मुलाला माया केली की जळफळाट होतो कुठूनही आमच्यामधे घुसतो, 'मी आहे तुझा खरा मुलगा' वाटतं त्याला. मुलीचा मात्र काही हेवा वाटत नाही. लेक त्याला गमतीने म्हणाली, 'तू ॲडॉप्टेड आहेस कोकोनट, दादा खरा मुलगा आहे. तू सिंड्रेला आहेस'.
(No subject)
मॅक्स एकदम खुष दिसतोय…. काही
मॅक्स एकदम खुष दिसतोय…. काही विशेष कारण?
कोकोनटच नाव बदलून मोदक ठेवा… हा कायम ईतका गोड दिसतो कुठल्याही फोटोत
>>>>>घराजवळ फार्म आहे.
>>>>>घराजवळ फार्म आहे. अधुनमधून बघायला जातो.
सुंदर. मला असं आवडलं असतं.
Pages